Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Be sure to visit the podcast's website and support the creator: lifeofstories.buzzsprout.com
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Oct 10, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1950: आनंदाचा सण "भोगी". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.01.2026 5:56
Send us Fan Mail नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रातांनुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या अदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
# 1949: अनोखा निरोप समारंभ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.01.2026 8:04
Send us Fan Mail सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपला जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. "आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल..." या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.
# 1948: बाईपण भारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.01.2026 4:10
Send us Fan Mail देवदूत स्त्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला. “प्रभु, तिला तुम्ही खूपच मऊ बनवलं आहे.” देव म्हणाला, “हो, ती मऊ आहे, पण मी तिला खूप मजबूत सुध्दा बनवलं आहे. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते, याची तुला कल्पनाही नाही करता येणार!”
# 1947: भक्त पुंडलिक आणि विठ्ठल यांची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.01.2026 6:40
Send us Fan Mail एकदा पुंडलिक नावाचा एक तरुण त्या वेळच्या पर्यटनाच्या साधनांनी काशीच्या यात्रेला निघाला होता, तो जंगलातून जातअसताना त्याचा रस्ता चुकला, तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला …तो आश्रम श्री कुकुटस्वामीचा होता. तिथे तो दोन रात्री राहिला कारण तो खूप थकलेला होता. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुट स्वामीना काशीला जाण्याचा सोपा व जवळचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की...
# 1946: डाळगप्पू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.01.2026 5:37
Send us Fan Mail एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले "तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?" सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंत सर्वांचा समावेश होता. "ऐसा सद्गुरु पूर्णपणी" हा पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओ...
# 1945: "आतला आवाज" लेखक पु. ल. देशपांडे (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 18.01.2026 1:05
Send us Fan Mail कुणी जिज्ञासू व्यक्तीने हा प्रश्न पू.लं.ना विचारला "तुम्ही कधी आतला आवाज ऐकला आहे का?". "माझ्या लेखी आतला आवाज म्हणजे "अहो , ऐकलं का?...जरा आत येता का?" असा जो आतून म्हणजे स्वयंपाक घरातून येतो .....तो आतला आवाज ". "जीवन शांततेत घालवायच असेल, तर नेहमी तो आतला आवाज जो सांगेल ते ऐकून वागा , सुखी व्हाल आणि राहाल"...!
# 1944: "त्यावेळी, आकाशात बोईंग 747 हे फक्त एक ग्लायडर झालं होतं" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 18.01.2026 5:56
Send us Fan Mail 2 जून 1982, British Airways, Flight 9 , Boeing 747 हिंद महासागरावर शांतपणे उडत होतं. अचानक काचांवर निळसर प्रकाश चमकू लागला आणि अवघ्या काही सेकंदांत, एकामागोमाग एक…चारही इंजिन बंद झाली. सात मैल वर आकाशात, इंजिनशिवाय उडणारं बोइंग 747 हे तब्बल चारशे टनांचं विमान एका प्रचंड ग्लायडरसारखं खाली घसरू लागलं....
# 1943: "पोरकेपण" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.01.2026 6:50
Send us Fan Mail “अहो ऐका ना…” “तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा ना .” “का? काय झालं?” “काय झालं काय?” “दिवसभर फोन… फोन… फोन! इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक! त्यांना कंटाळा कसा येत नाही? बायकोचा सूर हळूहळू वाढत गेला . ..... खरं तर फोनवर बोलणारे वृद्ध फार बोलके नसतात; ते घरातल्या शांततेशी झुंज देत असतात. कधी कधी माणसाला कमी फोनची नाही, तर थोड्या जास्त सहजीवनाची गरज असते. आणि...
#1942: "हरवलेला" लेखिका विद्या डेंगळे. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.01.2026 9:45
Send us Fan Mail “पुढे बरेच महिने गेले . वर्षही लोटली , पण माझा मित्र प्रदीप सापडलाच नाही . . " तेव्हापासून रस्त्यात मला माझ्या वयाचा रस्त्यावरील फाटका माणूस दिसला की मी तो “ तो” आहे का ते पाहतो” . प्रदीप कधीच सापडला नाही, पण उमेशमामाच्या मनात तो कायम जिवंत राहिला. त्या गरीबाला मदत करताना उमेशमामाला जणू आपल्या हरवलेल्या मित्राची सेवा केल्यासारखं वाटतं. माणुसकी, आणि नात्यांची खोल भावनिक गु...
