Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
शाळेत झोपेचा तास असावा का?| Power napping in schools| Agri Unplugged 28.05.2023 8:37
मुलांच्या मागणीनुसार पहिलीच्या वर्गात दुपारी झोपेचा तास सुरु झाला. जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं मुलं शांतपणे झोपी जातात. रिलॅक्स होतात. उठायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, पाणी पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वर्गात येऊन बसायचं. या तासाचा चांगला परिणाम दिसून आला. As per the demand of the children, power napping hour started in the first class. Children, after having lunch, sleep for 10 to 15 minutes. They f...
Soybean Market: बाजारात सोयाबीनची आवक कशी होतेय? | Agrowon 27.05.2023 5:43
सोयाबीनचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. शेतकरी खरिपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाव कमी होत असले तरी सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यामुळे सोयाबीन दरावर आणखीनच दबाव येत आहे. मग पुढील काळात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील? सोयाबीनवरील दबाव दूर होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास...
Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय | Agrowon 26.05.2023 5:16
म्यानमारमधील निर्यातदार तुरीचा स्टाॅक मागे ठेवत आहेत. भारतात तुरीचे दर वाढत असल्याने येथील निर्यातदार बाजारातील पुरवठा कमी करत आहेत. परिणामी देशात तूर आयातीची गती कमी आहे. मग पुढील काळात तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? दरात आणखी सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: हरभरा बाजारावरील दबाव कायम का? | Agrowon 25.05.2023 5:40
खरिप हंगाम तोंडावर आला तरी हरभरा भाव दबावात आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील आवक काहीशी वाढत आहे. हरभरा बाजार हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात दिसतो. मागील दीड वर्ष हरभरा दराने हमीभावाचा टप्पा गाठला नाही. मग पुढील काळात हरभरा दरात सुधारणा होऊ शकते का? हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Soybean Market: सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon 24.05.2023 5:41
खाद्यतेलातील नरमाईचा सोयाबीनवर सध्या दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेलाच्या दरात मोठी घट झाली. आयातही स्वस्त पडत आहे. याचा दबाव देशातील सोयाबीन बाजारावर येत असल्याचे सांगण्यात येते. मग सोयातेल, सूर्यफुल तेल आणि पामतेलाच्या दरात किती घट झाली? याचा सोयाबीन बाजारावर नेमका काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला काय भाव मिळतोय? | Agrowon 23.05.2023 5:39
आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या मेक्सिकोमध्ये सध्या वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळे मेक्सिकोतून यंदा काबुली हरभऱ्याची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. या स्थितीचा भारताला फायदा होईल का? काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Maize Market: बाजारातील मका आवक कशी सुरु आहे? | Agrowon 22.05.2023 5:36
देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. मक्याला मागील काही दिवसांपासून हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहेत. खरिपातील मक्याला यंदा चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे रब्बीतील मकाही चांगला भाव खाईल, अशी शक्यता होती. पण सध्या भाव दबावात आहेत.मग मक्याच्या भावावर कशाचा दबाव आला? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
मुखत्यारपत्र करताना काय काळजी घ्यावी?| Precautions to be taken while giving power of attorney?|Agri Unplugged 21.05.2023 3:22
कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी त्याचा काय अर्थ होतो हे व्यवस्थित तपासले पाहिजे. विशेषत: मुखत्यारपत्रासारखा दस्तऐवज तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. Before signing any document, one should carefully check what it means. Special care should be taken when signing a document like a power of attorney in the name of a third party.
Tur Market: तुरीची आयात सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमीच होणार | Agrowon 20.05.2023 5:24
देशातील तूर उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. यंदा सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट असले तरी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आयात होण्याची शक्यता कमीच असल्याचे आयातदार सांगत आहेत. म्हणजेच यंदा देशात तुरीचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. पण तुरीच्या दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Chana Market: हरभरा भावपातळी सध्या काय आहे? | Agrowon 19.05.2023 5:29
नाफेडने यंदा ८ राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास ९ लाख शेतकऱ्यांकडून १० हजार ८०० कोटींचा हरभरा खरेदी झाला आहे. तर आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खेरदी केली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने ७ लाख ७३ हजार टनांचा टप्पा पार केला. मग महाराष्ट्रातील हरभरा खरेदीने कितीचा टप्पा गाठला? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market: तूर बाजारात आवक वाढेल का? | Agrowon 18.05.2023 5:28
तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. देशात सध्या तूर डाळीला चांगला भाव मिळत आहे. लग्न सराई आणि सण समारंभामुळे तुरीच्या डाळीला उठाव आहे. पण सरकार उद्योगांवर दबाव ठेऊन आहे. सरकारला तुरीचे भाव कमी करायचे आहे. तर उद्योगांना गरजेप्रमाणेही तूर मिळत नसल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Wheat Market: गव्हाचे भाव यंदाही वाढणार का? | Agrowon 17.05.2023 5:42
यंदा नाफेडने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. सरकारला आतापर्यंत २५९ लाख टन खरेदी करता आली. तर यंदा सरकारची खरेदी २६० ते २७० लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मग सरकारची खरेदी यंदाही उद्दीष्टापेक्षा कमी का राहणार आहे? सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Maize Market: मक्याच्या भावात सुधारणा होईल का? | Agrowon 16.05.2023 5:22
देशातील बाजारात मक्याची आवक सध्या वाढत आहे. मका उत्पादक पट्यातील बाजारात मका आवकेचा दबाव वाढत आहे. पण सध्या मक्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मक्यातील ओलावाही कमी झाला. परिणामी मक्याचे भाव टिकून आहेत. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी सुरु आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 15.05.2023 5:25
बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मग खरचं तुरीचे दर कमी होतील...
