Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ 118 bölüm

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

Yazar

Sakal Media

Kategori

News

Podcast web sitesi

audiowallah.com

Son bölüm

10 Tem 2026

Nereden dinlenir?

Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakında

Podcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol

Google Play'den indir Ücretsiz yükle Android 5 Mn+ indirme · 4,8 puan iOS yakında

Bölümler

RAJ'KARAN PODCAST : सोनिया गांधी नऊवारी नेसून उतरल्या होत्या शरद पवारांच्याविरोधात मैदानात; अनंतराव थोपटेंसाठी पणाला लावली होती ताकद! 10.07.2026

१९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या बंडानंतर सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात थेट शरद पवारांच्या राजकीय बालेकिल्ल्यात उतरून काँग्रेसची ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी त्यांनी नऊवारी साडी नेसून सभा घेतली. या सभेमागील राजकीय रणनीती, शरद पवार विरुद्ध सोनिया गांधी...

RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण इतिहास! 03.07.2026

छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व, घाटावरील नेत्यांची नाराजी आणि त्यातून घडलेले राजकीय भूकंप उलगडतो. भुजबळांच्या बंडातील १७ आमदारांपासून ते शिंदे...

RAJ'KARAN PODCAST : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्या वादाची फुल हिस्ट्री! 26.06.2026

भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "नार्वेकर कोण लागून गेला?" या वक्तव्यामुळे २२ वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा समोर आला. २००४ मध्ये तिकीट कापल्याचा आरोप करत भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. मात्र २०१९ मध्ये याच नार्वेकरांनी जाधवांची शिवसेनेत घरवापसी घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मग नेम...

RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारणच फिरलं! 19.06.2026

1991 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं आमदारपद जाणं निश्चित मानलं जात असतानाच विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण खेळच बदलून गेला. 16 आमदार परत फिरल्यानंतरही भुजबळ कसे वाचले? काय होती कायद्यातील ती पळवाट? आणि या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजका...

RAJ'KARAN PODCAST : 50 मृत्यू, 2000 जणांना अटक अन् डॉक्टरकीचा काळाबाजार : इतिहासातील थरकाप उडवणारा रक्तरंजित घोटाळा! 12.06.2026

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप उसळला असतानाच पुन्हा चर्चेत आलाय मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळा. हजारो कोटींच्या या रॅकेटमध्ये मेडिकल प्रवेश, सरकारी नोकऱ्या, दलाल, अधिकारी, राजकारणी आणि संशयास्पद मृत्यूंची मालिका समोर आली होती. तब्बल ५० मृत्यू, २००० पेक्षा अधिक अटक आणि सीबीआय चौकशीमुळे हादरलेलं शिवराज सिंह चौहान सरकार… नेमकं काय होतं व्यापम प्रकरण? कसा चालत होता हा काळाबाजार? आण...

RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वाजपेयींचं सरकार हादरलं होतं! 05.06.2026

१९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना दिल्लीहून चेन्नईला हलवावा लागला आणि अखेर लालकृष्ण अडवाणींना स्वतः मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ...

RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेबांच्या एका निर्णयाने बदलला सत्तेचा खेळ : गोष्ट शिवसेनेतील सर्वात मोठ्या संघर्षाची 29.05.2026

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची ही Inside Story! बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षाचा वारसदार कोण होणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 1990 च्या दशकातील शिवसेनेतील वाढत गेलेले मतभेद, रमेश किणी प्रकरणानंतर बदललेलं राजकीय समीकरण, 1997 आणि 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुका, आणि अखेर उद्धव ठाकरेंसाठी तयार करण्यात आलेलं ‘कार्याध्यक्ष’ पद… या सर्व घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बद...

RAJ'KARAN PODCAST : एका नौदल प्रमुखांमुळे पाडलं होतं वाजपेयींचं सरकार; दिल्ली हादरवणाऱ्या बंडाची Inside Story 22.05.2026

१९९८-९९ मध्ये भारताच्या राजकारणात असा संघर्ष घडला, ज्यामुळे थेट केंद्र सरकारच कोसळलं. नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत यांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निर्णयाला उघड विरोध केला आणि त्यानंतर त्यांची बडतर्फी झाली. या प्रकरणात जयललिता, सोनिया गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी, शरद पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांची एंट्री झाली आणि अखेर अटलबिहारी वाजपेयी सरकार एका मताने कोसळलं. भारताच्या लोकशाही, सै...

RAJ'KARAN PODCAST : नरसिंहरावांचं सरकार वाचवायला शिवसेना खासदार धावला : बाळासाहेबांनी राजकारणातूनच संपवलं 15.05.2026

१९९३ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव सरकारविरोधात अविश्वास ठराव आला होता. सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता असताना शिवसेनेचे परभणीचे खासदार अशोक देशमुख यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा झाली. JMM लाचकांडात मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि देशभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी याला थेट गद्दारी मानत देशमुखांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत सामान्य शिवसैनिक सुरेश जा...

RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक 08.05.2026

१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या...

RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य? 01.05.2026

पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभ...

RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा 24.04.2026

धाराशिवच्या राजकारणात पवन राजेनिंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील या चुलत भावांच्या नात्याने एक वेगळाच इतिहास घडवला. सहकार क्षेत्रातून सुरू झालेला त्यांचा एकत्र प्रवास पुढे सत्तेच्या संघर्षात बदलला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा बँक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. 2004 च्या निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीनंतर हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि 2006 मध्ये पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्ये...

RAJ'KARAN PODCAST : खरात, एरंडे प्रकरणाआधी ‘जळगाव स्कँडलने’ हादरला होता महाराष्ट्र : 30 वर्षांनंतरही पीडित महिलांचा होतो थरकाप 17.04.2026

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या जळगाव सेक्स स्कँडलची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रभावशाली टोळीने महिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा हा धक्कादायक प्रकार होता. मीरा बोरवणकर यांच्या तपासातून प्रकरण उघडकीस आले, पण अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates...

RAJ'KARAN PODCAST : भारताने स्वतःच्याच विमानाचं हायजॅक घडवून आणलं अन् ऑपरेशन बांग्लादेश फत्ते झालं... 10.04.2026

1971 मध्ये Research and Analysis Wingच्या रणनीतीतून भारतीय विमान हायजॅक प्रकरण घडले. यामुळे भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली, त्यांचा हवाई मार्ग बंद केला आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोठा रणनीतिक व लष्करी फायदा मिळवला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, 1971 hijacking, Ganga aircraft, Indian A...

RAJ'KARAN PODCAST : संघर्ष, सत्ता, ग्लॅमर आणि वाद... रुपाली चाकणकरांचा गृहिणीपासून महिला आयोग अध्यक्षपदापर्यंतचा सगळा प्रवास 03.04.2026

रुपाली चाकणकर यांचा गृहिणीपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि वादांनी भरलेला आहे. महिलांसाठी काम करताना त्यांनी प्रभावी उपक्रम राबवले, मात्र विविध आरोप, टीका आणि राजकीय वादांमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आणि राज्यातील वादग्रस्त नेत्या म्हणून ओळख निर्माण झाली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Mahara...

RAJ'KARAN PODCAST : गुलमंडीत पहिली पाटी लागली अन् मराठवाड्यात सुरु झाला ठाकरेंच्या भगव्याचा प्रवास 27.03.2026

1985 मध्ये Bal Thackeray यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मराठवाड्यात एन्ट्री झाली. औरंगाबाद (आताचे Chhatrapati Sambhajinagar) येथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष वाढला. महापालिका जिंकत शिवसेना मजबूत झाली. पुढे फुट, बंड आणि भाजपच्या उदयामुळे आता मराठवाड्यात सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political up...

RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी 20.03.2026

आज अहिल्यानगरचे राजकारण राधाकृष्ण 'विखे पाटील' यांच्या शब्दाभोवती फिरते. सरकार कोणाचेही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचे फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असो की दूध संघ असो की जिल्हा बँक असो सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य क्षेत्रातही विखे पाटील यांचं साम्राज्य मोठं आहे. पण त्यांनी हे सगळं एका रात्रीत मिळवलं का? नाही. विखे पाटील कुट...

RAJ'KARAN PODCAST : भाजपच्या निष्ठावंतांना जमलं नाही, ते 'पँथर'ने करून दाखवलं... पण कसं? 13.03.2026

रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळवले असून तिसऱ्यांदा राज्यसभेत प्रवेश केला आहे. पण साधं ग्रामपंचयातीचंही तिकीट फायदा असल्याशिवाय न देणारा भाजप आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभा का देतोय? यामागील राजकारण काय आहे? तेच समजून घेऊ. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, bjp, Ramdas Athwale, RPI, Dalit Panther

RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला तो 'महाराष्ट्रानेच'! 06.03.2026

इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपरा...

RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाखतायत! 27.02.2026

'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत वसंतराव भागवत आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष...

RAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरी 20.02.2026

बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना चर्चिले जायचे. मग एवढ्या जीवघेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले? नेमका कुठे खडा पडला? पाहुया...

RAJ'KARAN PODCAST : राजीव गांधींच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला... 13.02.2026

केंद्रात काँग्रेसची ताकद वाढत होती. विरोधी पक्षात बसून राजकारण करण्यापेक्षा सत्तेत यावं असे राजीव गांधी यांचे मत होते. खासदार असताना शरद पवार यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. त्यावेळी त्यांनी बोललेल्या एका वाक्यानंतर शरद पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political upda...

RAJ'KARAN PODCAST : कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले... 06.02.2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारे 'विद्यापीठ' म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकेच खरे आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ajit Pawar, NCP, Pune

RAJ'KARAN PODCAST : रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणार संघर्ष... 30.01.2026

फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोचला आहे. दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोचला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Phal...

RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं... 23.01.2026

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा 2 राजकीय भागात विभागला गेला.

"राज"कारण " Rajkaran podcast'ini Replaio'da dinle

Radyo ve podcast'ler tek uygulamada - ücretsiz, kayıt gerektirmez. Bugün yükle ve lansmanı kaçırma

Google Play'den indir

Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır