BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categorie

Science

Site-ul podcastului

www.bbc.co.uk

Cel mai nou episod

8 mai 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

सीरियाचं भवितव्य कसं असेल? 16.12.2024

सीरियात बंडखोरांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवल्यावर पुढे काय होईल?

बोईंगचं विमान पुन्हा भरारी घेईल का? 10.12.2024

बोईंग कंपनीला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

यूट्यूबनं टीव्ही चॅनेल्सना मागे टाकलं आहे का? 02.12.2024

यूट्यूबवर व्हिडियो पाहणं तुमच्या सवयीचं असेल, पण हे यूट्यूब आता टीव्हीलाही मागे टाकतंय.

सुनीता विल्यम्स : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद पडल्यावर काय होईल? 25.11.2024

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काही वर्षांनी ते निकामी होईल, तेव्हा पुढे काय होईल?

जंगलातले वणवे थांबवता येतील का? 18.11.2024

कॅनडाच्या जॅस्पर शहरात जुलै-ऑगस्टमध्ये मोठा वणवा पेटला. अशा आगींवर नियंत्रण कसा मिळवायचं?

रुपर्ट मरडॉक यांच्या मिडिया साम्राज्याचा वारसदार कोण होईल? 11.11.2024

अनेक देशांतील माध्यमांमध्ये रुपर्ट मरडॉक यांची गुंतवणूक आहे. त्यांचे वारसदार कोण होणार?

मध्यपूर्वेत कोणी शांतता आणू शकतं का? | गोष्ट दुनियेची 29.10.2024

इस्रायल-हमास संघर्ष आता हिजबुल्लाह-इराणपर्यंत पोहोचला आहे.मग मध्यपूर्वेत शांतता कशी येईल?

अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार कसं चालतं? 20.10.2024

अफगाणिस्तानात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मग तिथलं तालिबान सरकार कसं काम करतंय?

इस्रायल-हमास युद्धाचा अंत कधी होईल की नाही? 14.10.2024

इस्रायल-हमास युद्धाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण इथला संघर्ष वर्षानुवर्ष जुना आहे.

हवामानबदलाविषयी ईस्टर आयलंडच्या या मूर्ती काय सांगतात? | BBC News Marathi 07.10.2024

पॅसिफिक महासागरात रापानुई बेट हे जगातल्या मानवी वस्ती असलेल्या सर्वात दुर्गम जांगांपैकी एक आहे. या बेटावर शेकडो प्राचीन मूर्ती आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे इथे बरेच बदल होताना दिसत आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की ईस्टर आयलँडवरचे हे पुतळे हवामान बदलाचा मार झेलू शकतील का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती -...

आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का? | गोष्ट दुनियेची BBC News Marathi 21.09.2024

अमेरिकेतल्या एका कोर्टानं दिलेल्या निर्णयानं गुगलविषयी प्रश्न निर्माण केले. सर्च मार्केटमध्ये सर्वात बळकट कंपनी म्हणून गुगल आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेत असून त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना वाव मिळणंच कठीण झालं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. अनेकांच्या मते ही कंपनी एवढी मोठी झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया की आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का?

हिजबुल्लाहला नेमकं काय हवं आहे? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 14.09.2024

लेबननमधली संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष गाझामध्ये गेल्या वर्षी युद्ध सुरू झाल्यापासून आणखी गहिरा झाला आहे. अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना असा दर्जा दिला आहे. पण ही संघटना नेमकी काय आहे? त्यांना काय हवं आहे? हिजबुल्लाह गाझामधल्या पॅलेस्टिनी लोकांना आणि हमास या संघटनेला पाठिंबा देत आहे की इस्रायलचं लक्ष या युद्धात गुंतलंय याचा फायदा घेत आहे? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्या...