# 1941: "लालसा" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 10.01.2026 7:20
Send us Fan Mail त्यानं म्हाताऱ्याच्या पैशांची तीनही गाठोडी डोक्यावर घेतलेली होती. पण आता ओझं फक्त त्याच्या डोक्यावर नव्हतं, मनावरही होतं. "मी पळून गेलो तर हा म्हातारा काय करणार? एका झटक्यात मी श्रीमंत होईन. बायकोचं रडणं थांबेल . प्रतिष्ठा , आराम, पैसा…" आणि त्याचा तो तिसरा आवाज जिंकला. तो पळून गेला. .."हरला!" " ही परीक्षा होती, प्रामाणिक सुरक्षा मंत्री शोधण्यासाठी &q...
# 1940: "बायको वाल्या कोळ्याची" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 09.01.2026 6:28
Send us Fan Mail शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, संतापलेला असा दरोडेखोर नवरा , वाल्या कोळी समोर येऊन ठाकल्यावर त्याच्या अशिक्षीत बायकोने "व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !" असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर? वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?
1939: शोध मोबाइल फोनचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.01.2026 9:41
Send us Fan Mail मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या पथकाचे प्रमुख मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल कॉल न्यूयॉर्कच्या सहाव्या अॅन्हेन्यू मधून पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी आपल्या मोबाईल वरून पहिला फोन न्यू जर्सीला केला होता. हा कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे जोल इंग्लर यांना केला होता. या कॉल बद्दल मार्टिन म्हणाला होता, "जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन ध...
# 1938: द स्टिचिंग सिस्टर्स. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.01.2026 7:44
Send us Fan Mail गेल्या हिवाळ्यात, एक तरुण त्या काळजी केंद्राच्या स्वागत कक्षात आला. त्याने ब्लँकेट्स बनवणाऱ्या स्त्रियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी सुरुवातीला कचरले, पण त्यांनी त्याला आमच्या सनरुममध्ये आणले. त्याच्या हातात एक निळ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ होता, ज्यामध्ये विणलेल्या विस्कळीत ओळी होत्या. "मला हा स्कार्फ डिसेंबरमध्ये केंद्रात मिळाला होता," तो म्हणाला. त्याचा आव...
# 1937: चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.01.2026 10:57
Send us Fan Mail माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो — मी ते हलवत नव्हतो, मी ते हलताना पाहत होतो. मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ, मिलिमीटर अंतरावर, क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखव...
# 1936: हा स्मृतीभ्रंश किंवा अल्झायमर तर नाही ना..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.01.2026 6:38
Send us Fan Mail एक ६२ वर्षांचे अभियंता घाबरलेल्या अवस्थेत माझ्या दवाखान्यात आले. गेले सहा महिने त्यांची स्मरणशक्ती खालावत होती. ते बैठका विसरत होते. पार्किंगमध्ये आपली गाडी कुठे लावली आहे हे विसरत होते. "माझ्या वडिलांना ६५ व्या वर्षी अल्झायमर झाला होता," ते मला म्हणाले. "मलाही तोच आजार झाला आहे." त्यांच्या पत्नीनेही या सर्व गोष्टींना दुजोरा दिला. प्रगतीतील घट. व्यक्तिमत्त्वात...
# 1935: बायकोची नोकरी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.01.2026 12:43
Send us Fan Mail मी घरात शिरलो, पाहुण्यासारखा खुर्चीवर बसलो. बूट काढले, पाठोपाठ कपडे उतरविले. बाथरुममधे गेलो, हात - पाय - तोंड स्वच्छ धुतलं. टॉवेलनी हात पाय पुसत बैठक खोलीत येऊन बसलो . क्षणातच केळे घातलेला शिरा आणि उप्पीट असलेली डिश समोर आली. मला आश्चर्य वाटलं. फारच भूक लागली असल्यानं पुढं आलेलं न बोलताच सारं पोटात ढकललं. पाठोपाठ चहा आला, तसा चहा घेतला. जोराची ढेकर दिली. मन प्रसन्न झालं. कारण पोटा...
# 1934: जीवनाचे मोल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 31.12.2025 4:46
Send us Fan Mail एकदा विवेकानंद असेच निश्चल ध्यानस्थ बसले होते. बऱ्याच वेळाने त्यांनी डोळे उघडले, तर समोर एक ढाण्या वाघ उभा होता. त्याच्या हिरव्याजर्द पिवळसर डोळ्यात भक्ष्याला न्याहाळणारी भूक होती. स्वामींनी मंदस्मित केलं. वाघ जणू भिक्षेला आला होता! आपल्यामुळे निदान एका जीवाची तरी भूक भागणार आहे, या विचारानं आनंदून त्यांनी डोळे मिटले आणि वाघ झेपावण्याची वाट पाहू लागले. काही क्षण तसेच सरले. त्यांनी...
