Ideabrew Studios
Sports कट्टा
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
CCBK बोल फुटबॉल - How magical Morocco stunned Spain 08.12.2022 12:34
स्पेनचा आणखी एक पेनल्टी शूटआऊटमधील पराभव स्पेनच्या 'झिरो माईल' मधील एका बारमध्ये पाहिल्यावर अमोल गोखले सांगत आहे त्याचा अनुभव 'बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल' मध्ये. त्याचबरोबर अमोल सांगत आहे पोर्तुगाल व मोरोक्कोच्या यशाचं रहस्य आणिकरत आहे भाकीत प्रत्येक उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याचं
Saaptahik CCBK, Rohit and Dravid's woes, Rahul on toes? 06.12.2022 21:08
सौराष्ट्रच्या देशांतर्गत क्रिकेटचं रहस्य काय? भारताचा बांगलादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभव जिव्हारी लागणारा होता का अपेक्षित? हा भारतीय संघ नक्की कोणत्या कर्णधाराचा? आणि केएल राहुलचं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणं खरंच संभ्रमात पाडणारं आहे? पाहूया सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकरच्या गप्पा "बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये
CCBK Explainer, Who will be India's new chief selector? 30.11.2022 13:41
अजित आगरकर होणार नवा निवड समिती अध्यक्ष का हेमांगी बादानी? विरेंदर सेहवागसारखा महान, फटकळ व ज्याच्या शब्दाला वजन आहे असा खेळाडू का नाही होऊ शकत भारताचा 'चीफ सिलेक्टर'? आणि इंग्लंडसारखी विशेष T२०I साठी निवड समिती सदस्याची नेमणूक भारतीय क्रिकेटमध्ये होऊ शकते? ह्या प्रश्नांची उत्तरे व निवड समितीसंदर्भातील विविध कंगोरे जाणून घेऊया "बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर" मध्ये
CCBK बोल फुटबॉल - Ronaldo, Messi steal the limelight at FIFA World Cup 28.11.2022 11:49
क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, एम्बापे, नेमार व रॉबर्ट लेवान्डोवस्की हे विविध कारणांमुळे फुटबॉल वर्ल्ड कपच्या गेल्या आठवड्यात चर्चेत राहिले. ह्याची कारणे समजावून सांगत आहे अमोल गोखले 'बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल' च्या ह्या भागात
Saaptahik CCBK, Should Shikhar Dhawan be persisted till 2023 ODI World Cup? 23.11.2022 15:40
न्यूझीलंड मधील T२० मालिकेतील यशानंतर हार्दिक पंड्या २०२४T२० वर्ल्ड कपसाठी कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार आहे? संजू सॅम्सन व उमरानमलिकला संधी मिळायला हवी होती T२० मालिकेत? एकदिवसीय मालिकेचा कर्णधारशिखर धवन २०२३ वर्ल्ड कपसाठी योग्य सलामीवीर आहे? आणि विजय हजारेट्रॉफीमध्ये नॉर्थ-ईस्टर्न संघांना मोठ्या संघांबरोबर खेळवणे योग्य आहे?जाणून घेऊया ज्येष्ठ क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर "बी. यु. भंडारीप्रस्तुत...
CCBK बोल फुटबॉल - FIFA World Cup 2022 format explained 20.11.2022 16:11
अल्कोहोल सेवनावर बंदी आणल्यावर चाहत्यांनी काय करायचं मैदानात? त्याहून महत्त्वाचं, वर्ल्ड कपमधील विजेतेपदाचे प्रमुख दावेदार कोण आहेत? "बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल" मध्ये अमोल गोखलेचा एक्स्प्लेनर पहा व तुमचे दावेदार सांगा आम्हाला
CCBK बोल फुटबॉल - Qatar 2022: Background, peculiarities and controversies 17.11.2022 12:04
कॉफी आणि क्रिकेट तर आहेच, 'बरंच काही' ची सुरुवात फुटबॉल वर्ल्ड कपने करूया "बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल" मालिकेत.क्रीडापत्रकार अमोल गोखले, ज्यानी नुकतंच रिअल माद्रिद ग्रॅड्यूएट स्कुल येथून फुटबॉल कोचिंग आणि मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे आणि एका स्थानिक फुटबॉल क्लब मध्ये आता काम करतो आहे, तो पहिल्या भागात सांगत आहे २०२२ वर्ल्ड कप कतारमध्ये खेळवला जाण्याची पार्श्वभूमी, ह्या वर्ल्ड कप...
CCBK T२० आतषबाजी - Powerplay, strike rate haunt India in T20 World Cup 14.11.2022 7:25
वयस्कर संघ. दोन महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती. आणि इंग्लंडचा झंझावात. ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर मांडत आहे दोन नाजुक मुद्दे ज्यामुळे भारताचा उपांत्य सामन्यातील पराभव जिव्हारी लागला. पॉवरप्लेमधील कामगिरी आणि त्याच्याशीच निगडित असलेले तेच पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज हा एक अनाकलनीय मुद्दा होत आहे. २०२४ साठी आम्ही ठेवत आहोत काही पर्याय ज...
