Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Chana Market: नाफेडची हरभरा खरेदी किती झाली? | Agrowon 03.05.2023

नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडच्या  खरेदीचा आधार मात्र खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव आजही हमीभावापेक्षा किमान ७०० रुपयाने कमी असल्याचं दिसतं. मग नाफेडची खेरदी वेगाने सुरु असतानाही हरभरा भाव दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Fertilizer Market : खतांच्या अनुदानासाठी मोठी आर्थिक तोशीस सहन करावी लागणार 02.05.2023

भारताची युरिया आयात २०२२-२३ या वर्षांत १७ टक्के घटलीय. परंतु परंतु डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी खताची आयात मात्र ३० टक्क्यांनी वाढलीय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खतांबाबत मोठे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याबद्दल सविस्तर पाहुयात बुलेटिनच्या शेवटी.  India's urea import has declined by 17 percent in 2022-23. But the import of di ammonium phosphate i.e. DAP fertilizer has increased b...

मी शेतीतल्या कामांकडे थ्रील म्हणून बघतो| Agricultural work is a thrill for me| Agri Unplugged 30.04.2023

शेतीतली अवघड, कष्टाची कामं करताना शरीर थकतं, पण मन ताजंतवानं होतं. पर्यटनात थ्रिल, थरारकता असते. नेहमीच्या जगण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो. तो अनुभव घेताना त्रास होत असला तरी त्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. त्यामुळंच पर्यटक, ट्रेकर जीवावरच्या जोखमीचे अनुभव घेतात. त्यात त्यांना भरपूर आनंद मिळतो. ही त्यांची अपनी पसंदकी जिंदगी असते. मी शेतीतल्या कामांकडंही असंच बघतो. त्यातलं थ्रिल मी जगतो.  The body get...

Soybean Market: सोयाबीन दरात सुधारणा कधी होईल? | Agrowon 29.04.2023

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर दबावात आले. खाद्यतेल बाजारातील नरमाईचा परिणाम तेलबियांच्या दरावरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि पामतेलाच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत नरमाई दिसली. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने देशात आयातही वाढली. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होतोय? सोयाबीनला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: तुरीची आवक अद्यापही मर्यादीतच | Agrowon 28.04.2023

तुरीच्या बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम आहे. सरकार अन्नधान्यसह खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षातील निवडणुकांच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. सरकार तुरीच्याबाबतीत एवढं आक्रमक झालं की अगदी जिल्हा पातळीवरही त्याचा आढावा घेतला जातोय. मग याचा बाजारावर काही परिणाम होतोय का? तुरीच्या दरात वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला आज...

Potato Market: बटाटा उत्पादकांची चिंता का वाढला? | Agrowon 27.04.2023

देशात यंदा बटाट्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे दरात मोठी नरमाई दिसून आली. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याने दरात किलोमागं ४ ते ५ रुपयांची घट दिसत आहे. यामुळं शेतकरी अडचणीत आले. मग सध्या बटाट्याला काय भाव मिळतोय? बटाटा उत्पादनाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Wheat Market: सरकारला यंदा गहू खरेदी वाढवता येईल का? | Agrowon 26.04.2023

यंदा सरकारने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवलं आहे. यंदा अवकाळी पावसामुळं गहू काढणीला अनेक भागांमध्ये उशीर झाला. परिणामी सरकारची गहू खरेदी धिम्या  गतीने सुरु झाली. त्यामुळं यंदा सरकारला गहू खरेदीचं उद्दीष्ट गाठता  येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मग सरकारला आतापर्यंत किती गहू खरेदी करता आला? गव्हाला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Chana Market: देशातून किती हरभरा निर्यात झाला? | Agrowon 25.04.2023

यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत असले तरी सरकारने मात्र यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. देशात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे. नाफेडने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करूनही दर दबावात आहेत. बाजारात हरभरा दर दबावात असल्याने निर्यातही वाढली. मग आतापर्यंत देशातून किती निर्यात झाली? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्क...

