Santosh Deshpande
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
`स्टोरीटेल`ची ७ वर्षे! 25.11.2024 18:01
जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद.
ट्रम्पतात्या जिंकले..`अमेरिकन भाऊ`चं काय म्हणणंय? 16.11.2024 25:34
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ...
गाण्यातली `मेलडी` अन् त्याचे `मेकर्स` ! 09.11.2024 40:32
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यात...
दिवाळीनंतरचे `राजकीय फटाके` 01.11.2024 32:05
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्ल...
दिवाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जावे कुठे? 26.10.2024 20:01
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठं फिरायला जावं असा एक प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या प्रश्नाची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पर्यटन सल्लागार व स्मिता हॉलिडेज् या नामांकित संस्थेच्या संचालक प्रज्ञा गोरे यांना. सध्या कोणती पर्यटनस्थळे ट्रेंडिंग आहेत, या सिझनमध्ये कुठे कुठे जाता येऊ शकते इथपासून ते सर्वांपेक्षा वेगळी अशी ऑफबिट डेस्टिनेशन्स कोणती आहेत, याची छानशी उकल प्रज्ञाने य...
रहस्यकथांची `मास्टर की`! 19.10.2024 23:25
दिवाळी जवळ आली की आपल्याकडे दिवाळी अंकांचे आगमन सुरु होते. यंदा `मास्टर की` नावाचा दिवाळी अंक प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहे. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याचे स्वागत करतानाच, एकूणच दिवाळी अंकांचं रहस्यकथांशी असणारं नातं, या दिवाळी अंकातील रहस्यकथांचे वेगळेपण तसेच त्यातील संपादनाचा अनुभव या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे `मास्टर की` ची संपादकीय धुरा ज्यांनी सांभाळली ते संपादक सम्राट श...
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे भविष्य काय? 03.10.2024 25:42
जगभरात मोठे अस्थिर वातावरण आहे. इस्त्रायल -इराण यांच्यातील थेट युद्ध ते अमेरिका, चीन, रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आणि त्यातून वेगाने पाहणारे जागतिक चित्र, यांचा आढावा घेतानाच असा स्थितीत, भारतात आयटी किंवा संगणक क्षेत्रात अभियंते होऊन उत्तम करिअर करु पाहणाऱ्यांपुढे काय आव्हाने असणार आहेत, याचा नेमका वेध स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून घेतला गेला आहे. आय...
ढोल-ताशांचा `नाद`! 02.10.2024 36:23
गणेशोत्सव सोहळ्यात खरे रंग भरतात ते ढोल ताशा पथकांकडून केले जाणारे जल्लोषमय वादन. पुण्यातून सुरु झालेली ही ढोल-ताशा संस्कृती आता जगभरात विस्तारली आहे. मात्र, ढोलताशा पथकांत काम करणाऱ्यांचे जग नक्की काय असते, ते कोणत्या भावनेतून वादन करतात, त्यातून त्यांना काय मिळते, ढोलताशांचे अर्थकारण काय असते, अशा पथकांपुढची आव्हाने काय असतात या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण्यातील अग्नी या ढोलताशा पथकाचे प्रमुख...
गणेशोत्सव@ स्टॉकहोम 07.09.2024 34:17
स्वीडन...युरोपातील उत्तरेकडील एक प्रगत आणि सुंदर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या या देशात तेथील महाराष्ट्रीय किंवा मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख, परंपरा जतन करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ हे तेथील तमाम मराठीजनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या माध्यमातून स्टॉकहोमला मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जपण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जात...
आरक्षणात वर्गवारी का हवी? 31.08.2024 19:22
घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोन...
भविष्यात नोकऱ्यांचं काय होणार? 25.08.2024 16:18
आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या.
उद्यमी `नेक्स्टजेन`ची `मूव्हिंग ॲस्पिरेशन्स`! 17.08.2024 37:07
उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्...
दिल्लीत मराठीचा जागर व्हायलाच हवा! 10.08.2024 28:27
आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्य...
तुम बिन जाऊँ कहाँ...किशोरदा! 03.08.2024 35:12
किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्...
ट्रम्पवरील हल्ला आणि अमेरिकेतील गन-कल्चर! 20.07.2024 25:45
सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून...
वारी... `इव्हेंट` नव्हे तर थोर आणि उदार परंपरा! 06.07.2024 41:45
पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार ड...
`आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग` उलगडताना... 30.06.2024 43:29
आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द ले...
केल्याने युरोप पर्यटन... 16.06.2024 27:49
पर्यटन हे फक्त मनास विरंगुळा म्हणून असतं का? नाही! पर्यटनातून त्याहून वेगळं काही साध्य होत असतं. त्यातून आपला दृष्टिकोन विकसित होतो. युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी भ्रमंती केल्यानंतर ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि संतोष देशपांडे यांना काही वेगळं गवसलं... त्याची, त्यांच्याच गप्पांमधून उलगड करणारा हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. प्रत्येकानं जरुर ऐकावा अन् वेगळ्या दुनियेतील डोळस मुशाफिरी करावी.
`डायरेक्टर्स`चा पट उलगडताना... 11.06.2024 30:56
आपल्या अजरामर कलाकृतींमधून कैक दशके कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजेच `डायरेक्टर्स` आता नव्याने आपल्या भेटीस आले आहेत. होय, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `डायरेक्टर्स` या पुस्तकातून निवडक भारतीय दिग्दशर्कांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथनिर्मितीमागची पटकथा काय होती, हे दीपा देशमुख यांसमवेतच्...
'फिल्ममेकिंग' मध्ये करियर करायचंय? 03.06.2024 36:02
मनोरंजन क्षेत्र विशेषत: चित्रपट निर्मिती अर्थात 'फिल्ममेकिंग' अनेकांना करिअर साठी साद घालते. प्रत्यक्षात हे क्षेत्र कसे आहे, त्यात करियर कसे होते? त्यासाठी शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत, या विषयावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व माध्यमकर्मी प्रसाद नामजोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद तुम्हाला नेमकी दिशा देऊन जातो!
शालेय ग्रंथालयांची साद... 26.05.2024 24:30
मुलांचे पुस्तकांशी नाते जडले तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते, मनात प्रेरणा पेरल्या जातात. याकामी शालेय ग्रंथालये मोठी भूमिका बजावू शकतात. प्रत्यक्षात, आज शाळेतील ग्रंथालयांची स्थिती कशी आहे, यावर संशोधन करुन पीएचडी मिळविलेल्या सीमा तारे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याचाच वेध घेणारा कट्ट्यावर रंगलेला हा संवाद प्रत्येक शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमी घटकाने ऐकायलाच हवा!
सृजनाच्या वाटेवर.... मिलिंद जोशी (२) 18.05.2024 27:49
निर्मितीची प्रक्रिया ही एका अर्थाने अतिशय सहज, सोपी असते तर दुसऱ्या अर्थाने अत्यंत कठीण. विशेषतः कलाक्षेत्रात.. जिथे तुमच्या भावभावनाही तुमच्या प्रतिभेच्या कर्तृत्वाच्या साक्षी असतात.... मिलिंद जोशी यांनी अशा कलाक्षेत्रात आपल्यातील सृजनशीलतेला एका आशयघन जगण्याचे जणू एक माध्यमच बनवले... नेमके कसे... ऐका त्यांच्यांच शब्दांत. शब्द, सूर, स्वर आणि भावनांच्या एकात्मेचे क्षितिज शोधू पाहणाऱ्या या कलाकाराच...
सृजनाच्या वाटेवर....मिलिंद जोशी (१) 11.05.2024 41:00
सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं? शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांड...
करिअरची निवड करताना... 04.05.2024 38:39
दहावी-बारावीनंतर आता खरे वेध लागले आहेत ते पुढच्या करिअरसाठी अभ्यासक्रम निवडण्याचे. खरं तर करिअर मार्गदर्शन हे वेळेवर आणि अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांना. करिअरची निवड कशी करावी हे सांगतानाच टाकळकर सरांनी अनेक गोष्टींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड करुन दिली आहे,...
डॅम इट आणि महेश कोठारे 27.04.2024 15:16
प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.