BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा? 11.05.2021 6:00
डेक्झामेथेझॉन आणि इतरही काही स्टिरॉईड्स सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारी औषधं म्हणून गौरवली गेली. पण, दुसऱ्या लाटेत स्टिरॉईड्सच्या अतीवापराचे परिणामही बघायला मिळत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत स्टिरॉईडचा वापर झाल्यामुळे उलट संसर्ग वाढल्याचीही काही उदाहरणं आहेत. म्हणूनच आज कोरोना रुग्णांसाठी स्टिरॉईडचा वापर कसा आणि कुठे करायचा जाणून घेऊया सोपी गोष्टमध...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनानंतर कान, डोळ्यांना येणारी काळी बुरशी 10.05.2021 6:41
कोव्हिड19च्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना नंतर काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि त्यामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. काळी बुरशीचा संसर्ग असलेल्या या आजाराला शास्त्रीय नाव आहे म्युकोर मायकोसिस. या आजाराविषयी आज सविस्तर जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम व...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? सरकार काय सांगतं? | सोपी गोष्ट 333 07.05.2021 5:23
मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? असा सवाल विचारला जातोय.
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठा आरक्षण मोदी सरकार मिळवून देऊ शकेल? | सोपी गोष्ट 332 06.05.2021 5:10
कलम 370 हटवतानाची हिंमत मराठा आरक्षणासाठी दाखवा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नरेंद्र मोदी कोरोना काळातही नवी संसदेची इमारत का बांधत आहेत? | सोपी गोष्ट 329 03.05.2021 5:19
‘नव्या संसदेवर खर्च होणारे 20 हजार कोटी लस, ऑक्सिजन विकत घेण्यासाठी वापरता आले नसते का?’
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लशीचा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल? 30.04.2021 5:23
कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये संश...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18+ साठी कोविनवर नोंदणी झाली, पण लस कधी मिळणार? सोपी गोष्ट 327 29.04.2021 3:53
18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असं सरकारने जाहीर केलं. त्यासाठी नोंदणीही सुरू झाली. पण लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही अशीच परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळतेय. असं का होतं आहे? 18 वर्षांच्या वरच्या लोकांना देण्यासाठी राज्यांकडे पुरेशा लशी आहेत का? महाराष्ट्राने याबद्दल काय निर्णय केलाय? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326 29.04.2021 5:25
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले? बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकारा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबी...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का? 27.04.2021 5:45
प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आणि या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे. रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्य...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल? 26.04.2021 5:43
महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे. आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा अंदाज आहे. अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोना...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात ऑक्सिजन तुटवडा का आहे? ऑक्सिजन पुरवठा सुरळीत कसा होणार? सोपी गोष्ट 323 (BBC News Marathi) 23.04.2021 5:58
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. देशातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. रेल्वे, विमानामार्फत ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे. पण मुळात ऑक्सिजनचा तुटवडा का पडला? आरोग्य यंत्रणा बेसावध होती का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस म्युटेशन ट्रिपल म्युटंट काय आणि किती घातक आहे? | सोपी गोष्ट 322 22.04.2021 4:49
कोरोना व्हायरसची विविध म्युटेशन्स म्हणजे उत्परिवर्तनं जगभरात सापडत आहेत. भारतात सापडलेल्या म्युटेटेड कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत ‘डबल म्युटंट’चा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आता ट्रिपल म्युटंटबद्दल बोललं जात आहे. तो काय आहे? त्यापासून आपल्याला किती धोका आहे? कोरोनाची आणखी किती म्युटेशन्स पाहायला मिळतील? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – बीबीसी मराठी...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321 21.04.2021 5:13
कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं? सध्या अनेक कोव्हिड रुग्णांची केली जाणारी HRCT टेस्ट काय असते? ती कोणत्या रुग्णांनी करावी? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – मयांक भागवत, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18 वर्षांवरच्या सर्वांना पुरेल इतका साठा भारताकडे आहे का?। सोपी गोष्ट 320 20.04.2021 6:05
18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस 1 मे पासून घेता येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अनेक राज्यांनी ही मागणी केली होती, पण तेव्हा केंद्र सरकारने अशाप्रकारच्या मागण्या चिंताजनक आहेत म्हणत खूप टीका केली होती. मग आता दोन आठवड्यांत परिस्थितीत काय बदल झाला? सरसकट प्रौढांचं लसीकरण करण्याचा निर्णय का घेतला गेला? सगळ्यांना देता येतील इतक्या लशी भारताकडे आहेत का? नसतील तर त्या मिळवण्याची योजना काय आह...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनामुळे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन उद्धव ठाकरे करतील? 19.04.2021 6:12
गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची? 16.04.2021 7:27
भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय. खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्याव...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका 15.04.2021 8:09
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कड...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं 14.04.2021 7:57
‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी लागू केले आहेत. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले. कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तर सोपी...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे 14.04.2021 5:34
एक वर्ष उलटून गेलंय, संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. पहिली लाट जात नाही तोच दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अधिक काळजी घ्यायला सांगितल जातंय. लस आहे पण ती आपला 100% बचाव करू शकते का? तर नाही... आणि म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आणि आपली काळजी घेत जगावं लागणार आहे. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोरोनासोबत जगण्याचे 9 फंड...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का? 12.04.2021 5:46
एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020मध्येच या औषधामुळे कोव्हिड रुग्णाचा जीव वाचत नाही, असा निर्वाळा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं हे मत असताना राज्यात रेमडेसिविरचा वापर का होत आहे? रेमडेसिविरमुळे रुग्णाला काय मदत मिळते? याविषयी जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये......
सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला? 09.04.2021 6:45
कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि १ एप्रिलपासून केंद्रसरकारने ४५ वर्षांवरच्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण, देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. केंद्रसरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का? 08.04.2021 6:28
ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, असं काल युरोपीयन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं. आणि युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमध्ये लोकांना हायसं वाटलं असणार. कारण, भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - अँस्ट्राझिनिकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो. भारतात रक्ताच्या गुठळ्या ह...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का? 07.04.2021 6:56
भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये. गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी मिळवली? 06.04.2021 5:09
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे. 36मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील. तोपर्यंत ते निवडणुका जिंकत राहिले आणि प्रकृतीनेही साथ दिली तर ते सर्वोच्च पदावर राहू शकतील. आणि त्यांनी तोपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ज्येष्ठ नेते स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात नक्षलवादी चळवळ कशी फोफावली? 05.04.2021 6:29
क्रांती म्हणजे कुठली मेजवानी नव्हे, एखादा सुरेख निबंध लिहिणं नव्हे. तर क्रांती हा सत्ताधाऱ्यांविरोधातला सशस्त्र उठाव आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते माओ त्से तुंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आज मला आठवलं कारण, याच विचारांनी प्रेरित झालेल्या देशातल्या नक्षली गटांनी ३ एप्रिलला बिजापूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाबरोबर केलेला संघर्ष आणि यात २२ जवानांचा झालेला मृत्यू. १९६७ पासून भारतात...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.