BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सोपी गोष्ट पॉडकास्ट : वाईन पिण्याचा खरंच आरोग्याला फायदा होतो का? 03.02.2022 6:42
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच वाईनच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जोरदार चर्चा सुरू झाली. वाईन पिणं आरोग्याला पोषक की घातक? किती प्रमाणात अल्कोहोल पिणं सुरक्षित असतं? या सगळ्यामागे शास्त्रीय आधार आहे का याची ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट : इन्कम टॅक्स स्लॅब न बदलल्याने मध्यमवर्गीयांचं नुकसान झालं का? 02.02.2022 6:31
तुम्ही नोकरी करत असाल तर बजेटमध्ये तुमची नजर आयकराबद्दलच्या घोषणांवर असेल. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढतेय का हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल. पण यंदा तसं झालं नाही, खरंतर गेली काही वर्षं ही सवलत मिळालीच नाहीय. यामुळे पगारदारांचं, मध्यमवर्गीयांचं नुकसान झालंय का? विरोधक, सरकार आणि तज्ज्ञ काय म्हणतात? ऐका ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसल...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: बजेटमधील ‘डिजिटल घोषणा’ 01.02.2022 5:06
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेलं बजेट पेपरलेस होतं. म्हणजे, नेहमीसारखा कागद आणि फायलींवर पैसा खर्च न करता सगळे मंत्री आणि सभागृहाला चक्क ऑनलाईन कॉपी देण्यात आली. यावर्षीचं बजेट पुन्हा एकदा पेपरलेस तर होतंच. शिवाय ते डिजिटलही होतं असं म्हणावं लागेल. कारण, बँकिंगपासून शेती आणि आरोग्य क्षेत्रातही सरकारने डिजिटल व्यवहारांवर आणि सोयींवर भर द्यायचं ठरवलंय. इतकंच नाही तर देशात पहिल्या डिजिटल...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तरुणांमध्ये बेरोजगारी का वाढतेय? 31.01.2022 6:20
रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया - युक्रेन सीमेवर काय घडतंय? 28.01.2022 6:30
रशिया आणि यु्क्रेन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रशियाने युक्रेन सीमेवर तब्बल एक लाख सैनिक तैनात केल्याची बातमी आहे. त्यामुळे सध्या दोघांमध्ये युद्धविराम असला तरी रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला करेल अशी भीती पाश्चात्य देश आणि अमेरिकेला वाटत आहे. रशिया इतका आक्रमक का आहे? पाश्चात्य देश या मुद्यावर रशियाविरोधात का एकवटले आहेत? आणि रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर जगावर, भार...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: अँटीबायोटिक्स घेऊनही लाखो लोक का मरत आहेत? 27.01.2022 5:16
अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय. औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो....
पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521 26.01.2022 7:14
पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश...
रशिया - युक्रेन तणाव : युरोप गारठण्याशी रशियाचा काय संबंध? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 520 25.01.2022 6:44
भर थंडीच्या काळात त्यांच्याकडे ऊर्जा संकट निर्माण झालंय. प्रचंड मागणी असूनही युरोपियन देशांना कमी गॅस पुरवठा होतोय. पुरेसा नैसर्गिक वायू मिळाला नाही तर युरोपातल्या देशांमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होईल आणि परिणामी लोकांना या थंडीच्या काळात विजेचा तुटवडा भासेल. पण नेमका आताच युरोपात हा ऊर्जा तुटवडा का निर्माण झालाय? आणि याचा रशिया आणि युक्रेनमधल्या तणावाशी काय संबंध आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : गांधीजींचं आवडतं गाणं बीटिंग द रिट्रिट कार्यक्रमातून का वगळलं? 25.01.2022 8:26
महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे. पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट. लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: अमर जवान ज्योती राष्ट्रीय शहीद स्मारकात विलीन का करण्यात आली? 21.01.2022 7:58
आता नवीन तयार केलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात आली. पण असं का करण्यात आलं? हे करून काय साध्य होतंय? तब्बल 50 वर्षांपासून शहिदांना सलामी देत असलेल्या एका ज्योतीचं महत्त्व कमी केलं जातंय का? याची कारणं ऐतिहासिक आहेत की राजकीय? पाहूया अमर जवान ज्योतीची ही सोपी गोष्ट. लेखन–निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517 21.01.2022 5:27
15 जानेवारी 2022 रोजी टोंगामधील बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही, तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्येही जाणवल्या. या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: या दोन बहिणींनी 9 मुलांची हत्या का केली? | सोपी गोष्ट 515 19.01.2022 6:22
अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी किरण शिंदेच्या साथीनं 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती. नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला की आजही अंगावर शहारे येतात. संशोधन – स्वाती पाटील लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या? 18.01.2022 6:59
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. संशोधन : अमृता दुर्वे ले...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोरोनाची साथ 2022 मध्ये संपणार का? 17.01.2022 5:00
