Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Cotton Rate : कापसाला किमान किती दर मिळेल? | Agrowon 01.10.2022 5:38
जागतिक कापड बाजारात सध्या काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. देशातही पुढील काही दिवसांमध्ये जिनिंग आणि सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने सुरु होतील. तसचं उद्योग सांगतो त्याप्रमाणं देशात ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं. मगं यंदा देशात नेमकं किती कापूस उत्पादन होईल? शेतकऱ्यांना यंदा कापसासाठी किती दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The global textile market...
Cotton Rate : देशात कापूस दराची स्थिती काय राहील? | Agrowon 30.09.2022 5:43
देशात सध्या कापूस सुताचे दर नरमले आहेत. सुताला अपेक्षेप्रमाणं मागणी वाढली नाही. त्यामुळं सूत आणि कापूस दरावर दबाव आलेला दिसतोय. त्यातच सध्या बाजारात कापूस आवक वाढत आहे. पुढील काळात कापूस आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे. पण नमकं या काळात कापूस बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा काय दर मिळेल? सध्याची कापूस बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल....
Turmeric Rate : हळदीचा बाजार दबावात का आला? | Agrowon 29.09.2022 6:15
मागील हंगामात देशात हळदीचं उत्पादन वाढलं होतं. सप्टेंबर महिन्यापासून हळदीला सणांसाठी मागणी वाढते. त्यामुळं दरातही सुधारणा होते. पण यंदा असं होताना दिसत नाही. सप्टेंबर महिन्यात हळदीचे दर वाढण्याऐवजी नरमले आहेत. पण यंदा असं का घटतंय? हळदीचे दर का नरमले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The turmeric production increased in the country in the last season. The demand increases from Septe...
Wheat Rate : देशात गव्हाचे दर पुन्हा का वाढले? | Agrowon 28.09.2022 6:03
देशातील गहू दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने गहू, गहू पीठ आणि रव्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले. तर कल्याणकारी योजनांमध्ये गव्हाऐवजी तांदळाचं वितरण वाढवलं. मात्र अस असतानाही गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. मागील महिनाभरात बहुतेक राज्यांमध्ये गव्हाचे दर वाढले. पण सरकारने एवढे प्रयत्न करुनही गव्हाचे दर का वाढले? महिनाभरात गहू दर कितीने वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल....
Tur Rate : देशात तुरीची आयात वाढेल का ? | Agrowon 27.09.2022 5:25
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. परंतु बाजारातील आवक मात्र कमीच दिसत आहे. आयातही मर्यादीत होत आहे. आफ्रिकेतील देशांमधील तूर आता काढणीला आलीय. त्यामुळे पुढील महिन्यापासून आयात वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहील? नव्या हंगामात तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean Rate : सोयाबीनचा बाजार कसा राहील? | Agrowon 26.09.2022 6:15
सध्या देशातील काही भागांत सोयाबीनची काढणी सुरु झाली. मात्र पेरणीला विलंब झाल्यानं यंदा सोयाबीनचा हंगामही किमान १५ दिवासांनी उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे. पिकाची स्थिती चांगली असल्याचं सांगत उद्योगाने यंदा सोयाबीन उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. पण खरंच यंदा सोयाबीन उत्पादन वाढेल का? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? पुढील महिन्यात आवक...
Cotton Rate : सुताचा बाजार का थंडावला? | Agrowon 26.09.2022 6:10
देशातील कापूस लागवड वाढल्यानं यंदा उत्पादनही वाढण्याच अंदाज व्यक्त होत आहे. सध्या कापसाला चांगला दर मिळत असला तरी कापूस बाजार पुढील महिन्यात दबावात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुताला मागणी नसल्यानं आवक वाढल्यानंतर कापूस दरावर दबाव येईल, असा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे. पण खरचं कापूस बाजारावर दबाव येईल का? पुढील महिन्यात कापसाचे दर काय राहू शकतात? शेतकऱ्यांनी कापूस केव्हा विकल्य...
Moong Rate : मुगाचं उत्पादन खरंच वाढणार का? | Agrowon 23.09.2022 6:03
बाजारात सध्या मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. त्यातच यंदा देशातील मुगाची लागवड चार टक्क्यांनी घटली. पावसानं पिकाचं नुकसानही झालं. मात्र केंद्राच्या मते यंदा देशातील मुगाचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढेल. पण उद्योग आणि जाणकारांना केंद्र सरकारचा हा अंदाज मान्य नाही. केंद्र सकारनं मूग उत्पादनाचा अंदाज नेमका काय दिलाय? सध्या मुगाला काय दर मिळतोय? पुढील काळात मुगाचा बाजार कसा राहू शकतो? याची माह...
Soybean Rate : सोयाबीन उत्पादन यंदा वाढणार की घटणार? | Agrowon 22.09.2022 6:02
देशात यंदा सोयाबीन लागवड काहीशी कमी झाली. मात्र पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगले येईल, असा अंदाज उद्योगांतून व्यक्त होत आहे. मात्र सोयाबीन पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारनेही यंदा सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. सरकारचा सोयाबीन उत्पादनाचा अंदाज काय आहे? सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधू...
Chana Rate : नाफेडच्या विक्रीचा हरभरा बाजारावर दबाव कायम| Agrowon 21.09.2022 5:59
नाफेडकडे सध्या हरभऱ्याचा विक्रमी साठा उपलब्ध आहे. हा साठा नाफेड टप्प्याटप्याने बाजारातही आणत आहे. त्यामुळे नाफेडच्या विक्रीचा दबाव सध्या बाजारावर जाणवत आहे. त्यातच केंद्र सरकारने राज्यांना यंदा सवलतीच्या दरात हरभरा देण्याचा निर्णय घेतला. याचाही परिणाम बाजारावर होत आहे. पण सध्या बाजारात हरभऱ्याला काय दर मिळतोय? नाफेडकडे किती स्टाॅक आहे? हरभरा दर सुधारण्याची शक्यता आहे? याची माहीती तुम्हाला आजच्या...
Moong Rate : मुगाला मागणीचा आधार मिळणार | Agrowon 20.09.2022 6:03
देशातील अनेक बाजारांमध्ये नव्या मुगाची आवक सुरु झाली आहे. यंदा देशातील मूग लागवड ४ टक्क्यांनी कमी झाली. तर पाऊस आणि कीड-रोगाचाही मूग उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मुगात ओलावा अधिक असल्यानं दरही दबावात आहेत. मात्र सणांच्या काळात मुगाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग मागणी वाढल्यास मुगाचे दर वाढतील का? सध्या मुगाला काय दर मिळतोय? याची माहीती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. New moong...
Soybean Rate : सोयाबीन दरातील चढ-उतार कायम | Agrowon 19.09.2022 6:04
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच आहे. मागील आठवड्यात तेजीने सुरुवात झाल्यानंतर शेवट मात्र दरातील नरमाईनं झाला. आज सोयाबीन दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारातही सोयाबीन दर एका भावपातळीच्या आसपास फिरत आहेत. सोयाबीन दरात चढ-उतार का येत आहेत? हंगामाच्या सुरुवातील किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The fluctuations in the soybean rates con...
Onion Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार | Agrowon 17.09.2022 6:10
अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने जागतिक मका उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. युएसडीएच्या या अहवालाचा बाजारावर परिणामही जाणवला. काही देशांमध्ये यंदा मका उत्पादन वाढेल तर काही देशांमधील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. पण नेमकं कोणत्या देशात मका उत्पादन कमी होईल? युएसडीएच्या अहवालाचा बाजारावर काय परिणाम झाला? देशातील मका बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्ट...
Onion Rate : नाफेडने कांदा खरेदी करण्याची का होतेय मागणी? | Agrowon 16.09.2022 6:21
यंदा कांदा आवकेचा हंगाम सुरु झाल्यापासून दर दबावात आहेत. रब्बी आणि उन्हाळा कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला होता. त्यामुळं बाजारात कांदा आवक दाटली. परिणामी दर नरमले. दरातही ही नरमाई आजही कायम आहे. त्यामुळं कांदा दरात सुधारणा होण्यासाठी निर्यात होणं गरजेच आहे. मात्र सध्या निर्यातही ठप्प आहे. पण देशात कांदा उत्पादन वाढूनही निर्यात का बंद आहे? दर वाढावे यासाठी कोणती मागे पुढे येत आहे? याची माहिती आ...
Soybean Rate : राज्यातील कापूस पिकावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता? | Agrowon 15.09.2022 5:56
सध्या देशात कापासची टंचाई जाणवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस काढणीला उशीरा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण कापूस उशीरा बाजारात आल्यास काय परिणाम होईल? याचा दरवाढीला आधार मिळेल की दरावर दबाव वाढेल? याची माहिती आजच्या पॉडकास्टम...
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन का घटतंय? | Agrowon 14.09.2022 6:24
अमेरिका कृषी विभाग अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढेल, असा अंदाज जाहिर केला आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा जास्त राहील, असंही युएसडीएने म्हटले आहे. पण या दोन्ही देशांत अजून पेरण्या सुरु व्हायच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील उत्पादन वाढेलच हे आताच नक्की सांगता येणार नाही. मात्र अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी होतंय. पण अमेरिकेतील सोयाबीन...
Tur Rate : आफ्रिका तूर पुरवठ्याचं केंद्र कसं बनलं? | Agrowon 13.09.2022 6:06
केंद्र सरकार देशात तुरीचे दर कमी असो वा जास्त आयात करतच असते. भारताचा मुख्य तूर पुरवठार देश अशी म्यानमारची ओळख होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन आणि निर्यात कमी होत गेली. तर आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातील उत्पादन आणि भारताला होणारी निर्यात वाढली. पण भारतावर तूर आयात करण्याची वेळ का येते? आफ्रिकेतून तूर आयातीचं प्रमाण का वाढलं? याची माहिती आजच्या मार्केट ब...
