Ideabrew Studios
Sports कट्टा
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
CCBK Explainer, Sting operation नंतर राहतील Chetan Sharma chief selector? 15.02.2023 12:15
भारतीय पुरुष संघाचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा ह्यांचं 'स्टिंग ऑपरेशन' करून नक्की काय साध्य झालं आहे? आणि त्याचे पडसाद त्यांच्या हकालपट्टीमध्ये उमटतील? त्यांनी केलेले दावे आणि त्याची पार्श्वभूमी सांगत आहे आदित्य जोशी 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये What exactly has been achieved by the 'sting operation' of Indian men's selection committee chief Chetan Sharma? And will its repercussions see Ch...
Pakistan विरुद्ध विजयात भारताने केले Smriti Mandhana ला miss, WPL Auction मध्ये सांगलीची स्मृती झाली hit 14.02.2023 4:45
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपची सुरूवात भारताने पाकिस्तानचा पराभव करत जोरदार केली. जेमायमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि राधा यादव यांनी मौल्यवान कामगिरी केली. या सामन्यानंतर काहीच तासांत WPL चे पहिलेवहिले ऑक्शन पार पडले. स्मृती मानधना ३.४० कोटींच्या बोलीसह सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. अनेक महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली. भारत-पाकिस्तान सामना आणि ऑक्शन याची थोडक्...
Rohit Sharma, R Ashwin आणि Ravindra Jadeja ने रचला नागपूरात इतिहास 12.02.2023 8:48
कर्णधार रोहित शर्माचे शानदार शतकाने पाय रचला व अष्टपैलू फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटाने त्यावर कळस चढवला. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसांत धुव्वा उडवला. ह्या सामन्याचा 'आँखो देखा हाल' देत आहेत थेट जामठ्यावरून सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर Captain Rohit Sharma's brilliant century laid the foundation and the trio of all-round spinners...
लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीने केला चमत्कार 09.02.2023 9:59
भारतीय क्रिकेट नुकतंच कुठे मॅच फिक्सींगच्या तडाख्यातून सावरत होतं. अशावेळी इतिहासातील सर्वोत्तम असा ऑस्ट्रेलियन संघ स्टीव वॉच्या नेतृत्त्वाखाली भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या इर्षेने आला होता. सलग १५ कसोटी जिंकलेला आणि मॅग्रा-शेन वॉर्न ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे चमत्कार होता. पहिली कसोटी सहज खिशात टाकून दुस-या कसोटीतही तिस-या दिवशी भारताला फॉलॉओन मिळाला. त्यानंतर जे घडलं त्याने ती...
जिंकू शकेल Harmanpreet & Co. भारताचा पहिला Women's World Cup? 08.02.2023 11:34
क्रिकेटमध्ये मंदिरा बेदीची एंट्री २००३ साली दक्षिण आफ्रिकेमधील वर्ल्ड कपच्या वेळी झाली. तेव्हा पुरुषांच्या खेळामध्ये महिला कशाला, अशी बोंबाबोंब झाली होती. गेल्या २० वर्षांत महिला क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रगती आणि सुधारणा झाली आहे. महिलांची प्रिमिअर लीग पुढच्या महिन्यात आहे आणि आत्ता दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय महिला आपला पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत. हरमनप्रीत आणि कंपनीला ऑस्ट्रेलिया,...
Saaptahik CCBK, Rohit Sharma or Pat Cummins? Who will lift the Border-Gavaskar Trophy? 07.02.2023 21:38
११ महिन्यांनंतर होणार भारतात कसोटी मालिका. ती देखील बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध. आणि त्याहून मोठे म्हणजे सहा व नंतर ऑस्ट्रेलिया खेळणार आहे भारतात. हे तर काहीच नाही, ह्या कसोटी मालिकेच्या निकालावर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचणार की नाही, हेही ठरणार आहे. अजून काय हवं आहे मालिकेची उत्कंठा वाढवायला? जे काही हवं आहे ते सादर करत आहेत गौरव जोशी, आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर "साप...
