Saurabh Kapoor
Guru Shishya Sukhaanandsamwad
Parampriya Parmanand Swami Maharaj unraveling the beautiful truth of life via conversation with his disciple. This is the modern-day Bhagvat Gita, Pramanand Prabhuji guiding his disciples just the way Shri Krishna guided Arjun.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Episode 224 as on 18th August 2023 18.08.2023 58:32
Guru Shishya Sukhsamwad as on 18th August 2023
Episode 223 as on 15th August 2023 15.08.2023 1:03:35
Guru Shishya Sukhsamwad as on 15th August 2023
Episode 222 as on 11th August 2023 11.08.2023 1:03:34
Guru Shishya Sukhsamwad as on 11th August 2023 संत सत्पुरुषांकडून प्रकट होणारी आनंदस्वरुप अवस्थेतील वचने त्यांच्या आत्मचिंतनातून स्फुरलेली असतात. ते प्रेमीजनांसाठी बाह्यांगाने कार्य करत असले तरी ते सदैव त्यांच्यामध्ये रमलेले असतात , अंतर्मुख असतात. त्यांची वचने प्रेमीजन श्रवण करतात पण क्वचित एखादाच ती त्यांच्या अनुभवाची वचने सर्वांगाने आत्मसात करतो. आता ती वचने त्याला अंतर्मुख करतात . मग त्याच्या...
Episode 221 as on 8th August 2023 08.08.2023 59:11
Guru Shishya Sukhsamwad as on 8th August 2023 कीर्तन , भजन , पूजन ,गायन ही भक्ती नसून भक्तीमार्गाला प्रवृत्त करणारी साधने आहेत. मना सज्जना भक्तीपंथेचि जावे. या साधनांचे सहाय्य घेऊन ईश्वराच्या सगुण रुपाच्या अंतःकरणाचा वेध घेणे ही खरी भक्ती. त्यासाठीच तर ईश्वराने सगुण रुप घेतले आहे. त्याचे अंतःकरण हेच भक्ताचे लक्ष्य असावे व त्याच्या अंतःकरणाकडे पहाता पहाता स्वतःच्या अंतःकरणात त्याला भेटावे. देहातीत...
Episode 220 as on 4th August 2023 04.08.2023 1:02:20
Guru Shishya Sukhsamwad as on 4th August 2023 जीवाच्या सगुण व्यक्तरुपाचे मूळ ईश्वराच्या आनंदाच्या अवस्थेमध्ये आहे. सहाजिकच व्यक्तीच्या ठिकाणी सुध्दा आनंद असायला हवा , दिसायला हवा . खरं तर त्याच्या ठिकाणी आनंद सुप्त अवस्थेत असतोच . पण तो प्रकट होताना दिसत नाही कारण सगुण व्यक्तरुपामध्ये जीवाच्या ठिकाणी अज्ञान मायेचा खेळ सुरु झालेला असतो. उलटपक्षी संत सत्पुरुष ईश्वरी तत्वाचे सगुण रुप धारण करत असताना...
Episode 219 as on 1st August 2023 01.08.2023 1:00:04
Guru Shishya Sukhsamwad as on1st August 2023 श्रीपरमानंदस्वामींच्या सहवासात , पवित्र वातावरणात घडणारे देखणे सोहळे अतिशय आनंददायी असतातच पण या सोहळ्यांचा सुगंध पुढे अनेक दिवस दरवळत रहातो. त्यांनासुध्दा या सोहळ्यांचा आनंद लगोलग व्यक्त करायचा असतो. त्या निमित्ताने पुन्हा अनेक विषयांचे चिंतन व मनन घडत असते. या त्यांच्या चिंतनातून प्रेमीजनांनाही पुढील वाटचालीला प्रेरणा मिळत रहाते. ते सांगत असतात की भक्...
Episode 218 as on 28th July 2023 - Prabhuji's Bday 28.07.2023 1:04:21
Guru Shishya Sukhsamwad as on 28th July 2023 Prabhuncha Janmdin सद्गुरु जीवनचरित्र जेव्हा भक्ताला प्रत्यक्ष पहायला मिळते तेव्हा त्याच्या स्वतःच्या जीवनावर सद्गुरुंच्या वृत्तीचा विशेषत्वाने प्रभाव पडत असतो व त्याच वृत्ती तोही जीवन जगत रहातो. परमानंदचरित्र म्हणूनच आम्हा भक्तांना अनुसरणीय आहे. अगदी कोवळ्या वयातच पिताश्री श्रीअवधूतस्वामींचे जीवन त्यांना जवळून पहाण्याची संधी मिळाली. पूर्वजन्मीचे काही स...