# 1933: गजेन्द्रमोक्ष. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.12.2025 7:59
Send us Fan Mail एकदा, गजेंद्र आणि त्याच्या पत्नी त्यांची तहान भागवण्यासाठी एका तलावावर पोहोचले. तहान भागवल्यानंतर, गजेंद्रला पाण्यात खेळावेसे वाटले. तो तलावात आपल्या पत्नींसोबत खेळू लागला. दुर्दैवाने, त्याच क्षणी, एक मोठा मगर आला. त्याने गजेंद्रचा उजवा पाय आपल्या दातांनी धरला आणि त्याला तलावात ओढायला लागला. गजेंद्र वेदनेने ओरडायला लागला. तलावाच्या काठावर असलेल्या त्याच्या पत्नी त्यांच्या पतीच्या...
# 1932: स्यमंतक मणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.12.2025 8:43
Send us Fan Mail रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नावाच्या एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे. असे रत्न गणप्रमुखा ऐवजी राजाच्या किंवा संघप्रमुखाच्या...
# 1931: श्री दत्तात्रेयांकडून रामदास स्वामींची कठीण परीक्षा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.12.2025 7:32
Send us Fan Mail एकदा रामदास समर्थ मातापुरी (माहूर) गेले. तेथे देवीचे दर्शन घेऊन, श्रीदत्तात्रयांचे स्थान आहे, तेथे ते गेले. तोच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्मण दिसले. त्यांस विचारले की, 'तुम्ही येथे का बसला?' तेव्हा त्यांनी उत्तर केले की, "श्रीदत्तात्रयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत." ते ऐकून समर्थ बोलले की, "उत्तम आहे. तुमच्या समागमे आम्हांसही दर्शन घडेल.&quo...
# 1930: ‘ती‘ नोट आणि BMW ची चावी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.12.2025 4:23
Send us Fan Mail मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं, "अरे राहू दे बाबा. फी नको. तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल." त्यावर तो मजूर जे बोलला, त्याने माझ्या अंगावर काटा आला. तो करारी आवाजात म्हणाला, "नको साहेब. ही तुमची 'विद्या' हाय, आणि हे माझं कष्टाचं 'दाम' हाय. फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण नाही येणार. हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामावरून...
# 1929: देवमाणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.12.2025 5:34
Send us Fan Mail "आजोबा, सुकी पुरी ... " नातवाने फर्माईश केली की, आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार. मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचे तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार. त्यानं पूर्ण पाणी प्यायल्यावर शिल्लक राहिलं तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.
# 1928: "गिरनारच्या दहा हजार पायऱ्या" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.12.2025 8:28
Send us Fan Mail गिरनार येथे श्री दत्तात्रेय यांनी तपश्चर्या केल्याची श्रद्धा आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, पायऱ्या नसताना, यात्रेकरूंना सरळ उभा डोंगर चढावा लागे . हा प्रवास अनेक दिवसांचा असे. अनेक जण थकून पडायचे, काही जण दरीत कोसळायचे, जंगली प्राण्यांचा धोका असे . ह्या पर्वतावर पायऱ्या बांधणं म्हणजे मोठं खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड काम होतं . त्यासाठी नवाबकडे पैसे नव्हते. मग लॉटरीतून...
# 1927: "The little Match girl" Hans Christian Anderson. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.12.2025 6:18
Send us Fan Mail ख्रिसमसच्या रात्री रस्त्यावर एक लहान मुलगी थंडीने कुडकुडत कडेपेट्या विकते आहे. पण कोणालचा त्या खरेदी करायच्या नाहीत. कारण ते सर्व घाईत निघाले आहेत उबदार घरांकडे, सुरक्षिततेकडे, आनंदाकडे. तिच्या आजूबाजूला बर्फ आहे, पोटात भूक आहे आणि मनात असुरक्षितता आहे. त्या अंधारात तिला आधार मिळतो तो वास्तवाकडून नाही, तर तिच्या कल्पनाशक्तीकडून शेगडी, अन्न, ख्रिसमस ट्री आणि आजीच्या रूपाने. त...
# 1926: "शांततेचा संसर्ग" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.12.2025 7:23
Send us Fan Mail “ऐक,” नवरा म्हणाला, “तू अलीकडे खूप बदलली आहेस. तू प्रतिक्रिया देत नाहीस. सगळं ठीक आहे ना?” “काहीच बिनसलं नाही" ”मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायची. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड." "मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचे. पण एक दिवस लक्षात आलं, माझ्या काळजीने त्यांची समस्या सु...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.