Meet Sayali Naik: Delhi Capitals' dietitian and Suryakumar Yadav's nutritionist 04.02.2023 28:24
२०११ वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याआधी दोन दिवस सचिन तेंडुलकर फक्त दही-भात खात होता. विराट कोहली जेवताना प्रत्येक गोष्ट मोजून मापूनच घेतो; पाणी सुद्धा ठरवून दिलेलं असतं, तेवढंच घेतो. या गोष्टी ते काटेकोरपणे पाळतात त्यांच्या आहारतज्ञाच्या सांगण्यावरून. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना क्रीडापटूच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. "पडद्यामागील शिलेदार" चा भाग हा पैलू उलगडून दाखवण...
Tendulkar व Warne ने रोवली Border-Gavaskar Trophy ची मुहुर्तमेढ 02.02.2023 8:12
भारत वि ऑस्ट्रेलिया. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेट जगतातील कदाचित सर्वात अटीतटीचा सामना. जरी ह्या दोन्ही देशांमधल्या मालिकेचं नामकरण १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं केलं गेलं तरी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला ग्लॅमर आलं, आणि दोन देश एकमेकांच्या जवळ आले. गौरव जोशी, जो २५ वर्षांहून जास्त काळ ऑस्ट्रेलियात राहतो, तो आपल्याला घेऊन जात आहे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या प...
Aditya Tare: Mumbai to Ranji Trophy knockouts via Uttarakhand 31.01.2023 16:45
मुंबईचे रणजी ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी मुंबईच्या शेवटच्या रणजी-विजेत्या कर्णधाराचे - आदित्य तरेचे - आव्हान मात्र अजूनही शाबूत आहे. ह्या हंगामात उत्तराखंडसाठी खेळताना आदित्यने त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या भरारीत मोलाची कामगिरी बजावली आहे. बलाढ्य कर्नाटकाशी लढायला सज्ज होताना आदित्यने त्याच्या व संघाच्या प्रवासाबद्दल CCBK शी गप्पा मारल्या Mumbai's Ranji Trophy challenge may hav...
Ajinkya Rahane on मुंबई क्रिकेट and domestic cricket 28.01.2023 7:52
मुंबईचा अजून एक रणजी ट्रॉफी हंगाम अजिंक्यपदाविना संपला. अजिंक्य रहाणे संपूर्ण हंगाम कर्णधारपदी असूनही. ह्याचा अर्थ मुंबईचे क्रिकेटर्स रणजी ट्रॉफी खेळण्यात कमी पडतात? का पुढच्या पिढीला मुंबईसाठी झुंजण्याची इच्छाशक्ती नाहीये? आणि एकंदर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये काय बदल करायला हवे? हे सर्व प्रश्न आम्ही विचारले खुद्द अजिंक्य रहाणेलाचMumbai's Ranji Trophy title-drought has extended by yet anyoehr season....
CCBK Special, WPL - महिलांची IPL - संघांसाठी पैशांची उधळण 25.01.2023 14:46
कोण आहेत महिलांच्या IPL - ज्याचं नाव विमेन्स प्रीमियर लीग असणार आहे - मधील संघमालक? सर्व संघमालक IPL मधीलच आहेत? नक्की काय विचार आहे WPL मध्ये गुंतवणूक करण्यामागे? कधी होणार आहे पहिली WPL, आणि त्याची ऑक्शन? संघमालकांनी पैशांची उधळण केल्यानंतर काहीच तासांत पडद्यामागच्या घडामोडी सांगत आहेत आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये Who are the team owners in the Women's IPL - titled as...
Saaptahik CCBK, Arch-rivals मुंबई and महाराष्ट्र in must-win Ranji Trophy game 23.01.2023 16:53
मुंबईसाठी पृथ्वी शॉची उणीव भासणार आहे. तीच गत महाराष्ट्राची राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतीत. तरीही रणजी ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे, कारण तो जवळजवळ 'नॉकआउट गेम'च आहे. जो संघ जिंकेल तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. तसेच, विदर्भाला - राज्यातील तिसरा संघ - बाद फेरीत स्थान मिळवण्याची काही संधी आहे का? आदित्य जोशी...
CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी? 21.01.2023 8:53
त्याचं वजन बघा. त्याचा फिटनेस बघा. त्याचा यो-यो टेस्टचा स्कोर बघा. हि सगळी कारणं एकीकडे दिली जात असताना सर्फराझ खान मात्र त्याच्या धावांनी आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीने भारतीय कसोटी संघाचा दरवाजा नुसता ठोठावत नाही, तर तोडायचा प्रयत्न करत आहे. नक्की काय कारण आहे ज्याने निवड समिती अजूनही त्याला घेत नाहीये संघात, पाहूया अमोल कऱ्हाडकरांकडून 'CCBK स्पेशल' मध्ये Look at his weight. Look at his...
Saaptahik CCBK, Will Virat Kohli surpass Sachin Tendulkar's record of 100 hundreds? 17.01.2023 14:55
विराट कोहली वर्ल्ड कप २०२३ च्या आधी ५० ODI शतकांचा पल्ला पार करेल? त्याहूनही महत्त्वाचं, खरंच कोहली सचिन तेंडुलकरांचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकेल? कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी भारतासाठी किती महत्त्वाची आहे? आणि केएल राहुल व अक्षर पटेलची जागा नयूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोण घेऊ शकेल? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर ह्यांच्या गप्प...
CCBK Special, Why Prithvi Shaw isn't considered for Team India 14.01.2023 13:48
रणजी ट्रॉफीमधील विक्रमी ३७९ धावांच्या खेळीने पृथ्वी शॉ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ह्या खेळीने उघडेल पुन्हा भारतीय संघाचा दरवाजा शॉसाठी? नक्की कारणं काय आहेत ज्यामुळे पृथ्वीला गेली ४ वर्षे कसोटी संघातून डावललं जात आहे? खरंच मैदानाबाहेरील कारणांमुळे शॉची मैदानावरील कामगिरी झाकोळली जात आहे? पाहूया आदित्य जोशी सादर करत असलेल्या 'CCBK स्पेशल' मध्ये Prithvi Shaw has hit the headlines for the right...
Saaptahik CCBK, Bumrah's failed comeback bid; Will Suryakumar Yadav get a chance in ODIs? 10.01.2023 15:13
जसप्रीत बुमराहचं पुनरागमन व्हायच्या आधीच फिस्कटलं. कसा हाताळायला हवा बुमराहचा मुद्दा? आणि अक्षर पटेलने T२० व ODI क्रिकेटमध्ये तो रविंद्र जाडेजापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं आहे. सुर्यकुमार यादवची श्रीलंकेविरुद्ध ODI मालिकेसाठी संघात जागा होऊ शकेल? आणि ईशान किशनचं काय होणार? ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये चर्चा करत सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर त्यांचं ODI मालिकेचं भाकित करत आहेत....
फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for 07.01.2023 18:07
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक तर आहेतच, परंतु भारताच्या जलदगती गोलंदाजीचा ताफा येणाऱ्या काळात चालू ठेवणारे १० गोलंदाज निवडले आहेत संदीप जगे ह्यांनी. संदीप, जे अलिबाग परिसरातील सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीचे दहा गोलंदाज निवडले आहेत जे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील. तुमचे टॉप-१० सुद्धा आम्हाला कळवा. हा आहे आपल...
