Sudhakar Chodankar
Sudhakar Chodankar
देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.
Author
Sudhakar Chodankar
Category
Podcast website
Latest episode
Jan 15, 2025
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आनंदतरंग – 15.01.2025 18:20
तरंग आनंदाचे असतात, पण ते निर्माण होत असतात आनंदाच्या स्थितीतून. जसे सागराच्या लाटा या सागरातच निर्माण होतात आणि त्यातच विलीन होतात. सागराच्या सातत्याच्या भरलेपणाच्या स्थितितूनच या लाटा निर्माण होतात. अगदी असेच भक्ताचे होत असते. तरंग क्षणभंगुर असतात पण मूळ अस्तित्व हे मात्र कायमचे असते. तसेच भक्ताची आनदाची स्थिति मात्र कायमची असते. असे का व कसे घडते ते पाहू या एपिसोडमधून
हरीने डाव मांडीला हो – 01.01.2025 17:39
अनुभवास येणारे समग्र अस्तित्व हे केवळ एकमेव श्रीहरीचेच लीला लाघव आहे. विश्वरूपाने श्रीहरीचाच खेळ चालूआहे हा भक्ताचा अनुभव आहे. म्हणूनच तो म्हणतो “ हरीने डाव मांडीला हो – या डावाचे नावची संसार, हरी त्यात करी नित्यची संचार “ असे हा भक्त का म्हणतो ? हे पाहू या एपिसोड मध्ये.
आनंदाचा ठेवा आम्हासीच ठावा- 15.12.2024 17:50
देवाचा भक्त हा सदैव आनंदात असतो. आनंद ही स्थिति आहे भक्ताची. समुद्र जसा कायम भरलेला असतो तसा भक्त देखील आंतरिक देवप्रेमाने भरलेला असतो. हे भरलेपण भक्ताचा स्थायीभाव आहे. मोर नाचून आनंद घेतो या पेक्षा आंनंदातून नाचतो. भक्त काही करून आनंद घेतो असे नाही तर त्याची हरएक कृती उक्ती आंतरिक आनंदातून उद्भवते. असा हा भक्त नेमका कसा घडतो हे प्रकट होत आहे या एपिसोडमधून.
समर्पण- सहज,स्वाभाविक स्थिति 01.12.2024 18:54
भगवंताच्या भक्ताची सहज स्वाभाविक स्थिति म्हणजे समर्पण. तसे अनेक जण एखादी कृती म्हणा यश म्हणा वा यशातून झालेली प्राप्ती कुणाला तरी समर्पित करत असतात परंतु भक्त मात्र देवाला सर्वस्वी समर्पितच असतो. भक्ताची केवळ कृती नाही तर त्याचे अस्तित्वच देवाला सातत्याने समर्पित असते. असा हा भक्त कसा असतो हे प्रकट होतेय या एपिसोडमधून.
एक रंग तुझा खेळे- 15.11.2024 22:35
भक्त केवळ एकीएक भक्तीरंगातच रमत असतो. तसे रंग अनेक आहेत. इतर रंगांचा राग नाही की हव्यासही नाही. वास्तविक काचेच्या लोलकातून प्रकाशाचा किरण गेला की विविध रंगांची उधळण होते. सार्याच रंगांची उत्पत्ति, स्थिति अन विलय या किरणातच होत असते. ऊर्जा , स्त्रोत, चेतना एकच आहे. अगदी तसेच सार्या अस्तित्वाची उत्पत्ति, स्थिति अन विलय या एकमेव ईश्वरी अस्तित्वातच होत असते. भक्त याच अस्तित्वाचा होऊन रहातो म्हणून...