Episode 217 as on 25th July 2023 25.07.2023 55:51
Guru Shishya Sukhsamwad as on 25th July 2023 भय इथले संपत नाही. जीवनातील अनिश्चतेमुळे सर्वसामान्य जीव भीतिग्रस्त आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भीतिमुळे मनाला शांति नाही आणि म्हणून जीवनात आनंदाचा अनुभव नाही. पण अशाच परिस्थितीत जीवन जगत असताना संतसत्पुरुष मात्र शांत असतात कारण शांति त्यांच्या अंतःकरणात स्थिरावलेली असते. सत्ता ईश्वराची आहे हे ते जाणत असतात . म्हणून कठीण व कसोटीच्या प्रसंगामध्...
Episode 216 as on 21st July 2023 21.07.2023 1:06:00
Guru Shishya Sukhsamwad as on 21st July 2023 सख्यत्व जर मैत्रीभावापर्यंत मर्यादित राहिले तर देवाच्या देवत्वाची जाणीव होणार नाही. कारण मैत्रीभावामध्ये स्वतःचे जीवन वेगळे राखलेले असते. आणि म्हणून देवाविषयी भक्तिभाव निर्माण होऊ शकत नाही. प्रेमभावातूनही भक्तिभाव सहजपणे निर्माण होईल याचीही शाश्वती नाही. प्रेमभावाने देवाविषयी प्रेम निर्माण होते पण त्याचे सर्व जीवांवरच प्रेम आहे हे पाहून जीव गांगरतो व त्...
Episode 215 as on 18th July 2023 18.07.2023 1:05:15
Guru Shishya Sukhsamwad as on 18th July 2023 तृषार्त जीवांची तृष्णा शमविण्यासाठी पावसाच्या रुपाने देव धावतो. पण केवळ तहानलेल्याला पाणी मिळावे एवढाच त्याचा मर्यादित उद्देश नसतो. तर त्याला सर्व सृष्टीच जलमय करायची असते. देव भरभरून देत असतो पण घेणारा जीव प्यायला पाणी मिळाले म्हणून खुश असतो. त्याच्या या अल्पसंतुष्टपणाची देवाला काळजी वाटत असते. वर्षावामुळे निर्माण झालेल्या जलधारेने सरितेला मिळून सागराप...
Episode 214 as on 14th July 2023 14.07.2023 58:34
Guru Shishya Sukhsamwad as on 14th July 2023 *चिदानंद रुपः शिवोSहम शिवोSहम.* आनंदरुप संतसत्पुरुष अतिशय शुध्द व पवित्र अशा शिवरुपात वावरत असतात. मी शुध्द आहे , पवित्र आहे असे जरी ते म्हणत असले तरी आपल्या शिवत्वाचा त्यांना जराही अहंकार नसतो. म्हणूनच सर्वसामान्य जीवानेही शिवम अवस्थेपर्यंत यावे अशी त्यांची आंतरिक तळमळ असते कारण जीवावर त्यांचा जीव जडलेला असतो. पण या अमूर्त शिवम अवस्थेचा ध्यास सर्वसामान...
Episode 213 as on 11th July 2023 11.07.2023 1:04:33
Guru Shishya Sukhsamwad as on 11th July 2023 *सत्यम् ब्रूयात प्रियम् ब्रूयात* असे म्हटले आहे . याचा अर्थ प्रिय होणार असेल तेवढेच सत्य सांगावे. खरं तर ब्रह्म हेच निःसंदिग्ध सत्य आहे व जे जे दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे हे सत्यवचन सर्वसामान्य जीवाला पेलवण्यासारखे नाही. म्हणून सत्यम् ब्रूयात प्रियम् ब्रूयात. सद्गुरुंच्या अंतःकरणात सत्य हे नेहमीच स्फुरत असते. म्हणून त्यांच्या वचनातून मुलभूत सत्यच प्रकट...
Episode 212 as on 7th July 2023 07.07.2023 57:49
Guru Shishya Sukhsamwad as on 7th July 2023 संतसत्पुरुषांचे पक्षी ईश्वराचे शुभ आशिर्वाद सर्वसामान्यांना सदा सर्वकाळ उपलब्ध असतात. पण या आशिर्वादातून प्राप्त होणारा शुभलाभ क्वचित एखादाच त्या ईश्वराला समर्पित करतो. देवत्व देवाया ठायी असते . देवत्व हा देवाचा अनुभव असतो. भक्त देवाला जेव्हा त्याला झालेल्या लाभाचा लाभांश अर्पण करतो तेव्हा त्या भक्ताच्या स्वरुपात व सहवासात देव आपल्या देवत्वाच्या अनुभवाचा...
Episode 211 as on 4th July 2023 - Gurupoornima 04.07.2023 1:10:03
Guru Shishya Sukhsamwad as on 4th July 2023 संत सत्पुरुष जनउध्दाराचे कार्य सदगुरुभक्ती म्हणून करतात व हे कार्य सदगुरुंनाच समर्पित करतात. दुःखितांचे सांत्वन करणे व सुखितांना सावध करणे हा त्यांच्या कार्याचा भाग असतो. सुखाच्या शोधात चरणाशी आलेल्या प्रेमीजनांना आधार देत असताना खरे सुख कशात आहे हे सांगत असतात. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणार्या प्रेमीजनांना शांती व समाधानाचा अनुभव निश्चि...
Episode 210 as on 30th June 2023 30.06.2023 1:03:15
Guru Shishya Sukhsamwad as on 30th June 2023 प्रपंचात सुखाची प्राप्ती हा एक भ्रम असल्यामुळे सुखामुळे समाधान लाभत नाही आणि दुःख असेल तर मनाला शांती मिळणे अशक्यच. संसार भ्रामक आहे हे ज्ञान बुध्दीला होते मग ईश्वरापाशी या भ्रांतिचे निरसन होऊन समाधान व शांतीच्या प्राप्तीसाठी आळवणी केली जाते. शांती व समाधान हवे आहे पण संसारभाव सुटत नाही . मग मनाला शांती व समाधान कसे मिळणार ? त्यासाठी संतसत्पुरुषांच्या ज...
Episode 209 as on 27th June 2023 27.06.2023 58:29
Guru Shishya Sukhsamwad as on 27th June 2023 ऋषिमुनींची ध्यानधारणा श्वास आणि उच्छवासाच्या नादामध्ये सहजपणे होत असते. अशी निःशब्द ध्यानधारणा सर्वसामान्य जीवाला जमण्यासारखी नसते. म्हणून ऋषिमुनींनी श्वासाच्या नादाला ॐ या एकाक्षरी शब्दाचे रुप दिले. पुढे त्यांनी या एकाक्षरी शब्दाचे *ॐ भगवते वासुदेवायनमः* किंवा तत्सम जपाच्या रुपाने विस्तार करून सगुणाचे ध्यान करायला प्रेरित केले. पण मनात संसारभाव असल्याम...
Episode 208 as on 23th June 2023 23.06.2023 1:01:58
Guru Shishya Sukhsamwad as on 23rd June 2023 बाह्यांगाचे जीवन सुगम व्हावे म्हणून कुटुंबाच्या रुपाने ईश्वराने सुविधा निर्माण केल्या. या सुविधांचा किमान लाभ घेता घेता संसारभावाचा त्याग करायला हवा. किंबहुना तो मूळापासूनच नष्ट करायला हवा. त्यासाठी सुखी संसाराची वाट सोडून पंढरीच्या दिशेने पाऊले पडायला हवीत. प्रभूंच्या ईश्वरी प्रेमाचा स्पर्श झाला तर या वाटेवर मार्गक्रमण करायला प्रेमीजीवाला प्रेरणा मिळते...
Episode 207 as on 20th June 2023 20.06.2023 53:03
Guru Shishya Sukhsamwad as on 20th June 2023 प्रत्येक संत सत्पुरुषाचे व्यक्तीमत्व व वृत्ती जरी भिन्न असली तरी श्रीहरीचा ध्यास हे सर्व सत्पुरुषांच्या जीवनचरित्राचे सामाईक सूत्र असते. आणि श्रीहरीच्या ध्यास म्हणजे सदगुरूंचाच ध्यास. या आंतरिक ध्यासाला बाह्य जगामध्ये वेड म्हणून संबोधले जाते. पण त्यांना त्याची पर्वा नसते कारण त्यांनी त्यांचे लक्ष्य निश्चीत केलेले असते. म्हणूनच ज्ञानदेव निवृत्तिनाथांच्या...
Episode 206 as on 16th June 2023 16.06.2023 1:06:28
Guru Shishya Sukhsamwad as on 16th June 2023 सत्यं शिवं सुंदरम् हे ईश्वराचे युगानुयुगाचे चिरंतन रुप आहे. कलीयुगामध्ये याच वचनाला मधुरम् ची जोड दिली गेली. ईश्वरत्वाच्या सत्यं , शिवं , सुंदरम् चा अनुभव सर्वसामान्य जीवाला येणार नाही म्हणून संत सत्पुरुषांच्या रुपाने या वचनातील अंगभूत गोडी चाखण्याची सोय केली. जीवाला सत्पुरुषांच्या सहवासाच्या गोडीची ओढ लागली व त्या गोडीतच तो रमला. प्रेमाचे सुख मिळाले व...
Episode 205 as on 13th June 2023 13.06.2023 56:31
Guru Shishya Sukhsamwad as on 13th June 2023 सुखाच्या शोधात असलेला सर्वसामान्य जीव संत सत्पुरुषांच्या चरणापर्यंत पोहचतो. सत्संगतीमध्ये त्याला सुख लाभते तसेच त्याच्या सहवासात सत्पुरुषालाही सुख लाभते. जीवाचे सुख हे प्रेमाचे सुख असते तर सत्पुरुषाचे सुख आनंदाचे असते. जीवाचे सुख प्रेमाचे असल्यामुळे सत्पुरुषापासून दूर गेल्यावर तो सुखाला मुकतो. उलट सत्पुरुष नित्यानंदात असल्यामुळे ते नेहमीच त्यांच्या स्वा...
Episode 204 as on 9th June 2023 09.06.2023 59:37
Guru Shishya Sukhsamwad as on 9th June 2023 सूर्याची उर्जा हे सृष्टीच्या कार्याचे कारण आहे हे वास्तव शास्त्रज्ञांनी शोधून काढले. पण सूर्याच्या उर्जेचे मूळ श्रीहरी आहे हे संत सत्पुरुषांनी जाणले. जीवामधील चैतन्याचे मूळही श्रीहरीच आहे. तत्वज्ञांनी सुध्दा श्रीहरी हेच सत्य आहे हे मान्य केले. पण तत्वज्ञांना तत्सत् आणि शास्त्रज्ञांना चैतन्या शोध लागूनही आनंदाचा अनुभव घेता आला नाही. ते सत् व चित यामध्येच...
Episode 203 as on 6th June 2023 06.06.2023 57:16
Guru Shishya Sukhsamwad as on 6th June 2023 संत सत्पुरुष नेहमीच स्वानंदात रमलेले असतात. पण स्वतःमध्ये रमलेले असूनही त्यांना जीवाचे आकर्षण असते. कारण उभयतांचे जड देह जरी भिन्न असले तरी उभयतांमध्ये तरल चैतन्य एकच असते. सदगुरुंनी शिष्याच्या ठिकाणी लावलेले गुरुबीज त्यांच्याच फलरुप अवस्थेतून निर्माण झालेले असते. संस्कारित वृक्ष मूळ फळलेल्या वृक्षापेक्षा भिन्न असला तरी दोन्ही वृक्षांचे बीज एकच असते. म्ह...
Episode 202 as on 2nd June 2023 02.06.2023 58:27
Guru Shishya Sukhsamwad as on 2nd June 2023 ईश्वरीप्रेमाचा अनुभव मनाला यावा म्हणून ईश्वराने देहाची व इंद्रियांची योजना केली. पण जीव देहालाच चिकटून राहतो. संत सत्पुरुषांचे ईश्वरी प्रेम त्याला आकर्षित करते पण त्या प्रेमाचा अनुभव घेता येत नाही कारण देहाभिमान आडवा येतो. प्रेमाची भूक असते पण बाह्यांगाने भूक भागल्यासारखी वाटली तरी मनाला तृप्तीचे सुख मिळत नाही. खूपदा भूक लागली तरी देहाच्या मीपणामीळे भोजन...
Episode 201 as on 30th May 2023 30.05.2023 1:06:38
Guru Shishya Sukhsamwad as on 30th May 2023
Episode 200 as on 26th May 2023 26.05.2023 1:02:16
Guru Shishya Sukhsamwad as on 26th May 2023 मानसशास्र शास्र म्हणून विकसित झाले असेल कदाचित पण खरं तर मनाचे म्हणून असे कुठले शास्र असू शकत नाही . बरं मनाचा अभ्यास करणार तरी कोण ? तर बुध्दी तोही तिच्या बुध्दीने .म्हणजे नुसतेच शब्दाचे बुडबुडे. मनाला प्रेमाची आस आहे तर बुध्दीला ज्ञानाचा हव्यास आहे. म्हणून बुध्दीने मनाची अवस्था जाणून घेता येणे शक्य नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम व अनुभवाचे ज्ञान आहे ....
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.