Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Cotton Market: कापसाचा बाजार किती काळ दबावात राहू शकतो? | Agrowon 22.06.2023 5:41
देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. कापसाला आजही हंगामातील कमी भाव मिळाला. कापसाची आवक सरासरीपेक्षा आजही जास्तच होती. मग आज कापूस भाव काय होते? कापूस आवक कशी राहीली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये किती वाढ झाली? | Agrowon 21.06.2023 5:40
अमेरिकेतील कमी पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली. पण देशातील बाजारात सोयाबीन दर दबावातच आहेत. आजही सोयाबीनची दरपातळी कायम होती. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली असताना देशात भाव दबावातच का आहेत? देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Jeera Market: जिरा बाजारातील तेजी टिकेल का? | Agrowon 20.06.2023 5:38
देशातील बाजारात गेल्या काही महिन्यांपासून जिऱ्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. सध्या बाजारांमध्ये जिरा ५१ हजारांवर पोचला. वायद्यांमध्येही जिऱ्याने ५२ हजारांची पातळी गाठली. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही जिऱ्याचे भाव तेजीत आहेत. मग यंदा जिऱ्याच्या दरात एवढी तेजी का आली? जिऱ्याच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेड किती हरभरा खुल्या बाजारात विकणार? | Agrowon 19.06.2023 5:31
नाफेडची हरभरा खरेदी आता बहुतांशी भागांमध्ये बंद झाली. हरभरा खरेदी बंद होते न होते तोच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री करणार असल्याचे जाहीर केले. मग नाफेड नेमका कधीचा हरभरा बाजारात विकणार आहे? नाफेडच्या या विक्रीचा बाजारावर काही परिणाम होऊ शकतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.
म्हशींच्या बाजारात उठाव नाही| Buffalo market was down amid low demand| Agri Unplugged 18.06.2023 3:34
जनावरांच्या बाजारात दलाल, व्यापाऱ्यांचं एकमेकात साटेलोटं असतं. एका म्हशीची एखाद्या व्यापाऱ्याने किंमत केली की, दुसरे तिची किमत वाढवत नाहीत. विकण्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी विकून मोकळे होतात. बाजारात शेतकरी खरेदीदार असतात तेव्हाच स्पर्धा असते. In the animal market, brokers and traders are in conflict with each other. Once a trader puts a price on a buffalo, others do not increase its price. F...
Cotton Market: कापसाचे भाव दबावात येण्याची कारणं काय? | Agrowon 17.06.2023 5:51
देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायदे चालू आठवड्यात नरमले. आठवडाभरात कापूस वायद्यांमध्ये आडीच सेंटची नरमाई आली. मग कापूस दरावरील दबाव का वाढला? आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव काय होते? देशातील बाजारात काय चित्र होते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Chana Market: हरभरा भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon 16.06.2023 5:36
देशात यंदा १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले. यापैकी नाफेडने आतापर्यंत २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. म्हणजेच यंदा एकूण उत्पादनापैकी १७ टक्के हरभरा खरेदी केला. मग याचा हरभरा भावाला आधार मिळाला का? आज हरभरा भावपातळी काय होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
तूर भाव कमी करण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच | Agrowon 15.06.2023 5:50
देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी चांगलीच चर्चेत आहे. तुरीच्या भावाने यंदा सरकारची झोपच उडवली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी होऊन दरात मोठी तेजी आली. सरकारने तुरीवर मागील आठवड्यात स्टाॅक लिमटही लावले. पण तुरीच्या दरातील तेजी कमी व्हायचे नावचं घेईना. मग सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅ...
Sunflower Market: देशात सूर्यफुलाला काय भाव मिळतोय? | Agrowon 14.06.2023 5:58
भारत खाद्यतेल आयातीवर अवलंबून असल्याने देशातच तेलबिया उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण देशातील बाजारात सध्या सूर्यफुलाच्या भावात मोठी घट झाली. सूर्यफुलाला सध्या हमीभावापेक्षा तब्बल अडीच हजार रुपये कमी भाव मिळत आहे. मग सद्या सूर्यफुलाला काय भाव मिळतोय? सूर्यफुलाचे भाव नेमके कशामुळे दबावात आले? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Cotton Market: कापूस आवकेचा दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon 13.06.2023 5:29
देशातील बाजारात कापूस आवक सध्या सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यातच शिल्लक कापसावरून बाजारात मतभेद दिसतात. अनेक व्यापारी संस्था देशातील कापूस उत्पादन यंदा जास्त असल्याचे सांगतात. तर शेतकरी आणि जाणकारांच्या मते उत्पादन कमी आहे. मग सध्या बाजारात कापूस आवकेची स्थिती काय आहे? कापसाला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेड कमी भावात हरभरा विकणार का? | Agrowon 12.06.2023 5:40
हरभरा बाजारात सध्या नाफेडच्या हरभरा विक्रीचा मुद्दा चर्चेला येत आहे. नाफेडची खेरदी आता २३ लाख टनांपर्यंत पोचली. विशेष म्हणजे नाफेडची खेरदी इतिहासातील दुसरी विक्रमी खरेदी झाली. पण बाजारात मात्र भाव ६०० ते ८०० रुपयाने कमी राहिले. मग नाफेडची खरेदी चांगली होऊनही बाजाराला आधार का मिळाला नाही? खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
भुईमुगाच्या शेंगा आणि कॅडबरी| Groundnut and Cadbury| Agri Unplugged 11.06.2023 6:51
शेवटी भुईमुगाचे उत्पन्न इतके घटले की एकरी चार पोत्यांवर आले. भुईमुग काढणीच्या वेळी मजुर मिळेना.ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे घरच्यांची तारांबळ उडायला लागली.भुईमुगाचा पाला जनावरे आवडीने खातात.तोही पावसात भिजल्यामुळे सडू लागला.एकूण काय तर लागोपाठ काही वर्षे भुईमुग शेती तोट्यात जाऊ लागली.घरचे बियाणे मोडले.आपल्याकडच्या डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा केला.लोकांनी शेंगदाणा तेलाचा धसका घेऊन सोयाबीन तेल...
Tur Market: तुरीच्या भावातील तेजी आता टिकेल का? | Agrowon 10.06.2023 5:41
काही बाजारांमध्ये तुरीच्या भावाने ११ हजारांचा टप्पा गाठला होता. तर खुल्या बाजारात तूर डाळीचे भाव १५० रुपयांवर पोचले होते. निवडणुकीच्या तोंडावर तुरीच्या भावातील तेजी सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळे सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावले, असे व्यापारी सांगत आहेत. पण या स्टाॅक लिमिटचा तुरीच्या भावावर काही परिणाम होतोय का? तुरीचे भाव सध्या काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मि...
Chana Market: हरभरा बाजारावर मंदीचे सावट कायम? | Agrowon 09.06.2023 5:59
देशातील बाजारात हरभरा आवक आता कमी झाली. नाफेडच्या केंद्रांवरही हरभरा खरेदीची गती मंद झाली. सध्या नाफेडने २३ लाख टनांपर्यंत हरभरा खरेदी केला. मागील काही दिवसांमध्ये काही बाजारात हरभरा दरात सुधारणा दिसली. मग हरभरा दरातील ही सुधारणा टिकेल का? हरभरा बाजारात तेजीची शक्यता आहे का? नाफेडच्या खेरदीचा बाजाराला आधार मिळेल की दबाव वाढेल? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Turmeric Market: हळदीचे दर पुन्हा वाढतील का? | Agrowon 08.06.2023 5:35
देशातील बाजारात हळदीचे भाव सध्या नरमले आहेत. वायद्यांमधील सुधारणेमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये बाजार समित्यांमध्येही दरवाढ झाली होती. दरात वाढ झाल्यानंतर देशात ५ ते ६ लाख टन हळदीची विक्री झाली. पण हळदीच्या भावातील सुधारणा जास्त दिवस टिकली नाही. सध्या हळदीचे भाव दबावात आले आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळत आहे? हळदीचा पुरवठा कसा होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मि...
Ginger Market: आल्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 07.06.2023 5:39
आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात आले पिकाला गेल्या १० वर्षांतील चांगला भाव मिळत आहे. मग सध्या आल्याला काय भाव मिळत आहे? आले दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतकमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Onion Market: कांदा आवकेचा दबाव दूर होणार का? | Agrowon 06.06.2023 6:06
यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. तर कांद्याची टिकवणक्षमताही कमी झाली. एरवी पाच ते सहा महीने कांदा टिकत होता. पण यंदा बहुतांशी कांद्याची टिकवणक्षमता ३ महीन्यांपेक्षा जास्त नसेल. त्यातच नाफेडने कांदा खेरदी सुरु केली. बांगलादेशने निर्यातीवरील निर्बंध काढले. या सर्व परिस्थितीचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? कांद्याचा बाजार कसा आहे? कांदा भावात पुढील काळात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हा...
Tur Market: देशात तुरीचा पुरवठा सरकार वाढवू शकते का? | Agrowon 05.06.2023 5:38
तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने स्टाॅक लिमिट लावले. पण स्टाॅक लिमिट लावल्यानंतर त्याचा बाजारांवर फारसा परिणाम जाणवला नाही. काही बाजारांमध्ये दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची नरमाई आली. पण ही नरमाई सरसकट नव्हती. मग तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
शेती यांत्रिकीकरणाचा जुगाड| Jugad in farm mechanisation| Agri Unplugged 04.06.2023 10:13
शेतीचे काम करताना काही तरी जुगाड करायला लागणे हे अजिबात प्रगतीचे लक्षण नाही. बहुतेक जुगाड हास्यास्पद असतात. गंमत म्हणून पेपरमध्ये, टीव्हीवर, सोशल मिडीयावर व्हायरल होतात. समाजाच्या मनोरंजनाचा भाग बनतात. The labour shortage is a burning issue in Agriculture. Mechanization is required to tackle this problem. But instead of innovations and original research ideas, there is a popular trend of Jugad. B...
Kabuli Chana Market: काबुली हरभरा बाजार कसा राहील? | Agrowon 03.06.2023 5:49
देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले. काबुली हरभऱ्याला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. यंदा सरकारने देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक आता कमी झाली. मग याचा दरावर काही परिणाम दिसत आहे का? काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजा...
Jowar Market: ज्वारीची बाजारातील आवक वाढेल का? | Agrowon 02.06.2023 5:33
देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खात आहे. बाजारात ज्वारीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. ज्वारीची आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दरात वाढ झाली. मग सध्या ज्वारीला काय भाव मिळतोय? ज्वारीची बाजारातील आवक कशामुळे कमी झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Moong Market: मुगाला यंदाही हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल का? | Agrowon 01.06.2023 4:58
देशातील मुगाचे उत्पादन यंदा वाढल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. त्यातच मध्य प्रदेशसह काही बाजारांमध्ये उन्हाळी मुगाची आवक वाढली. याचा दबाव दरावर आला. अनेक बाजारात दर ४०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. मग सध्या मुगाला काय भाव मिळतोय? मुगाच्या दरात पुन्हा वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Urad Market: उडदाच्या भावातील तेजी टिकेल का? | Agrowon 31.05.2023 5:39
देशात यंदा उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तर उडदाची मागणी कायम आहे. त्यामुळे भारताला आयात करून गरज भागवावी लागत आहे. उडदाची आयात सुरु असतानाही भाव मात्र तेजीत आले. मग उडदाच्या भावात तेजी का आली? उडदाचे भाव पुढील काळात टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेडच्या हरभरा खरेदीचा बाजाराला आधार नाहीच | Agrowon 30.05.2023 6:09
सरकारने यंदा देशात १३६ लाख टन, म्हणजेच विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तर सरकारने आतापर्यंत २१ लाख ६५ हजार टनांची हमीभावाने खरेदी केली. यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे. पण असं अतानाही खुल्या बाजारात हरभरा दबावातच आहे. माग सरकारची खरेदी वाढूनही भाव दबावातच का आहेत? खरेदी वाढविण्यामागे सरकारचा मनसुबा काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Mazie Market: देशात मक्याचे उत्पादन किती झाले? | Agrowon 29.05.2023 6:02
देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. त्यातच केंद्र सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले. त्यातच सध्या निर्यातीसाठी मागणी नाही. बाजारातील आवकही वाढत आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे उत्पादन किती झाले? मका बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.