Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Be sure to visit the podcast's website and support the creator: lifeofstories.buzzsprout.com
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Oct 10, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1925: "सगळ्यांना शकुंतला परांजपे नावाची आई मिळत नाही" लेखिका सई परांजपे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.12.2025 9:42
Send us Fan Mail ‘मुलांचा मेवा’ हे वयाच्या आठव्या वर्षी लिहिलेलं पुस्तक म्हणजे सगळी आईचीच कृपा. मी लहान असताना आई रोज मला गोष्ट सांगायची. आप्पा फिरायला जाताना सांगायचे- ग्रीम्स किंवा अँडरसनच्या फेअरी टेल्स. एके दिवशी आई मला म्हणाली, "मला कंटाळा आलाय आज. तूच सांग बरं गोष्ट." मग मी तिला गोष्ट सांगितली. त्यात सोनेरी बदक आणि निळ्या दाढीचा साधू वगैरे असं काही बाही होतं. "कुठे वाचलीस?&q...
# 1924: "सर्वोत्तम क्लिक चा शोध घेणारी परी" लेखिका : गौरी देशपांडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.12.2025 8:50
Send us Fan Mail दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या हातात वर्तमानपत्र होतं आणि परीने काढलेला फोटो तिच्या नावासकट पहिल्या पानावर छापला गेला होता. आता तुम्हाला वाटेल रोज किती तरी असे फोटो पेपरमध्ये छापून येतात. त्यात काय विशेष आहे? सांगते! कल्पना करा की, हा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ आहे साधारण १९३० चा आणि एक मुलगी नऊ किलोचा 'रोलीफ्लेक्स' कॅमेरा घेऊन सायकलवर 'बॉम्बे'त फिरतेय- फोटो का...
# 1923: "IPS अंबिका" लेखक विशाल गरड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.12.2025 3:47
Send us Fan Mail रावसाहेब तात्याला म्हणाला, “ "आरं तात्या, पुरगी काय गडी बिडी हाय व्हय रं, असं सोबत घिवून फिरायला? असं पुरी ठुरींना घिवून नकु येत जावू. परक्याचं धन ते. वळण चुकलं तर?" "न्हाय रावसाब, शिकून मुठी साहेबीन करणार हाय म्या तिला." अंबिका देशामध्ये 124 वी येऊन IPS झाली. एके काळी “पोरगी म्हणजे परक्याचं धन” म्हणणाऱ्यांसमोर, आज तीच पोरगी वर्दीत उभी होती अभिमानाने, निर्धा...
# 1922: "You are not dead until you are warm and dead." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.12.2025 11:30
Send us Fan Mail नॉर्वेमधील २९ वर्षांची प्रशिक्षणार्थी करत असताना बर्फाआड लपलेल्या ओढ्यात उलटी कोसळली आणि बर्फाखाली अडकली. तब्बल ८० मिनिटे ती बर्फाखाली होती आणि जवळपास ९ तास तिचं हृदय थांबलेलं होतं. मात्र तीव्र थंडीमुळे शरीरातील क्रिया अत्यंत मंदावल्या, मेंदू सुरक्षित राहिला आणि वैद्यकीय प्रयत्नांमुळे ती पूर्णपणे बरी झाली. अॅना फक्त स्वतः वाचली नाही. तिने वैद्यकशास्त्राला सांगितलं: “मृत्यू ही रेषा...
# 1921: The snake chasing effect. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 18.12.2025 4:21
Send us Fan Mail आयुष्यात, तुम्हाला अधूनमधून साप चावणारच. इथे साप हे एक रुपक आहे. कोणीतरी तुमचा विश्वासघात करतो. जोडीदार खोटे बोलतो. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी गैरवर्तन करतो. मित्र तुम्हाला निराश करतो. सहकारी तुमच्या कामाचे श्रेय घेतो. तुमच्या कामाचे तुम्हाला बक्षीस मिळत नाही. हेच ते चावणारे साप..!!
# 1920: ज्येष्ठांची कट्टा पार्टी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.12.2025 5:39
Send us Fan Mail नंतर गोविंद पंत उभे राहिले, "सदाशिवने सांगितले आम्ही आता जेष्ठ आहोत. अहो, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालीशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा! त्याला कारणही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी. ह्या ग्रुप मधे वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून चार पाच वेळ...
# 1919: आतड्यातील जीवाणू आणि पार्किन्सनचा संबंध. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 16.12.2025 10:20
Send us Fan Mail आपल्या आतड्यात 100 ट्रिलियनपेक्षा जास्त सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असू शकतात, जे 300 ते 1000 पेक्षा जास्त प्रजातींचे असू शकतात, आणि त्यांचे एकत्रित वजन सुमारे 1 ते 2 किलोग्रॅम (एका मोठ्या मांजरीएवढे) असू शकते. हे सूक्ष्मजंतू पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातील जीवनसत्त्वे तयार करण्यात मदत करतात, आणि ते चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात, जे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी...
# 1918: वाळवंटात उमललेलं प्रेम: स्वप्न आणि वास्तव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.12.2025 11:05
Send us Fan Mail "प्रेमात पडल्यावर अनेक निर्णय भावना आणि मोहाने घेतले जातात . पण आयुष्यात खरं समाधान हवं असेल, तर काही वेळा फक्त प्रेम पुरेसं ठरत नाही. अशा वेळी मनातला आतला आवाज ऐकावा लागतो… आणि त्यानुसार पाऊल टाकण्यासाठी धाडसही दाखवावं लागतं."
# 1917: पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॅाट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.12.2025 11:04
Send us Fan Mail खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंत असले पाहिजेत. रात्रंदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातार...
# 1916: अवयव प्रत्यारोपणाचा इतिहास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.12.2025 11:45
Send us Fan Mail सन १८१७ मध्ये फ्रेंच चिकित्सक हेन्री ड्युट्रोचेट यांनी त्वचेच्या प्रत्यारोपणावर गॅझेट डी सांतेच्या संपादकाला एक पत्र लिहिले होते जे भारतात तैनात असलेल्या त्यांच्या मेहुण्याच्या कथेवर आधारित आहे. पत्रानुसार, सैन्याच्या अधीनस्थ व्यक्तीला त्याचे नाक कापून शिक्षा देण्यात आली होती. त्या माणसाने त्वचेचे ग्राफ्टिंग करण्यात पारंगत असलेल्या स्थानिक लोकांचा शोध घेतला आणि त्याच्या नाकाची शस्...
# 1915: "एक रात्र अशीही" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.12.2025 5:39
Send us Fan Mail पहाटेच्या सुमारास आजोबांचा श्वास मंदावत गेला आणि थोड्याच वेळात तो थांबला. मेजरने नर्सला जाऊन सांगितले. मेजरने तिला विचारले, “कोण होते ते?” ते माझे वडील नव्हते. मी त्यांना याआधी कधीच पाहिले नव्हते.” नर्स अधिकच गोंधळली. “मग मी तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन गेले तेव्हा तुम्ही काही का नाही बोललात?” तिने विचारले. मेजर म्हणाले , “तेव्हाच मला कळले होते की काहीतरी चूक झाली आहे. पण मला हे...
# 1914: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.12.2025 8:37
Send us Fan Mail तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.
# 1913: सुगरण पक्षिणी नव्हे तर पक्षी बांधतो घरटे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.12.2025 4:50
Send us Fan Mail ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना तो किमान दोन तर कमाल आठ ते दहा घरटी बांधतो.
# 1912: "एकमेव प्रवासी" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.12.2025 4:11
Send us Fan Mail या स्टेशनचा एकमेव नियमित प्रवासी होती हायस्कूलमध्ये शिकणारी काना हराडा . तिच्या शिक्षणासाठी प्रवासाचा हा एकमेव मार्ग होता. स्टेशन बंद झालं असतं, तर तिची शाळाच बंद पडली असती. हे लक्षात येताच जपानी रेल्वेने आपला स्टेशन बंद करण्याचा निर्णय ३ वर्षे थांबवला....
# 1911: "मी आहे कौरव नंबर 101" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.12.2025 6:00
Send us Fan Mail भगवंत म्हणले, "पाप काय आहे हे दुर्योधनच काय, तूही जाणतोस. तुला माहीत आहे ‘हे हेल्दी नाही’ तरीसुद्धा तू जेवण निवडताना तळण, चीज, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असं जिभेला आवडणारं तेच निवडतोस." "तुला रात्री झोपायची वेळ कळते. सकाळी उठायचं महत्वही कळतं. पण तरीही रात्र–रात्र जागून सिनेमे, सीरियल्स, रील्स पाहत बसतोस." "दुर्योधनाने माझं सांगणं ऐकलं…पण आपल्यात बदल करायच...
# 1910: जोनास सॅाल्क: पोलिओ लस संशोधक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.12.2025 5:51
Send us Fan Mail हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्या...
# 1909: स्पर्श. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.12.2025 4:55
Send us Fan Mail नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. "कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू" असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली...
# 1908: Safety pin. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.12.2025 5:12
Send us Fan Mail वॉल्टर हंट एका मित्राचा १५ डॉलर्सचा कर्जदार होता. कर्ज फेडायचं होतं पण हाताशी पैसे नव्हतेच मुळी . हंटच्या हातात होती ८ इंच लांबीची पितळी तार . त्याने ती तार बोटांनी वाकवायला सुरुवात केली. वळणावर वळण, एका टोकाला स्प्रिंगसारखी रचना, आणि दुसऱ्या टोकाला टोकदार सुई झाकणारी सुरक्षित कवच. आणि मग काही वेळातच……त्या विलक्षण क्षणी . सेफ्टी पिनचा जन्म झाला.
# 1907: "गुरुदक्षिणा" डॉ. सुरेश कोठारी यांची मुलाखत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.12.2025 7:56
Send us Fan Mail “तुझ्या गणिताच्या शिकवणीची फी फक्त एक पैसा. पण मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तू बोर्डाच्या दोन्ही गणिताच्या पेपरमध्ये प्रथम येऊन दाखव.” बर्वे सर ठामपणे म्हणाले. श्रीरंग गुणे सरांनी सुरेशचं इंग्रजी घडवलं. त्याच्यात दडलेलं तेज त्यांनी ओळखलं आणि त्याला सामान्यपणात अडकू दिलं नाही. सतत पुढची दिशा दाखवत, त्याला मोठं होण्यासाठी प्रवृत्त करत राहिले. या दोन्ही गुरुवर्यांचा मान राखत सुरेश...
# 1906: "काल आणि उद्याचा संगम असणाऱ्या बेटांची गुढ कहाणी" लेखक: संतोष कारखानीस. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.12.2025 7:08
Send us Fan Mail बेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे! हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे आज मधून उद्यात किंवा उद्यातून आज मधे ! एका बेटावर दिवस संपत असतो, तर समोरच्या बेटा...
# 1905: "कारल्याची भाजी आणि...हरवलेलं त्रिकूट" लेखिका : सौ विदुला जोगळेकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.12.2025 7:16
Send us Fan Mail बाबांनी मला दिलेल्या शिक्षेची ना आईने दखल घेतली ना आजीने. चुक ही चुकच असते...ती आड अंगाने,सुचवायची गोष्ट नसते,ही पालकत्वाची जबाबदारी आमच्या पिढीपर्यंत शिक्षेच्या माध्यमातून अमलात येत होती. वाचनाचे वेड जसं वाढत गेलं,तसं आईने दोन तीन लेखकांची पुस्तके वाचायची नाहीत... असं एकदाच बजावलं होतं.आजही लायब्ररीचे भांडार समोर उभे असुन,वयाचे सारे निर्बंध संपलेले असुनदेखील,कुतूहल म्हणुनही ...का...
# 1904: वंदेमातरम् ची १५० वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 30.11.2025 6:21
Send us Fan Mail या वर्षी आपण वंदेमातरम या गीताची १५०वर्ष पूर्ती साजरी करत आहोत. सात नोव्हेंबर या दिवशी १८७५ साली बँकिंचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम ही सहा दिव्य श्लोक किंवा कडवी असलेली स्वर्गीय रचना केली. जगाच्या पाठीवर एव्हढी उदात्त रचना झाली नाहीये आणि होणार ही नाही.... कारण मातृभूमी बद्दल एव्हढी उदात्त संकल्पना ही याच भूमीचं, याच संस्कृतीचं देणं आहे.... या भूमीला केवळ माताच नव्हे तर देवीचे स्...
# 1903: प्रार्थना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.11.2025 9:20
Send us Fan Mail बालपणापासून आपल्याला ‘जीवनातील प्रार्थनेचं महत्व‘ सांगितले जाते. जेव्हा काही समजतही नव्हते, तेव्हासुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे. थोडे समजायला लागल्यावर “बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे”, असं बोलायला शिकवले. आणखी थोडे समजदार झाले तेव्हा स्वतःला जमेल, पटेल तशी प्रार्थना करायला लागलो. या प्रार्थनेमध्ये मनाला शांत करण्याची अमाप शक्ति आहे. म्हणून आयुष्यात कोणतेही...
# 1902: आता हे बाळ म्हणजे माझा भाचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.11.2025 6:21
Send us Fan Mail कर्नाटकातील बेलवडी येथील (आताचे यादवाड) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प हे एक प्राचीन शिल्प आहे, जे १६७८ साली म्हणजे त्यांच्या हयातीतच बनवले गेले होते. हे शिल्प तेथील श्री. मारुती मंदिरात सापडले आहे आणि ते बेलवडीच्या मराठा मोहिमे दरम्यानचे आहे. हे शिल्प खास आहे कारण ते छत्रपतींच्या काळात तेथील राणीने तयार केले होते, असे मानले जाते..
# 1901: आईच्या चप्पलांची किंमत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.11.2025 3:20
Send us Fan Mail गोविंद म्हणाला, " मला माझ्या आईसाठी चप्पल हवी आहे. ती नेहमी अनवाणीच असते, त्यामुळे तिच्या चपलेचं माप नाहीये माझ्याकडे. हो, पण माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नसलं तरी तिच्या पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का?" दुकानदाराला हे अजबच वाटलं. तो म्हणाला, "याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही?"...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.