Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Maize Market: Maize producers are waiting for price increase | Agrowon 27.12.2022

 बाजारात मागील काही दिवसांपासून मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे. मग सध्या मक्याला काय दर मिळत आहे? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Market: Tur arrival increasing gradually in the market | Agrowon 26.12.2022

देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त आहे. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. पण सध्या तुरीला मिळणारा दर गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   

Agri Unplugged Trailer 25.12.2022
A Biogas Plant That Does Not Require Dung | शेणाची गरज नसणारे बायोगॅस संयंत्र | Agri Unplugged 25.12.2022

जैव इंधनवायु म्हणजेच बायोगॅस या विषयावर संशोधन करण्यास डॉ. आनंद कर्वे यांनी २००३ सालापासून सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने हा विषय नवा होता. म्हणून कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी त्यावर उपलब्ध असणारी माहिती संकलित करू लागले.  To research the topic of biofuel i.e. biogas. Dr. Anand Karve started in the year 2003. According to him, this topic was new. So before starting the work, he started co...

Turmeric Market: Turmeric production may increased this season | Agrowon 24.12.2022

 यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे. पण यंदा खरंच हळद उत्पादनात वाढ होईल? हळदीला सध्या काय दर मिळत आहे? हंगामात हळदीचे दर टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Chana Market: Chana sowing may decrease this season |Agrowon 23.12.2022

देशात हरभरा दर सध्याही दबावातच आहेत. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. कारण यंदा तुरीच्या बाबतीत हा अनुभव खरिपात आला आहे. आता रब्बीची पेरणी वेगाने सुरु आहे. मग यंदा हरभऱ्याची पेरणी खरंच कमी झाली का? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Soybean Market: Removal of future ban can support soybean market? |Agrowon 22.12.2022

 केंद्र सकारने सात शेतीमालावरील वायदेबंदी एक वर्षासाठी वाढवली. याचा शेतकऱ्यांना फटका बसणारच आहे. मात्र आता प्रक्रिया दारांच्या संघटनेनेही वायदेबंदीला विरोध केला आहे. पण वायदेबंदीला विरोध करणारी ही संघटना कोणती? या संघटनेची नेमकी मागणी काय? शेतकऱ्यांना वायदे सुरु झाल्याचा काय फायदा होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Market: Tur market will get support in coming days ? |Agrowon 21.12.2022

 यंदा देशातील तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने तूर आयातीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. यंदाही गेल्यावर्षीऐवढी तूर आयात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आफ्रिकेतील देशांमधूनच जास्त तूर आयात केली जाते.   पण आता तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी आफ्रिकेतून येत आहे. मग काय आहे ही बातमी? याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Chana Market : Will the desi chana rate increase? |Agrowon 20.12.2022

 हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून किमान दरात चांगला उठाव मिळतो आहे. या दरात मागणीही चांगली येत आहे. तर काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला निर्यातीसाठी मागणी वाढत आहे. मग सध्या देशी हरभऱ्याला काय दर मिळत आहे? काबुली हरभऱ्याचे दर किती वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Market : The price of tur depends on the farmers' sales |Agrowon 19.12.2022

शेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. परिणामी दरातील घसरण थांबली. पण शेतकरी तुरीचीही विक्री अशीच करतील का? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Cotton Market: Cotton Import Duty and CCI Procurement will Support the Market | Agrowon 17.12.2022

केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयातशुल्क काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सीसीआय बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदीत उतरली. याचा फायदा कापूस बाजाराला होणार आहे. मग शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार का? कापसाचे दर कधी मिळणार? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Tur Market: Will farmers control tur arrival? | Agrowon 16.12.2022

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं तुरीचीही विक्री गेरजेनुसार करतील की काय? अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. पण खरंच यंदा शेतकऱ्यांच्या विक्रीवरचं तुरीचे दर ठरतील का? तुरीला यंदा काय दर मिळेल?  याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Cotton Market: How much cotton arrived in the market ? | Agrowon 15.12.2022

 यंदा देशातील कापूस लागवड वाढली मात्र उत्पादकता कमी राहीली. कापसाचा हंगाम सुरु होऊन आता अडीच महिने झाले. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे. मग कापसाचा साठा नेमका कुणाकडे आहे? कापूस विक्रीबाबत यंदा शेतकऱ्यांची भुमिका काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Soybean Market: देशातील सोयाबीन बाजार स्थिर का ? | Agrowon 14.12.2022

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार लाख टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम झाला? देशातील सोयाबीन बाजार कसा राहीला? याची माहिती तुम्हाला आजच्या म...

