BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categorie

Science

Site-ul podcastului

www.bbc.co.uk

Cel mai nou episod

8 mai 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi 12.04.2024

जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल. मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत. खरं...

इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi 05.04.2024

इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला. पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार? मूळ...

'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi 26.03.2024

अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का? प्रेझेंटर : जान्हवी मुळेे ऑडियो: तिलक राज भाटिया मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

मानवी पेशींचा नकाशा का तयार केला जात आहे? BBC News Marathi 19.03.2024

एखादी जागा कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो? तर अनेकदा त्या जागेचा नकाशा पाहतो. आपलं जग समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर मानवी संस्कृतीत अगदी सुरुवातीपासून केला गेल्याचं दिसतं. इतकंच नाही, तर गेल्या काही दशकांत मानवी शरीराची मूलभूत रचना समजून घेण्यासाठी नकाशे बनवले जात आहेत. मानवी जनुक कसं कार्य करतात हे समजून घेण्यासाठी, सहा देशांच्या शास्त्रज्ञांनी 1990 मध्ये मानवी जीनोम प्रकल्प सुरू केल...

चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 29.02.2024

जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत भारताच्या चंद्रयान-3 पाठोपाठ जपानचा ‘स्लिम’ लँडर आणि अमेरिकेतल्या इंट्यूटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीचं ओडिसियस हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये चंद्रावर जाण्याची आणि माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याची चुरस रंगलेली दिसते आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग -...

रशिया युक्रेन युद्धापासून उत्तर ध्रुवावर संघर्ष का पेटला? BBC News Marathi 23.02.2024

जगभरातल्या काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी, ज्यामुळे तुमचं विश्व होईल अधिक समृद्ध

सरगॅसम या सागरी शैवालाचं आव्हान आपण कसं सोडवणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 09.02.2024

1492 सालची गोष्ट. अटलांटिक महासागरात प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर अचानक एक मोठं संकट उभं राहिलं, ज्याची त्या दर्यावर्दींनी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या जहाजासमोर मैलोनमैल दूर दाट शेवाळ पसरलं होतं. आपलं जहाज त्यात अडकून बुडणार तर नाही ना, अशी चिंता त्या खलाशांना सतावत होती. आता पाचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच सरगॅसम नावानं ओळखलं जाणारं लाखो टन सागरी शैवाल जगासमोर म...

टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi 30.01.2024

ऑक्टोबर 2023 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टोयोटानं दावा केला की ते लवकरच इलेक्ट्रिक कार्ससाठी एक अशी बॅटरी बनवणार आहेत जिच्यावर गाडी 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापू शकेल. इतकंच नाही, तर ही बॅटरी फक्त दहा मिनिटांत रिचार्ज होऊ शकेल. टोयोटा कंपनीचे प्रमुख कोजी साटो यांनी टोकियोमध्ये ही घोषणा केली, ते म्हणाले की हा इलेक्ट्रिक कार्ससाठीच नाही तटोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा...

पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या आयोजनासाठी तयार आहे का? 09.01.2024

2024 मध्ये जगातला सर्वात मोठा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिंपिकचं आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये केलं जाणार आहे. त्यासाठी शहरात तयारी सुरू आहे. पण पॅरिसच्या सीन नदीचं प्रदूषण, मेट्रो लाईन्सचं अर्धवट काम आणि राजकीय आंदोलनं अशा गोष्टींचं आव्हान आयोजकांसमोर आहे.

2024 मध्येही वर्क फ्रॉम होम सुरू राहील का? BBC News Marathi 01.01.2024

कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर करोडो कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही सामान्य गोष्ट बनली होती. साथीच्या तीन वर्षांनंतर अनेक कर्मचारी आता ऑफिसात परतले आहेत, पण काही क्षेत्रांमध्ये अजूनही कर्मचारी घरून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर कंपन्या आता आपल्या कर्माचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्याचा आग्रह करताना दिसत आङेत. अर्थात प्रत्येक देशात परिस्थिती वेगळी आहे. मग आता यापुढच्या काळात कामाचं स्वरूप कसं असेल...

मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi 23.12.2023

सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंग्डम म्हणजे युकेनं एक घोषणा केली, जी फक्त युकेच नाही तर कदाचित जगभरातच लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते. युकेमधली नवीन औषधांना मंजुरी देणारी संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस अर्थात NICE ने तेव्हा एका नवीन मायग्रेनरोधक औषधाला मंजुरी दिली. मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना त्याचा त्रास होतो. या आ...

भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आता अस्वस्थ का होतोय? BBC News Marathi 16.12.2023

बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांमधल्या अनेक मोठ्या फॅशन कंपन्यांसाठी बांगलादेश हा मोठा कपडा पुरवठादार आहे. पण सध्या निषेध मोर्चे आणि वाढती महागाई यांमुळे बांगलादेशच्या आर्थिक यशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वर्चस्वा...

गाझा डायरी : इस्रायल हमासच्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्यांच्या गोष्टी | BBC News Marathi 04.12.2023

इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत. गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत. गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती. संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स...

खूप झाला फराळ? आता पोटाची काळजी घ्या, कारण पोटाचा 'हा' प्रॉब्लेम आहे (BBC News Marathi) 18.11.2023

आपण आयुष्यभर खातच असतो. खासकरून सणावारांना. आणि मग पोटाचं काही बिघडलं की आपण तब्येतील किंवा अन्नालाच दोष देतो. आपल्या पोटाचं शास्त्र आपल्याला कधी समजलंय का? ऐका ही गोष्ट दुनियेची मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

भारत आणि चीन कधी मित्र होऊ शकतात का? BBC News Marathi 28.10.2023

ऑगस्ट 2023 मध्ये भारत आणि चीनमधला तणाव पुन्हा वाढला. एकमेकांवरच्या विश्वासाला तडे गेले आणि सीमेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दोन्ही देशांनी एकमेकांना संयमानं वागण्याचा सल्ला दिला. झालं काहीच नाही, पण दोन्ही देशांमधली मतभेदांची दरी आणखी वाढली. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दोन देशांत अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे. पण तणावामागे केवळ हे एकच कारण नाही. मग हे दोन्ही देश आपल्यातलं नातं सुधारू शक...

इस्रायलवर हमासचा हल्ला, आता पॅलेस्टाईनचं भवितव्य काय असेल? BBC News Marathi 21.10.2023

7 ऑक्टोबर 2023. पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासनं इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला. इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. पण फक्त गाझा आणि इस्रायलच धुमसत नाहीये. तर इस्रायलच्या ताब्यातल्या वेस्ट बँक प्रदेशामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांसाठीही 2023 हे वर्ष सर्वात हिंसक ठरलं आहे. पण सध्या केवळ वेस्ट बँकच पॅलेस्टिनी प्रशासनाच्या ताब्यात...

हे आदिवासी अमेझॉनचं जंगल वाचवू शकतात का? BBC News Marathi 30.09.2023

21 सप्टेंबर 2023. ब्राझिलच्या अमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींमध्ये अशी आनंदाची, उत्साहाची लहर पसरली. यामागचं कारण होतं तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक ऐतिहासिक निर्णय. पिढ्यानपिढ्या या जंगलांवर आदिवासींचा अधिकार होता आणि आता तो कोर्टानं कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे इथे आदिवासींसाठी आरक्षित जमिनींवर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसू शकते. खरंतर एप्रिल 2023मध्ये अमेझॉनमधल्या स...

पृथ्वीशिवाय विश्वात आणखी कुठे जीवन खरंच असू शकतं का? BBC News Marathi 16.09.2023

भारताच्या चंद्रयान-३ चं प्रपल्शन मोड्यूल 17 ऑगस्ट 2023ला विक्रम लँडरपासून वेगळं झालं. या मोड्यूलवरचं SHAPE हे उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवतंय, ज्याच्या आधारे सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेता येऊ शकतो. अशा ग्रहांवर कदाचित पृथ्वीसारखं जीवन असण्याची शक्यताही जास्त असेल. असा पृथ्वीबाहेरच्या सजीवांचा शोध घ्यावासा वाटणं ही नवी गोष्ट नाही...

देश एकमेकांशी आता अंतराळात स्पर्धा करणार? BBC News Maratih 02.09.2023

23 ऑगस्ट 2023. भारताच्या चंद्रयान-3 चं लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि चांद्रमोहिमांच्या अध्यायातलं एक नवं पर्व सुरू झालं. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला. भारताचं हे यश आणखी विशेष ठरलं, कारण त्याआधी तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या लुना-25 या यानाला चंद्राच्या याच भागात सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आलं होतं. सध्या अमेरिका, चीन, जपान, इस्रायलही चांद्र मोहिमा...

