Ideabrew Studios

Sports कट्टा

Sports MR ↓ 507 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Author

Ideabrew Studios

Category

Sports

Podcast website

bingepods.com

Latest episode

Sep 8, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Harbhajan vs Sreesanth 'SLAPGATE' Controversy 20.04.2023

पहिल्या-वाहिल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला-वहिला वादंग. तोही भारताच्या २ सुपरस्टार्समध्ये. तेदेखील मैदानावर एकानी दुसऱ्यावर हात उगारून. नक्की काय झालं ज्यामुळे हरभजन सिंगने श्रीसांथच्या मुस्काटात मारली? आणि त्याच्यामुळे भारतीय क्रिकेटविश्व किती बदललं? भारतीय क्रिकेट बोर्डाने - BCCI ने - का आणि काय कारवाई केली? त्या घटनेचा मोहालीत साक्षीदार असलेला आणि IPL इतिहासातील पहिली 'कॉंट्रोव्हर्सी' वार्त...

Sourav Ganguly vs Virat Kohli, Nitish Rana vs Hrithik Shokeen 18.04.2023

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार संघामध्ये १५ खेळाडू असताना प्रत्येकाचं सगळ्यांशी पटेलच असं नाही. पण जमवून घेणं प्रत्येकाचं काम आहे. गेल्या आठवड्यात IPL मध्ये सौरव गांगुली-विराट कोहली आणि नितिश राणा-रितिक शोकिनमध्ये जे घडलं त्यावरून खेळाडूंमध्ये किती खुन्नस असते याची झलक बघायला मिळाली. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स स्पर्धा अजून ४० दिवस शिल्लक असतानाच पुढच्या सीझनकडे डोळे लावून बसले असावेत अस...

का केले होते Shah Rukh Khan ला वानखेडे स्टेडियमवर ban? 13.04.2023

इंडियन प्रीमियर लीग आणि वाद-विवाद हे जणू काही समानार्थी शब्द आहेत. IPL मधील आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चेत असलेले विवाद सादर करताना पहिल्या भागात आम्ही निवड केली आहे मुंबईतील २०१२ मधील घटनेची जेव्हा शाहरुख खानवर मैदानावर हाणामारी केल्याच्या व अपशब्द वापरल्याच्या आरोपानंतर  मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर बंदी घातली होती.Indian Premier League is  synonymous with controversies. While presen...

Saaptahik CCBK, Rinku Singh चा प्रवास, Ajinkya Rahane चा नवा ध्यास 11.04.2023

रिंकू सिंगने कोलकता नाईट रायडर्ससाठी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच सिक्स मारून कमाल केली. आहे तरी कोण रिंकू सिंग? आणि त्याच्या कामगिरीमुळे KKR आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ह्या दोघांनाही सुटकेचा निःश्वास का बरं टाकला असावा? २०२३ ची IPL हि इन्जुअर्ड प्रीमियर लीग समजली जाईल? आणि अश्याच एका दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेची T२० कारकीर्दीला नवे पंख फुटले आहेत? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये आ...

जेव्हा MS Dhoni ने माझ्यासाठी IPL मॅच-बॉल सही केला 09.04.2023

IPLची मॅच हॉस्पिटॅलिटी बॉक्समधून सेलिब्रिटीसारखं बघता येणं, ते सुद्धा स्वत:च्या शहरात नाही तर थेट दुबईला विमानाने जाऊन. ती मॅचसुद्धा मुंबई-चेन्नई या आपयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली. मॅच संपल्यानंतर धोणीची प्रत्यक्ष भेट आणि त्याच्याकडून सही करून मिळालेला बॉल. सगळंच स्वप्नवत घडलं २०१४ मध्ये. त्याचीच अविस्मरणीय आठवण आपल्याला आदित्य जोशी त्याचा मित्र मनन भट बरोबर सांगत आहे. Watching the IPL matc...

Saaptahik CCBK, Mark Wood गाजवणार IPL 2023? 04.04.2023

कोण वाटत आहे सर्वात बॅलन्स्ड संघ? पहिल्या सहा सामन्यांमधून सर्वात समतोल संघाचा अंदाज बांधता येईल? दक्षिण आफ्रिकेची फौज दाखल झाल्यावर कोणाला होईल सर्वात जास्त फायदा? रोहित शर्माची कामगिरी सुधारणं किती आवश्यक आहे? इम्पॅक्ट प्लेयर्समध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'कल्याण एक्स्प्रेस' तुषार देशपांडे सोडून अजून कोणी चमकलं आहे? आणि मार्क वूड होईल ह्या स्पर्धेचा स्टार? 'साप्ताहिक CCBK' मध्ये आदित्य जोशी व अमोल...