नारायणायेति समर्पयामि- 08.11.2024 19:08
भक्त देवाला समर्पितच असतो. खरेतर समर्पिताला मी समर्पित आहे असे सांगताही येत नाही. तरंग पाण्यापासून वेगळा नसतोच. मी पाण्याला समर्पित आहे असे सांगणे संभवतच नाही. अनुभवास येणारे समग्र अस्तित्व देवाचेच रूप आहे. मी देखील याच अस्तित्वाचा आहे तर मग “ मी” हा शब्द येईलच कसा? शब्दांची समज या एकरूपतेचा अनुभव नाही देऊ शकत. पराकोटीच्या भक्तीतूनच या अनुभवाचे होता येते. असे प्रकट होत आहे या एपिसोडमधून
चिंतनाचे सुखे, तुका म्हणे, नेणे दु:खे- 01.11.2024 21:12
चिंतनाच्या अवकाशात जेव्हा साधक स्वताला अनुभवतो तेव्हा दु:खाची तेवढी झळ त्याला लागत नाही. दुखाचा समूळ नाश होतो असे नाही मी म्हणत. पण दुखापासून काही प्रमाणात फारकत होते हे निश्चित. चित्त स्थिर असेल, तर दु:ख वेगळेपणाने पहाण्याची किमया साधकाला हळू हळू साधत जाते. देव प्रेमी रमे तो मी- ही खरी ओळख सिद्ध होत जाते भक्ताची. अन मी दु:खाचा नाही लागत हे भान येते साधकाला. असेच रुपांतरण होत रहाते भक्ताचे – हे...
पाहू देवरुप छान – 25.10.2024 19:59
देवळातल्या देवाला , मूर्तीतल्या देवाला पहाता येते. पाहून आनंदही होतो. हा भविकाचा अनुभव झाला. पण देवाला जर स्वताच्या हृदयात अनुभवायचे असेल तर त्याचे स्वरूप जाणावे लागेल. “ देवाचे स्वरूप जाणून, पाहू देवरुप ते छान” भक्ता कडून हे जाणणे घडते तेव्हा हा देव प्रसन्न होतो भक्ताला पाहून. असेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून -
राघवी वस्ती किजे- 18.10.2024 21:11
समर्थ रामदास स्वामी मनाला प्रार्थना करतात – “ मना सज्जना राघवी वस्ती किजे-“ प्रभुरामांच्या भक्तीतूनच राघवी वस्ती होऊ शकते. भगवंताच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी घडणार्या स्मरण, मनन चिंतनातून, ध्यासातून भक्त राघवी वस्तीला पावतो. प्रभुराम रामनवमीला जन्मले. भक्त देखील रामांच्या नवविधा भक्तीने सर्वस्वी प्रभुरामांचा होऊन रहातो- या एपिसोडमधून हेच प्रकट होत आहे.
भक्ति आता, या घडीला, नंतर नाही – 11.10.2024 22:26
भक्ति ही वर्तमानाची आहे. पूजा केली किवा उद्या करेन असे म्हणता येते, भक्तीच्या बाबतीत हे शक्य नाही. सातत्याची नाही ती भक्तिच नाही. भक्ति हा तत्कालिक भाव नाही तर स्वभाव आहे, भक्ति कृती नाही तर वृत्ती आहे. कसे ते पहा या एपिसोड मधून -
नको डोळे भरून पाहुस सावळ्या हरीला – 04.10.2024 16:51
अगं राधे, तू डोळे भरून पाहतेस या सावळ्या हरीला तर मग, काजळ लावायला डोळ्यात जागाच उरणार नाही ! अशी चिंता राधेच्या सखीला पडली. पण राधा सखीच्या या प्रश्नाला बेमालूम आंतरिक भक्तीच्या भरलेपणातून असे काही उत्तर देते की आपण चकित व्हाल – तेच ऐकू या एपिसोड मधून
देव रोकडा संत सज्जनी- 27.09.2024 21:02
भाविकाला मूर्तितला, तसबीरीतला देव पुरेसा होत असेल, पण भक्ताला मात्र देव प्रत्यक्षाचा लागतो. त्याच्या सारखा हाडा मासाचा. तसबीर, फोटो पाहून निवड करता येते. पण लग्न व्हायचे असेल तर तसबीर नाही पुरेशी. प्रत्यक्ष व्यक्ति हवी. तसा देवही रोकडा हवा. असा हा रोकडा देव केवळ अन केवळ संत सत्पुरुषांच्या रूपानेच आपलासा होतो. जिथे भक्त पूर्णत्वाला पोचतो. असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोडमधून
भेट अधूरी राही तरीही- 20.09.2024 21:45
मित्रांनो, भक्त प्रकट करतोय आपली व्यथा. देवा, तुझी भेट कितीही झाली तरी अपुरीच पडते मला. खरे तर प्रेमात आगतिक झालेल्या आपल्या प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. भक्त काही अपवाद नाही. परंतु या व्यथेवर देव भक्ताला जे सांगतो ते विलक्षण आहे. ते देवाचे सांगणे (वचन) जेव्हा भक्ताचे जीवन होते तेव्हा अखंड मिलनाचा अनुभव भक्त घेत असतो. तो कसा तेच पाहू , या एपिसोड मधून
मन मंदीरा तेजाने - 12.09.2024 20:56
मनाला मंदिर म्हटले आहे. आपण मंदिर कशाला म्हणतो ? ज्या वास्तूत देवाची प्रतिष्ठापना झाली आहे त्याला. माझ्या मनात देवाची अशी स्थापना झाली आहे का ? तरच मनाला मंदिर म्हणता येईल ना? केवळ स्थापना होणे पुरेसे नाही तर तसे पावित्र्य, तशी सजावट , तशी नित्याची साधना घडते आहे का ? अशाच प्रश्नाचा शोध घेत आहे साधक या एपिसोड मधून-
नमिला गणपति 06.09.2024 22:28
श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग म्हणताना माझ्या कडून नमन घडत असते. पण म्हणून झाल्यावर मनात सारखी खंत येत रहाते. “ नमिला गणपति” म्हणतो मी पण गणपति अजून मिळालाच नाही असे वाटत असते. गणपति अजून लाभलाच नाही मला. असे का होते हेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून -
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान- 30.08.2024 21:48
भाविक आणि भक्त यात फरक आहे. भाविक भक्त होईलच असे सांगता येत नाही. तशी संभावना असते. भक्ताचा प्रवास म्हणजे साधकत्व. साधक होणे म्हणजे प्रयोगशील होणे. सद्गुरुवचन जीवनात उतरविण्यासाठी प्रयत्न हाच प्रयोग. यातूनच देव भेटीचा योग घडतो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान – हे भक्ताचे उद्गार – त्याच्या आंतरिक स्थितीची चाहूल देतात. ही दत्ताची आरती , केवळ शाब्दिक , वा भावनिक त्यावेळेपूर्ती आर्तता नाही तर साधकाचे समग्र...
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल- 23.08.2024 20:55
श्री संत तुकाराम महाराज सांगत आहेत. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. मला तर जाणवते आहे की साक्षात विठ्ठलच बोलतोय श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखातून. असे काय बोलतोय तेच ऐकू या एपिसोडमधून “बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव”
आवडे निरंतर हेचि ध्यान- 16.08.2024 21:52
श्री संत तुकाराम महाराज अगदी आनंदाने सांगत आहेत. आवडे निरंतर हेचि ध्यान. ही त्यांची आवड काही क्षणाची , वेळेची नाही. माझीही आवड निवड असते. पण आजची आवड उद्या नावड होऊ शकते माझी. इथे तर संत तुकाराम महाराज आवडी निवडीच्या पलीकडे पोचले आहेत. आवडे निरंतर असे म्हणत आहेत ते. आता हे ध्यान कुणाचे ? केवळ मूर्तीचे ?की जिला पहाता पहाता ते अंतरंगातून अखंड ध्यानमग्न झाले. या ध्यानाबद्दल बोलत आहेत की काय ? हेच ऐ...
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे- 09.08.2024 21:06
सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच भक्ताला येतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे- सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. प...