कोरोनाचे रुग्ण कमी होतायत असं वाटेपर्यंत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली. कोरोनाची साथ नेमकी कधी संपणार असा प्रश्न अनेकांना असतो. 2022 च्या वर्षात कोरोना पँडेमिककडून एंडेमिककडे जाईल का? हा आजार किती काळ गंभीर राहील? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन- मयांक भागवत व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो? 14.01.2022 7:02
एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं? श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : रजनीश कुम...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला? 13.01.2022 8:24
महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापना म्हणजे commercial establishments च्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आधीच्या नियमांतल्या पळवाटा बंद करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. दुकानांच्या पाट्यांबद्दल आताच निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे? दुकानांच्या पाट्या मरा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: केंद्र सरकारकडे व्होडाफोन आयडियाचा 36% हिस्सा का देण्यात येतोय? 12.01.2022 5:36
व्होडाफोन आयडिया लिमिटेडमधले 35.8% शेअर्स सरकारला देण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. BSNL - MTNL ची वाईट असताना दुसरीकडे व्होडाफोन - आयडियामध्ये सरकारी भागीदारी कशाला? नेमकी ही काय भानगड आहे? यात Vodafone-Idea कंपनीचा काय फायदा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट : आर्थिक प्रगती होत असतानाही बेरोजगारीचा दर इतका जास्त का? 12.01.2022 7:54
कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोज...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस घेऊनही काहींना पुन्हा कोव्हिड का होतोय? 12.01.2022 5:29
मागच्या 24 तासात भारतात एक लाखांच्या वर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. थोडक्यात रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा जोमाने वाढतोय. आणि यावेळी आधी लस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याच्या केसेस आहेत. जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारानंतर लस घेतल्यानंतर झालेला ब्रेकथ्रू संसर्ग पाहायला मिळाला आहे. लस घेतल्यावरही कोरोना संसर्ग का होतो? तिसरा लशीचा डोस त्यावर प्रभावी ठरेल का? पाहूया आज सोपी गोष्टमध्य...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पंतप्रधानांची सुरक्षा इंदिरा गांधींच्या हत्येनंतर SPG कडे कशी आली? 07.01.2022 5:26
1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर Special Protection Groupची स्थापना झाली. त्यांचं काम कसं चालतं? त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे असते? ऐकू या या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – सिद्धनाथ गानू, टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मुस्लीम महिलांवर अश्लील शेरेबाजी आणि ट्रोलिंग कोण करतं? 05.01.2022 4:26
इंटरनेटवर फ्री अॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करण्याचं आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 18 वर्षांची एक तरुणी आणि 21 वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लहान वयात ही मुलं असे उद्योग का करतात? मुस्लीम समाजातल्या मुलींवर याचा काय परिणाम होतोय, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… [ https://www.youtube.com/watch?v=5N...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सिन असल्याचा दावा किती खरा? | सोपी गोष्ट 505 04.01.2022 5:35
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचा दावा काहींनी केला आहे. पण अनेक तज्ज्ञांनी तो खोडून काढला आहे. संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवीन वर्षी ‘या’ पाच गोष्टी कशा बदलतील? 03.01.2022 5:59
2022 सालात आणखी कुठला कोरोना व्हेरियंट त्रास देईल की, लशीमुळे सगळे सुरक्षित असू? वर्क फ्रॉम होममध्ये काही बदल होईल का? मेटाव्हर्स, 4जी यामुळे आपलं जग किती बदलेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तरं शोधूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… [ https://www.youtube.com/watch?v=RHqZmep_MlA ] संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
सुधीर मुनगंटीवार साहेब, लैंगिकतेविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं | सोपी गोष्ट पॉडकास्ट 31.12.2021 5:26
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य. सुधीर मुनंगटीवारांनी प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती LGBTQA समुदायाचा आहे की नाही हे कसं कळणार? एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण आहे, याचं सर्टिफिकिट कोण देणार? त्याची व्याख्या काय? सुधीर भाऊंना पडलेल्या या प्रश्नांची सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि कायदेशीर उत्तर शोधू या, आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश...
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय? | सोपी गोष्ट 502 पॉडकास्ट 30.12.2021 6:12
कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे? संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.