Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Tur Market : तूर उत्पादन घट आणि मागणीमुळे दर तेजीतच | Agrowon 15.02.2023 5:05
देशातील तूर उत्पादन यंदा घटले आहे. त्यातच तुरीला सध्या उठाव मिळत आहे. त्यामुळं गुणवत्तेच्या तुरीच्या दरात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा पाहायाला मिळाली. मग सध्या तुरीला काय दर मिळत आहे? तुरीचे दर टिकतील का? आवकेच्या हंगाात तुरीचे बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Cotton Market : कापूस दर वाढीसाठी अनुकूल स्थिती! 14.02.2023 6:54
एमसीएक्स या प्लॅटफॉर्मवर कापसाचे वायदेबाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. वायदेबाजार सुरू झाले की, लगेच कापसाच्या भावात तेजी येईल, असा प्रचार काही मंडळींनी केला होता. त्यात काही तथ्य आहे का? वायदेबाजाराचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? तसेच या पुढील काळात कापसाचे दर वाढतील की त्यात नरमाई येईल? याची उत्तरं जाणून घेऊया बुलेटिनच्या शेवटी.The cotton futures market resumed on the MCX platform from Monda...
Wheat Export ban : गव्हाचे दर नियंत्रणासाठी आणण्यासाठी सरकारचा खटाटोप 13.02.2023 6:52
केंद्र सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली होती. यंदा एप्रिल महिन्यात निर्यातबंदीचा आढावा घेतला जाईल. यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज सरकारी गोटातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार गहू निर्यातीवरची बंदी उठवेल की तिला मुदतवाढ देईल, याबद्दल चर्चा रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकार नेमका काय निर्णय घेईल? The central government had banned the export of wheat...
स्वार्थी व्हा, पोटार्थी व्हा | Old is not gold | Agri Unplugged 12.02.2023 4:32
खेड्यांतून असलेली बलुतेदारी ही मुळात उत्पादन व्यवस्था नव्हती तर जाती व्यवस्था होती. तिथे स्केल सुद्धा नव्हती आणि नवीन कल्पना सुद्धा नव्हत्या. म्हणून इथे नवीन शोध लागले नाहीत. ह्या काळात भारतीय शेतीत झालेला एकमेव बदल म्हणजे मिरची सारखी नवीन पिके. त्याला मागणी आणि बाजारपेठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली. The Twelve Balutedar system was not the production system. It was a caste syste...
Wheat Market: गहू दर नियंत्रणात सरकार अपयशी? | Agrowon 11.02.2023 5:19
देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने गहू लिलावाची आरक्षित किंमत कमी केली. मग सरकारने गव्हाची किंमत किती कमी केली? गव्हाचे दर कमी करण्यासाठी आणखी कोणते निर्णय घेतले? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
पुरवठ्या वाढल्याने पामतेल, सूर्यफुल तेल दबावात | Agrowon 10.02.2023 5:09
जागतिक बाजारात सध्या पामतेल आणि सूर्यफुल तेलाचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयातेलाचेही दर नरमले आहेत. इंडोनेशियाने पामतेलाचे दर वाढविण्यासाठी जैव इंधानात वापर वाढवला आणि निर्यात कोट्यातही बदल केला. मात्र तरीही दर वाढले नाहीत. मग सध्या पामतेलाचे दर काय आहेत? याचा सोयातेलावर काय परिणाम होत आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
बाजारातील केळी आवक निचांकी पातळीवर | Agrowon 09.02.2023 4:52
देशात यंदा केळीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. बाजारात सध्या केळीचा तुटवडा आहे. त्यातच केळीला निर्यातीसाठी मागणीही वाढली आहे. त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत. मग सध्या केळीला काय भाव मिळत आहे? केळीचे दर पुढील काळात काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Maize Market : मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज | Agrowon 08.02.2023 5:06
देशातील मका उत्पादन यंदा अंदाजापेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सध्या देशातून मका निर्यातही वेगाने सुरु आहे. दुसरीकडे खरिपातील मका सध्या बाजारात येत असून पुढील काळात रब्बीतील मका बाजारात दाखल होईल. मग या परिस्थितीत मक्याचे भाव काय राहतील? मक्याचे दर टिकून राहतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
