Ideabrew Studios

Sports कट्टा

Sports MR ↓ 507 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Author

Ideabrew Studios

Category

Sports

Podcast website

bingepods.com

Latest episode

Sep 8, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: CSK on the backfoot, Dinesh Karthik on the rise 07.04.2022

क्रीडासमीक्षक सुनंदन लेलेंबरोबर 'साप्ताहिक CCBK' मध्ये पाहूया IPL च्या दुसऱ्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी व करूया चर्चा ऑस्ट्रेलियाच्या महिलांच्या विश्वविजेतेपदाबद्दल

Rising stars in IPL 2022 06.04.2022

IPL च्या ब्रीदवाक्याला अनुसरून "CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर ओळख करून देत आहे तीन भारतीय डोमेस्टिक खेळाडू ज्यांनी IPL २०२२ मध्ये आत्तापर्यंत स्वतःची चुणूक दाखवली आहे 

Saaptahik CCBK, ft Sunandan Lele: Multan rewind, sensational Shami and time to start Smriti raj? 31.03.2022

उपांत्य फेरीत पोहोचण्यात आलेले अपयश हा भारतीय महिला क्रिकेटला किती मोठा धक्का आहे? काय धडे घेता येतील वर्ल्ड कपमधील अपयशातून? मुलतान कसोटी १८ वर्षांपूर्वी याचि देही, याचि डोळा पाहिल्यानंतर त्याबद्दलच्या आठवणी आणि IPL च्या पहिल्या सहा सामन्यांमधील विशेष घडामोडी. क्रिकेटतद्न्य सुनंदन लेलेंशी करूया चर्चा ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये         

IPL २०२२ मध्ये सर्वोत्तम संघ कधी दिसतील? 30.03.2022

When will IPL franchisees be able to field their best XI on the park? Description: परदेशी खेळाडू IPL चा अविभाज्य घटक असले तरी काही संघ महत्त्वाच्या परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कमकुवत वाटत आहेत. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये गौरव जोशी सांगत आहे कोणते खेळाडू उशिरा येणार आहेत ह्या वर्षी

IPL Uwaach with Prashant Solanki 26.03.2022

उमेदीच्या काळात कौटुंबिक कारणांमुळे दोन वर्षे मुंबई क्रिकेटचा दुरावा, मग करोनाव्हायरसच्या काळात वजन कमी देण्यावर भर, मुंबईच्या २०२१ मधील विजयाचा शिल्पकार, IPL २०२१  मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'नेट बोलर', आणि आता २०२२ IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या करोडपतींपैकी एक. भेटूया ठाणेकर लेगस्पिनर प्रशांत सोळंकीला "IPL उवाच" 

Saaptahik CCBK ft Sunandan Lele: Talking points of IPL 2022 24.03.2022

इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाआधी वरिष्ठ समीक्षक सुनंदन लेलेंबरोबर करूया चर्चा २०२२ IPL मधील विशेष लक्षवेधी मुद्द्यांकडे, आणि जाणून घेऊया त्यांचे व अमोलचे प्लेऑफ्सचे चार प्रमुख दावेदार कोण आहेत.    

Four unique aspects of IPL 2022 22.03.2022

इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा अध्याय सुरू होण्याआधी पाहूया IPL २०२२ ची चार वैशिष्ट्ये अमोल कऱ्हाडकर कडून 'CCBK एक्स्प्लेनर' 

Why Indian captains get preference in IPL 16.03.2022

प्रशिक्षक भले परदेशी असो, परंतु कर्णधारपदासाठी IPL संघांची भारतीय खेळाडूंना पसंती राहिली आहे. भारतीय कर्णधारांना झुकतं माप मिळण्यामागची कारणे सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये 

