Santosh Deshpande
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
मुलांसाठीची `वाचन साखळी` 11.07.2026 31:57
शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील बालक-पालक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी `वाचन साखळी` संकल्पना रुजते आहे. या संकल्पनेचे प्रणेते विनायक जोशी यांना...
FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार? 28.06.2026 22:27
सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या खेळाचे चाहते म्हणून त्यांनी आजवरच्या सामन्यांचे विश्लेषण आणि काही अंदाज मांडले आहेत. त्याबाबत संतोष देशपांडे यांसोबत रंगलेल्या या स्टोरीटेल...
‘श्रीमानयोगी’चं शिवधनुष्य पेलताना.. 14.06.2026 36:09
मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांची ही कादंबरी आता 'स्टोरीटेल' वर श्राव्य स्वरुपात दाखल झाली आहे. त्यास ज्यांचा आवाज लाभला आहे, ते प्रसिद्ध अभिवाचन कलाकार अनिरुद्ध दडके यांच्या समवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्ट मधून हा सारा प्रवास तर पुढे येतोच शिवा...
IT vs AI: करिअर संपणार की बदलणार? 10.06.2026 20:03
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरतीप्रक्रियाही मंदावली आहे. अशा परिस्थितीत, ज्यांनी आयटी मध्ये शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असे ठरविले आहे, अशांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे याचा...
पूर्वीचं पुणे का राहिलं नाही? 07.04.2026 40:31
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत राहिलेला आहे. नगर नियोजनातील तज्ज्ञ अनिरुद्ध पावसकर यांनी पुणे महापालिकेचे शहर अभियंता म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना याच विषयावर बोलतं केले आहे संतोष देशपांडे यांनी. पुण्याच्या विकासाची दिशा नक्की कशी आहे, ग...
तेलभूमीत नेमकं काय घडतं? 21.03.2026 26:43
इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज...
हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात? 13.03.2026 24:53
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोन...
ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात... 12.02.2026 19:19
वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी...
डायट प्लॅन करताना... 05.02.2026 29:41
चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतात. त्यातही ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशन्स कसे मदत करते, त्यांच्यासाठी डायट प्लॅन करताना काय केलं जातं अशा अनेक बाबींची उलगड क्...
अर्जुनाविषयी का लिहावसे वाटले? 27.01.2026 2:46
साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी साधलेला हा छोटेखानी संवाद.
`पूर्णवादा`ची जागतिक दखल 16.01.2026 21:40
महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स' प्रकाशित Know Thy Roots सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून नांदेड येथील डॉ. टी.पी. देशपांडे सरांनी पूर्णवाद आंतरराष्ट्रीय पटलावर आणला. नुकत्याच झालेल्या भारतीय तत्त्वज्ञान परिषदेत त्यावर विशेष व्याख्यान दिले. या पार्श्वभूमीवर, पूर्...
'स्पेलिंग' बदलून नशीब बदलते? 22.12.2025 29:04
Numerology म्हणजेच अंकशास्त्र याचा आपल्या नावाच्या 'स्पेलिंग'शी काय संबंध आहे? आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून आपले भवितव्य बदलता येते का? असेल तर कसे? या विषयी पुण्यातील प्रसिद्ध Numerology अभ्यासक नीलेश पैठणकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा एकदम 'हटके' संवाद! हा संवाद युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा- https://youtu.be/Ldek3dxkhDE
उद्याची 'फॉरेन लँग्वेज' कोणती? 15.12.2025 25:02
परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. परकीय भाषातज्ज्ञ अदिती विशाल यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून परकीय भाषा का शिवावी इथपासून कोणती भाषा शिकणे सोपे आहे, कठीण आहे आणि कोणत्या भाषांना नजिकच्या काळात भवितव्य आहे इथ...
`हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास` उलगडताना... 25.11.2025 49:20
शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची ओळख. ही परंपरा काळाच्या ओघात समृद्ध होत गेली. गेल्या सात शतकांचा वेध घेत त्यातील महत्त्वाच्या नोंदी आपल्यापुढे आल्या आहेत 'हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास' या संशोधनसिद्ध ग्रंथातून. प्रसिद्ध गायिका, संगीताच्या अभ्यासक विदुषी अंजली मालकर यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हा इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने पुढे आणला आहे. मराठी भाषेत कदाच...
....म्हणून `तुकाराम`! - दिग्पाल लांजेकर 15.11.2025 43:52
आजचे आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा अभंग तुकाराम हा नवा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आपल्या शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांच्या माध्यमातून मराठी रसिकांपुढे शिवकाळ उभा करणारे दिग्पाल लांजेकर यांना या नव्या निर्मितीतून काय संदेश द्यायचा आहे, संत तुकारामांचे, त्यांच्या अभंगांचे दर्शन नव्या पिढीपुढे त्यांना का उभा करावेसे वाटले, या प्रवासातील आव्हाने काय होती अशा अनेक...
`लक्षात ठेवण्या`ची कला! 05.11.2025 43:39
स्मरणशक्ती ही आपल्याला लाभलेली देणच आहे. मात्र, आपण तिचा किती उपयोग करतो हे कोडेच असते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे ही खरे तर एक कलाच आहे. म्हणजे नेमके काय, याची उलगड करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट अर्थात, स्मरणशक्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ विष्णू चौधरी सरांसोबत संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून उलगडल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला या कलेच्या अगदी जवळ घेऊन जातात. मेमरी मॅनेजमेंट प्रत्येक...