Chana Market: देशात गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा तुटवडा? | Agrowon 13.12.2022

 हरभऱ्याचा बाजार मागील रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात. पण खरंच हरभरा दरात वाढ होऊ शकते? या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Tur Market: देशातील तूर उत्पादनात किती घट होणार ? | Agrowon 12.12.2022

 देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. तर दुसरीकडे तुरीची  आयातही वेगाने होत आहे. मात्र सध्यातरी तुरीचे दर तेजीत आहेत. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मग यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीचे उत्पादन यंदा वाढणार की घटणार? याची माहिती आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

Cotton Market: कापूस दरात चैतन्य कधी येणार? | Agrowon 12.12.2022

 शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. मात्र चालू महिन्यात देशातील कापूस दर नरमले. नोव्हेंबरच्या तुलनेत दरात क्विंलटमागे ८०० ते एक हजार रुपयांची नरमाई आली. त्यातच उद्योग दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाही परिणाम कापूस दरावर जाणवला. पण सध्या कापसाला काय दर मिळत आहे? चालू महिन्यात कापूस बाजारातील स्थिती कशी राहील? कापूस दर केव्हा वाढू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधू...

Soybean Market: हरभरा पेरणी घटल्यास दर वाढण्याचा अंदाज | Agrowon 09.12.2022

 देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मागील आठवड्यात मात्र हरभऱ्याचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर होता. मग चालू आठवड्यात हरभरा पेरणी कशी राहीली? त्याचा बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

Soybean Market: अर्जेंटीनाचं सोयाबीन उत्पादन घटणार ? | Agrowon 08.12.2022

 अर्जेंटीनाने गेल्या हंगामातील ७५ टक्के सोयाबीनची विक्री केली आहे. तर यंदा अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाीबन पेरणी यंदा घटण्याची शक्यता आहे. मग याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होईल? देशातील सोयाबीनला याचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडका...

Arhar Market: तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल का ? | Agrowon 07.12.2022

 काही बाजारांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक होत आहे. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. सध्या आवक कमी असली तरी पुढील काही दिवसांमध्ये आवक वाढण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला काय दर मिळत आहे? सोयाबीन आणि कापसाप्रमाणे तुरीलाही हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल का? याची माहिती आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

Corn Market: देशातील खरिप मका उत्पादन घटले का ? | Agrowon 06.12.2022

देशातील खरिप मका पिकाला यंदा पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा खरिपातील मका उत्पादन घटून गुणवत्ताही कमी झाल्याचे जाणकारांनी सांगितले. तसेच सध्या बाजारातील मका आवकही मर्यादीत आहे. मग सध्या मक्याला काय दर मिळत आहे? पुढील काळात मका बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Market: आयातीमुळे तुरीच्या दरावर दबाव? | Agrowon 05.12.2022

 देशातील नवी तूर काही बाजारांमध्ये दाखल झाली आहे. मात्र यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज होता. मात्र देशातील बाजारात सध्या तुरीचे दर नरमलेले दिसत आहेत. पण तुरीचे दर का नरमले? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Chana Market: दर कमी असूनही शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती कशी ? | Agrowon 03.12.2022

मागील वर्षभर हरभऱ्याला कमी दर मिळाला. मात्र गहू आणि मसूरने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. ऐन पेरणीच्या काळातही  हरभऱ्याचे दर दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभरा पेरणी कमी करून इतर पिकांना पसंती देतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या तरी हरभऱ्याची लागवड जास्त दिसत आहे. हे गौडबंगाल काय आहे, ते पाहुयात आजच्या पॉडकास्टमध्ये.  Gram got low price last year....

Tur Market: शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळू शकतो? | Agrowon 02.12.2022

 आफ्रिकेतील देशांमधून सध्या तूर आयात वाढली आहे. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आला. म्यानमारमध्येही तुरीचे दर कमी झाले. म्यानमारची तूर मार्च महिन्यापासून बाजारात येईल. तसेच देशातील मालाचीही आवक वाढणार आहे. मग या परिस्थितीत तुरीचा बाजार कसा राहील? शेतकऱ्यांच्या तुरीला काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Tur imports from African countries have increased at present. Due to t...

पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा 01.12.2022

 सोयाबीनचे भाव कधी वाढतील, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. पाम तेलाचे दर वाढत आहेत. मलेशियन पाम तेलाच्या किंमतीत चांगली सुधारणा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीनमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात जनतेची निदर्शने सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली. चीन सरकारने निर्बंधांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेतले आहे. या सगळ्या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. China easing co...

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.