Saaptahik CCBK, IND v SL: Focus on Hardik Pandya, Washington Sundar in T20I series 03.01.2023 11:26
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेकडून आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढेल? कुठल्या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर T२० मालिकेत? पाहूया आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर ह्यांचे विश्लेषण "साप्ताहिक CCBK" मध्ये
CCBK Explainer, Indian cricket's heroes and zeroes of 2022 31.12.2022 17:26
२०२२ च्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र रसिकांच्या दृष्टीने निराशा झाली. राहुल द्रविडसारखा माजी खेळाडू प्रशिक्षक आणि पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी अजून तरी कमाल करू शकलेली नाही. २०२३ मध्ये तरी आपण मॉडर्न क्रिकेट खेळायला लागू आणि नवीन निवड समिती संघामध्ये आवश्यक ते बदल करण्याची धमक असणारी असेल या आशेवर २०२३ सुरूवात करूया. तो...
Saaptahik CCBK, Time running out for KL Rahul and Rahul Dravid? ft Sunandan Lele 27.12.2022 14:01
बांगलादेशविरुद्ध रडतखडत जिंकलेल्या मालिकेने २०२२ चा शेवट जरी गोड झाला असला तरी ह्या वर्षात भारतीय क्रिकेटवरील विविध प्रश्नचिन्ह कायम राहिली आहेत. केएल राहुलला कसोटी संघातून वगळायची वेळ आली आहे का? आणि विराट कोहलीचं काय? संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल? ह्या मुख्य पप्रश्नांवर चर्चा करताना 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर देत आहेत भारतीय पुरुष व...
Saaptahik CCBK, Hot picks at the IPL Auction 2023 21.12.2022 14:29
२३ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात १० संघ मिळून २०६ कोटींची उधळण करू शकतात. त्यातील सर्वात जास्त बोली लागू शकणारे १० लक्षवेधी खेळाडू - ५ परदेशी व ५ भारतीय देशांतर्गत खेळाडू - तुमच्यासमोर मांडत आहे अमोल कऱ्हाडकर 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये
CCBK बोल फुटबॉल - Who will win the FIFA World Cup final? 18.12.2022 13:15
२०२२ चा वर्ल्ड कप अर्जेन्टिना किंवा फ्रान्स कोणीही जिंकले तरी एका अर्थाने विजय हा कतारचाच होणार आहे. कारण लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे हे दोघंही कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट ग्रुप ची मालकी असलेल्या पी.एस.जी ह्या संघाकडून खेळतात आणि साहजिकच ह्या अंतिम सामन्याचं मुख्य आकर्षण असणार आहेत आणि मेस्सीचा हा वर्ल्ड कप मधला अखेरचा सामना आहे हे नक्की..
CCBK Explainer, How does IPL Auction operate? 17.12.2022 12:06
२०२३ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाची खरी सुरुवात डिसेंबर २३ ला होणाऱ्या ऑक्शनने होत आहे. लिलावाआधी नक्की ऑक्शनच्या आधी आणि लिलाव चालू असताना संघमालक व अधिकारी करतात काय, हे माहित आहे तुम्हाला? जाणून घेऊया आदित्य जोशीकडून "बी. यु. भंडारी प्रस्तुत कॅचबक एक्स्प्लेनर" मध्ये
Saaptahik CCBK, Enigmatic Ishan, daredevil Devika and unsung hero Unadkat 13.12.2022 18:42
ईशान किशनच्या विक्रमी खेळीचं महत्त्व काय? आणि भारताच्या महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला रोखण्यात एका पुणेकराचा मोलाचा वाटा आहे, माहीत आहे ना? त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कोणाचं पारडं असेल जड? आणि रणजी ट्रॉफीच्या ८८व्या हंगामाचं काय आहे वैशिष्ट्य? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये
CCBK Special, Ruturaj, Rajvardhan and record run: Ankeet Bawane relives Maharashtra's memorable campaign 10.12.2022 29:32
ऋतुराज गायकवाडची तडाखेबंद फलंदाजी आणि इतर खेळाडूंच्या झुंजार खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. उपकर्णधार अंकीत बावणे, ज्याने ऋतुराजच्या अनुपस्थितीत चार सामन्यांत कर्णधारपद भूषवले, सांगत आहे महाराष्ट्राच्या यशाचे रहस्य
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.