Ideabrew Studios
Sports कट्टा
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
CCBK at Edgbaston: Will Bumrah be India's saviour against England? 01.07.2022 14:11
दोन नवे कर्णधार, दोन नवे प्रशिक्षक. परंतु मालिका मात्र तीच. भारत मालिका जिंकायच्या उंबरठ्यावर असताना बुमराहच्या संघापुढील आव्हाने आपल्यासमोर मांडत आहेत थेट एजबॅस्टन मैदानातून गौरव जोशी व सुनंदन लेले
Chandrakant Pandit's recipe for success in Ranji Trophy 28.06.2022 26:04
मध्य प्रदेशला पहिलंवहिलं रणजी ट्रॉफी अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या चंद्रकांत पंडितांना मानाचा मुजरा देत असतानाच 'साप्ताहिक CCBK' मध्ये पाहूया ह्या विजयाचं भारतीय देशांतर्गत क्रिकेटसाठी असलेलं महत्त्व. आणि अर्थात सुनंदन लेले आयर्लंडमधून पहिल्या T२० सामन्यानंतर हार्दिक पंड्याने विरोधी संघातील खेळाडूला दिलेल्या 'सरप्राईझ गिफ्ट' बद्दल आणि ऋतुराज गायकवाडच्या फिटनेसबद्दल ताजी बातमी देत आहेत.
Meet Chirag Patil, a failed cricketer but a genuine cricket fan 25.06.2022 26:40
नसानसांत क्रिकेट भिनलेल्या कुटुंबात जन्माला येऊनही त्याला लहानपणी क्रिकेटने झपाटलं नाही. योगायोग पहा, चिराग पाटीलच्या दशकभरातील कलाकाराच्या प्रवासातील सर्वात प्रसिद्ध भूमिका मात्र एका क्रिकेटरची - तीदेखील त्याच्या वडिलांची - ठरली. चिराग जरी क्रिकेटवेडा नसला तरी "क्रिकेटचा किडा" नक्की आहे.
Saaptahik CCBK, Is Karthik frontrunner for T20 keeper's role? Can Pandit-Patidar stop Mumbai's Ranji juggernaut? 21.06.2022 20:19
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील सकारात्मक व नकारात्मक मुद्द्यांची चर्चा करतानाच 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर मारत आहेत गप्पा रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याबद्दल. चंद्रकांत पंडित चालू ठेवतील त्यांची छोट्या संघांबरोबरील घोडदौड मध्य प्रदेशला विजेतेपद मिळवून देऊन? का मुंबईचा संघ 'पंडित फॅक्टर' बाजूला ठेवून त्यांचे ४२ वे अजिंक्यपद पटकावतील?
My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 1 18.06.2022 29:02
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या यष्टीरक्षकांमध्ये विनायक सामंतचे नाव घेतले जाते. मुंबईसाठी खेळायच्या आधी आसामचं प्रतिनिधित्व करूनही सामंतने मुंबई क्रिकेटवर स्वतःची छाप सोडली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी हंगाम' या मालिकेत पाहूया विनायकच्या २००६-०७ सीझनच्या आठवणी. भाग पहिला
My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 2 18.06.2022 31:48
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या यष्टीरक्षकांमध्ये विनायक सामंतचे नाव घेतले जाते. मुंबईसाठी खेळायच्या आधी आसामचं प्रतिनिधित्व करूनही सामंतने मुंबई क्रिकेटवर स्वतःची छाप सोडली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी हंगाम' या मालिकेत पाहूया विनायकच्या २००६-०७ सीझनच्या आठवणी. भाग पहिला
IPL media rights simplified, India's mid-series dilemma demystified 15.06.2022 20:32
इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपण हक्कांच्या लिलावाद्वारे नक्की किती पैसे मिळणार BCCI ला? IPL खरंच जागतिक क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनली आहे? ह्या लिलावामुळे डोमेस्टिक क्रिकेटला कसा फायदा होऊ शकतो? आणि तुमच्या-आमच्या खिशाला जास्त खड्डा पडणार का IPL पाहण्यासाठी? "साप्ताहिक CCBK" मध्ये अमोल कऱ्हाडकर व सुनंदन लेले हे मुद्दे समजावून सांगत तर आहेतच त्याचबरोबर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचा आढावादेखील घेत...
