Vechleli Phule
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
चित्र | Chitra 05.05.2023 9:33
सर्वांना आवडणारी चित्रं. त्यांच्या रंगांच्या, छटांच्या आपण प्रेमात पडतो. कोणी कागदावर तर कोणी मनात पण चित्रं सगळेच काढतात. रोज वेगवेगळे घटक, रंग त्याचा भाग बनत राहतात. चला तर मग कवितेच्या शब्दांनी सजवलेलं चित्र पाहायला. 1. हे चित्र कवी - शंकर वैद्य 2. हाय काय न्हाय काय कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी वगैरे 3 . चित्र कवी - शांता शेळके कवितासंग्रह - पूर्वसंध्या Hosted on Acast. See acast.com/privac...
सावली | Sawali 02.05.2023 9:00
धगधगत्या उन्हापासून जीवाला गारवा देणारी सावली. अशी ही हवीशी वाटणारी सावली रात्री आपल्याला नकोशी वाटते. तिची रूपं बदलतात. हरवून जाऊयात कवितांच्या सावल्यांत. 1. सावली कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मारवा 2. सावली कवी - वि स खांडेकर कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता 3 . सावली कवी - ग्रेस कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
जय महाराष्ट्र | Jai Maharashtra 28.04.2023 9:58
शिवरायांचे शौर्य,सह्याद्रीचे सौंदर्य आणि पंढरीच्या माऊलीने पावन केलेला आपलं राज्य. अभिमानाने छाती फुलून यावी असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. ही गौरवपताका नेहमीच अशी महाराष्ट्रावर फडकत राहो. साजरी करूया महती आपल्या लाडक्या महाराष्ट्राची. 1. महाराष्ट्र गीत कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मारवा 2. महाराष्ट्र-गीत कवी - माधव ज्युलियन कवितासंग्रह - स्वप्नलहरी 3. नवा महाराष्ट्र कवी...
पाणी...पाणी... | Pani.. Pani.. 25.04.2023 10:45
पाण्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे. ते आहे तर आपण आहोत. त्याचा निखळ प्रवाह, मुबलकता समृध्दी आणते. पाणी अत्यंत कमी होत चाललंय. त्याचं महत्व ओळखून आपण जागरूकतेने वागायला हवे. बघूया या जीवन देणाऱ्या पंचमहाभूताबद्दल काय म्हणतायत कवी मंडळी. 1. पाणी कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा 2. पाणी...पाणी... कवी- इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 3. पाणी कवितासंग्रह - दिवेलागण कवी - आरतीप्रभू 4. पा...
वासुदेव आला | Vasudev Aala 21.04.2023 9:53
वासुदेव, गारुडी, सारंगीवाला, विदूषक ही व्यक्तिमत्वं अचाट असतात. त्यांच्या कलागुणांनी आपल्याला भारून टाकतात. लहानथोरापासून सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटतं. बघूया कविवर्य यांची महती कशी कवितेत बांधतायत. 1. चिमणा वासुदेव कवी के नारखेडे कवितासंग्रह आठवणीतल्या कविता भाग 3 2. सारंगीवाला कवी - यशवंत कवितासंग्रह - पाणपोई 3. गारुडी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे Hosted on Acast. See acast.com/priv...
आवाज | Awaj 18.04.2023 11:08
आपला आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यातून आपण कोणाला उमेद देऊ शकतो तर कोणाला उमेद हरवून बसण्याची वेळही आणू शकतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून जगभरात विविध क्रांत्या घडून आल्या. बघूया कवितांचा आवाज आज कवींच्या शब्दरुपी माध्यमातून. 1. मुक्या माझ्या व्यथा कथा कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - चित्रवीणा 2. मी अन माझा आवाज कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी अन माझा आवाज 3. ताजा उष्ण आवाज क...
पहाटतो सूर्य | Pahatato Surya 14.04.2023 8:45
सूर्याच्या प्रकाशाने अख्खी धरती उजळून निघते. तो आपल्याला जीवन तर देतोच पण रोज नवीन आशा देतो. या सुवर्णयज्ञावर काय कवितेचा प्रकाश टाकलाय बघूया कवी मंडळींनी. 1. अरूण कवी बालकवी कवितासंग्रह फुलराणी 2. सूर्य कवी कुसुमाग्रज कवितासंग्रह छंदोमयी 3. अर्घ्य कवी अनिल कवितासंग्रह सांगाती 4. सूर्य कवी सुधीर मोघे कवितासंग्रह आत्मरंग Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
मोदक, गुलाबजाम आणि आपण | Modak, Gulabjam ani aapan 11.04.2023 13:59
आपल्याकडे किती पदार्थांची रेलचेल असते ना. तोच पदार्थ किती वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्याला किती सुखावून जातात. मज्जा आणतात जीवनात. चला तर मग मारुयात ताव कवितांचा आस्वाद घेऊन. 1. काय वाढले पानावरती कवी - ग दि माडगूळकर 2. मोदक कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 3. गुलाबजाम कवी - अरुण साळगावकर 4. वडापाव Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
ही माणसे | Hee Manase 07.04.2023 12:43
माणसांनी अख्ख्या पृथ्वीला आपल्या इच्छेनुसार बदललय. खूप गोष्टींचा शोध लावला. बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रगती केली. पण माणूस म्हणून आपण खरंच पुढं गेलोय का. का हरवून बसलोय माणूसपणाला. चला बघूया या मनुष्य प्राण्याविषयी काय विचार आहेत कवींचे. १. माणसे कवी - वलय मुळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं २. कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता ३. मानवाचे अंती | एक गोत्र कवी - विं. दा.करंद...
तरीही झाडं म्हणत नाहीत.. | Tarihi jhade mhanat nahit 04.04.2023 9:08
झाडांच्या अस्तित्वाने सारं जग सुंदर बनवलंय. मनाला शांती, तनाला सावली आणि डोळ्याला गारवा देणारी ही झाडं. किती प्रकारचा आनंद देतात ना आपल्याला. अगदी निःस्वार्थपणे. पाहुयात या लाडक्या हिरव्या मित्राबद्दल काय म्हणतात कवीवर्य. १.पिंपळ कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - पिंपळ २.माडाचे भावगीत कवी - बा.भ.बोरकर कवितासंग्रह - आनंदभैरवी ३. कवी - संदीप अवचट Hosted on Acast. See acast.com/privacy for more in...
स्वप्नशहारे | Swapnashahare 31.03.2023 9:41
स्वप्नांची दुनिया किती भारी असते ना. आपल्याला हव्या त्या गोष्टी आकारात आणता येतात. स्वप्ने पाहिल्यानेच तर ती सत्यात उतरतात. पण काही स्वप्ने मात्र पायाखालची जमीन सरकवतात. बघूया गोड स्वप्नं आपल्या कवी मंडळीसोबत. १. स्वप्ने पडून कवितासंग्रह - चैत्रपुनव कवी - बा.भ.बोरकर २.स्वप्न कवितासंग्रह - प्रिय मित्रास कवी - शशी डंभारे ३.स्वप्ने कवितासंग्रह - सांगाती...
चंद्र : सोहळा | Chandra : Sohala 28.03.2023 12:50
चंद्र हा अगदीच सगळ्यांच्या आवडीचा विषय.मग ते लहान मूल, कवी, प्रेमी किंवा कुणीही असो. तो नेहमीच आपल्याला त्याच्या सौंदर्याची भुरळ पाडतो. त्याच्या चंद्रकोरीपासून ते पूर्ण आकारापर्यंत त्याचं स्थान खूप मोठं आहे या दुनियेत. बघूया या चांदमामावर काय प्रकाश टाकलाय कवी महाशयांनी. १. चंद्र : सोहळा कवी : आरती प्रभू कवितासंग्रह : दिवेलागण २. उदार चंद्र कवी : भा.रा.तांबे &nb...
ते वळण | Te Valan 24.03.2023 6:05
वळण कसलंही असू दे, थोडा धक्का बसतोच. नात्याचं आयुष्याचं, रस्त्याचं वळण वेगळ्याच गोष्टी आपल्या पुढ्यात आणून ठेवत. पण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होऊन बसतं. बघुयात कवी मंडळी या वळणावरती काय खजिना शोधतात. १. वळण कवी - प्रभा अत्रे कवितासंग्रह - अंत:स्वर २. वळण कवी - सुरेश भट कवितासंग्रह - सप्तरंग ३. वळण कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मित्रास Hosted on Acast. See acast.com/privacy for more...
गुढीपाडवा | Gudhi Padva 21.03.2023 6:24
मराठी नववर्ष. गुढी, पुरणपोळी,कडुनिंबाची गोड कटू चटणी, साखरहार; अशी सगळी गंमत घेऊन येतो गुढीपाडवा. आपल्या संस्कृतीची जोपासना करायला लावणारा, जीवनाचं गोड कडू सत्य सांगणारा. कविवर्य काय म्हणतात बघूया. 1. पाडवा कवी - आरती प्रभू कवितासंग्रह - दिवेलागण २. पाडवा कवी - भा रा तांबे कवितासंग्रह - तांबे यांची समग्र कविता ३. गुढी उभारणी कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंची गाणी Hosted on Acast. See...
डोळ्यांतली गाणी | Dolyatali Gani 17.03.2023 8:15
डोळे आपल्याला सारं जग दाखवतात. खरं काय खोटं काय शिकवतात. प्रेमातही पाडतात. पण आपण खरंच डोळस असून आंधळे बनतो कधी - कधी. पाहूया दृष्टिकोन कविवर्यांचा या जुलमी डोळ्यांकडे. १. कविता - नेत्र कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - पाथेय २. कविता - दृष्ट कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या ३. कविता - आंधळ्यांची माळ कवी - गोविंदाग्र...
आरसा | Aarsa 14.03.2023 8:04
रोज ज्यात पाहून आपण आपलं रूप निहारतो, स्वतःला एक ओळख देतो असा आरसा. खूप गोष्टी दाखवतो ज्या त्यात दिसत नाहीत त्याही. तुम्ही जेवढं खोल बघाल तेवढं तेवढं जास्त दाखवणारा. सगळ्यांच्या आवडीचा. चला बघूया बिंबा- प्रतिबिंबाची मजा कवितेच्या आरशातून. १. कविता - आरसा कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही कवी - मिलिंद जोशी २. कविता - बिंब कवितासंग्रह - आनंदऋतू कवी - मंगेश पाडगांवकर ३. कविता - आरसा कवितासंग्रह...
रंगांचे ढंग | Ranganche Dhang 10.03.2023 9:00
रंग प्रत्येक गोष्टीला असतो. त्यामुळेच तर त्यांची रंगत वाढते. आपण रंगांचा महोत्सव जरवर्षी साजरा करतो. पण रंग हे फक्त वस्तूंचे असतात का? उलगडूया रंगांची बेढंगी बाजू कवितांच्या साह्याने. 1.रंग कवी - ग्रेस कवितासंग्रह- चंद्रमाधवीचे प्रदेश 2.रंग कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - सूर आनंदघन 3.रंगबंध कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी 4.रंग माझा वेगळा कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रंग माझा वेगळा #ma...
दुर्गाच ती | Durgach Ti 07.03.2023 14:28
स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. जग कितीही पुढं गेलं तरीही बायकांची आजही वाताहत होतेच. पण त्या झगडत राहतात आणि बनतात सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, मेरी कॉम. महिलांच्या जिद्दीला आणि त्यांच्या धडाडीला सलाम. १.कविता - बायका कवितासंग्रह - निरंजन कवी - अरुणा ढेरे २. कविता - एकटी कवितासंग्रह - वंशकुसुम कवी - इंदिरा संत ३.कविता - तिचे स्वप्न कवितासंग्रह - बाहुल्या कवी - इंदिर...
वसंत आला दारी | Vasant Aala Dari 03.03.2023 7:28
वसंत ऋतूचे आगमन खूप सुंदर गोष्टींची बरसात करून जातं. कोकिळेच्या गाण्यांनी, आंब्यांचे मोहर, झाडांची नवीन पालवी यांनी सजून जाते आपली बाजूची दुनिया. बघूया कवी कसं स्वागत करतायत या लाडक्या ऋतूचं. १. कविता - ग्रीष्माची चाहूल कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा २. कविता - वसंत आला दारी कवी - मंगेश पाडगांवकर कवितासंग्रह - सूर आनंदघन ३. क...
द्वैत सुखदुःखाचे | Dwait SukhDukhanche 28.02.2023 10:27
सुखदुःखाची व्याख्या प्रसंगानुसार, व्यक्तीनुसार बदलत राहते. माणूस म्हणून खूप धडे शिकवणाऱ्या या दोन गोष्टी. जसा त्यांच्याकडे बघू तसं रूप बदलत राहतात. बघूया कविवर काय म्हणतात या सुखदुःखाच्या जोडगोळीवरती. १. सुखदुःख कवितासंग्रह - पिंपळ पान कवी - गोविंदाग्रज २. सुखाच्या शोधात कवितासंग्रह - मृद् गंध कवी - विंदा करंदीकर ३. सुख आणि दुःख कवितासंग्रह - सप्तरंग कवी - सुरेश भट Hosted on Acast. See...
गौरव मराठीचा | Gourav Marathi Cha 24.02.2023 11:22
कुसमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपली मराठी अगदी ज्ञानेश्वर ते आताचे लेखक, कवी, विविध कलाकार यांनी समृध्द केली. आपल्या भाषेला खूप मोठा सुवर्ण इतिहास आहे. पाहुयात मराठीच्या गोडीबद्दल कविवर्य काय म्हणतायत. 1. मायबोली कवी - सुरेश भट कवितासंग्रह -रुपगंधा 2. मराठी माती कवी -कुसुमाग्रज कवितासंग्रह मराठी माती 3. मराठी ओव्या कवी- बा भ बोरकर कवितासंग्रह -...
सांज सोनेरी | Sanj Soneri 21.02.2023 7:38
दिवसाचा शेवट आणि रात्रीच्या आधीचा रम्य काळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताचे रंग, मनाची चलबिचल, परतीच्या वाटा अशा अनेक गोष्टींनी भरलेली. रोज वेगळ्या रूपाने भुरळ घालणारी. बघूया कशी रिझवतीय ही कवी मनाला. १. कविता - माझ्या मावळत्या उन्हा कवितासंग्रह - कांचनसंध्या कवी - बा.भ. बोरकर २. कविता - संध्याकाळ कवितासंग्रह - समग्र केशवसुत कवी - केशवसुत ३. कविता - संध्यामाई कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश कवी -...
पत्रांची भाषा | Patranchi Bhasha 17.02.2023 10:39
निळी पिवळी पत्रं, तिकिटं खूपच गोड भाग आपल्या बालपणातला. ती वाचणं, लिहिणं, जपून ठेवणं यात काही औरच गंमत होती. प्रेमाची, खुशालीची, मायेची ही पत्रं खूप देऊन जातात. थोडे शब्द जे लिहिले नसतात तेही बोलून जातात. अशी ही सुंदर पत्रे. 1. असे छानसं पत्र लिहू बघतो आहे कवी - संदीप खरे 2. पोस्टमन कवी - द वा फफे कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता भाग 2 3. पत्र लिही.. पण कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी H...
प्रेम कुणावर करावं | Prem Kunavar karave 14.02.2023 10:07
आपण किती गोष्टींच्या प्रेमात पडतो ना. आपली खेळणी, कपडे, व्यक्ती, पुस्तकं. या यादीत नवीन गोष्टींची भर पडतच राहते. या व्यक्ती, वस्तू आपल्या जीवनात रंगत आणतात. प्रेमाच्या गुलाबी दुनियेत डोकावूयात आज. प्रेम कुणावर करावं १. कविता - प्रेम कवितासंग्रह - प्रिय मित्रास कवी - शशी डंभारे २. कविता - मग बोलू... कवितासंग्रह - मिलिंद जोशी कवी - असंच होतं ना तुलाही ३. कविता - प्रेम कुण...
बावरं मन | Bawra Man 10.02.2023 8:23
मन हा अत्यंत किचकट विषय पण अतिशय महत्वाचा. वेड लावणारं पण हेच असतं आणि शहाणपणा शिकवणारं पण हेच असतं. अश्या या बावऱ्या मनाची व्यथा ऐकूया आज. 1. मन कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा 2. मन वढाय वढाय कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंची कविता 3. खुळे मन कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - सहवास 4. मन कवी - आरतीप्रभू कवितासंग्रह - दिवेलागण #kavita #marathikavita #marathi #marathisahitya...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.