Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sugar Market : राज्यात इथेनॉलची उलाढाल १२ हजार कोटीवर जाणार 30.11.2022

  यंदा परतीचा पाऊस लांबल्याने साखर कारखाने उशिरा सुरू झाले. परंतु यंदाचा गळित हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा इथेनॉलमधून गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. यंदा साखर उद्योगाची उलाढाल किती होईल, त्यात इथेनॉलचा वाटा किती असेल, त्याचा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये.Sugarcane crushing se...

देशात गहू, तांदळाचा साठा बफर स्टॉकपेक्षा अधिक 29.11.2022

 गहू, तांदळाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलणार असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी त्याचा इन्कार केलाय. हे नेमके प्रकरण काय आहे, देशात गहू, तांदळाचा साठा नेमका किती आहे, दर पडतील की टिकून राहतील, याची माहिती जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. Central food secretary Sanjeev Chopra ruled out the possibility of government intervention to control the prices....

रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होईल का? 28.11.2022

 बागायती भागात ऊस आणि फळबागा वाढल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकावर भलताच परिणाम होतोय. परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीची लागवड उशीरा झाली. त्यात आता शेतकऱ्यांना एक वेगळीच समस्या भेडसावू लागलीय. ती नेमकी काय आहे, ते पाहूया आजच्या पॉडकास्टमध्ये.  Changing cropping pattern has an adverse impact on the crop of rabi jowar. As area under sugarcane and horticulture crops rises birds are destroying the jowa...

देशात गव्हाचा पेरा वाढला की घटला? 26.11.2022

केंद्रीय कृषी मंत्रालयाने २५ नोव्हेंबर रोजी रब्बी पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केलीय. देशातील रब्बी पिकांच्या लागवडीचे चित्र त्यातून स्पष्ट झालंय. रब्बी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचं पीक असलेल्या गव्हाची पेरणी वाढलीय का? उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? हरियाणात पेरा घटलाय का? महाराष्ट्रातील स्थिती काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये.

Tur Market: आयात वाढली तरी तुरीतील तेजी कायम राहणार? | Agrowon 25.11.2022

 देशात यंदा तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने आयातीसाठी जोर लावलाय. परंतु आयात वाढली तरी तुरीच्या किंमतीतील तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया पॉडकास्टच्या शेवटी.  Tur output will be lower this year compared to last year. Therefore the central government has pushed for imports. But despite the increase in imports, prices will remain higher in domestic ma...

Cotton Export: आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी का घटली ? | Agrowon 24.11.2022

 यंदा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकायला सुरूवात केलीय. भाव वाढण्याच्या आशेने मालाचा साठा केलाय. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव नाही. माल कमी उपलब्ध होतोय. त्यामुळे दर चढे आहेत. त्याचा निर्यातीच्या बाजारावर काय परिणाम होतोय, निर्यात वाढणार की घटणार, याविषयी जाणून घेऊ या आजच्या पॉडकास्टमध्ये. This year farmers have started selling cotton in phases. Goods have been stocked in the hope of price...

Cotton Market: कापसाला आज किती दर मिळाला ? | Agrowon 23.11.2022

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आजही काहीशी घट झाली. मात्र देशांतर्गत बाजारात कापूस दरातील घट आज थांबली. आज अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहयाला मिळाली. पण कापूस दरातील चढ-उतार पुढील महिनाभर कायम राहू शकतात. मग या स्थितीत कापसाला काय दर मिळू शकतो? आज कापसाच्या दरात किती सुधारणा झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Cotton Market: देशातील बाजारात कापूस दर का नरमले? | Agrowon 22.11.2022

 आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आजही चढ-उतार पाहायला मिळाले. तर देशातील बाजारातही अनेक ठिकाणी कापूस दरात नरमाई दिसून आली. कापसाचे दर नरमल्यानंतर बाजारातली आवकही घटली. मग या स्थितीत कापूस दर कसे राहू शकतात? कापूस दरातील चढ-उतार कधीपर्यंत राहतील? शेतकऱ्यांना या स्थितीत काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Fluctuations were seen in the cotton price in the international...