Life in the fast lane: CCBK Special with Snehal Pradhan 12.06.2022 43:01
पुणे ते मुंबई, क्रिकेटर ते कंमेंटेटर आणि अभ्यासू मुलगी ते यूट्युबर हा प्रवास उलगडत आहे भारताची माजी गोलंदाज स्नेहल प्रधान.
Saaptahik CCBK, Importance of India's T20 series versus South Africa; Ranji Trophy QF analysis 08.06.2022 20:48
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये कोणत्या मुद्द्यांकडे विशेष लक्ष असेल? त्याचबरोबर 'साप्ताहिक CCBK' मध्ये जाणून घेऊया मुंबईच्या सुवेद पारकरबद्दल ज्याने रणजी ट्रॉफी पदार्पणात स्वतःची छाप सोडली
Meet Shams Mulani, the Mumbai allrounder 04.06.2022 29:59
छोट्या चणीच्या शम्स मुलानीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे स्वतःची 'मुंबईचा आधारस्तंभ' अशी ओळख प्राप्त केली आहे. जाणून घेऊया त्याच्या क्रिकेट प्रवासातील विविध टप्पे व त्याच्या मैदानावरील व मैदानाबाहेरील आवडीनिवडी 'CCBK स्पेशल' मध्ये शम्सशी मारलेल्या गप्पांमधून
Saaptahik CCBK, The secret of Hardik Pandya's and Gujarat Titans' success in IPL 2022 30.05.2022 23:58
महिलांचं T२० चॅलेंजमधील घेऊ शकणारे धडे व IPL प्लेऑफ्समधील 'ट्रेंड्स'बरोबरच 'साप्ताहिक CCBK' मध्ये IPL २०२२ ला निरोप देऊया आगळेवेगळे पुरस्कार जाहीर करून.
Saaptahik CCBK, India's selection, IPL Playoffs prediction and Women's T20 Challenge resumption 23.05.2022 20:45
'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T२० मालिकेसाठी संघाचं, सांगत आहेत त्यांच्या अपेक्षा विमेन्स T२० चॅलेंजकडून, बांधत आहेत अंदाज IPL विजेत्याचा आणि सांगत आहेत IPL साखळी फेरीतील त्यांच्या दृष्टीने असलेले बहुचर्चित मुद्दे
CCBK Explainer: Talking points from IPL 2022's league stage 22.05.2022 9:14
१० संघ, ५८ दिवस व ७० सामन्यांनंतर इंडियन प्रीमियर लीगचा पहिला टप्पा पार पडला आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर निवडत आहे त्याच्या ५ बहुचर्चित घटना
CCBK Explainer: IPL Playoffs format simplified 17.05.2022 6:17
कशामुळे झालं आयपीएलच्या बाद फेरीचं रूपांतर प्लेऑफ्समध्ये आणि काय आहेत इतर लीग्जमधील शेवटच्या टप्प्याचे प्रकार. जाणून घेऊया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून
Rayudu's retirement U-turn and curious case of IPL teams dropping retained players 15.05.2022 17:28
लिलावाआधी घेतलेल्या खेळाडूंना संघातून वगळण्याची वेळ येणं ह्यातून सूचित होतं IPL संघांच्या बाबतीत. रायडुच्या निवृत्ती-नाट्यावरून त्याची मानसिक अवस्था आणि CSK चा विस्कळीत झालेला संघ हे सर्व अधोरेखित होतं का? करूया चर्चा ह्या मुद्द्यांची 'साप्ताहिक CCBK' मध्ये क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंबरोबर
Impressive Arshdeep, DRS drama and the Virat RCB conundrum 14.05.2022 28:05
'प्रश्न तुमचे, उत्तरं आमची' ह्या सदराचा आरंभ इंडियन प्रीमियर लीगच्या 'बिझनेस एन्ड' चे औचित्य साधून करत आहोत. CCBK प्रेक्षक व श्रोत्यांचे प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारत आहेत आमचे व्हिडिओ संकलक - एडिटर - सोहम कुरुळकर व तनिष्क मोहिते
CCBK Explainer: How have new Indian captains fared in IPL? 11.05.2022 8:47
