Ideabrew Studios

Sports कट्टा

Sports MR ↓ 507 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Author

Ideabrew Studios

Category

Sports

Podcast website

bingepods.com

Latest episode

Sep 8, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Meet Satyajit Satbhai, the match referee 24.09.2022

सामनाधिकारी - साध्या मराठीत मॅच रेफ्री - नक्की करतो काय क्रिकेट सामन्यात? खेळाडूच का बरं होऊ शकतात मॅच? आणि ह्या भूमिकेतील आव्हानं व संधी काय आहेत? चला करूया सैर सामनाधिकाऱ्यांच्या दुनियेत माजी महाराष्ट्राचा खेळाडू व BCCI पॅनेलवरील तरूण मॅच रेफ्री सत्यजित सातभाईकडून. ह्या भागाचे लोकेशन पार्टनर आहेत पुण्यातील "LCR जिमखाना" हे रेस्टॉरंट

Where should Smith and Rahul bat during India versus Australia series? 20.09.2022

भारत व ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांवर असलेल्या दुखापतींच्या सावटामुळे आगामी मालिका ही T२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम कदाचित ठरणार नाही. तरीही ह्या मालिकेचं महत्त्व आणि उत्सुकता खचितच कमी होत नाही. 'साप्ताहिक CCBK' मध्ये गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर सांगत आहेत ह्या मालिकेचं दोन्ही संघासाठी असलेलं महत्त्व. भागाचा शेवट गौरव व अमोल त्यांचं मालिकेच्या निकालाचे प्रेडिक्शन देऊन करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला न...

Rahul's batting position and Dravid's impact as coach and much more 17.09.2022

केएल राहुलचा T२० वर्ल्ड कपमधील फलंदाजीचा क्रमांक व राहुल द्रविडचे प्रशिक्षकपदाचे वेगळेपण ह्या दोन्ही विषयांबरोबरच तुमच्या विविध शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करत आहोत प्रश्नोत्तरांच्या तासात. CCBK परिवाराचा सदस्य आदित्य जोशी करत आहे तुमचे प्रतिनिधित्व अमोलला प्रश्न विचारताना 

Saaptahik CCBK, Safe or risky? How India's squad for T20 World Cup appears 13.09.2022

भारताचा T२० विश्वचषकाशी साठी घोषित झालेला संघ समतोल वाटत आहे? संजू सॅम्सन जास्त नाराज असेल का रवी बिश्नोई? आणि कोण ठरू शकेल भारताचा एक्स-फॅक्टर? अमोल कऱ्हाडकरचं मत 'साप्ताहिक CCBK' मधील विश्लेषण पाहून तुमचं मतही कळवा   

Meet Kiran Navgire: Long jump medallist, Dhoni fan and an international women's cricketer 10.09.2022

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजजवळ श्रीपूरपासून थोडं लांब असलेल्या मिरे गावात वाढलेल्या किरण नवगिरेने थेट भारतीय महिला संघात मजल मारली आहे. इंग्लंड दौऱ्यातील T२० मालिकेसाठी तिची निवड झाली आहे. त्याआधी तिने राष्ट्रीय स्तरावर लांब उडीत पदकंसुद्धा मिळवली आहेत. किरण उलगडत आहे तिचा मिरे ते विमेन इन ब्लु - व्हाया बारामती, अहमदनगर, पुणे आणि नागालँड - हा आश्चर्यकारक प्रवास. त्याचबरोबर ती सांगत आहे तिच्या आदर्श...

Saaptahik CCBK, Kohli's knock or Arshdeep's drop: What will India versus Pakistan be remembered for? 06.09.2022

पाकिस्तानविरुद्धचा आशिया कपच्या सुपर ४ मधील पहिला सामना भारत भलेही हरला असेल, तरी  विराट कोहलीचं आश्वासक अर्धशतक किती आशादायक आहे? अर्शदीप सिंगने सोडलेल्या गोळ्यातून, अर्रर्र झेलातून, काय प्रतीत होतं? आणि रविंद्र जाडेजा नक्की मुकणार T२० वर्ल्ड कपला? जाणून घेऊया 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून             

CCBK Explainer, How Hardik Pandya revived his career 03.09.2022

जवळवळ गेली ४ वर्षे हार्दिक पंड्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. २०२२ मध्ये मात्र त्याने स्वतःची अष्टपैलू खेळाडूची प्रतिमा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे हार्दिकच्या 'कमबॅक'ची कहाणी    

Saaptahik CCBK, Hardik, Jadeja and Bhuvneshwar put India on top versus Pakistan 29.08.2022

भारताने आशिया कपची सुरूवात पाकिस्तानवरील बहारदार विजयाने केल्यानंतर सुनंदन लेले सांगत आहे सामन्यानंतर दुबईत झालेल्या सेलिब्रेशनबद्दल. त्याचबरोबर लेले व अमोल कऱ्हाडकर घेत आहेत सामन्याचा मागोवा आणि करत आहेत चर्चा भारताच्या फलंदाजीतील क्रमवारीबद्दल. आणि हो, एशिया कप फायनलचं प्रेडिक्शनसुद्धा करत आहेत ते.           

