Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सरकार कुणाच्या भल्यासाठी तूप आणि लोणी आयात करणार? 07.04.2023 6:52
दुधाचे दर वाढल्यामुळे खुश झालेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार घी, बटर यासारख्या उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात आहे. त्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्र लिहून विरोध केलाय. दुधाचा प्रश्न का पेटलाय, मागणी-पुरवठ्याची स्थिती काय आहे, सरकार खरंच शेतकऱ्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकणार का, दुधाचे दर वाढतील की पडतील, हे जाणून घ्या मार्केट बुलेटिनच्या श...
Maize Market: पाकिस्तानचा मका सध्या भारतापेक्षा स्वस्त | Agrowon 06.04.2023 5:47
पाकिस्तान सध्या भारतापेक्षा कमी दरात मका निर्यात करतोय. त्यामुळं आशियातील काही देश पाकिस्तानच्या मक्याला पसंती देत आहेत. देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. रब्बीतील पिकाची स्थितीही चांगली आहे. रब्बीतील मक्याची बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. मग सध्या पाकिस्तान आणि भारतातील मक्याचे भाव काय आहेत? यंदा निर्यातीची स्थिती काय राहील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्...
Kabuli Chana Market: देशातील काबुली हरभरा उत्पादनात मोठी घट | Agrowon 05.04.2023 5:29
जागतिक पातळीवर मागील सात महिन्यांपासून काबुली हरभऱ्याची टंचाई आहे. काबुली हरभऱ्याने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. त्यामुळे चालू हंगामात काबुली हरभरा लागवडीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सहाजिकच लागवड वाढल्याने बंपर उत्पादन होईल, असा अंदाज होता. पण पावसाने मोठा फटका बसला. मग देशातील उत्पादन कसं राहील? आंतरराष्ट्रीय बाजारातील टंचाई किती काळ राहील? पुढील काळात काबुली हरभऱ्याचे भाव कसे राहतील? याची म...
Tur Market: तुरीचे उत्पादन घटल्याने शेतकरी बरोबरीतच | Agrowon 04.04.2023 5:51
मागील हंगामात शेतीमाल बाजारात कडधान्यांचे दर दबावात होते. मात्र यंदा कडधान्यांचे दरही वाढताना दिसातात. कडधान्यातील तेजीचं नेतृत्व तूर करताना दिसत आहे. तुरीचे दर तेजीत असल्याने महागाई वाढत असल्याची ओरड सध्या केली जात आहे. पण शेतकऱ्यांचा विचार केला तुरीतील तेजीत तेवढी फायदेशीर ठरताना दिसत नाही. मग शेतकऱ्यांसाठी तुरीचं गणित कसं आहे? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी किती दिवस टिकेल? य...
Chana Market : उत्पादनातील घटीचा हरभरा दराला आधार 03.04.2023 7:45
हरभरा हे रब्बी हंगामातलं प्रमुख पीक आहे. पण यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच दर दबावात आहेत. प्रतिकूल हवामानामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. सध्या हरभऱ्याच्या दरात सुधारणा झालेली दिसतेय. हे दर टिकून राहतील की दरात पुन्हा घसरण होईल? पाहूयात मार्केट बुलेटिनमधून. Gram is the main crop of the Rabi season. But this year the rates are under pressure from the beginning of the season. The gram crop has b...
खोबरेल तेलाच्या साबणाला सगळ्यात जास्त फेस का? | Soap made by coconut oil has special characters | Agri Unplugged 02.04.2023 8:08
भारतात नारळाशिवाय, भुईमूग, मोहरी, सोयाबीन, करडी, सूर्यफूल, तीळ, जवस, कारळा, सरकी, एरंडी, भाताचा कोंडा यांसारख्या कृषिजन्य स्रोतांशिवाय करंज, कडुलिंब, मोह, उंडी, जट्रोफा, पिसा, गेळा, साल, पिलू, कोकम, यांसारख्या कृषिबाह्य स्रोतांपासूनही तेल काढले जाते. पण कारखान्याच्या व्यवस्थापनात कच्च्या मालाची अशी हंगामी उपलब्धता परवडत नाही In India, oil is extracted from agricultural sources such as Coconut, Gr...