Soybean Rate : सोयाबीन, मोहरीची वायदेबंदी मागे घेण्याची मागणी | Agrowon 12.09.2022 6:36
खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नेहमीप्रमाणं केंद्रानं २०२१ मध्ये सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवर बंदी घातली. परंतु तेलबियांवरील वायदेबंदीनंतरही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. दरात मोठे चढ-उतार होतच राहिले. म्हणजेच खाद्यतेलातील दरवाढीला वायदे जबाबदार नव्हते, हे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवरील बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे. पण ही मागणी नेम...
Soybean rate : नव्या हंगामात सोयाबीन दर काय राहू शकतात? | Agrowon 10.09.2022 6:22
ताज्या आकडेवारीनुसार देशात सोयाबीनची लागवड किंचिंत पिछाडीवर आहे. मात्र देशातील बाजारांमध्ये चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीन दर दबावात आले होते. मात्र शनिवारी दर काही प्रमाणात पुन्हा सुधारले. पण सोयाबीन दर दबावात का आले होते? सध्या सोयाबीनला काय दर मिळतो आहे? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Soybean sowing is a little behind compared to last s...
Cotton Rate: कापूस उत्पादन घटीचा पाॅलिस्टरला मिळतोय फायदा | Agrowon 08.09.2022 6:06
जागतिक कापूस पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळं कापसाचे उत्पादनही कमी-जास्त होत आहे. तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून पाॅलिस्टर कापडाचा वापर वाढत आहे. त्यामुळं उत्पादनातही सतत वाढ झाली. पण पाॅलिस्टरचा वापर नेमका का वाढला? याचा कापसाच्या बाजारावर काय परिणाम होत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Cotton crop is affecting by global warming from the last few years. Cotton...
Tur Rate: तुरीचा तुटवडा नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार? | ॲग्रोवन 07.09.2022 5:53
देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवत आहे. तर सणांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. यंदा तुरीची लागवड जवळपास ६ टक्क्यांनी कमी झाली. पिकाचंही नुकसान होत आहे. मात्र असे असतानाही तुरीचे दर सध्या काहीसे नरमले आहेत. पण तुटवडा असताना तूर का नरमली? तुरीचे दर काय राहू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The Indian is facing tur shortage in the current situation. Tur demand may increase in the fe...
Cotton Rate: कापूस पिकाची स्थिती चांगली असल्याचा सीएआयचा दावा |ॲग्रोवन 06.09.2022 6:40
देशात यंदा कापसाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसलाय. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा खंड, गुलाबी बोंड अळी आणि इतर कीड-रोग यामुळे शेतकरी जेरीस आलेत. पण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र देशातील कापूस पिकाची स्थिती सध्या चांगली असून कापूस उत्पादन मागील वर्षीपेक्षा वाढेल, असा दावा केलाय. हा नेमका काय प्रकार आहे, असोसिएशनच्या मते उत्पादन किती होईल, देशातील एकंदर कापूस चित्र काय आहे हे या पॉडक...
Soybean Rate: सोपा म्हणते सोयाबीन पिकाची स्थिती चांगली |ॲग्रोवन 05.09.2022 6:12
देशातील सोयाबीन पीक हे सामान्य ते चांगल्या स्थितीत आहे, असा दावा सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला. देशातील सोयाबीन पिकाची वाढ अतिशय चांगली झालेली असून बहुतेक पीक हे फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. तर बहुतांश सोयाबीन पीक तणमुक्त आणि कीड-रोगापासून मुक्त आहे, असाही दावा सोपानं केला. मात्र सोपाचा हा दावा खरा आहे का? प्रत्यक्षात सोयाबीनची स्थिती काय आहे? सोयाबीनला सध्या काय दर मिळत...
Cotton Rate: जगातील महत्वाच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार ? |ॲग्रोवन 03.09.2022 5:53
जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस पिकाला दुष्काळ, अतिपाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसत आहे. त्यामुळे या देशांमधील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा कमी होऊ शकतो. पण कोणत्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे? याचा भारताच्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. The cotton crop in the importan...
Soybean Rate: सोयाबीन वायद्यांवरील बंदी कायम ठेवण्याची सोपाची मागणी | ॲग्रोवन 02.09.2022 6:13
मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनसह सोयातेलाचे दर तेजीत आले होते. त्यामुळे सरकारनं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांवर बंदी घातली होती. बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. आजही सोयाबीन बाजार दबावात आहे. त्यातच ही बंदी कायम राहावी अशी मागणी आता केली जातेय. ही मागणी नेमकी कुणी केली? या संघटनेचा सोयाबीन वायद्यांना विरोध का आहे? वायदे बंद असल्यास शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय ? याची माह...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.