CCBK T२० आतषबाजी - What's the secret of Suryakumar Yadav's success? Ask Vinayak Manel "ft. Vinayak Mane" 09.11.2022 9:24
सूर्यकुमार यादवच्या T२० विश्वचषकातील अचंबित करणाऱ्या कामिगिरीचं रहस्य काय? सूर्याने वर्ल्ड कपसाठी तयारी कशी केली? कोण करायचं त्याला गोलंदाजी? आणि त्याचे विचित्र फटके तो नेट्समध्ये देखील खेळायचा? जाणून घेऊया विनायक मानेंकडून, जे पारसी जिमखाना संघाचे - सूर्याचा मुंबईतील क्लब - प्रशिक्षक आहेत.
CCBK T२० आतषबाजी - Will it be India vs Pakistan final in T20 World Cup? "ft. Sunandan Lele" 08.11.2022 21:12
४ आठवडे, ४२ साखळी सामने आणि डझनभराहून जास्त अनपेक्षित निकालानंतर T२० विश्वचषकातील ४ सेमीफायनलिस्ट्स आपल्याला माहित आहेत. वरिष्ठ क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर घेऊया आढावा साखळी सामन्याचा आणि घेऊया अंदाज भारताच्या कामगिरीचा व भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या अंतिम सामन्याच्या शक्यतेचा
CCBK T२० आतषबाजी - Rahul and Virat star for India against Bangladesh 03.11.2022 8:27
भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामधील चर्चेतील मुद्दे जाणून घेऊया अमोल कऱ्हाडकरकडून "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये
CCBK T२० आतषबाजी - India vs Bangladesh: Rohit, Rahul, Karthik in spotlight 01.11.2022 8:25
केएल राहुलचं करायचं तरी काय? दिनेश कार्तिक होणार का 'फिट'? आणि रोहित शर्मा त्याचं बांगलादेश-प्रेम पुन्हा एकदा मोठी खेळी खेळून सिद्ध करेल? पाहूया भारताच्या बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सुपर १२ सामन्याचं पूर्वावलोकन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये
CCBK, T२० आतषबाजी - Can India get past Proteas pacers in Perth? 29.10.2022 9:38
भारतीय संघाने T२० विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात तर केली आहे, परंतु ऑक्टोबर ३० ला होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशासाठी महत्त्वाचा असेल. "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे ह्या सामन्यात भारतासाठी असलेल्या पूरक व मारक बाबी
CCBK, T२० आतषबाजी - King Kohli floors Pakistan at MCG 25.10.2022 8:06
एकहाती सामना जिंकवून देणे म्हणजे नक्की काय हे विराट कोहलीने दाखवून दिल्यानंतर मेलबर्न ते माथेरान सर्वत्र जल्लोष होत आहे. MCG वर सामना पाहिल्यानंतर काहीच क्षणांत त्याच्या भावना शब्दबद्ध केलेला आदित्य जोशी, कोहलीच्या कमालीनंतर त्यापासून प्रेरित झालेला होतकरू क्रिकेटर समृद्ध भट व CCBK चा अमोल कऱ्हाडकर सांगत आहेत कोहलीच्या पराक्रमाबद्दल "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" च्या ह्या विशेष भागात
CCBK Explainer, India vs Pakistan: Will rain play spoilsport on Sunday? 22.10.2022 14:58
ज्येष्ठ क्रीडामीक्षक सुनंदन लेले मेलबर्नमधून सांगत आहेत T२० वर्ल्ड कपमधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खरंच पावसामुळे न होण्याचा धोका आहे? त्याचबरोबर लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत चर्चा भारत खरंच अजिंक्यपदासाठी दावेदार आहे का, ह्या विषयावर.
CCBK Explainer, How India can beat Pakistan at MCG 20.10.2022 7:41
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ला 'The G' असं संबोधतात. तिथे २०२२ T२० वर्ल्ड कपचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहित शर्माच्या भारतीय संघाला कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावे लागेल? MCG वर खेळायच्या आधी २००८ मध्ये धोनीने व २०१५ मध्ये रोहित व विराटने काय विशेष तयारी केली होती? आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला २३ ऑक्टोबर - व त्यानंतरही इतर सामन्यांमध्ये - MCG वरील सामना पाहताना कोणत्या गोष्टींवर...
CCBK Explainer, Can India win the T20 World Cup in 2022? 19.10.2022 16:05
शाकिब अल हसनच्या बांगलादेशकडून जेवढी निराशाजनक कामगिरीची खात्री आहे त्याच्या कित्येक पट आशा-अपेक्षांचं ओझं रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. भारताला १५ वर्षांनंतर T२० विश्वविजेता होण्यासाठी परिस्थिती खरंच अनुकुल आहे? हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव झुकवू शकतील पारडं भारताच्या बाजूने? भारताच्या संघाचं 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' मध्ये विश्लेषण करताना गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर देत आहेत त्यां...