Tur Market: तुरीचे भाव कितीवर पोचले? | Agrowon 01.04.2023 5:49
तुरीचे दर तेजीत असल्याने सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. सरकारने तुरीचा नेमका किती स्टाॅक आहे याच्या माहितीसाठी आणि हा स्टाॅक बाजारात आणण्यासाठी व्यापारी, आयातदार, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्यामुळे तुरीचा व्यापार मर्यादीत होत आहे. पण बाजारातील आवकही कमी असल्याने तुरीचे दर टिकून आहेत. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार आणखी काय करु शकते? आणि त्य...
Kabuli Chana Market: देशातून काबुली हरभरा निर्यात दुप्पट झाली | Agrowon 31.03.2023 6:04
जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली. देशात काबुली हरभरा पिकावर बदलते वातावरण आणि पावसाचा परिणाम झाला. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मग पुढील काळात बाजारातील आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? निर्यात टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Turmeric Market: हळदीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 30.03.2023 5:14
देशात हळदीला उठाव कमी आहे. त्यामुळे हळदीचे दरात मोठी नरमाई आली होती. पण देशातून हळद निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. निर्यात वाढल्याने दरातील नरमाई काहीशी थांबली. मात्र हळदीचे अद्यापही गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलमागं एक हजार रुपयांनी कमीच आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? आवक वाढल्यानंतर हळदीच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेडच्या खरेदीचा हरभऱ्याला आधार आहे का? | Agrowon 29.03.2023 5:17
हरभरा उत्पादकता घट्ल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर देशातील बाजारात हरभरा दरात सुधारणा पाहयला मिळतेय. दुसरीकडे नाफेडची खरेदीही सुरु आहे. नाफेडची खरेदी अद्यापही चारच राज्यांमध्ये सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळतोय. मग बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Maize Market: मक्याचे दर का स्थिरावले? | Agrowon 28.03.2023 5:38
रब्बी हंगामात मक्याची लागवड ३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच सुरुवातीच्या काळात पिकाला पोषक हवामान होते. पुढे मात्र उष्णता आणि पावसाचा फटका बसला. पुढील महिन्यात बाजारात मक्याची आवक वाढेल. मागील काही दिवसांपासून मका बाजार स्थिर आहे. मग बाजारात मक्याची आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Tur Market: तुरीच्या दरातील तेजी वाढेल का? | Agrowon 27.03.2023 5:28
देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे. पण सध्याची आवक खूपच आहे. त्यातच लग्न सराईमुळे तुरीला चांगला उठाव मिळतोय. तर सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का? |Groundnut is wonder nut| Agri Unplugged 26.03.2023 7:52
भुईमूग हे सोयाबीनप्रमाणेच फाबेसी कुटुंबातील एक जागतिक महत्त्वाचे पीक असून त्याची लागवड मुख्यतः खाद्यतेलासाठी केली जाते. या वनस्पतीच्या शेंगा जमिनीखाली लागत असल्याने तिच्या नावात भुई हा शब्द वापरला गेला आहे. जमिनीखाली शेंगा किंवा फळे धारण करणा-या इतरही काही वनस्पती आहेत, पण एक पीक म्हणून लागवड केल्या जाणा-या वनस्पतींपैकी जमिनीखाली फळे असलेली भुइमूग ही एकमेव वनस्पती आहे. AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे
Ginger Market: आले दरात कशामुळे सुधारणा झाली? | Agrowon 25.03.2023 5:27
देशात मागील चार महिने आल्याचे दर दबावात होते. आले दराने अनेक वर्षातील निचांकी दराचा टप्पा चालू हंगामात पाहिला होता. आल्याचे भाव निचांकी २ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आले लागवडीकडे पाठ फिरवली होती. पण सध्या आले उत्पादकांना दिलासा मिळताना दिसतोय. दिवाळीनंतर आले दरात काहीशी सुधारणा होत गेली. मग आले दरात नेमकी किती सुधारणा झाली? आले दरातील ही सुधारणा टिकेल क...