प्रोजेक्ट 2025 काय आहे आणि ते अमेरिकेचं भविष्य कसं ठरवेल? BBC News Marathi 08.09.2024

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी 'प्रोजेक्ट 2025'ची चर्चा आहे. काही लोकांच्या मते ही यशाची किल्ली आहे तर अनेकांच्या मते हे धोकादायक असून यामुळे समाजात दुफळी माजेल. हे प्रोजेक्ट 2025 काय आहे आणि ते अमेरिकेचं भवितव्य कुठल्या दिशेला नेत आहे? गोष्ट दुनियेचीमध्ये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

पुतळ्यांचं राजकारण नेमकं काय? आपण पुतळ्यांना इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi 31.08.2024

सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सरू होता, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणइथल्या राजकोट किल्ल्यावर उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या 28 फूट उंच पुतळ्याचं अवघ्या 9 महिन्यांपूर्वी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं होतं. त्यामुळे त्यावरून राग आणि संताप राज्यभरात व्यक्त करण्यात आला. पुतळा बांधतांना निकष पाळले गेले ना...

ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi 27.08.2024

सिंथेटिक ओपियॉइड्स अर्थात वेदनाशामक औषधांचा गैरवापर आणि ओव्हरडोस ही मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाय म्हणून कॅनडामध्ये टोरंटोनं दोन वर्षांपूर्वी एक मागणी केली होती, की या शहरात खासगी वापरासाठी ड्रग्ज बाळगणं डिक्रिमिनलाईझ केलं जावं म्हणजे हा अपराध मानला जाऊ नये. कॅनडातल्याच ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रायोगिक तत्वावर अशीच योजना सुरू आहे. पण ड्रग्जचा वापर कायदेशीर करणे हे व्यसनावरचे उत्तर ठरू शकते का?...

बर्ड फ्लू ही माणसांसाठी किती मोठी चिंतेची बाब आहे? BBC News Marathi 18.08.2024

मार्च 2024 मध्ये अमेरिकेतल्या एका डेअरी फार्मवर गाई आणि कर्मचाऱ्यांमध्येही बर्ड फ्लूची साथ पसरली. पहिल्यांदाच गाईंना या विषाणूचा संसर्ग झाला असून गाईंपासून माणसांमध्येही हा आजार पसरला आहे. एखाद्या सस्तन प्राण्याकडून माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याचीही ही पहिली घटना ठरली. अमेरिकेतले ते कर्मचारी तर बरे झाले आहेत. पण तेव्हापासून बर्ड फ्लूची साथ अमेरिकेच्या अनेक डेअरी फार्म्समध्ये पसरली आहे. गोष्ट दुन...

एक गंजणारं जहाज दक्षिण चीन समुद्राविषयी काय सांगतं? BBC News Marathi 03.08.2024

17 जूनला वादग्रस्त साऊथ चायना सी म्हणजे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या चीन आणि फिलिपिन्सच्या बोटींमध्ये चकमक उडाली. चीनच्या तटरक्षक दलानं सिएरा माद्रे नावाच्या जहाजाला रसद पोहोचवणाऱ्या फिलिपिन्सच्या बोटींना त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. सिएरा माद्रे हे जहाज फिलिपिन्सनं 1999 साली मुद्दाम या जागी उभं केलं होतं आणि सध्या हे जहाज गंजलेल्या अवस्थेत आहे. हे गंजलेलं जहाज साऊथ यचायना सी मधल्या तणावाविषयी...

Artificial intelligence साठी आपल्याकडे पुरेशी वीज उपलब्ध आहे का? | BBC News Marathi 24.07.2024

एआयच्या मदतीनं सर्व प्रकारच्या कॅन्सरवर गुणकारी ठरतील अशी औषधं तयार करता येऊ शकतात. पृथ्वीचं वाढतं तापमान रोखण्यासाठी मदत होऊ शकते. इतकंच नाही तर अनेक कामं, जी माणसांना करायची इच्छा नाही, ती एआयच्या मदतीनं मशीन्स करू शकतील. पण अशा एआयला विकसित करण्यासाठी करोडो कंप्युटर्स सुरू ठेवायचे आणि त्यांना एअरकंडिशनिंगद्वारा थंड ठेवायचं तर किती मोठ्ठ्या प्रमाणात वीजेची गरज पडते. म्हणूनच गोष्ट दुनियेचीमध्ये य...