ध्यानातून ज्ञानाकडे.... 19.10.2025 28:46
जगभरात दिवाळी साजरी होत असताना आपल्या अंतःकरणात तेज कसे जागवावे, जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल, याचं सुरेख विवेचन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये केले आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि अंतरात साठवावे आणि समृद्ध व्हावे असे हे मौलिक विचारधन.
स्टोरीटेलिंगचा फॉरमॅट बदलतोय? 06.10.2025 20:37
गोष्ट ऐकणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट. गोष्ट सांगण्याचे, ऐकण्याचे माध्यम बदलत जात आहे. पारंपरिक पुस्तक, चित्रपटांपलीकडे जात ऑडिओबुक्स, शॉर्टफिल्म्स आता प्रचलित झाले आहेत. आता मोबाईलच्या माध्यमातून व्हर्टिकल स्टोरीटेलिंगचा ट्रेंडही जोरात सुरु आहे. या सर्व स्थित्यंतराचा वेध स्टोरीसाइड इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमध्ये घेतला आहे.
मृत्युनंतर घडतं काय? 19.09.2025 42:06
मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या लेखिका डॉ. मनिषा अन्वेकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला विशेष संवाद. व्यक्ती मरते म्हणजे काय घडते, माणसाला मृत्युची चाहूल लागते का, जन्म-मृत्यू आणि कर्माचा संबंध असतो का, मृत्यू हा विधिलिखत अस...
उद्योजकांचा सॅटर्डे क्लब! 10.09.2025 33:30
मराठी लोकांमध्ये उद्यमशीलतेचा अभाव असल्याने ते उद्योग-व्यवसायात मागे पडतात, मुळात उद्योग करणे हा त्यांचा पिंडच नाही ही सामाजिक धारणा अजूनही आपल्याकडे आहे. ती मोडीत काढून व्यवसायात असणाऱ्या मराठीजनांना एका सूत्रात बांधत एकमेकांच्या साहाय्याने उद्योगात यश मिळवता येते, हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने दाखवून दिले. कै. माधवराव भिडे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रेरणेतून रुजलेले हे बीज आता चळवळ बनून अनेक म...
ढोल-ताशा आणि `आमचा` आवाज! 04.09.2025 30:15
ढोलताशा पथक हे पुण्याच्याच नव्हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतील एक अविभाज्य अंग आहे. विशेषतः गणेशोत्सवातील ढोलताशांचा निनाद हा सर्वांनाच भुरळ घालतो. अशा ढोलताशा पथकांमध्ये महिलावर्गाचाही फार मोठा सहभाग असतो. या महिलावर्गाचा विशेषतः पथकांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे जग काय असते, त्यांच्यापुढची आव्हाने काय असतात, त्यावर त्या कशी मात करतात, त्यांचे अनुभव काय आहेत...याबाबतचा त्यांचा आवाज आपल्य...
`संस्कृत`ला भवितव्य आहे? 23.08.2025 38:43
भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतची आधुनिक काळात पिछेहाट झाली. मात्र, अजूनही तिचे अस्तित्व टिकून आहे. किंबहुना, तिला आता उर्जितावस्था येते आहे. बदलत्या काळात संस्कृतचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ते कसे, याच विषयी `संस्कृत भारती`चे अ.भा. प्रचार प्रमुख डॉ. सचिन कठाळे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. या संवादातून संस्कृत का मागे पडली इथपासून ते संस्कृतमध्ये असे काय...
भाषा अनेक तर संधी अनेक! 14.08.2025 55:30
बदलत्या जगात तुम्हाला जितक्या भाषा अवगत असतील तितक्या पुढे येण्याच्या संधीही लाभतील. म्हणूनच, `स्टोरीटेल कट्ट्या`वर संतोष देशपांडे यांनी संस्कृतपासून मराठी-कन्नड-मल्यालम अशा कैक भाषांमध्ये पारंगत असणारे विद्वान अभ्यासक, अनुवादक वासुदेव डोंगरे यांना बोलतं केलंय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठीवर प्रभुत्व मिळवून अन्य भारतीय भाषांवरही तितकेच प्रेम करणारे आणि त्यात आपले वेगळे करिअर घडवणारे भाषातज्...
एक अशीही `सृष्टी` 16.07.2025 29:40
गोंदियासारख्या दुर्गम भागातून आलेली मराठी मुलगी सृष्टी पाटील पर्यावरणशास्त्राचे धडे घेऊन आता थेट अंतराळ जीवसृष्टीवर संशोधन करते आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी आहे. आपली आवड जोपासत, मनातील कुतुहलभाव कायम राखत करिअर कसे घडविता येऊ शकते, याचे दर्शन तिच्या या प्रवासातून घडते. स्टोरीटेल कट्ट्यावर सृष्टीने तिच्या या प्रवासाचीच नव्हे तर एकूणच या क्षेत्राची, त्यातील विविध संधींची केल...
महाराष्ट्रात हिंदी सक्तीची? खरे काय? 24.06.2025 20:53
नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसताच त्यावर मोठा वादंग सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या भूमिकेवर मराठीप्रेमी नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी याच वादंगावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठीला डा...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.