Difference between being fit and cricket-fit 28.08.2022

व्यायामशाळेत - म्हणजे जिम्नॅशियम अथवा जिम मध्ये - जाणं हे तरुणांमध्ये फॅड समजलं जातं, परंतु एका खेळाडूसाठी ते अत्यावश्यक आहे. टीम CCBK जात आहे पुण्यातील  स्टेल्थ फिटनेस स्टुडिओमध्ये, जिथे विशेषतः सर्व वयोगटातील क्रिकेटर्सकडे विशेष लक्ष दिले जाते. जाणून घेऊया क्रिकेटर्सच्या फिटनेसबद्दल स्टिल्थमधील ट्रेनर्स व खेळाडूंकडून

Saaptahik CCBK, Rahul, Chahar ready for Asia Cup? 23.08.2022

केएल राहुल व दीपक चहरच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरील कामगिरीचा आढावा घेत 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले करत आहेत चर्चा आगामी एशिया कपबद्दल. भारत उतरेल जसप्रित बुमराहविना तर पाकिस्तानलाही शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीचा धक्का बसला आहे. कोणाचं पारडं असेल जड? नक्की पहा व तुमचं मतही सांगा   

Who is the best cricketer in Celebrity Cricket League? Ask Pushkar Jog 20.08.2022

 बालकलाकार ते दंतचिकित्सक, बिग बॉस मराठी ते चित्रपट व वेब सिरिज अश्या विविध रूपांतून अभिनेता पुष्कर जोग आपल्याला माहीत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे पुष्कर हा अस्सल क्रिकेटवेडा आहे. त्याच्या क्रिकेटवेडाचे किस्से - तेंडुलकरला भेटण्यापासून सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंत - पाहूया पुष्कर जोगकडून 'क्रिकेटचा किडा' मध्ये    

What makes Chandrakant Pandit, the KKR head coach, special 19.08.2022

कोलकाता नाईट रायडर्सने नुकतीच चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली. पंडितांनी त्यांचे पांडित्य देशांतर्गत क्रिकेटमध्ये वारंवार सिद्ध केले आहे. जाणून घेऊया पंडितांच्या शैलीबाबत त्यांच्या हाताखाली खेळलेल्या चार दिग्गज खेळाडूंकडून. हे खेळाडू आहेत पारस म्हाम्ब्रे, आदित्य तरे, रमेश पोवार व अक्षय वखरे.

CCBK Explainer, Domestic cricket transfer market explainer 14.08.2022

अर्जुन तेंडुलकरने येत्या देशांतर्गत हंगामांत मुंबई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया डोमेस्टिक क्रिकेटमधील 'ट्रान्सफर मार्केट' चे नियम 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून   

Saaptahik CCBK, Thrills of CWG, injury scare ahead of T20 World Cup 09.08.2022

CWG चे अनुभव, महिला क्रिकेट संघाची कामगिरी, एशिया कपसाठी जाहीर झालेला क्रिकेटचा संघ, T२० वर्ल्ड कपआधी दुखापतींमुळे वाढलेले प्रश्न आणि भारतीय खेळाडूंचे सामन्यानंतर बदललेलं वर्तन. "साप्ताहिक CCBK" मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले मारत आहेत गप्पा ह्या सर्व विषयांवर

Meet Harsha Bhogle 07.08.2022

हैदराबाद असो वा हंबनतोटा, मेलबर्न असो वा मुंबई, लखनौ असो वा लंडन, 'क्रिकेटचा आवाज' अशी ख्याती मिळवलेल्या हर्ष - हो हर्षा नव्हे - भोगलेंना प्रेम, आदर, सन्मान प्राप्त होतो. CCBKच्या दुसऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून भोगलेंशी साधूया संवाद त्यांच्या पत्रकार-समालोचकाच्या चार दशकांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल

CCBK Explainer, Why IPL owners are investing in South African league 04.08.2022

क्रिकेटचा अतिरेक हेच फक्त बेन स्टोक्सच्या ODI निवृत्तीचे कारण आहे? का तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दुय्यम स्थान देणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे? दक्षिण आफ्रिकेतील येऊ घातलेल्या लीगमध्ये का बरं IPL संघमालकांना एवढा 'इंटरेस्ट' आला? हे आहे का सूतोवाच भारतीय खेळाडू परदेशी लीग्जमध्ये खेळताना दिसण्याचे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

Flashback to 1997: Nilesh Kulkarni recalls ecstatic and agonising Test debut 03.08.2022

३ ऑगस्ट १९९७ ला डोंबिवलीचा निलेश कुलकर्णी कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर बळी घेण्याचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा जरी निलेश अजूनही एकमेव गोलंदाज आहे, तरी त्या सामन्याचे उर्वरित तीन दिवस श्रीलंकेच्या फलंदाजानी उभारलेल्या धावांच्या डोंगरासाठी लक्षात राहतात. परंतु निलेशला बोलिंग योगायोगाने मिळाली त्या दिवशी हे तुम्हाला माहित आहे? आणि का आहे मारवान अटापट्टू, ज्या...