Tur Market: तूर आयात यंदा खरचं वाढेल का? | Agrowon 24.03.2023 5:15
देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील उत्पादन घटल्यानं बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळं केंद्र सराकरनं आयात करून पुरवठा वाढवण्याचं उद्दीष्ट ठेवलं. वर्षभरात १० लाख टन तूर आयात केली जाईल, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. मग खरचं सरकारला एवढी तूर आयात करता येईल का? आफ्रिकेत तूर लागवड आणि पिकाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Cotton Market: कापूस दरातील नरमाई कायम | Agrowon 23.03.2023 5:11
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. त्यामुळं कापूस दरावर दबाव आहे. मग बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल? सध्या कापसाला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेडची चार राज्यांमध्ये खरेदी सुरु | Agrowon 22.03.2023 5:23
नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मग नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळेल का? हरभरा बाजारात काय स्थिती राहील ? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास...
Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला मागणी चांगली | Agrowon 21.03.2023 5:02
गेले सहा ते सात महिने काबुली हरभऱ्याचे दर तेजीत असल्याने देशात यंदा काबुली हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मागील काही दिवसांपासून काबुली हरभऱ्यातील तेजी कमी झाली. मग बाजारात आवक वाढल्यानंतर काबुली हरभऱ्याचे भाव कसे राहतील? काबुली हरभऱ्याचे उत्पादन कसे राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Tur Market: तुरीच्या दरात काहीसे चढ उतार | Agrowon 20.03.2023 4:47
सध्या अनेक बाजारात तुरीचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेला. त्यामुळं ८ हजार रुपयांपेक्षा कमी दरात खरेदी केलेली तूर काही व्यापारी बाजारात विकून नफावसुली करताना दिसत आहेत. मग याचा तुरीच्या दरावर काही परिणाम होत आहे का? सध्या तुरीची भावपातळी काय आहे? पुढील काळात दर कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
तुम्ही माती खाल्ली का? | Is eating soil good for health? | Agri Unplugged 19.03.2023 8:13
गवत खाणारे प्राणी जमिनीलगतचे गवत खातात तेव्हा त्यांच्या पोटात नक्कीच तिथली स्थानिक माती जात असणार आणि तिच्यातून त्यांना नक्कीच खनिज पदार्थही मिळत असणार. माणसांनीही खनिजांचा स्रोत म्हणून माती खाण्यास हरकत नाही. ण खाण्याआगोदर या मातीचे निर्जंतुकीकरण केलेले असावे. AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे
Chana Market: वादळी पावसाचा हरभरा उत्पादकतेला फटका | Agrowon 18.03.2023 5:13
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातच देशातील एकूण हरभरा लागवडीपैकी निम्मे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात मराठवडा आणि विदर्भात हरभऱ्याखाली जास्त क्षेत्र आहे. राज्यात ५० टक्के हरभरा काढणी पूर्ण झाली असून जवळपास ५० टक्के हरभरा शेतातच आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या हरभरा उत्पादक भागांमध्ये पाऊस होतोय. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीचा आ...
Tur Market: कमी उत्पादनामुळे तुरीचा तुटवडा | Agrowon 17.03.2023 5:19
मागील हंगामात तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नाही. त्यामुळे तूर डाळीचे दरही वाढत आहेत. या दरवाढीचा आधार तुरीच्या बाजाराला मिळेल का? तुरीचे भाव काय राहू शकतात? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Chana Market: तीन राज्यात नाफेडची हरभरा खरेदी सुरु | Agrowon 16.03.2023 4:51
नाफेडने कालपासून म्हणजेच १५ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु केली. नाफेडने आत्ता महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात खरेदी सुरु केली. नाफेडने केरदी सुरु केल्यानंतर हरभरा दरालाही आधार मिळत आहे. मग सध्या हरभरा बाजारभाव कसे राहील? सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Chana Market: हरभरा बाजार सुधारण्याचे संकेत | Agrowon 15.03.2023 4:49
हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारांत सुधारणा होताना दिसत आहे. दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. मग आवक वाढल्यानंतर हरभरा दर टिकतील का? हरभरा दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Soybean Market: सोयाबीनचे दर दबावात कधीपर्यंत राहतील? | Agrowon 14.03.2023 4:59
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम सोयाबीन दरावर झालाय, असं व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. मार्च महिन्यातील आवक जास्त राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगानेही व्यक्त केलाय. मग मार्च महिन्यात सोयाबीनची दरपातळी काय राहू शकते? सोयाबीनचे भाव कधी वाढतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.