Tur Rate: आफ्रिकेतून स्वस्त तुरीची आयात वाढली | Agrowon 21.11.2022

आफ्रिकेतील देशांमधून स्वस्त तुरीची आयात वाढत आहे. तसेच या देशांमधून आयात होणारी तूर म्यानमारच्या तुरीपेक्षा स्वस्त आहे. त्यातच सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तुरीची खरेदी केली. मग देशातील तुरीच्या बाजारावर याचा काय परिणाम होत आहे? यंदा शेतकऱ्यांना तुरीसाठी काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मधून मिळेल.  Imports of cheap tobacco from African countries are on the rise. Also...

हरभऱ्याऐवजी राजमा पीक निवडले तर शेतकऱ्यांना फायदा होईल का? 19.11.2022

राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक बनलं आहे. परंतु रोगराईचा प्रादुर्भाव आणि घटलेले दर यामुळे गेल्या काही हंगामांत हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं बनलं आहे. त्याला राजमा हे पीक चांगला पर्याय ठरू शकते का, याबद्दल जाणून घेऊ या आजच्या मार्केट पॉडकास्टमध्ये.Chana is the major rabi crop in Maharashtra. But due to disease infestation and dip in prices farmers are incurri...

Sugar export: साखर दरातील तेजीचा निर्यातीवर काय परिणाम होणार ? | Sugar Rates | ॲग्रोवन 18.11.2022

 जागतिक बाजारात साखरेच्या दरात तेजी आलीय. त्याला कारणीभूत आहे भारत. निर्यातीच्या मागणीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी देशातील साखर कारखान्यांनी कंबर कसली आहे. अनेक कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापैकी निम्मी साखर विकल्यानंतर नवीन निर्यात करार करण्याचे थांबवले आहे. निर्यातीच्या आघाडीवर काय घडामोडी सुरू आहेत, त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. Many...

Chana Rate: हरभरा बाजार कधीपर्यंत मंदीत राहणार ? | Agrowon 17.11.2022

 नाफेड मागील काही महिन्यांपासून सातत्याने हरभऱ्याची खुल्या बाजारात विक्री करत आहे. त्यामुळं नाफेडकडील साठा कमी झाला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये नाफेडकडील साठा १० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे. मग या काळात हरभरा दर काय राहू शकतात? सध्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

Cotton Rate: देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ? | Agrowon 16.11.2022

देशातील उद्योगांनी यंदा कापूस उत्पादन वाढून ३४४ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज कायम ठेवला. मात्र कापूस बाजारातील काही अभ्यासक आणि शेतकरी यांना हा अंदाज मान्य नाही. मग कापूस उत्पादनाबाबत नेमक कोण खरं सांगतंय? कापूस बाजार का सुधारला? सध्या कापसाला काय दर मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Rate: तूर आयातीचा बाजारावर परिणाम होईल का? | Agrowon 15.11.2022

 देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात चढउतार सुरु आहेत. तसंच दरात सध्या मोठी तेजी दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. मग या स्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर काय दर मिळू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Tur production is expected to decline in the country this year. But...

Cotton Rate: बाजारातील कापूस आवक वाढली का? | Agrowon 14.11.2022

 आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज जवळपास अडीच टक्क्यांनी नरमले होते. तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे वायदे गाठीमागे १६० रुपयांनी कमी झाले. तर दुसरीकडे बाजारात कापसाची आकही अपेक्षेपेक्षा कमीच आहे. मग या परिस्थितीत बाजार समित्यांमधील दराची स्थिती काय आहे? कापसाला सध्या काय दर मिळत आहे? कापसाचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Cotton prices in the international mar...

Cotton Rate: कापसाचे दर का स्थिरावले ? | Agrowon 12.11.2022

 देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे दर वाढलेले आहेत. मात्र कापसाचे दर वाढूनही बाजारातील आवक अद्यापही अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यातच मागील तीन दिवसांपासून दर स्थिर दिसत आहेत. मग सध्या कापसाला काय दर मिळत आहे? कापसाचे दर काय राहू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Cotton prices have increased in the country as well as in the international market. However, despite the incr...

