Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Wheat Market: गहू उत्पादनाला फटका बसल्याचा अंदाज | Agrowon 13.03.2023

वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. तर दुसरीकडे गहू पिकाला वाढती उष्णता आणि पावसाचा फटका बसत आहे. मग या स्थितीत गव्हाचे भाव कसे राहतील? गहू हमीभावाचा टप्पा पार करेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Listen today's market bulletin to know the details. 

वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव |What is Vel Amavasya? Who celebrates it ?| Agri Unplugged 12.03.2023

येळवस हा मातीतला अस्सल उत्सव आहे. वेळामावस्या असेही याला म्हणतात. दर्शवेळा अमावस्येला येळवस असते. कर्नाटकातून आलेला हा उत्सव आहे असे मानले जाते. या दिवशीचा स्वयंपाक वैशिष्ट्यपूर्ण असतो. Yelvas or Vel Amavasya is a festival celebrated by farmers. It is also called as Darsh-vela Amavasya. It is believed that the roots of this festival are in Karnataka. The special food is cooked on this day. Author...

Chana Market: हरभरा दर दबावातच का? | Agrowon 11.03.2023

सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. केंद्राने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण यंदा हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? उत्पादनातील घटीचा दराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या म...

Soybean Market: सोयाबीन दर सुधारण्यास वाव | Agrowon 10.03.2023

अर्जेंटीनातील उत्पादन घट आणि ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून आहे. भारतात मात्र दर दबावात आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील बाजारावर परिणाम होईल का? सोयाबीनचे दर वाढतील का?  याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Tur Market: देशात तुरीचा तटवडा जाणवणार? | Agrowon 09.03.2023

देशातील तूर उत्पादन यंदा घटलं. त्यामुळे तुरीचे दर सध्या तेजीत आहेत. पण सरकारही तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकार तुरीची साठेबाजी आणि नफेखोरी होऊन देणार नाही, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केले. मग या स्थितीत तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधू मिळेल

Kanda Bajarbhav: नाफेडची कांदा खरेदी फक्त नावालाच | Agrowon 08.03.2023

लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दर दबावात आले आहेत. महाराष्ट्रात नाफेडने कांदा सुरु केली. पण नाफेडची खरेदी केवळ नावापुरतीच सुरु असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आता नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी सुरु करणार आहे. मग नाफेडच्या कांदा खरेदीचा बाजाराला आधार मिळेल का? कांदा दर पुढील काळात सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: सरकार तेलबिया उत्पादकांना दिलासा देणार? | Agrowon 07.03.2023

देशात खाद्यतेल आयात वाढल्याने सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आले आहेत. मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. मोहरीचे दर सुधारण्यासाठी सरकार पामतेल आयातशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. मग याचा सोयाबीनला फायदा मिळेल का? सोयाबीनचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Rate: तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज | Agrowon 06.03.2023

देशातील बाजारात तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे. पण मार्च महिन्यात बाजारात आवक वाढू शकते. तर आयातही सुरु आहे. मग या परिस्थितीत तुरीचे दर कसे राहू शकतात? मार्च महिन्यात तुरीला काय भाव मिळू शकतो? तुरीचे दर आणखी कधीपासून वाढतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी | Agri Unplugged 05.03.2023

जर्मनीतील श्वार्त्सवाल्डचा मध हे येथील एक खास उत्पादन आहे. तो पेटीत ठेवलेल्या पाळीव मधमाशांकडूनच निर्माण केला जातो पण तो डांबरासारखा काळाकुट्ट, अपारदर्शी आणि घणसर असतो. हा मध जर्मन लोक आवडीने खातात. काहींच्या मते तर त्यात विशेष औषधी गुणधर्म असतात. Honey from the Black Forest in Germany is a special product. It is produced by honeybees kept in boxes but it is black, opaque and dense like tar. Germa...