CCBK Explainer, Will Jos Buttler's England boss the T20 World Cup? 17.10.2022 15:52
'होस्ट' ऑस्ट्रेलियानंतर जर एक संघ T२० विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असेल तर तो म्हणजे इंग्लंड. खरंच इंग्लंड २०१० ची पुनरावृत्ती करू शकेल? जॉस बटलरला अजिंक्यपदाच्या शर्यतीत स्वतःच्या संघातील कुठले प्रमुख अडथळे पार करावे लागतील? आणि अफगाणिस्तान अखेर स्वतःची छाप वर्ल्ड कपवर सोडू शकेल? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' च्या ह्या भागात
CCBK Explainer, Miller magic to work for South Africa? Is Pakistan a title contender? 15.10.2022 15:02
सर्वात संतुलित गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका मारू शकेल धडक T२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत? आणि पाकिस्तान टाकेल एक पाऊल पुढे गेल्या वर्षीच्या साखळी फेरीतील धडाकेदार कामगिरीनंतर? गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर टाकत आहेत नजर ह्या दोन संघांच्या ताकदी व उणीवांवर. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन नक्की सांगा आम्हाला
CCBK Explainer, India's T20 World Cup voyage explained 13.10.2022 11:15
रोहित शर्माची फौज ऑस्ट्रेलियामध्ये पोचली आहे. भारताने पूर्वतयारीसाठी पर्थची निवड का केली?ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशात एक वर्ल्ड कप खेळताना काय आव्हाने आहेत? आणि साखळी स्पर्धेत प्रवास सोडून भारत खेळत असलेल्या प्रत्येक मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी CCBK च्या ऑस्ट्रेलियन-महाराष्ट्रीयन गौरव जोशीपेक्षा दुसरा कोणता पर्याय असेल? पाहूया "बी. यु. भंडारी प्रस्तुत गॅवचा ग...
CCBK Explainer, Williamson's quest for glory, Finch and Co. chase history 11.10.2022 14:32
T२० वर्ल्ड कपसाठी काहीच दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. सुरु करूया CCBK चा काऊंटडाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" सदरात. पहिल्या भागात गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ह्या तुल्यबळ संघाचं. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन सांगा व वर्ल्ड कपच्या सफरीत आमच्याबरोबर नक्की रहा.
Meet Sarfaraz Khan, the maverick Mumbai run-machine 08.10.2022 6:30
त्याने आपल्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटजगतात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण बॅटिंगने त्याचा भारतीय संघात प्रवेश "होणार का?" पेक्षा "कधी होणार?" ह्याची चर्चा जास्त आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भले मोठी खेळी खेळण्यात त्याची हातोटी असली, तरी T२० मध्येसुद्धा सर्फराझ खान तेवढाच प्रभावी आहे. पाहूया सर्फराझची पहिली मराठी मुलाखत "बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK स्पेशल" सदरात
Saaptahik CCBK, Who should replace Bumrah for T20 World Cup? 06.10.2022 10:08
T२० वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी भारताने कोणाला घ्यावे संघात? दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या T२० मालिकेतील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? आणि एकदिवसीय मालिकेतूनही डावलल्यानंतर पृथ्वी शॉवर खरंच अन्याय होत आहे का? "बीयु भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये ह्या तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकत आहे अमोल कऱ्हाडकर
A tale of Rohit Sharma's turnaround 01.10.2022 9:41
रोहित शर्मासाठी २०२२ चा T२० वर्ल्ड कप व २०२३ चा ODI वर्ल्ड कप विशेष महत्त्वाचा का आहे? २०११ वर्ल्ड कपच्या निराशेनंतर रोहितने कसा केला 'कमबॅक'? रोहितचं कार्सचं प्रेम जगजाहीर आहे, परंतु कोणी शिकवलं त्याला कार चालवायला? आणि कोण आहेत रोहितचे आवडते कलाकार? ह्या सगळ्यांची उत्तरं घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर 'बीयु भंडारी प्रस्तुत कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही' च्या ह्या भागात
Saaptahik CCBK, Rahane's discipline, Deepti's run-out and Virat's form 27.09.2022 14:55
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेएवढेच, किंबहुना त्याहून जास्त चर्चा झालेले क्रिकेटजगतातील २ विषय घेऊन येत आहेत गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये. दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने सहकारी यशस्वी जयस्वालला खरंच मैदानाबाहेर 'हाकलून' दिलं? आणि शेवटच्या फलंदाजाला नॉन-स्ट्रायकर एंडला धावचीत करून दीप्ती शर्माचं काही चुकलं का? आणि अर्थात, भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी T२० मालिकेतून वर्ल...
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.