वृक्षशेतीचा पर्याय फायदेशीर ठरेल|Tree plantation will be beneficial than seasonal crops| Agri Unplugged 14.05.2023 7:54
हवामानबदलामुळे वादळे आणि अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हंगामी पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी हंगामी पिकांऐवजी वृक्षलागवडीचा पर्याय निवडणे योग्य ठरेल. Climate change has increased the frequency of storms and unseasonal rains. It causes a huge loss of seasonal crops. Therefore, those farmers who can afford it would be wise to opt for tree planting i...
Tur Market: तुरीच्या दरातील तेजी किती दिवस टिकेल? | Agrowon 13.05.2023 5:45
देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरत आहे. यंदाही भाव दबावात ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीने पाणी फेरले. सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर दबाव वाढवला. तरीही तुरीच्या दरातील तेजी कमी झाली नाही. त्यामुळे सरकार स्वतः तुरीची आयात करू शकते, असा इशारा अन्न सचिवांनी दिला होता. मग सरकारला खरचं स्वस्त तूर आयात करता येईल का? सरकारला स्वस्त तूर मिळू शकेल का? याची...
Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी होतेय? | Agrowon 12.05.2023 5:19
देशातील बाजारात हरभरा सध्या दबावात आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर दबाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. मग सध्या हरभरा बाजारात काय स्थिती आहे? हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Onion Market: कांदा भाव शेतकऱ्यांना परवडत आहेत का? | Agrowon 11.05.2023 5:19
देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market: निर्यातदार देशांमध्ये तुरीचे भाव का वाढले? | Agrowon 10.05.2023 6:02
देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे केंद्र सरकार आयातीवर जोर देत आहे. पण भारताची गरज लक्षात घेऊन आफ्रिका आणि म्यानमार या देशांमध्येही तुरीच्या दरात वाढ झाली. मग आयात तुरीचे दर काय आहेत? देशाती तुरीला सध्या काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी सुरु आहे? | Agrowon 09.05.2023 6:01
नाफेडच्या हरभरा खरेदीचा वेग मागील चार दिवसांपासून कमी झाला. या काळात नाफेडने देशभरात केवळ दोन लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केल्याचं दिसतं. नाफेडने चालू हंगामातही हरभऱ्याची चांगली खरेदी केली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मग खुल्या बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Ginger Market: आल्याच्या दरातील तेजी टिकेल का? | Agrowon 08.05.2023 5:51
आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला. आल्याच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १० वर्षांतील उच्चांकी भावाचा टप्पा गाठलेला दिसतो. मग सध्या आलेल्या काय भाव मिळतोय? आल्याचे दर तेजीत का आले? आल्याच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रूमणेच घ्यावे?|First registered farmer suicide| Agri Unplugged 07.05.2023 8:25
साहेबराव करपे यांनी कुटुंबासह जीवन संपवलं, त्याला ३७ वर्षे पूर्ण झाली. कृषिसंस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे त्या महाराष्ट्रात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या’. त्यानंतर ३७ वर्षे शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी वाढतच गेल्या. समाज म्हणून आपण या सगळ्याकडं कसं बघायला हवं? Sahebrao Karpe ended his life with his family 37 years ago. This is the first 'farmer suicide' official...
सोयाबीन बाजाराचं लक्ष ब्राझीलकडे का? | Agrowon 06.05.2023 6:09
ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्यानं सोयाबीन बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्याबरोबर दरावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठी घट मागच्या माहिनाभरात पाहायला मिळाली. ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन निर्यात आणि गाळप करण्याचीही शक्यता आहे. मग सध्या ब्राझीलची सोयाबीन निर्यात कशी सुरु आहे? सोयाबीन बाजाराची स्थिती पुढील काळात कश...
Maiz Market: कोणत्या राज्यात मक्याची आवक वाढली? | Agrowon 05.05.2023 5:56
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत आहे. त्यातच अनेक भागात पावसाचीही हजेरी दिसत आहे. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील बाजारात आवक वाढतेय. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे भाव सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Wheat Market: गहू खरेदीचं उद्दीष्ट यंदा पूर्ण होईल का? | Agrowon 04.05.2023 5:35
सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमीभावाचाही टप्पा पार केला. त्यामुळं गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशात शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं. मग सध्या खुल्या बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? यंदा सरकारला खेरदीचं उद्दीष्ट गाठता येईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्क...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.