Cotton Market: कापसाच्या दरावर दबाव कायम | Agrowon 04.03.2023

देशात मागील काही दिवसांपासून कापूस आवक वाढली. वाढते ऊन आणि आर्थिक गरजेमुळे कापूस विक्री वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण रुईचे दर टिकून आहेत. दुसरीकडे कापूस दर मात्र नरमले. मग रुईचे दर स्थिर असताना कापूस का नरमला? सध्या कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: उन्हामुळे हरभरा पिकावर परिणाम | Agrowon 03.03.2023

देशातील अनेक भागांमध्ये दिवसाचे तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानाचा हरभरा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मग वाढलेल्या उष्णतेमुळे हरभरा उत्पादन घटेल का? हरभरा बाजार दबावातच राहणार का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

Tur Market: बाजारातील कमी आवकेमुळे तुरीचे दर टिकून | Agrowon 02.03.2023

तूर बाजारात येण्याचा हंगाम आता सुरु झाला. मात्र शेतकरी तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. त्यातच यंदा देशातील उत्पादन घटणार आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग तुरीचे दर आणखी वाढतील का? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

एल-निनो आला तर शेतीवर नेमका परिणाम होईल? 01.03.2023

सध्या ‘एल-निनो’ची मोठी चर्चा सुरू आहे. अनेक अमेरिकी हवामान संस्थांनी यंदा मॉन्सून हंगामात एल-निनो प्रभावी ठरणार असल्याचा अंदाज दिलाय. भारतातील संस्थांनीही त्याची री ओढली आहे. एल-निनो आला तर शेतीवर नेमका काय परिणाम होईल, सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढतील की कमी होतील, या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या बुलेटिनच्या शेवटी. Currently, there is a big discussion about 'El Nino'. Many American weather organiza...

Chana Market: हरभरा उत्पादनात घटीची शक्यता | Agrowon 27.02.2023

देशात अनेक भागात हरभरा काढणी सुरु झाली. पण वाढलेल्या उष्णतेचा हरभरा पिकाला फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हरभरा उत्पादकता कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे. मग याचा बाजारावर परिणाम जाणवत आहे का? यंदा हरभरा बाजारभाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

मी डोंगल फोडले, कारण... | Agri Unplugged 26.02.2023

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जिल्हा परिषदेच्या एका लहानशा शाळेत डिजिटल क्लास चालवण्यासाठी डोंगल वापरले जात होते. परंतु एके दिवशी तिसरीतल्या एका मुलीने ड्रॉवरमध्ये ठेवलेला डोंगल काढून घेतला आणि दोन दगड घेऊन तो फोडून टाकला. काय होतं त्यामागचं कारण? ते जाणून तुम्ही थक्क व्हाल. Few years back, a dongle was used to conduct the digital class in a small ZP school. One fine day, a girl studying in third...

Soyabean Market : खाद्यतेलामुळे सोयाबीन बाजारावर दबाव | Agrowon 25.02.2023

भारत सरकारने आयातशुल्क कमी केल्यामुळं खाद्यतेल आयात वाढली. त्यामुळं यंदा देशात खाद्यतेलाचा स्टाॅक वाढला. सद्याचा स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. याचा दबाव सोयाबीनवर येत आहे. मग देशात खाद्यतेलाचा किती  स्टाॅक आहे? खाद्यतेल स्टाॅकमुळे सोयाबीनवर आणखी दबाव वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Onion Rate: कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी | Agrowon 24.02.2023

खरिपातील कांदा उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली. खरिपातील कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने जास्त दिवस ठेवता येत नाही. इतर राज्यांतील उत्पादनही वाढले. त्यामुळे बाजारातील आवक वाढली. परिणामी कांदा बाजार दबावात आला. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

सरकारच्या निर्णयावर गहू व्यापारी नाराज | Agrowon 23.02.2023

देशातील बाजारात सध्या गहू दरावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. सरकारनं ११ लाख ७२ हजार टन गहू विक्रीसाठी लिलाव केले. पण या लिलावात कमी व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळं केवळ ५ लाख टन गहू विकता आला. गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. मग खरंच सरकारला हे उद्दीष्ट गाठता येईल का? सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? गव्हाचं उत्पादन यंदा वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट...