मेरे जिंदगीमें हुजूर आप आये 02.08.2024 22:07
भगवंत जेव्हा भक्ताच्या अनुभवाचा होतो तेव्हा भक्त कृतार्थ होत असतो. या कृतार्थतेतूनच भक्त नितांत कृतज्ञ रहातो देवाचा. कारण आता देव हा भक्ताच्या जीवनात संचारून असतो. या अशा आंनंदातून तो गातो " बहुत शुक्रिया बडी मेहरबानी , मेरे जिंदगीमे हुजूर आप आये. सर्वांगाने भक्ताचे प्रिय करतो तोच खरा प्रियकर अन भक्त त्याची प्रेयसी - ती गाते या एपिसोडमधून -
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो – 26.07.2024 22:55
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो – संत ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वासाठी पसायदान मागते . आत्यंतिक कारुण्याने.“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो “ हे मागणे का आहे तर दुरितांचे तिमिर म्हणजे त्यांचा अज्ञान रूपी अंध:कार नाहीसा होवो. पण अंधार आहे की नाही हे डोळे उघडल्याशिवाय कसे कळणार? आता माऊली माझे डोळे कसे उघडणार? मलाच हे करावे लागेल. हेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून -
अब हरी है, मै नाहि- 19.07.2024 20:52
अब हरी है, मै नाहि- परमेश्वराचे महान भक्त संत कबीर म्हणतात “अब हरी है, मै नाहि “ संत कबीर जे स्वताला “मी नाही” म्हणतात. जर मीच नाही तर “ अब हरी है मै नाही” हे ते कसे म्हणू शकतात? माझा आत्मविश्वास आहे की संत कबीर जे सांगत आहेत ते अंतिम सत्य आहे. तेच आता ऐकू या या एपिसोड मधून.
शब्देविण संवादु दुजेविण अनुवादू- 12.07.2024 22:55
शब्दांशिवाय संवाद – दूसरा असल्याशिवाय अनुवाद शक्य आहे का ? पण संत ज्ञानेश्वर माऊली अशक्य ते शक्य करून दाखवते केवळ स्वानुभवाने. शब्द देखील प्रतिमा आहेत. त्या प्रत्यक्षापर्यंत नाही नेऊन ठेवत. आरशातील प्रतिमा जशी दुसरी असते तसेच शब्दांचे आहे. रूप, रस, गंध, स्पर्ष आणि नाद ज्या एकत्वातून उद्भवतात पुन्हा त्याच एकत्वात विलीन होतात या जाणिवेकडे माऊली निर्देश करताना मी त्या ध्यासाचा होऊन राहतो. असेच प्रकट...
ठेविले अनंते तैसेची रहावे 05.07.2024 21:22
ठेविले अनंते तैसेची रहावे – वास्तविक ज्याने मला ठेवले आहे तो अनंत कोण ? हा जो मला ठेवणारा अनंत, तो मुळात कसा आहे ? त्याला मी कसे रहावे हे आभिप्रेत आहे? हे सारे प्रश्न भविकाला पडत नसतील पण भक्ताला मात्र पडतात हे खरे? किंबहुना ज्याला पडतात तोच भाविक भक्त होण्याची शक्यता असते. भक्ताचे प्रश्न केवळ कुतुहल वा जिज्ञासा एवढ्या पुरते नसतात. भक्ताचे प्रश्न पडत नाहीत तर कायमचे समोर उभे रहातात ठामपणे अन भक...
जेणे बोले विठ्ठल डोले - 28.06.2024 18:48
जेणे बोले विठ्ठल डोले - संतांचे सहज बोलणे हा त्यांच्या अलौकिक आंतरिक आनंदाचा सहज उत्सव असतो. किंबहुना त्यांच्या रूपाने भगवंतच साकार होत असतो. “ बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले” या संत नामदेव महाराजांच्या शब्दातून मला जाणवतेय की प्रत्यक्ष पांडुरंगच डोलतोय त्यांच्या रूपाने. चला तर आपणही काहीसा फील घेऊ या आनंदाचा -
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.