नाफेडच्या विक्रीचा हरभरा दरावर दबाव कायम | Agrowon 07.02.2023 5:10
देशातील बाजारात आता नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्री सुरुच आहे. त्याचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. पण दुसरीकडे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? हरभरा दरात तेजीची शक्यता आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market : तुरीचे बाजारभाव मजबूत स्थितीत | Agrowon 06.02.2023 5:10
देशातील बाजारात आता नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र पुरवठा साखळीत तुरीचा ठणठणाट आहे. तर देशातील उत्पादनात यंदा मोठी घट आली. त्यामुळे बाजारात येणाऱ्या तुरीला लगेच उठाव मिळत आहे. मग या परिस्थितीत सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीचे भाव यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
ऊतिसंवर्धनाचे मृगजळ |Tissue culture: Myth and reality | Agri Unplugged 05.02.2023 7:59
ऊतिसंवर्धनाच्या माध्यमातून वनस्पतीची रोपे मोठ्या प्रमाणावर तयार करून ती विकण्याचे धंदे अनेक तरूणांनी सुरू केले. पण ते दिवाळ्यात गेले. सध्या महाराष्ट्रांत ऊतिसंवर्धनाने गुणन केलेली फक्त केळीची रोपेच मोठ्या प्रमाणात विकली जातात. There was hype about Tissue culture in Maharashtra. This technique is useful to produce saplings in huge quantities. Many young graduates started the business of selling ti...
Rice Market : तांदळाच्या दराला उत्पादन घटीचा आधार | Agrowon 04.02.2023 5:09
जागतिक पातळीवर यंदा तांदूळ उत्पादनात मोठी घट झाली. भारत, पाकिस्तान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये उत्पादन कमी झाले. मात्र मागणी वाढलेल्या पातळीवर कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे सद्या तांदळाचे दर तेजीत आहेत. मग सध्या तांदळाला काय दर मिळत आहे? तांदळाचे उत्पादन नेमके का कमी झाले? तांदळाचे दर पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Wheat Market : एफसीआयनेच विकला जास्त भावात गहू | Agrowon 03.02.2023 4:58
देशातील बाजारात विक्रमी गहू दरवाढ झाल्यानंतर सरकराने खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतला. भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयने काल पहिल्या टप्प्यात जवळपास ९ लाख टन गहू लिलावाद्वारे विकला. मग लिलावात गव्हाला काय भाव मिळाला? सरकारच्या गहू विक्रीने दर नरमतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Chana Market : बदलते वातावरण, पावसामुळे हरभऱ्याचे नुकसान वाढले | Agrowon 03.02.2023 4:58
देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावात आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे. यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली. त्यातच बदलते हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Mung Market : देशातील मूग उत्पादन यंदाही घटणार | Agrowon 03.02.2023 4:58
खरिप हंगामात यंदा मुगाची लागवड कमी झाली होती. तसचं पिकाचं नुकसानही झाले होते. त्यामुळे यंदा मुगाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुगाची आयातही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग या स्थितीत मुगाला यंदा काय भाव राहू शकतो? यंदा देशातील मूग उत्पादन किती होऊ शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Urad Market : उडदाचे उत्पादन घटले; मागणी चांगली | Agrowon 31.01.2023 5:07
देशात यंदा उडदाचे उत्पादन घटले. तर मागणी चांगली आहे. उडिद आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हातून बाजारात आला. त्यामुळं आवक घटली. परिणामी उडदाचे भाव तेजीत आहेत. पुढील काळातही उडदाला मागणी वाढणार आहे. मग या काळात उडदाचे भाव कसे राहतील? उडदाची आयात यंदा वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Pulses Market : तुरीच्या दरावर आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव येईल का? | Agrowon 30.01.2023 4:58
देशातील बाजारात नव्या तुरीची आवक वाढत आहे. तर आयातीचाही वेग यंदा जास्त आहे. सरकार यंदा विक्रमी तूर आयातीचे उद्दीष्ट बाळगून आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात तुरीचे दर दबावात येतील का? शेतकऱ्यांना तुरीसाठी यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