आपण खरंच तेलाचा वापर बंद करू शकतो का? BBC News Marathi 19.08.2023

यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान अचानक काही आंदोलकांनी केशरी रंगाची कन्फेटी म्हणजे कागदाचे तुकडे उडवण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारानं खेळाडू आणि प्रेक्षकांनाही गोंधळात टाकलं आणि सामना थांबवण्यात आला. यंदा अशेस मालिकेदरम्यान आणि अन्य काही मोठ्या स्पर्धांदरम्यानही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या ‘जस्ट ‘स्टॉप ऑइल’ या संघटनेनं असं विरोध प्रदर्शन केलं होतं. या संघटनेची मागणी आहे, की यूक...

लोड शेडिंगमुळे एका देशाचं भविष्य कसं अंधारात चाललंय? BBC News Marathi 12.08.2023

लोड शेडिंग. पॉवर कट. बत्ती गुल हे शब्द आपल्यापैकी अनेकांसाठी नवे नाहीत. महाराष्ट्रातला मुंबई-पुण्यासारखा शहरी भाग सोडला तर बहुतेक ठिकाणी आठवड्यातून काही वेळा आणि काही ठिकाणी बऱ्याचदा वीजपुरवठ्यात कपात करावी लागते. पण लोड शेडिंग नित्याचं झालं तर? दक्षिण आफ्रिकेत सध्या तेच होतंय. 2007 पासून इथे लोड शेडिंगला सुरुवात झाली, तेव्हा आधी काही तास वीज जायची. लोकांची थोडी गैरसोय व्हायची पण चिंता करण्यासारखं...

ओपनहायमर: जगात अणू हल्ल्याचा धोका आता वाढतो आहे का? BBC News Marathi 26.07.2023

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जून महिन्यात एक घोषणा केली की त्यांनी अण्वस्त्रांचा एक साठा बेलारूसमध्ये तैनात करण्यासाठी पाठवला आहे. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच पुतिन अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत होते. पण पहिल्यांदाच त्यांनी असं ठोस पाऊल उचललं आहे. बेलारूसमधून ही अण्वस्त्रं पोलंड आणि लिथुआनियावर हल्ला करू शकतात. त्याशिवाय रशियानं इथे अशी क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं पा...

समुद्रात बुडणाऱ्या व्हेनिस शहराकडून मुंबई-कोकणाने काय धडा घ्यावा? BBC News Marathi 15.07.2023

नोव्हेंबर 2019 मध्ये इटलीतल्या व्हेनिस शहरात भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. लाखो घनमीटर पाणी पूरबंधारे ओलांडून ऐतिहासिक इमारतींनी भरलेल्या सिटी सेंटरमध्ये शिरलं. व्हेनिसच्या इतिहासातली ती दुसरी सर्वात मोठी भरती होती. शहरातला ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक इमारतींना धोका निर्माण झाला. अशा प्रचंड मोठ्या भरतीला व्हेनिसमध्ये अ‍ॅक्वा आल्टा म्हटलं जातं आणि अनेक शतकं अशा अ‍ॅक्वा आल्टाचा सामना या शहरानं केला आ...

हायड्रोजन जगातली ऊर्जेची समस्या मिटवू शकतो? BBC News Marathi 01.07.2023

शाळेत विज्ञानाच्या तासाला तुम्ही कदाचित हा प्रयोग केला असेल – धातूच्या दोन पट्ट्या पाण्यात बुडवून बॅटरीला जोडायच्या. विजेचा प्रवाह सुरू झाला, की त्या धातूच्या पट्ट्यांवर मग बुडबुडे जमा होतात. पाण्याच्या रेणूंचं विघटन होऊन त्यातून वेगळा झालेल्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूमुळे हे बुडबुडे तयार होतात, हेही तुम्हाला ठावूक असेल. तर हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. म्हणजे या वायूवर आग पेटवून...

या देशात एवढी रिकामी घरं का आहेत? BBC News Marathi 24.06.2023

घर पाहावं बांधून असं म्हणतात. पण घर बांधणंच नाही, तर घर भाड्यानं मिळवणंही कठीण असतं, हे तुम्ही मुंबईत राहात असाल, किंवा तिथे कधी गेला असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. महाराष्ट्राच्या राजधानीत एकीकडे लोकांना घर मिळवणं कठीण जातं, तर दुसरीकडे एक लाखाहून अधिक घरं रिकामी असल्याचं काही वर्षांपूर्वी माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्समध्ये तुम्ही वाचलं असेल. हा विरोधाभास फक्त मुंबईपुरता किंवा भारतापु...

Ascultă podcastul गोष्ट दुनियेची în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice