Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा सुधारले | Agrowon 01.11.2022

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The price of soybeans in the international market saw an improvement again today. Along with soybeans,...

Chana Rate: देशात हरभऱ्याचा पुरवठा कसा आहे? | Agrowon 31.10.2022

 देशात सध्या हरभऱ्याचा बाजारभाव दबावात आहे. सध्या हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेरण्या वेग घेण्याचा अंदाज आहे. पण हरभरा पेरण्या वाढल्याचा बाजारावर काय परिणाम होईल? सध्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The market price of gram is currently under pressure in the country. At present, there is a favorable environment for sowing gram...

Cotton Rate: कापूस बाजार अद्यापही दबावात का? | Agrowon 29.10.2022

दिवाळीनंतर कापूस दरात सुधारणा होण्याची आशा होती. मात्र कापसाच्या बाजारात अजून नरमाईच दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात असल्याचा परिणाम देशातील दरावर होत आहे. त्यामुळे देशातील कापूस दर काहीसे नरमले. सध्या कापसाला काय दर मिळतोय? कापसाचे दर कधी सुधारतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Cotton prices were expected to improve after Diwali. But the cotton market is still soft. Th...

Soybean Rate: बांधावर सोयाबीन विक्रीचा ट्रेंड फायद्याचा की तोट्याचा? | Agrowon 28.10.2022

 देशात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. मात्र अनेक शेतकरी काढणी केल्यानंतर लगेच बांधावरून सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत. अशा शेतकऱ्यांना काहीसा कमी दर मिळत आहे. तर बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली आहे. पण सोयाबीन दर नेमके किती सुधारले? सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Soybean harvesting is going on in full swing after the rains...

Tur Rate: आयात तूर खरेदीचा बाजारावर काय परिणाम होईल? | Agrowon 27.10.2022

देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशात यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान आणि कीड-रोगामुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे. नव्या तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल. मग बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? आयात तुरीचा बाजारावर दबाव येईल का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Chana Rate: बाजारात हरभरा दर अद्यापही दबावातच | Agrowon 26.10.2022

 दिवाळीमुळं देशात हरभऱ्याला मागणी वाढली होती. मात्र दरात सुधारणा झाली नाही. तर दुसरीकडे देशात रब्बीची पेरणी आता वेग घेत आहे. नेमकं याच काळात हरभरा दर दबावात असल्याने पेरणीवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होतोय. पण मागणी वाढूनही हरभरा दर दबावात का आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Cotton Rate: कापूस बाजारावरील दबाव कधी दूर होईल? | Agrowon 25.10.2022

Description: कापड उद्योग यंदा देशातील कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असं सांगत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते पावसानं नुकसान जास्त असल्यानं उत्पादन या प्रमाणात वाढणार नाही. तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत कापसाला उठाव मिळण्याची शक्यता व्यक्त होतेय. मग या काळात कापसाला काय दर मिळू शकतो? कोणत्या राज्यांमधील कापूस पिकाला पावसाचा फटका बसला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The textile ind...

Soybean Rate: पाऊस उघडल्याने सोयाबीनची काढणी जोमात | Agrowon 24.10.2022

 देशात पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला गती दिली. तसंच उन्हामुळं सोयाबीनमधील ओलावाही कमी होण्यास मदत होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरु आहेत. त्याचाही परिणाम देशातील सोयाबीन दरावर होतोय. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? देशात सोयाबीन बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हा...

Soybean Rate: नव्या सोयाबीनचे दर दबावातच | Agrowon 22.10.2022

 शेतकरी सध्या दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. त्यामुळं महत्वाच्या बाजारांमध्ये आवक वाढली. पण या आवकेत एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचं प्रमाण कमी आहे. तर मागील काही दिवसांमध्ये एफएक्यू सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र नवं सोयाबीन दबावातच आहे. मग नव्या सोयाबीनचा दर केव्हा वाढेल? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल....

Cotton Rate: महाराष्ट्र, गुजरातमध्ये कापूस उत्पादन वाढलं? | Agrowon 20.10.2022

 देशातील काही राज्यांमध्ये पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. मात्र गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस पिकाची स्थिती चांगली आहे असं सांगत या दोन्ही राज्यातील उत्पादन वाढीमुळे देशातील एकूण उत्पादनात वाढ होईल, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय. पण महाराष्ट्रात खरंच कापूस उत्पादन वाढेल का? राज्यातील पिकाची स्थिती काय आहे? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मि...

Soybean Rate: सोयाबीन बाजारात काय घटतंय? | Agrowon 20.10.2022

 देशात होणाऱ्या पावसामुळं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाला मागणी वाढली. त्यामुळं सोयातलाच्या दरात सुधारणा झाली. मात्र सोयापेंडची मागणी आणि दर स्थिरा आहेत. त्यामुळं सोयाबीनचाही बाजारभाव स्थिर आहे. पण हे नेमकं काय घडतंय? सोयातेलाचे दर किती वाढले? सोयाबीनचा बाजारभाव काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The soybean crop has a hug...

Soybean Rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon 19.10.2022

 देशात सध्या सोयाबीन काढणी जोमानं सुरु आहे. मात्र पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडं बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसतेय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. शेतकरी दिवाळी सणासाठी सोयाबीन विक्री करताना दिसत आहे. पण दिवाळीनंतरही दर कायम राहिल्यास शेतकरी सोयाबीन रोखू शकतात. मग या परिस्थितीत सोयाबीनचा बाजार कसा राहील? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम...

साखर निर्यातीत थायलंडवर मात करण्याचा मनसुबा पाण्यात 18.10.2022

 यंदा थायलंडच्या आधी आपली साखर बाजारात आणून निर्यातीच्या मार्केटमध्ये बाजी मारायची, असा भारतातल्या साखर कारखान्यांचा प्लॅन होता. पण ऑक्टोबरमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या मनसुब्यांवर पाणी पडलंय. Heavy rainfall has spoiled Indian sugar mills' plans for an early start to cane crushing so raw sugar exports could get underway before supplies start coming on the market from rival exporter Thail...

Soybean Rate: देशात सोयाबीनचा बाजार सुस्तच का? Agrowon 17.10.2022

 देशात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान जास्त आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होतेयं. मात्र असं असतानाही देशात सोयाबीनचा बाजार दबावात दिसतोय. पण हे नेमकं का घडतंय? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Soybean crop da...

Soybean Rate: सोयाबीन नुकसानीनंतर बाजारभाव काय राहील? | Agrowon 15.10.2022

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज जाहीर केलाय. ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं आहे. तर भारतातील सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसतो आहे. मग या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काय आहेत? देशात सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉ...

Maize Rate: जागतिक मका उत्पादन घटणार | Agrowon 14.10.2022

 जागतिक मका उत्पादन यंदा कमी राहील. तर अमेरिकेतील मका उत्पादनही घटलं, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. सीबाॅटवर मागील काही दिवसांपासून मक्याचा दर एक भावपातळीभोवती फिरतोय. तर देशात मका पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील मका दर दबावात आहेत. पण ही स्थिती का निर्माण झाली? देशात सध्या मक्याला काय दर मिळतोय? आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर काय आहेत? याच...

Cotton Rate: पंजाब, हरियानात कापूस उत्पादन घटलं? | Agrowon 13.10.2022

 लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता, कीड-रोग आणि अतिपावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा घट आली.  पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस पिकाला मोठा फटका बसला, असं सांगितलं जातं. पण या राज्यांमधील कापूस उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The cotton crop was affected by the wa...

Soybean Rate: देशात पावसामुळं सोयाबीनचं नुकसान वाढलं | Agrowon 12.10.2022

 मागील आठवडाभरापासून देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं सोयाबीनचं नुकसान होतंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण नेमकं कोणत्या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान होतंय? सोयाबीन नुकसानीचा दरावर काही परिणाम होतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. It has been raining heavily in the important s...

Cotton Rate: अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार? | Agrowon 11.10.2022

अमेरिकेतील कापूस पिकाला यंदा दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय. मात्र तरीही तेथील कापसाचे दर घटले. मागील महिन्यात ११५ सेंटवर असणारे कापसाचे दर ८४ सेंटपर्यंत नरमले होते. मात्र आता कापूस दरात सुधारणा होतेय. पण अमेरिकेतील कापूस दर का सुधारले? सध्या अमेरिकेत कापसाला काय दर मिळतोय? याचा देशातील कापूस बाजाराला फायदा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The American cotton crop is aff...

Kabuli Chana Rate: काबुली हरभरा दरातील तेजी कायम | Agrowon 10.10.2022

 देशात सध्या काबुली हरभऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यातच काबुली हरभऱ्याला मागील काही महिन्यांपासून मागणी वाढली. आता सण आणि रबीच्या पेरणीला बियाण्यासाठी काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय. मग या परिस्थितीत काबुली हरभऱ्याचा बाजार कसा आहे? काबुली हरभऱ्याला सध्या काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. There is currently a shortage of Kabuli gram in the country. In addition, the demand f...

Soybean Rate: अमेरिकेत सोयाबीन बाजाराची स्थिती काय ? | Agrowon 08.10.2022

 सध्या अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा नवा हंगाम सुरु झाला आहे. अमेरिकेतील सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यातच चीनकडून सोयाबीन खरेदी काहीशी वाढली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? देशातील सोयाबीन बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Currently, the new season of soybea...

Soybean Rate: सोयाबीनला सध्या काय दर मिळतोय? | Agrowon 07.10.2022

 देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे येत आहेत. तर बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात, असे काहीजण सांगत आहेत. पण खरंच असू होऊ शकतं का? बाजारातील स्थिती काय आहे? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Soybean harvesting has started in most parts of the country. However...

Cotton Rate: बाजारात कापूस आवक केव्हा वाढेल ? | Agrowon 06.10.2022

देशातील काही राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उत्तरेतील राज्यांमध्ये पूर्व हंगामी कापसाची आवकही घटली. पंजाबमधील कापूस आवक यंदा जवळपास पाच पटींनी कमी झाली. पण असं नेमकं का घडलं? कोणत्या राज्यांमध्ये कापूस पिकाचं नुकसान झालं? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The cotton crop is affected by the rain and pest...

Tur Rate: सणांमुळं तुरीला मागणी वाढली | Agrowon 04.10.2022

देशात सध्या तुरीची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळं निर्यातदार देशांनीही तुरीचे दर वाढले आहेत. परिणामी आयात तुरही महाग पडत आहे. देशात यंदा तूर लागवड कमी होऊन उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. मग या परिस्थितीत देशातील तूर बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा तुरीसाठी काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Tur shortage is in the country now. Due to Indian demand, exporter cou...

Soybean rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon 03.10.2022

देशाच्या अनेक भागात सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. यंदा गेल्या हंगामातील सोयाबीनचा साठा जास्त असल्याने बाजारावर परिणाम होत असल्याची चर्चा सरु आहे. तसचं या शिल्लक साठ्यामुळचं सोयाबीन बाजारात मोठे चढ-उतार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण खरंच असं घडतंय का? देशात किती सोयाबीन शिल्लक आह? यंदा सोयाबीनला किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The Soybean is in the har...

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.