Tur Market: तुरीची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowon 24.04.2023

तुरीचे बाजारभाव सध्या चढेच आहेत. बाजारात सध्या तुरीचा पुरवठा कमी दिसतोय. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट झालीय. तर आयातही उद्दीष्टापेक्षा कमी आहे. त्यामुळं सरकारही डाळीचे भाव कमी करण्यासाठी अॅक्शन मोडवर आहे. सरकार बाजारावर कसा दबाव वाढवत आहे? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

चहा इंग्रजांनी भारतात आणला ही गोष्ट खोटी | Did British really introduce tea to India? | Agri Unplugged 23.04.2023

आसामच्या सिंगफो जमातीमध्ये चहाच्या पानांचा काढा  पिण्याची रीत होती. आसामच्या राजाचा दिवाण असलेल्या मणिराम दिवाणने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन सिंगफो जमातीच्या गावांना भेटी दिल्या. तो काढा चहाच्या पानांचा आहे असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. भारतीय चहाचा शोध असा लागला. Manram Dewan, the secretary of the state of Assam, took an interest in discovering Tea. There was a tradition of consuming...

Chana Market: पिवळा वाटाणा आयातीमुळे काय होईल? | Agrowon 22.04.2023

 भारत सरकार यंदा पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला परवानगी देण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आयातदारांचा हिरमोड होताना दिसत आहे. पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणूनही पाहिला जातो. मग सरकारला पिवळा वाटाणा आयात का नको? सध्या हरभरा बाजारभाव काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Pulses Market: आयातीतून कडधान्याची गरज भागेल का? | Agrowon 21.04.2023

देशात सध्या तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तर बाजारात हरभरा आणि मसूरची आयात सुरु आहे. सध्या हरभरा आणि मसूर हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत. पण निम्म्या अधिक कडधान्याचे भाव तेजीत असल्यानं सरकारचा आयातीवर जोर आहे. पण २०२२-२३ च्या हंगामात भारताची कडधान्य आयात कमी झाली. मग तूर आणि हरभरा आयातीचं चित्र कसं राहीलं? आयात कशामुळं कमी झाली? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या श...

Soybean Market: बाजारातील सोयाबीन आवक कायम | Agrowon 20.04.2023

ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. पण अर्जेंटीनात उत्पादन कमी झालं. पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली. अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. तर देशातील बाजारात दर स्थिर आहेत. मग सोयाबीन दराची स्थिती काय आहे? सोयाबीनची भावपातळी कितीवर पोचली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Red Chilli Market: लाल मिरचीला निर्यातीसाठी मागणी वाढली | Agrowon 19.04.2023

देशातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून लाल मिरचीच्या दरात मोठी तेजी आहे. यंदा देशातील लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली. गेल्या हंगामात देशात १८ लाख ३० हजार टन उत्पादन होते. मात्र यंदा पाऊस आणि कीड-रोगामुळं मिरची उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. निर्यातही जोमाने सुरु आहे. मग सध्या लाल मिरचीला काय दर मिळतोय? पुढील काळात लाल मिरचीचे दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आ...

Chana Market: शेतकऱ्यांची हरभरा विक्री कशी सुरु आहे? | Agrowon 18.04.2023

देशातील हरभरा बाजारत सध्या काहीसे चढ उतार दिसत आहेत. आज सरासरी गुणवत्तेच्या हरभरा दरात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसली. तर चांगल्या गुवत्तेचा हरभरा टिकून आहे. रमजान महिन्याची हरभरा मागणी आता कमी होत आहे. तसचं लग्नसराईसाठी पुढील दोन महिन्यांचाच कालावधी समजला जातो. त्यामुळं उठाव कमी राहण्याचा अंदाज आहे. मग या काळात हरभरा बाजार कसा राहील? दरात सुधारणा होऊ शकेल का? याची माहिती तु...

Tur Market: तूर व्यापारी, स्टाॅकिस्टवर सरकारचा दबाव ? | Agrowon 17.04.2023

केंद्र सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय. सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना देत आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशाराही सरकारनं दिलाय. मग या सर्व घडामोडींचा तूर बाजारावर काय परिणाम होतोय? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तूर बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच...

फ्रान्सचा राजा बटाटे चोरीला उत्तेजन द्यायचा | How is potato popularised in europe? | Agri Unplugged 17.04.2023

युरोपात बटाटा हे पशुखाद्य समजलं जात असे. अनेक युरोपिय देशात बटाटे खाण्यावर बंदीच होती. बटाटा हे फळ नाही तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे, हे अनेक वर्षं युरोपला ठाऊकच नव्हतं.बटाटे कच्चे खायचे नसतात तर उकडून, सोलून खायचे असतात हे सुध्दा त्यांना माहित नव्हतं. Potatoes were considered animal feed in Europe for several years. There was a ban on eating potatoes in many European countries. Europe was unaware...

Soybean Market: स्टाॅक असतानाही खाद्यतेल आयात का वाढली? | Agrowon 15.04.2023

मागील वर्षभरापासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसतोय. मागील पाच महिन्यांमध्ये भारतानं जवळपास ७० लाख टन खाद्यतेलाची आयात केली. मग याचा नेमका कसा परिणाम देशातील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारावर जाणवतोय? शेतकरी आणि उद्योगांची मागणी काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभरा दरात सुधारणा होणार का ? | Agrowon 14.04.2023

देशात सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला विक्री करण्याचं उद्दीष्ट बाळगून आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा देण्यासाठी माल मागं ठेवला. यामुळं खुल्या बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी दिसते. दुसरीकडे नाफेडची खरेदीही ७ लाख टनांवर पोचली. पण हरभरा दर मात्र दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळे...

Maize Market: रब्बीत मका उत्पादन वाढणार का? | Agrowon 13.04.2023

देशातील बाजारात रब्बी हंगामातील मका दाखल होतोय. बिहार आणि मध्य प्रदेशात मक्याची आवक वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना मका वाळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं काही शेतकरी मका काढणीनंतर लगेच विक्री करत आहेत. मग याचा मक्याच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या मक्याचे दर काय आहेत? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

कृषी निविष्ठाच्या मागणीत वाढ होणार? 12.04.2023

आयएमडीने काल  २०२३ सालासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सलग पाचव्या वर्षी देशात सरासरीइतका पाऊस होईल, असं हा अंदाज सांगतो. त्याची बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली. पण तरीही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी म्हणजे खते, बियाणे, कृषीरसायने उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा का घेतलाय? निविष्ठांची मागणी वाढेल की घटेल, याबद्दल त्यांना काय वाटतंय? जाणून घेऊया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.  The IMD released...

तुरीचा हमीभाव वाढवण्यासाठी व्यापाऱ्याचे केंद्र सरकारला साकडे! 11.04.2023

तुरीचे दर वधारल्यामुळे सरकार धास्तावलंय. तुरीचे दर पाडण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरू आहे. परंतु मुळात उत्पादनच कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात तुरीचा पुरवठा आणखी रोडावेल, अशी भीती व्यापारी आणि डाळमिल चालकांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारकडे काही मागण्या केल्यात. काय आहेत या मागण्या ते पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.The government has pani...

Chana Market: नाफेडच्या खरेदीमुळं हरभरा बाजार स्थिर | Agrowon 10.04.2023

देशात नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी वेगाने सुरु आहे. त्यातच मागील हंगामातील हरभरा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने नाफेडला हरभरा विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.  रमजान आणि लग्नसराईचा काळ संपल्यानंतर हरभऱ्याला उठाव कमी राहण्याची शक्यता आहे. मग आगामी काळात हरभरा बाजार कसा राहील? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने आतापर्यंत किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तु...

अमेरिकी कापसाने भारताचा देशी कापूस संपवला| Rise of American cotton in India| Agri Unplugged 09.04.2023

अमेरिकेतील गॉसिपियम हिर्सुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्सी या कापसाच्या जातींची जगाला माहिती होईपर्यंत जगात जे सुती कापड वापरले जाई ते भारतातल्या देशी किंवा जरिला कापूस (गॉसिपियम हर्बेशियम) आणि देवकापूस (गॉसिपियम आर्बोरियम) या जातींच्याच सुतापासून बनविले जात असे.  Indian cotton varieties such as Jarila cotton (Gossypium Herbaceum) and Dev Kapus (Gossypium Arboreum) were popular across the world until...

Onion Market: बाजारांमध्ये रब्बी कांद्याचे दर स्थिर | Agrowon 08.04.2023

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांदा आवकेचा दबाव सध्या कमी दिसतो. राज्यातील अनेक कांदा उत्पादक पट्ट्यात पावसाचा फटका बसतोय. तर रोगांमुळेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा लागवड काहीशी अधिक दिसत असली तरी पिकाचे होणारे नुकसान लक्षणीय आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा आवकेची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.