Pros and cons of curtailed Ranji Trophy league stage 08.03.2022

दोन वर्षांनंतर पुनरागमन झाले तर खरे परंतु रणजी ट्रॉफी साखळी फेरी अत्यंत छोट्या स्वरूपात खेळली गेली. तीन सामने प्रत्येक संघाला मिळण्याच्या पद्धतीचे विविध कंगोरे अमोल कऱ्हाडकर तुमच्यासमोर मांडत आहे 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

CCBK Explainer: ICC Women's World Cup simplified 03.03.2022

काय आहे विमेन्स वर्ल्ड कपचं महत्त्व आणि स्वरूप? माहित आहेत तुम्हाला महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमधील नियमांचे फरक? आणि भारताचं काय होऊ शकेल ह्या स्पर्धेत? गौरव जोशी सांगत आहे 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये

Saaptahik CCBK, ft Spruha Joshi: Will Kohli be the last Indian in 100-Test Club? 02.03.2022

विराट कोहली हा शंभर कसोटी खेळणारा भारताचा १२वा क्रिकेटर व्हायच्या उंबरठ्यावर असताना निवेदिका स्पृहा जोशी विचारत आहे कोहलीबद्दलच्या काही विशेष आठवणी. आणि पाहूया CCBK त्रयीचं महिला विश्वचषक सुरू होताना भारताच्या संघाबद्दलचं 'प्रेडिक्शन'  

Saaptahik CCBK, ft Spruha Joshi: What is Saha-gate? End of the road for Rahane, Pujara, Ishant? 24.02.2022

वृद्धिमान साहाला खरंच धमकी दिली पत्रकाराने? आणि साहाने प्रकरणावर पडदा पाडायचं का ठरवलं असावं? हे 'ट्रेंडिंग' प्रश्न स्पृहा जोशी विचारतेच, त्याचबरोबर ती चर्चा घडवून आणते रोहित शर्माचं कर्णधारपद, मातब्बर खेळाडूंना कसोटी संघातून मिळालेला डच्चू, श्रीलंका मालिकेतील महत्त्वाचे मुद्दे, रणजी ट्रॉफीमधील उगवते तारे आणि अर्थात महिला क्रिकेटविषयी सुद्धा.  

CCBK Explainer: Modus operandi of age-fudging in cricket 22.02.2022

एखाद्या खेळाडूवर वय चोरण्याचे आरोप होणे हे काही भारतीय क्रीडाक्षेत्राला, विशेषतः क्रिकेटला, नवीन नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करू वय कमी का करावंसं वाटते, ते कसं जमू शकते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात 

Rahul Tripathi remembers IPL debut: Dhoni’s calming effect and Rahane’s help 20.02.2022

राहुल त्रिपाठी हे नाव प्रत्येक IPL प्रेमीला माहित आहेच. त्याचे महत्त्व त्याला IPL लिलावात सनरायझर्स हैदराबादने तब्बल ८.५ कोटी रुपयांच्या बोलीत सिद्ध होतेच. काय आहेत पुणेकर राहुलच्या २०१७ मधील त्याच्या IPL पदार्पणाच्या आठवणी, जेव्हा तो रायजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये होता. lm5epaz0J2MHZOex14Nn

Saaptahik CCBK ft Spruha Joshi: Why Suresh Raina went unsold in IPL Auction 17.02.2022

को-होस्ट स्पृहा जोशी विचारत आहे सर्वांना पडलेला प्रश्न: IPL लिलावामध्ये सुरेश रैनाला का नाही लागली बोली? आणि कुठला संघ सर्वात समतोल वाटत आहे कागदावर. त्याचबरोबर महिला क्रिकेटबद्दल विशेष सेगमेंट नक्की बघा 

Why six pacers joined the 10-crore club in IPL Auction 15.02.2022

IPL लिलावामध्ये तेजगती गोलंदाजांसाठी का झाली सर्व संघांमध्ये चढाओढ? आणि काय विचार केला असेल संघ व्यवस्थापनांनी परदेशी खेळाडू निवडताना? पाहूया गौरव जोशीचं विश्लेषण

CCBK Explainer: IPL Auction simplified 10.02.2022

सर्वात भव्य IPL लिलाव काही तासांवर येऊन ठेपला आहे. पाहूया ऑक्शनचं गणित असतं तरी कसं आणि मांडूया प्रत्येक संघाचा ताळेबंद

Latadidi, the cricket fan; Under-19 World Cup triumph and IPL Auction 09.02.2022

नवीन अँकर स्पृहा जोशीबरोबर वाहूया श्रद्धांजली भारतरत्न लता मंगेशकरांना त्यांच्या क्रिकेटप्रेमाच्या आठवणींना उजाळा देऊन. त्याचबरोबर पाहूया अंडर-१९ विश्वविजेत्या संघातील खेळाडूंसाठी पुढे असलेली आव्हाने, IPL लिलावाकडे टाकूया एक नजर, रणजी ट्रॉफीच्या पुनरागमनाचे जाणून घेऊया महत्त्व व चर्चा करूया वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडूची भरून काढू शकेल का कसर ह्या मुद्द्यावर

Why quick legspinners are in demand in T20 cricket 03.02.2022

रवी बिश्नोईची भारतीय संघात निवड, बिश्नोई व रशीद खानसाठी दोन नव्या IPL संघांमध्ये चढाओढ. आणि कायम त्यांच्यासारख्या नव्या गालंदाजांचा शोध? गौरव जोशी सांगत आहे 'जलद लेगस्पिनर्स' का महत्त्वाचे ठरतात T२० क्रिकेटमध्ये

The making of "Osmanabad Express" Rajvardhan Hangargekar 29.01.2022

 तुळजापूरमधून क्रिकेट खेळायला सुरूवात करून भारताच्या अंडर-१९ संघामध्ये  "उस्मानाबाद एक्स्प्रेस" असा नावारूपाला आलेल्या राजवर्धन हंगर्गेकरच्या प्रवासाचे साक्षीदार तेजस मातापूरकर, जे त्याचे मार्गदर्शक आहेत, उलगडत आहेत राजवर्धनचा प्रवास

Cricketcha Keeda Ft. Spruha Joshi 26.01.2022

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत क्रिकेट आवडणे व त्यावर चोखंदळपणे गप्पा मारणे हा सर्व भारतीयांचा छंद आहे. सादर करत आहोत एक नवी मालिका 'क्रिकेटचा किडा' ज्यात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल गप्पा मारणार आहोत. मालिकेची सुरूवात करूया एका अशा अभिनेत्रीपासून जी एक हळवी कवयित्रीसुद्धा आहे. ओव्हर टू स्पृहा जोशी

Why India lost so badly in ODIs 24.01.2022

If you did not anticipate India's whitewash in the three-match ODI series in South Africa, we present to you the main reasons for the forgettable week at the end of the tour. We also discuss the fate of the Under-19 team in the World Cup and the women's team's fate during the long tour to New Zealand. And don't forget the teaser about the Republic Day special.

Who should be India's next Test captain? 20.01.2022

With Virat Kohli having stepped down as Test captain, his successor is a hot-topic across the cricketing globe. Amol Karhadkar presents his five contenders for the coveted post.

Kohli conundrum to overshadow ODI series in South Africa 18.01.2022

He may no longer be India's captain in any format but having resigned as Test captain barely a few hours earlier, Virat Kohli will definitely be in the limelight during India's ODI series in South Africa. We discuss what's next for Kohli and present you India's possible starting XI on January 19तो भले भारताचा कर्णधार नसेल परंतु काहीच तासांपुर्वी कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली नक्कीच ODI स...

Why England lost the Ashes so badly 17.01.2022

Lack of planning? Or overplanning? And why aren't England able to produce quality batters in county cricket? CCBK's very own Australian Gaurav Joshi explains after England are mauled 4-0 in the Ashes

Listen to the Sports कट्टा podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.