एका डिझायनर हॅंडबॅगमुळे या देशाच्या राजकारणात भूकंप कसा झाला? 06.07.2024

दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडींना कुणीतरी एक महागडी डिझाईनर हँडबॅग भेट म्हणून द्यायचा प्रयत्न केला, आणि त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले. नेमकं काय घडलं? यावरून दक्षिण कोरियाच्या राजकारणाविषयी आपल्याला काय कळतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi 02.07.2024

एक महाकाय हिमनग महासागरात वाहात चालला आहे. हा हिमनग A23A या नावाने ओळखला जातो. हा कुठला सामान्य हिमनग नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा हिमनग आहे. 1 खर्व टन किलोचा हा बर्फाचा महाकाय तुकडा समुद्रातून वाहत पुढे सरकतोय. या आठवड्यात ‘गोष्ट दुनियेची ’मध्ये आपण याच महाकाय हिमनगाविषयी बोलणार आहोत. या हिमनगापासून आपण काय शिकू शकतो? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडि...

मल्टिपल स्क्लेरॉसिस आजार रोखणं लवकरच शक्य होईल का? BBC News Marathi 15.06.2024

मेंदूचा आजार म्हणजे न्यूरॉलॉजिकल आजार असलेल्या मल्टिपल स्केलॉरिसिस म्हणजे MS मागे EBV या विषाणूचा हात असावा, असं संशोधकांना काही काळापासून वाटत होतं. दोन वर्षांपूर्वीच ते सिद्ध झालं. या विषाणूचा शोध लागला त्यालाही नुकतीच पन्नास वर्ष झाली आहेत. सध्या जगभरात तीस लाख लोक मल्टिपल स्क्लेरॉसिसनं पीडीत आहेत. हा आजार रोखणं आता खरंच शक्य होणार आहे का? गोष्ट दुनियेचीमध्ये आजच्या भागात तेच जाणून घेणार आहोत....

म्यानमार देश म्हणून विखुरण्याच्या मार्गावर आहे का? गोष्ट दुनियेची BBC News Marathi 08.06.2024

भारताचा शेजारी देश असलेला म्यानमार पुन्हा धुमसतो आहे. म्यानमारमध्ये लष्करशाही आहे आणि सैन्याच्या नेतृत्त्वातलं त्यांचं सरकार सध्या गृहयुद्धात गुंतलं आहे. खरंतर भारताच्या उंबरठ्यावर आग्नेय आशियातल्या या देशात अंतर्गत कलह ही नवी गोष्ट नाही. पण आताचा हा नवा संघर्ष देशाला मोठ्या संकटात टाकतो आहे. म्हणूनच या आठवड्यात गोष्ट दुनियेचीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्यानमार विखुरण्याच्या मार्गावर आहे का? मू...

लठ्ठपणा आणि स्थूलता खरंच औषधांनी कमी करता येते का? BBC News Marathi 22.05.2024

'मला वजन कमी करायचं आहे, पण डाएट आणि जिमचा तर कंटाळाच येतो' अशी चर्चा तुमच्या कानावर अनेकदा पडली असेल किंवा तुम्ही स्वतः वाढलेल्या वजनाविषयी कधी ना कधी विचार केला असेल. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ही काही देशांमध्ये तर राष्ट्रीय समस्या बनली आहे आणि वजन कमी करण्यासाठी सरकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी काहीवेळा वजन घटवणाऱ्या औषधांचा वापरही केला जातो. हॉलिवूडमधले कोणते सेलिब्रिटी वजन घटवण्यासाठी अस...

सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi 14.05.2024

मार्च 2024 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांंनी व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक आयोगासमोर बोलताना सांगितलं की अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्स किंवा ओपियॉइड्स. एका अहवालानुसार 2022 साली सिंथेटिक ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की...

चॉकलेट उत्पादन हवामान बदलामुळे कमी होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 04.05.2024

चॉकलेट कुणाला आवडत नाही? पण सध्या कोको आणि चॉकलेटच्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. फेब्रुवारी 2024 मध्ये तर चॉकलेटच्या किंमतीनं नवा विक्रम रचला. अमेेेरिकेतत कोकोची किंमत दुप्पटीनं वाढली आणि कोको आता तिथे प्रतिटन 5874 डॉलर्सला पोहोचलं आहे. कोको उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देेशांना सध्या हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहेे. त्यामुळेच या किंमती वाढल्या आहेत का? प्रेझेेंटर : जा...

Ascultă podcastul गोष्ट दुनियेची în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice