BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ 963 episódios

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categoria

Health

Site do podcast

www.bbc.co.uk

Último episódio

25 de mar de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत? 22.12.2022

हे वर्षं संपता संपता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आलेला आहे. चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे. BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे. हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षण का आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

औषधं घेऊन थांबवता म्हातारपण लांबवता येतं का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 21.12.2022

अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिनक्लेअर गेली 20 वर्षं वृद्धत्व याविषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्यामते काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. तरुण दिसण्याच्या उद्योगाची आजची उलाढाल 110 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे. म्हातारपण अपरिहार्य नाही असा संशोधकांचा दावा आहे. सिनक्लेअर यांचं म्हणणं आहे की म्हातारपण अप...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सर्व धर्मांच्या मुलींची लग्न एकाच वयात व्हावी अशी मागणी का होतेय? 20.12.2022

दिल्ली हायकोर्टात एक केस आली होती. एका अल्पवयीन मुस्लीम मुलीने आपल्या पतीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी सुरक्षा मागितली होती. यावर निकाल देताना कोर्टाने त्या मुलीचं लग्न वैध ठरवलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगाने आता याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि सगळ्या धर्मांच्या महिलांसाठी लग्नाचं वय समान असावं अशी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आधीच मुलींचं लग्नाचं वय 18...

कोटामधले विद्यार्थी आत्महत्या का करतात? त्यांचे मृत्यू रोखायचे कसे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 20.12.2022

कोटा शहर – देशभरातल्या IITमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठीची पंढरी. याच कोटातून आता तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी येतेय. ही बातमी धक्कादायक आहेच, पण ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा कोटा या बातमीमुळे चर्चेत आलंय. काय आहे कोटाचं कोचिंग विश्व? आणि इथे विद्यार्थी आत्महत्या का करतात? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - मोहर सिंग मीणा, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - गु...

'लोकायुक्त विधेयक आणणार, भ्रष्टाचाराला आळा बसवणार,' शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा : सोपी गोष्ट पॉडकास्ट 19.12.2022

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आंतरधर्मीय विवाहांवर सरकार लक्ष ठेवणार? 16.12.2022

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

‘कृत्रिम सूर्य’ तयार करण्याचा हा प्रयोग - न्युक्लिअर फ्युजन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 15.12.2022

ऊर्जेचा एका नवा स्रोत म्हणजे न्यूक्लियर फ्युजन विकसित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. सूर्य आणि बाकीच्या ताऱ्यांनाही प्रकाशित करणारं हे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे? गेली शंभर वर्ष शास्त्रज्ञ त्यावर काम का करत आहेत? उर्जेचा हा स्रोत माणसाचं जगणं कसं बदलू शकतो आणि त्यात भारत काय योगदान देतो आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे? 13.12.2022

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी क...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का? 12.12.2022

निर्भया फंड सध्या पुन्हा चर्चेत आहे. या निधीतून आणलेल्या गाड्या महिलांच्या नाही, तर VIP नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरत असल्याचा आरोप होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आणि खासदारांसाठी या गाड्या वापरत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरू झाली. सरकारनं याविषयी अजून कोणतं स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही. पण निर्भया फंडच्या वापरावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे....

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे? 07.12.2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे. पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का? 06.12.2022

गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का? निवेदन- गुलशनकुमार वनकर लेखन-पराग फाटक व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोबाईल फोनमधील पेमेंट ॲप्स सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग माहितीये? 05.12.2022

UPI Apps वापरुन आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो. बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत. यासाठी RBI ने काय निकष घालून दिलेत? आपली ही ॲप्स सुरक्षित कशी ठेवायची? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? नोकऱ्या जाणार का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 02.12.2022

GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे. खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार लेखन,...

एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 01.12.2022

1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय. पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे

धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? BBC News Marathi सोपी गोष्ट 739 30.11.2022

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, असं म्हणतात. या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समुहाने जिंकला. 60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार? निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला? 29.11.2022

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. 2019 मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर खुल्या प्रवर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. हे 10 टक्के आरक्षण नेमकं कोणासाठी आहे? या आरक्षणासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? EWS अंतर्गत सरकारने शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर 28.11.2022

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेवरून जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता देशभरात पसरताना दिसतंय

पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 25.11.2022

श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील बाहेर येत आहेत. पण अजूनही कोर्टात मांडण्यासाठी ठोस पुरावे कमी पडतायत. त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती. पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गु...

गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.11.2022

कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो. जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कर्नाटकने महाराष्ट्राच्या 40 गावांवर दावा का केलाय? 23.11.2022

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने या वादाला नव्याने तोंड फुटलंय. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची, सांगलीतली जवळपास 42 गावं ताब्यात घ्यायचा विचार करतंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? 22.11.2022

कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 19 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना D. Lit पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर त...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं? 21.11.2022

इजिप्तमध्ये COP27 या हवामान परिषदेच्या अखेरीस एका ऐतिहासिक करारावर 197 देशांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत हवामान बदलाचे परिणाम भोगणाऱ्या विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारला जाणार आहे आणि श्रीमंत आणि विकसित देश त्यासाठी पैसा पुरवतील. भारत आणि पाकिस्ताननं या निधीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे? 18.11.2022

श्रध्दा वालकर या वसईच्या 28 वर्षीय तरुणीची आफताब या तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या केली. श्रध्दा आणि आफताब यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघं दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. या घटनेमुळे लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. खरंच लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय असतं? कायद्यात याबद्दल नेमकं काय म्हटलंय? आणि अशा जोडप्यांना भारतात कायदा काय संरक्षण देत...

नार्को टेस्ट म्हणजे काय? श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाची ही चाचणी किती महत्त्वाची? सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.11.2022

वसईच्या श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, याचे वेगवेगळे आणि धक्कादायक तपशील रोज समोर येत आहेत. पण त्याने आतापर्यंत दिलेले जबाब आणि त्याच्याकडून मिळेले दस्तावेज, जसं की ऑनलाईन व्यव्हार, सोशल मीडिया चॅट्स, यांमधून काही विसंगत माहिती पोलीसांसमोर आली. त्यामुळे पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, जी कोर्टाने मंजूरही केली आहे. पण ही नार्को टेस्ट नेमकी काय असते...

गोवर म्हणजे काय? मुंबईत गोवरचे रुग्ण का वाढत आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 16.11.2022

मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत गोवरमुळे 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत गोवरचे निश्चित निदान झालेले 142 रुग्ण आहेत, शिवाय 1079 रुग्णांना ताप - पुरळ अशी लक्षणं आहेत, आणि ते गोवरचे संशयित म्हणून धरले जातायत. मुंबईत गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्रीय आरोग्य पथकही दाखल झालंय. गोवर हा आजार नेमका काय आहे? गोवर रुग्णांची संख्या अचानक वाढतेय? त्याची लक्षणं...

Ouça o podcast सोपी गोष्ट no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos