BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ 963 episodes

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Author

BBC Marathi Audio

Category

Health

Podcast website

www.bbc.co.uk

Latest episode

Mar 25, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची नवीन योजना काय आहे? BBC News Marathi 29.08.2024

केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली. आणि अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत? समजून घेऊयात सोपी...

चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi 26.08.2024

चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग...

सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi 22.08.2024

मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले. शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे. काय...

परदेशात उपलब्ध औषधं भारतात मिळण्याचा मार्ग सोपा, काय आहेत नवे नियम? BBC News Marathi 21.08.2024

जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या, तरी मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांची भारतातील नियामक - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात येण्याचा मार्ग मोकळा केलाय. एखाद्या औषधाला जगात इतरत्र मान्यता मिळालेली असली, तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून, मान्यता मिळाल्य...

UPSC ची लॅटरल एन्ट्रीची जाहिरात वादात का अडकली? BBC News Marathi 20.08.2024

UPSC च्या वेबसाईटवरची नोकऱ्यांसाठीची जाहिरात वादात सापडलीय. Joint Secretary म्हणजे सहसचिव, Director - संचालक आणि Deputy Secretary म्हणजे उप-सचिव पदासाठीच्या Lateral Entry म्हणजे थेट नियुक्तीसाठीची ही जाहिरात आहे. दिल्लीमधील विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या मुख्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने या नेमणुका होतील. या नेमणुका 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि हा काळ 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या नेमण...

डेंग्यूवरची लस तयार करणं अवघड का आहे? BBC News Marathi 19.08.2024

भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय. ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत. डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही. हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे.  या प्रक्रियेत आणखी कोणती आव्हानं आह...

Mpox ची साथ आणि महाराष्ट्रातला माकडताप हे एकच आहेत का? BBC News Marathi 16.08.2024

आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. किती धोकदायक आहे हा संसर्ग? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे

युक्रेनने रशियात घुसून हल्ला का केला? BBC News Marathi 16.08.2024

6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. आठवडा उलटल्यानंतरही रशियन सैन्याला अजूनही या भूभागात पुन्हा वरचस्मा प्रस्थापित करण्यासाठी झगडावं लागतंय. युक्रेनने रशियाच्या भागावर केलेला हल्ला हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सैन्याचा तुटवडा असताना असा धाडसी हल्ला करण...

मंगळाच्या पोटात सापडलं पाणी! कसा लागला शोध? BBC News Marathi 16.08.2024

मंगळावरच्या खडकाळ पृष्ठभागाच्या खोलवर आत वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे. नासाच्या मार्स इनसाईट लँडर (Mars Insight Lander) च्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेलं पाणी आणि वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेच्या अस्तित्त्वाचे पुरावे यापूर्वीच आढळले आहेत. पण मंगळावर द्रव स्थितीतलं पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळलं आहे. कसा...

हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय करते? BBC News Marathi 16.08.2024

सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय आहे? ती काय काम करते? या कंपनीच्या नव्या रिपोर्टमधून अदानी उद्योग समूह आणि सेबी संबंधित कोणते आरोप करण्यात आले आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी नि...

वक्फ बोर्ड म्हणजे काय? कायद्यातल्या बदलांवर कोणते आक्षेप घेण्यात आलेयत? BBC News Marathi 09.08.2024

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय. वक्फ बोर्ड म्हणजे काय? या वक्फ कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा सरकारतर्...

आरोग्य विम्यावरील GST चा वाद काय आहे? BBC News Marathi 08.08.2024

दरवेळी कोणत्याही प्रकारच्या विम्याचा - Life Insurance, Medical Insurance, Term Insurance चा हप्ता आपण भरतो, तेव्हा त्यावर GST आकारला जातो. सध्या आरोग्य आणि आयुर्विम्यावर म्हणजेच Health Insurance आणि Life Insurance वर 18% GST दर आहे. महाग होत जाणाऱ्या प्रिमियम्समुळे पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांचं प्रमाण घटत असल्याने हा GST 18% वरून कमी करून 5% करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. GST मुळे आरोग्य विमा आणि...

आरक्षणावरचं ते आंदोलन ज्यामुळे शेख हसीना देश सोडून गेल्या BBC News Marathi 06.08.2024

बांगलादेशतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन एवढं चिघळलं की पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देश सोडून गेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनानं सरकारविरोधी चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर बांगलादेशात बऱ्याच वेगानं घडामोडी घडल्या. नेमकं काय झालं आणि त्यावर नजर ठेवणं भारतासाठी का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग - शरद...