भारतातून मका निर्यात वाढली | Agrowon 22.02.2023

जागतिक पातळीवर यंदा मका उत्पादन घटले. त्यामुळे अमेरिका, अर्जेंटीना आणि ब्राझीलच्या मक्याचे दर वाढलेले आहेत. सध्या भारतीय मका स्वस्त पडतो. भारतीय मक्याला निर्यातीसाठी मागणीही आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. मग सध्या मक्याला काय भाव मिळत आहे? मक्याच्या दर टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Cotton Market: कापसाच्या दरात सुधारणा होईल का? | Agrowon 21.02.2023

देशात यंदा कापसाचे उत्पादन घटले. तर वापर कायम राहणार आहे. त्यातच देशातून कापूस निर्यातही सुरु झाली. सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. मात्र पुढील काळात कापूस दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. मग कापसाचे भाव वाढतील का? कापसाला पुढील १५ दिवसांनंतर काय भाव मिळू शकतो? आज कापूस बाजार कसा राहिला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Tur Market : तुरीच्या बाजारावर सरकारचेही लक्ष | Agrowon 20.02.2023

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकरी माल मागे ठेवत आहेत. पण दुसरीकडं सरकारही तूर बाजारावर लक्ष ठेऊन आहे. मग या परिस्थितीत तूर बाजार कसा राहू शकतो? सध्या तुरीला काय दर मिळत आहे? तुरीचे दर आणखी वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

वनस्पतींना शिकविणे शक्य आहे का? |Can we teach plants? | Agri Unplugged 19.02.2023

 शिकणाऱ्याच्या ठायी स्मरणशक्ती असेल तरच त्याला शिकता येते. वनस्पतींमध्ये स्मरणशक्ती असते हे प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांना १९६०-६१ साली त्यांनी फुलांच्या पाकळ्यांच्या हालचालींवर केलेल्या संशोधनातून लक्षात आले.  Renowned scientist Dr Anand Karve conducted experiments to teach the plants. He established that the plants have the memory. So the plants can be taught, he proved. AUTHOR NAME: ड...

हळद दरात हंगामाच्या आधीच मोठी घट | Agrowon 18.02.2023

देशात यंदा हळदीचे उत्पादन वाढले. मागील हंगामातील साठाही शिल्लक आहे. मात्र हळदीला उठाव कमी मिळतोय. त्यामुळं मागील महिनाभरात हळदीच्या दरात क्विंटलमागं ७०० रुपयांपर्यंत नरमाई आली. मग सध्या हळदीला काय दर मिळतोय? हळदीची आवक वाढल्यानंतर बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

नव्या हरभऱ्याचे दर हंगामाआधीच दबावात | Agrowon 17.02.2023

देशात यंदा हरभरा लागवड अडीच टक्क्यांनी घटली. तर केंद्राने हरभरा उत्पादन चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला. सध्या काही बाजारांमध्ये हरभरा आवक सुरु झाली. नाफेडही स्टाॅकमधील हरभरा बाजारात आणत आहे. मग या परिस्थितीत सध्या नव्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

खाद्यतेल आयातीमुळे तेलबिया बाजारावर दबाव | Agrowon 16.02.2023

देशात मागील तीन महिन्यांमध्ये खाद्यतेलाची विक्रमी आयात झाली. सोयातेल आणि सूर्यफूल तेलाची आयातही वाढली. जानेवारीत तर सूर्यफुल तेलाची आयात जवळपास तिप्पट झाली. त्यामुळं देशात खाद्यतेलाचा साठा वाढला. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होत आहे? सध्या देशात खाद्यतेलाचा साठा किती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.