Sugar Factories: कारखान्यांची साखर निर्यातीसाठी लगबग; एफआरपीसाठी फायदा होणार का ? | Agrowon 11.11.2022

 केंद्र सरकारने साखर निर्यातीबद्दलचे धोरण जाहीर केल्यावर देशातील साखर कारखानदारांनी निर्यातीचे करार करण्याचा धडाका लावलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर आकर्षक आहेत. त्याचा फायदा घेण्याचा कारखानदारांचा प्रयत्न आहे. त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार का? एफआरपी वेळेवर मिळणार का?

Soybean Rate: अमेरिकेत सोयाबीन उत्पादन वाढलं का? | Agrowon 10.11.2022

 यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  सोयाबीन उत्पादनात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला आहे. मग यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कसं राहील? अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचा भारताच्या बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. This year, global soybean production is expected to increase. America ranks...

Cotton Rate: कापसाची विक्री शेतकऱ्यांनी वाढवली का? | Agrowon 09.11.2022

 देशातील बाजारात आजही कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. आता कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला. सरकीच्या दरातही सुधारणा झाली होती. मात्र तरीही बाजारातील आवक वाढलेली दिसली नाही. मग कापसाचे दर कितीवर पोचले? शेतकऱ्यांना कापसासाठी किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. In the market of the country today, the price of cotton has seen an increase of Rs. 1...

Tur Rate: तुरीला यंदा काय भाव राहील? | Agrowon 08.11.2022

 दिवाळीनंतर देशातील बाजारात तुरीला काहीसा कमी उठाव मिळत आहे. त्यामुळं बाजारात दर कमी जास्त होत आहेत.  देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळाली. देशात सध्या आफ्रिकेतून तुरीची आयात वाढत आहे. मग तूर आयातीचा बाजारावर नेमका काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. After Diwali, turi is getting little ris...

Cotton Rate: देशातील कापूस बाजाराची स्थिती काय? | Agrowon 07.11.2022

देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली होती. मात्र उद्योगाकडून मागणी वाढल्यानं कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात मागील तीन दिवसांपासून कापसाचे दर वाढले आहेत. आजही कापूस दर काही प्रमाणात वाढले. पण कापसाच्या दरात नेमकी किती वाढ झाली? सध्या कापसाला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The arrival of cotton in the country's market was reduced. But due to increase in demand from the ind...

Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले? | Agrowon 05.11.2022

 आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. त्यामुळे सरकीपेंडेला मागणी वाढत आहे. परिणामी सरकीचे दर वाढले. मागील महिनाभरात सरकीच्या दरात मोठी सुधारणा झाली. मग सरकीच्या दरात नेमकं किती वाढ झाली? सध्या सरकीला काय दर मिळतोय? याचा कापूस बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   The price of oilseed meal improved in the international market as well as...

Cotton Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले| Agrowon 05.11.2022

 आंतरराष्ट्रीय बाजारात कापसावरील दबाव आज काहीसा दूर झाल्याचं दिसलं. आज आयसीईवर कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्के वाढ झाली होती. कापसाने मागील महिनाभरातील उच्चांकी टप्पा गाठला. याचा देशातील बाजारावर काय परिणाम झाला? देशात कापसाला काय दर मिळाला? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The pressure on cotton in the international market seems to have eased today. Today on ICE, the price of cotton inc...

Soybean Rate: बाजारात सोयाबीनची आवक वाढली | AgrowonEpisode 169_3rd Nov 2022 03.11.2022

 केंद्र सरकारने सोयाबीन आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे. मग देशात सोयाबीनच्या दरात किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   The central government has removed the stock limit on soybeans and soybeans. Soy...

Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon 02.11.2022

 देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात कापसाची आवकही वाढलेली आहे. मात्र रुईला सुतगिरण्यांकडून सध्या उठाव कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात आहे. मग या काळात शेतकरी कापूस विक्री कशी करत आहेत? कापसाचे दर केव्हा सुधारु शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Cotton prices are currently under pressure in the country's market. The arrival o...

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.