ब्राझीलमध्ये शार्क माशांच्या शरीरात कोकेनचे अंश कुठून आले? BBC News Marathi 02.08.2024

ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या शार्क्सच्या शरीरात कोकेनचे अंश कसे सापडले याचा तपास सध्या संशोधक करतायत. रिओ दी जानेरोच्या किनारपट्टीजवळच्या 13 शार्कची तपासणी ओस्वाल्ड क्रूझ फाऊंडेशनच्या जीवसंशोधकांनी केली आणि त्यात त्यांना या शार्क्सचे स्नायू आणि यकृतात मोठ्या प्रमाणात कोकेन सापडलं. पहिल्यांदाच असं शार्क्सच्या शरीरात कोकेन सापडलंय आणि इतर समुद्रीय प्राण्यांत आढळलेल्या कोकेनपेक्षा हे प्रमाण 100...

कमी कालावधी, धो-धो पाऊस असं का होतं? | BBC News Marathi 02.08.2024

31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, घरांमध्ये शिरलं. मुंबईमध्येही अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं. कमी काळामध्ये असा धो - धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जान्हवी मुळे, अमृता दुर्वे निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

गेमिंगचं व्यसन मुलांना लागू नये म्हणून काय करायचं? | BBC News Marathi 02.08.2024

पिंपरी चिंचवड येथे 15 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगपायी 14 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एका गेमममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. यापूर्वीही ब्लू व्हेल चॅलेंजची लाट आली, तेव्हा हे घडलं होतं. टाईमपास म्हणून सुरू होणारे व्हीडिओ गेम्स जीवघेणे ठरायला लागतात, तेव्हा काय करायचं? आपण एका गेमच्या आह...

इस्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्सवर हल्ला करणारे हिजबुल्लाह कोण आहेत? BBC News Marathi 30.07.2024

हिजबुल्लाहने गोलन हाईट्सवर डागलेल्या रॉकेटमुळे 12 मुलं आणि तरुणांचा जीव गेल्याचं इस्रायलने म्हटलंय. गेले नऊ महिने इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये दररोजच्या चकमकी सुरू आहेत. हिजबुल्लाहवर अनेक वर्षांपासून बॉम्बस्फोट तसंच इस्रायल आणि अमेरिकन तळांवर लक्ष्य करणारे कट रचल्याचा आरोप आहे. पाश्चात्य देश, इस्रायल, अरब आखाती देश आणि अरब लीग हिजबुल्लाहला 'दहशतवादी' संघटना मानतात. हिजबुल्लाह नेमके कोण आहेत? लेबनॉन...

ऑलिम्पिक मॅस्कॉट असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? BBC News Marathi 29.07.2024

फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास असणाऱ्या फ्रिज टोपी ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मॅस्कॉट म्हणजेच बोधचिन्ह आहे. एखादा प्राणी द्योतक न करता या टोपीची निवड का करण्यात आली? ही टोपी कशाची खूण आहे? इतिहासात असं काय घडलं होतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

बजेटनंतर घर विकणं महागणार? LTCG टॅक्समध्ये बदल काय? BBC News Marathi 25.07.2024

अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचे स्लॅब्स बदलले, तुमच्यातल्या काही लोकांना कदाचित याचा फायदा होईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल. पण या बजेटमध्ये आणखी एक बदल झालाय, ज्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मालकीचं घर विकलंत, तर तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून अ...

अर्थसंकल्पातल्या घोषणांवर निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव आहे का? BBC News Marathi 24.07.2024

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे जे मुद्दे महत्वाचे ठरले त्या मुद्द्यांशी संबंधित घटकांविषयी घोषणा करण्याची विशेष काळजी या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसतंय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आले होते. त्याचे पडसाद या बजेटमध्ये कसे पहायला मिळाले...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडि...

कमला हॅरिस यांची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी नक्की आहे का? BBC News Marathi 24.07.2024

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं अखेर जाहीर केलं. त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहन अनेकांकडून गेल्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आलं होतं. बायडन हे आता त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासही त्यांनी समर्थन जाहीर केल...

चांदीपुरा विषाणू काय आहे? तो कसा रोखता येईल? BBC News Marathi 23.07.2024

गुजरात राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीकडे (NIV) पाठवण्यात आलेयत. 1965 साली नागपुरातल्या एका परिसरातल्या रुग्णांच्या रक्तामध्ये एक व्हायरस आढळला. ज्या गावात ६५ साली हा व्हायरस सापडला, त्याचं नाव व्हायरसला देण्यात आलंय. -...

पृथ्वीचा आतला भाग आणि बाहेरचा भाग उलट सुलट फिरतायत? BBC News Marathi 23.07.2024

पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच आपल्याला माहिती मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो. वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे....

चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का? BBC News Marathi 23.07.2024

वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते. इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे. अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जॉर्जिना र...

भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi 22.07.2024

जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो. कि...

Listen to the सोपी गोष्ट podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.