CCBK Explainer, 5 Legends in IPL 2023 04.04.2023

IPL मध्ये जसं अनेक नवीन खेळाडूंना आपलं टॅलेंट दाखवता येत, त्याचप्रमाणे नावाजलेल्या खेळाडूंना आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करायची संधी मिळते. गेल्या IPL मध्ये हार्दिक पांड्याने ती संधी पुरेपुर साधली आणि टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून कमबॅक केलं. यावर्षीदेखील अनेक रथी महारथींचा कस लागणारे. कोण आहेत हे रथी-महारथी आणि काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून हे सांगत आहे आदित्य जोशी सीसीबीकेच्या या IPL विशेष भा...

CCBK Explainer, 5 Missing Stars in IPL 2023 31.03.2023

IPL ही जगातील सर्वात श्रीमंत T२० स्पर्धा आहे. त्यामुळे अगदीच नाईलाज झाला तरंच खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ IPL मध्ये अनुपलब्ध असतात. इतर देशांच्या क्रिकेट नियामक मंडळांना सुद्धा त्यांचे खेळाडू IPLला पाठवण्याचे पैसे मिळतात. एकंदरीतच स्पर्धेतील सहभाग तुम्हाला मालामाल करतो. त्यामुळे करियर आणि आर्थिक स्थैर्य ह्यासाठी दृष्टिकोनातून स्पर्धा महत्त्वाची ठरते. असं असून देखील ह्या ना त्या कारणाने काही नावाजलेल...

२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 2 31.03.2023

इंडियन प्रीमियर लीगची १६ वी आवृत्तीच्या 'काउंटडाउन' चा भाग म्हणून CCBK ने नुकताच पुण्यात IPL च्या गप्पांचा कार्यक्रम - T२० लीगची टोलेबाजी - आयोजित केला होता. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, CCBK चे खंदे पाठीराखे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी क्रिकेट चाहते डॉ. गौतम गोवित्रीकर यांनी IPL च्या विविध कंगोऱ्यांवर संवाद साधला.  हा कार्यक्रम पाहण्यासाठी १३० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते....

२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 1 28.03.2023

इंडियन प्रीमियर लीगची १६ वी आवृत्तीच्या 'काउंटडाउन' चा भाग म्हणून CCBK ने नुकताच पुण्यात IPL च्या गप्पांचा कार्यक्रम - T२० लीगची टोलेबाजी - आयोजित केला होता. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, CCBK चे खंदे पाठीराखे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी क्रिकेट चाहते डॉ. गौतम गोवित्रीकर यांनी IPL च्या विविध कंगोऱ्यांवर संवाद साधला.  हा कार्यक्रम पाहण्यासाठी १३० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते....

WPL ठरेल महिला क्रिकेटचा टर्निंग पॉईंट? 27.03.2023

हरमनप्रीत कौरच्या संघाने मुंबई इंडियन्सला पहिलीवहिली WPL जिंकवून देऊन मुंबापुरीच्या क्लबला सातवी ट्रॉफी मिळवून दिली. मुंबई व दिल्ली कॅपिटल्समधील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यापलीकडे जाऊन समजून घेऊया पहिल्या WPL हंगामाचे महत्त्व. अमोल कऱ्हाडकर व एस. सुदर्शनन मारत आहेत गप्पा क्रिकेटच्या गुणवत्तेबद्दल, प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल, RCB च्या अपयशाबद्दल व पुढील वर्षी होऊ शकणाऱ्या सुधारणांबद्दलHarmanpreet...

Domestic uncapped players to watch out for in IPL 2023 26.03.2023

रथी-महारथी जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच देशांतर्गत क्रिकेटमधील भारतीय खेळाडू IPL मधील यशस्वी संघांसाठी निर्णायक ठरू शकतात. आदित्य जोशी सांगत आहे ५ 'अनकॅप्ड' खेळाडूंबद्दल ज्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल IPL २०२३ मध्ये Indian domestic cricketers play as critical role as the stalwarts for a team's success in the Indian Premier League. Aditya Joshi profiles five domestic uncapped cricketers to w...