IPL २०२२ मधील चार नव्या भारतीय कर्णधारांच्या कामगिरीचा मागोवा घेत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
Should Umran Malik be selected for T20 World Cup? 08.05.2022 19:44
भारतीय वेगवान गोलंदाजांच्या पुढील पिढीचा म्होरक्या उम्रान मलिक आहे का सज्ज आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी? पाहूया सुनंदन लेलेचं मत. त्याचबरोबर मारूया गप्पा फिनिशरची भूमिका व सेकंड-सीझन सिंड्रोमबद्दल
Is age just a number in IPL and T20 cricket? 04.05.2022 7:28
वाढते वय हे T२०, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग, खेळण्यासाठी मारक ठरते कि पूरक? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
Rohit Sharma's and Mumbai Indians' woes; Hardik Pandya's and Gujarat Titans' stock grows 29.04.2022 18:04
मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी झगडत असल्याची कारणं 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेलेंबरोबर शोधायचा प्रयत्न करताना टाकूया एक नजर रोहित शर्माच्या फलंदाजीतील अपयशाकडे. त्याचबरोबर करूया चर्चा रिषभ पंतला झालेल्या शिक्षेबद्दल, अंपायरिंगच्या दर्जाबद्दल आणि गुजरात टायटन्सच्या यशाबद्दल
CCBK Explainer: Financial disparity between IPL and other T20 leagues 27.04.2022 7:05
ऑस्ट्रेलियाचे असो अथवा दक्षिण आफ्रिकेचे, वेस्ट इंडिजचे असो वा श्रीलंकेचे, परदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य देण्याचे किस्से दर वर्षी होत राहतात. टाकूया एक नजर IPL व इतर T२० लीग्जमधील आर्थिक तफावतीकडे
Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Similarities between IPL ratings and Kohli's form; differences in dealing with COVID-19 scare 22.04.2022 19:35
IPL २०२२ ला मिळणारा प्रतिसाद आणि कोहलीच्या धावा - दोन्हीला का लागली आहे ओहोटी? आणि कोव्हिडचं सावट कसं हाताळलं आहे आत्तापर्यंत? सुनंदन लेलेंबरोबर ह्या मुद्द्यांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न करू व मध्यांतराला 'प्लेऑफ्स' मध्ये असू शकणाऱ्या चार संघांचा अंदाजही बांधू
CCBK Explainer: How IPL began in 2008 18.04.2022 5:54
१८ एप्रिल २००८ ला IPL चा पहिला सामना खेळला गेला खरा, पण तुम्हाला माहित आहे कि IPL चा पाया १९९५ पासून नकळतपणे रचला गेला होता? पाहूया IPL ची सुरुवात नक्की कशी झाली अमोल कऱ्हाडकरकडून 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Rohit and Virat's mediocre form; will 'retired out' be a new IPL norm? 15.04.2022 16:01
IPL २०२२ मधील कळीच्या मुद्द्यांबरोबरच 'साप्ताहिक CCBK' मध्ये क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंशी करूया चर्चा रोहित शर्मा व विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयशाचे सावट भारताच्या T२० वर्ल्ड कपच्या संघनिवडीवर असू शकेल का, ह्या प्रश्नावर
Increasing importance of a data analyst in T20 cricket 12.04.2022 4:24
'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये गौरव जोशी समजावून सांगत आहे डेटा ऍनालिस्टची T२० क्रिकेटमधील भूमिका आणि त्यांचे वाढते महत्त्व
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.