Meet the curator: CCBK with Praveen Hinganikar - Part 2 01.08.2022

खेळपट्टी नक्की कशी तयार करतात? प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो. जाणून घेऊया खेळपट्टीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे सुविख्यात क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांच्याकडून. विदर्भाचे कर्णधार, नंतर  प्रशिक्षक व BCCI सामनाधिकारी ह्या विविध जबाबदाऱ्या निभावलेल्या हिंगणीकरांनी गेल्या दशकभराहून जास्त काळात स्वतःची क्युरेटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य क्युर...

Meet the curator: CCBK with Praveen Hinganikar - Part 1 31.07.2022

खेळपट्टी नक्की कशी तयार करतात? प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो. जाणून घेऊया खेळपट्टीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे सुविख्यात क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांच्याकडून. विदर्भाचे कर्णधार, नंतर  प्रशिक्षक व BCCI सामनाधिकारी ह्या विविध जबाबदाऱ्या निभावलेल्या हिंगणीकरांनी गेल्या दशकभराहून जास्त काळात स्वतःची क्युरेटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य क्युर...

CCBK Explainer, All you need to know about women's cricket at Commonwealth Games 28.07.2022

राष्ट्रकुल खेळ - ऊप्स, कॉमनवेल्थ गेम्स - मध्ये महिला क्रिकेटचा समावेश कसा झाला? कुठले देश बर्मिंगहॅममध्ये तीन पदकांसाठी लढतील? आणि कोण असतील भारताचे प्रतिस्पर्धी? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

Saaptahik CCBK, Will ODI cricket survive the T20 league onslaught? 26.07.2022

अक्षर पटेलच्या फलंदाजीचे कौतुक करण्याआधी 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले चर्चा करत आहेत एकदिवसीय सामन्यांच्या भवितव्याबद्दल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील होत असलेल्या उलथापालथीबद्दल. भारतीय क्रिकेटमध्येदेखील बेन स्टोक्स व क्विंटन डि कॉकच्या रांगेत जाऊ शकणारा खेळाडू नजीकच्या भविष्यात दिसू शकतो? आमच्या गप्पा बघाच परंतु तुमचं मतदेखील सांगा    

Rishabh's revival, Hardik's turnaround, Rohit's technical flaw and Virat's woes 20.07.2022

 गॅबा कसोटी होती रिषभ पंतच्या कारकीर्दीचा कलाटणी देणारा क्षण? हार्दिक पंड्याने कसा केला मैदानावरील कायापालट साकार? रोहित शर्मा का लटकतो लेफ्ट-आर्म पेसरच्या गोलंदाजीवर? विराट कोहलीचं करायचं काय? आणि प्रेक्षकांना मैदानांवर बेसिक सुविधादेखील का नाही मिळत भारतात? ह्या व अश्या इतर तुमच्या मनातले प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारले आहेत CCBK ची ग्राफिक डिझाईनर रिद्धी वझे व CCBK चा निष्ठावंत श्रोता शुभम वाळुं...

Hits and misses in England; Will Dhawan dazzle in West Indies? 19.07.2022

रिषभ पंत व हार्दिक पंड्याने शेवट गोड केलाच परंतु मँचेस्टरमधील सुखावह विजयाने दौऱ्याच्या सुरूवातीला लागलेले गालबोट पुसले गेले? "साप्ताहिक CCBK" मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर तीन आठवड्यात तीनही फॉरमॅट्समधील भारताची कामगिरी पडताळत आहेत. त्याचबरोबर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याकडून त्यांच्या अपेक्षा सांगत आहेत

Saaptahik CCBK, Sensational Surya, worrying Virat and an important ODI series 12.07.2022

भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात जेवढी सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीची चर्चा झाली तेवढीच आपले लाडके सुनंदन लेलेंचे महेंद्र सिंह धोनी व रवी शास्त्रीबरोबरचे 'फूटेज व्हायरल' झाले. अर्थात "साप्ताहिक CCBK" मध्ये सुरुवातीला सुनंदन सांगत आहे त्या गप्पांमधल्या रंजक आठवणी. त्याचबरोबर सुनंदन या अमोल घेत आहेत T२० मालिकेचा आढावा व ODIs चा प्रिव्यू  

Saaptahik CCBK, Bazball in Birmingham leads to India's downfall 05.07.2022

 बॅझ-बॉलचा चमत्कार आणि भारतीय संघाची निस्तेज कामगिरी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर पाहिलं कि इंग्लंडने सर्वात मोठं लक्ष्य लीलया सर केलं तर भारताने इंग्लंडमध्ये मालिका जिंकायची सोनेरी संधी गमावली. 'साप्ताहिक CCBK' मध्ये अमोल कऱ्हाडकरबरोबर पराभवाची कारणमीमांसा करत आहेत थेट बर्मिंगहॅममधून सुनंदन लेले व गौरव जोशी

Listen to the Sports कट्टा podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.