Impact Player म्हणजे काय रे भाऊ... 24.03.2023

आयपीएल २०२३ मध्ये बीसीसीआयने इंपॅक्ट प्लेअरचा नियम आणला आहे. नक्की कसा वापर करू शकतील संघ या नवीन नियमाचा? कसा ठरू शकेल हा गेमचेंजर आयपीएलसाठी. त्याशिवाय प्रथमच आयपीएल होणारे ईशान्य भारतामध्ये. का निवडलं आहे राजस्थान रॉयल्सने दूरचं मैदान? ही आणि अशीच अजून ३ आयपीएल २०२३ ची वैशिष्ट्ये घेऊन तुमच्या समोर येत आहेत आदित्या जोशी आणि अमोल क-हाडकर

पुन्हा भेडसावणार भारताला No. ४ चा प्रश्न? कोण होणार WPL विजेता? 23.03.2023

ऑस्ट्रेलियाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, परंतु ४ वर्षांमधील घरच्या मैदानावरील पहिल्या मालिकेतील पराभव ही भारताला वर्ल्ड कपआधी चपराक आहे? भारताच्या पराभवाचं खापर फक्त सूर्यकुमार यादवच्या अपयशावर फोडणं योग्य आहे? आली आहे वेळ पुन्हा एकदा संजू सॅम्सनला संधी देण्याची? आणि पहिल्यावाहिल्या WPL च्या साखळी फेरीनंतर काय आहेत चर्चेतील मुद्दे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये        One cannot...

Ruturaj Gaikwad ते Rohit Sharma; Jitesh Sharma ते Prithvi Shaw: कोणता मराठी खेळाडू तोडणार IPL २०२३? 22.03.2023

मराठी नववर्षाच्या सुरुवातीचा मुहूर्त पाहून सुरु करूया 'थोडा हटके' असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 'काउंटडाउन' ची. १० संघ, आधीचे विजेते, ह्या वर्षीचे फेव्हरिट्स वगैरे गोष्टींमध्ये न जाता जाणून घेऊया IPL २०२३ मध्ये दिसणाऱ्या २५ मराठी-भाषिक खेळाडूंबद्दल. हा एपिसोड रेकॉर्ड करताना आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकरला फार मजा आली. आशा आहे तुम्हालाही येईल.         Let's start CCBK's different IPL countdown on...

Saaptahik CCBK, Border Gavaskar Trophy series review, ft. Sunandan Lele 14.03.2023

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ जिंकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा गाठ पक्की केली. कोहलीने एका 'विराट' खेळीने टीकाकारांची बोलती बंद केली खरी, पण शुबमन गिलने ज्या पद्धतीने शतक झळकावलं त्यावरून भारतीय संघाचं भविष्य सुरक्षित हातात आहे, ह्याची खात्री नक्की पटवून दिली? आणि भविष्याचा विचार करताना, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कोहली, स्टिव्ह स्मिथ, डे...

आखाडे बनवून Team India नक्की काय साध्य करते? 07.03.2023

पुणे २०१७ ची पुनरावृत्ती इंदोरमध्ये झाली. ह्या दारुण पराभवाला नक्की जबाबदार कोण? काय साध्य होतं भारतात वारंवार आखाडे बनवून? अहमदाबाद कसोटीत काय बदल घडू शकतात? आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचायची अजूनही भारताला संधी आहे? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकरची चर्चा        Pune 2017 was repeated in Indore last week. Who should be held responsible for India'...

CCBK Saaptahik, कोहली-पुजारा यांना गवसेल का सूर ? 27.02.2023

ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी T२० विश्वचषक अपेक्षेप्रमाणे पटकावला. फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी सलग तिसरा आणि एकूण सहावा विश्वचषक जिंकला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पुरूष मात्र कसोटी सामना पाच दिवस तरी चालवू शकणार का हा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या जागी नेतृत्त्व करणारा स्टीव्ह स्मिथ करू शकेल का काही चमत्कार ? कॅमरून ग्रीन आणि स्टार्क पहिल्यांदाच दिसतील का मालिकेमध्ये ? आणि सगळ्यात महत्...

Harmanpreet च्या run-out मुळे? का खराब fielding मुळे? का संपलं भारताचं आव्हान 24.02.2023

हरमनप्रीत कौरने आजारपणातून सावरून बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारी खेळी खेळली. तरीही भारताच्या उपांत्य फेरीतील पराभवाचं खापर भारतीय महिला संघाच्या कर्णधाराच्या रन-आऊटवर फोडायचं का? का भारताची अतिसामान्य फिल्डिंग त्यांच्या T२० वर्ल्ड कपमधील 'एक्झिट' ला जबाबदार ठरला? उपांत्य सामना व भारताची स्पर्धा ह्यावर प्रकाश टाकत आहे जुईली बल्लाळ          Despite being sick, Harmanpreet K...

Australians ना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणारा Virat Kohli 23.02.2023

जे तेंडुलकर, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण, सेहवाग आणि धोनी अश्या दिग्गजांना जमलं नाही, ते विराट कोहलीच्या भारतीय संघाने करून दाखवलं. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. त्याही आधीपासून, म्हणजे २०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून, कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सुरू झाली. प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात डोळे घालून, शाब्दिक बाचाबाची करणारा आणि २०१४-१५ दौऱ्यात धावांचा डोंगर उभारणार...

मराठीत rapid-fire with Smriti Mandhana 22.02.2023

सांगली का साऊथॅम्प्टन? सांगलीतील एक गोष्ट जी जगात कुठेही घेऊन जायला आवडेल? "माझं आडनाव मंधाना नव्हे, मानधना आहे," हे शेवटचं कधी सांगितलं? ह्या आणि अजून काही प्रश्नांची उत्तरं देत आहे खुद्द स्मृती मानधना, तेही आपल्या मराठीत. Sangli or Southampton? One thing from Sangli that you would love to carry everywhere in the world? When was the last time you corrected someone for having mispronounced your su...

Ashwin, Jadeja ने केला Australia चा 'स्वीप'डा साफ, ft Sunandan Lele 20.02.2023

 सलग दुसरा सामना तिसऱ्या दिवशी खिशात टाकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात एक पाऊ तर टाकलेच आहे, परंतु ऑस्ट्रेलिया  फिरकी गोलंदाजीसमोरील किती कमकुवत आहे हे सुद्धा सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यापेक्षा दुसरा पराभव जास्त जिव्हारी लागेल ऑस्ट्रेलियाच्या? आणि अश्विन, जाडेजा आणि अक्षर ह्या त्रयीला कोण रोखू शकेल? त्याचबरोबर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भारत देईल केएल राहुलला विश्रांती...

Devika Vaidya ला वगळणं पडलं भारताला महागात? 19.02.2023

भारताच्या महिलांनी पुन्हा एकदा इंग्लंडसमोर नांगी टाकल्याने T२० वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकण्याचे स्वप्न भंगू शकतं? काय करावे लागेल भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी? आणि देविका वैद्यच्या जागी शिखा पांडेला खेळवणं भारताला महागात पडलं इंग्लडविरुद्ध? पाहूया जुईली बल्लाळचं विश्लेषण      Has India's defeat against England, its bogey team in the Women's T20 World Cup, dealt a severe blow to Harmanpreet K...

Harbhajan vs Symonds: का करावी लागली India व Australia च्या Prime Ministers ना मध्यस्थी? 18.02.2023

२००७-०८ भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ही क्रिकेटपेक्षा 'मंकीगेट' प्रकरणामुळे अधिक गाजली. हरभजन सिंगने अँड्रयू सायमंड्सला माकड म्हणून चिडवले असा आरोप करण्यात आला. या आरोपाला रेसिझमची किनार असल्याने वातावरण अधिकच बिघडलं. केवळ एकच संघ मैदानावर चांगल्या स्पिरिटने उतरला, असा धक्कादायक शेरा भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने मारला होता. सिडनीमध्ये झालेल्या कसोटीत भारताचा पराभव झाला. पुढे कसोटी मालिका रद्द होत...

CCBK Special, Cheteshwar Pujara ची स्पेशल शंभरी 16.02.2023

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर तब्बल एक तपानंतर चेतेश्वर पुजारा शंभर कसोटी सामने खेळणारा भारताचा १३ वा खेळाडू व्हायच्या उंबरठ्यावर आहेच. त्याचे मैदानातील वर कारकिर्दीतील चढ-उतार तुम्हाला माहीत आहेतच, परंतु त्याच्या राजकोटमधून सुरु झालेल्या प्रवासातील काही रंजक आठवणी सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये  More than 12 year since making his Test debut against Australia, Cheteshwar...

Listen to the Sports कट्टा podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.