खुद को कर बुलंद इतना... |How to increase Soil fertility? | Agri Unplugged 29.01.2023 13:37
चार बांधाच्या आत फुकटात मिळणाऱ्या पदार्थातून जमीन उत्तमरित्या सुपीक करता येते. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष व चालू पिकात दोन ओळीमध्ये उगविणाऱ्या तणांचा युक्तीने वापर केल्यास जमीन फुकटात सुपीक करता येते. Deteriorating Soil fertility is the major problem adversely affecting productivity and profitability. There are few simple measures to address this issue. AUTHOR NAME: प्र. र. चिपळूणकर
Pulses Market : देशातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन का घडले | Agrowon 28.01.2023 5:13
भारत लवरकच कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मागील काही वर्षांपासून भारताची तूर, मूग आणि उडिद आयात वाढली आहे. यंदाही त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. मग भारताला कडधान्य आयात का वाढवावी लागली? वाढलेल्या आयातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Millet Market : केंद्र सरकार देशातील भरडधान्य उत्पादन वाढवणार | Agrowon 27.01.2023 5:35
केंद्र सरकारने देशात भरडधान्य पिकांचे उत्पादन आणि वापर वाढवण्याचा निर्णय घेतला. तर राज्य सरकारांनाही खरेदी व्यवस्था उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व भरडधान्य पिकांचा समावेश हमीभाव खरेदी योजनेत करण्यात येणार आहे. मग यामुळं ज्वारी, बाजारी, नाचणी, वरई, रागी या पिकांना चांगाल भाव मिळेल का? सरकार भरडधान्याची खरेदी कशी करणार ? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market : तुरीचे दर दबावात ठेण्यासाठी सरकारचा आटापीटा | Agrowon 26.01.2023 5:13
यंदा देशातील तूर उत्पादन ३० लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज उद्योग आणि व्यापारी संस्थांनी व्यक्त केला. त्यामुळं यंदा देशात तुरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मग यंदा खरचं १० लाख टन तूर आयात होईल का? याचा तुरीच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल...
Wheat Market: सरकार यंदा गव्हाची खरेदी वाढविण्याचा अंदाज | Agrowon 25.01.2023 5:30
गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला. तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. मग गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त असताना सरकारला गहू मिळेल का? सरकार गव्हाला बोनस देईल का? गव्हाचे दर यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्क...
Urad Market: देशातील उडदाचे उत्पादन यंदा घटणार | Agrowon 24.01.2023 5:21
देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा उडीद आयात वाढणार आहे. त्यामुळं देशातील बाजारात उडदाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल. मग या परिस्थितीत उडदाला यंदा काय दर मिळू शकतो? सध्या उडीद बाजार कसा आहे? यंदा उडीद उत्पादन आणि आयात किती होऊ शकते ? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen to today's podcast to know the details.
Tur Market: काबुली हरभऱ्याचे दर का नरमले? | Agrowon 23.01.2023 5:04
देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत. मग यंदाच्या हंगामात काबुली हरभऱ्याला काय दर मिळू शकतो? सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Listen today's podcast to know the details.
पाण्याचं गारूड | Agri Unplugged 22.01.2023 11:32
शेतकरी दररोज सकाळ-संध्याकाळ दोन्ही बोअरच्या पाईपजवळ कान देऊन पाण्याचे आवाज येतात का, ते पाहतो. मध्येच तो खडा टाकून बघतो. बुडूक बुडूक आवाज आला की खूष होतो. मनातल्या मनात म्हणतो की, पाणी आलंय बोअरमध्ये. बाकी सगळं नॉर्मल आहे त्याचं. पण एवढे पैसे जाऊनही त्याचं पाण्याचं वेड काही गेलेलं नाही. The farmer is crazy for water. Every morning and evening, he puts his ear near the bore pipe and listens for...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.