Veena World

Around The World

Society MR ↓ 33 episodes

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.   हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.   ही सिरीज म्हणजे कुत...

Author

Veena World

Category

Society

Podcast website

www.spreaker.com

Latest episode

Jul 3, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

एका आर्किटेक्टच्या नजरेतून जग पाहिलं आहे का? 🏛️🌍 | संदीप शिक्रे | Veena World 03.07.2026

Can architecture change the way we travel? In this special episode of Around The World, renowned architect Sandeep Shikre joins Sunila Patil for a fascinating conversation that reveals how architecture shapes tourism, cities, culture, and the way we experience the world. From designing the Veena World studio, corporate office and branding to landmark projects like the National Salt Satyagraha Memo...

"तुमचा प्रवास सोशल मीडियाने ठरवू देऊ नका” ✈️📱 | ओंकार आणि शार्दूल | Veena World 19.06.2026

युरोपच्या रस्त्यांपासून इटलीच्या फॅशनपर्यंत, गोव्याच्या म्युझियम्सपासून श्रीनगरच्या स्थानिक जीवनापर्यंत 🌍✨, ओंकार जाधव आणि शार्दूल कदम यांच्यासोबतचा हा भाग आजच्या प्रवास संस्कृतीकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावतो. कॅप्री, इटलीमध्ये पाहिलेल्या एका महागड्या शर्टच्या किस्स्यापासून या गप्पांची सुरुवात होते. त्यानंतर त्या युरोपमधील अनुभवांपर्यंत आणि प्रवासामुळे निरीक्षणशक्ती, आवडीनिवडी आणि दृष्टीकोन कस...

Travel Is About Observation, Not Just Destinations | Rajiv Khandekar | Veena World 05.06.2026

पत्रकारिता, फेक न्यूज, प्रवास, समाज आणि माणसांचं वर्तन 🌍✨, राजीव खांडेकर यांच्यासोबतचा हा भाग फक्त प्रवासापुरता मर्यादित राहत नाही. सोशल मीडियामुळे वाढलेल्या फेक फॉरवर्ड्स आणि चुकीच्या माहितीपासून या गप्पांची सुरुवात होते. कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं किती महत्त्वाचं आहे, यावर ते स्पष्टपणे बोलतात. मुंबईने त्यांना कसं घडवलं, दिल्लीमुळे भारताकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलली,...

From Driverless Taxis to Gorilla Trekking... Most Incredible Travel Experiences by Dr. Sarita & Milind Davare 22.05.2026

परफ्यूम्सपासून पेन मॅनेजमेंटपर्यंत, आणि तंत्रज्ञानापासून वन्यजीवनापर्यंत, मिलिंद डावरे आणि डॉ. सरिता डावरे यांचा प्रवास म्हणजे अनुभवांची आणि जिज्ञासेची सुंदर कहाणी आहे. या भागात ते सांगतात की जगभरातील प्रवासांनी त्यांच्या विचारांना आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला कसा आकार दिला. मिलिंद डावरे सांगतात की परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये ४५ वर्षे काम करताना त्यांना जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली. कधी...

Living in the Present Is an Art 🌿✨ | Amruta Subhash on Travel, Theatre & Life | Veena World 22.05.2026

बालपणापासून मिळालेली वाचनाची सवय, शिस्त आणिकलेचा प्रभाव, आणि तिथून जगभरातील रंगमंचांपर्यंतचा प्रवास 🌍अमृता सुभाष यांचा प्रवास म्हणजे कला आणि आयुष्ययांचा सुंदर संगम आहे. या भागात त्या सांगतात कीआजीच्या लायब्ररीपासून आईकडून मिळालेल्या शिस्तीपर्यंत, आणि अभिनय, गायन, नृत्य शिकताना त्यांना कसं जाणवलं कीसर्व कला एकमेकांशी जोडलेल्याआहेत.  🎭सत्यदेव दुबे यांच्याकडून घेतलेलं शिक्षण, ब्रॉडवेचा अनुभव, जपानम...

Pune to Global Stages ✈️🎶 | सावनी रवींद्रचा प्रवास | Veena World 01.05.2026

 लहानपणी पुणे, मुंबई आणि चिंचवड दरम्यान प्रवास करणाऱ्या कलाकारापासून ते जगभरात परफॉर्म करणाऱ्या गायिकेपर्यंत 🌍 सावनी रवींद्रचा प्रवास म्हणजे संगीत आणि आवडीची कहाणी आहे. या एपिसोडमध्ये ती मंगोलियाचा ‘नो-कार डे’, इस्रायलमधील परफॉर्मन्स, न्यूझीलंडमधील हनिमून आणि अचानक ठरलेले शो अशा अनेक अनुभवांबद्दल सांगते ✈️ स्थानिक संगीत, अन्न आणि संस्कृतीबद्दलचं तिचं प्रेम, मजेशीर किस्से आणि “संगीत हीच एक भाषा आह...

Experience is the Biggest Roadblock to Creativity" ft. Bharat Dabholkar (भरत दाभोळकर) | Veena World 27.04.2026

 तुमचं ज्ञान आणि अनुभवच तुमच्या प्रगतीचा अडथळा ठरू शकतात? जाहिरात क्षेत्रातील “बादशहा” भरत दाभोळकर यांचा हा विचार तुम्हाला चक्रावून टाकेल.  अमूलच्या जाहिरातींमधून देशाला मिश्किलपणे आरसा दाखवणारे आणि एअर इंडियाला वेगळी ओळख देणारे भरत दाभोळकर हे नियमांच्या चौकटीत न बसणारं व्यक्तिमत्व आहे.  ऑफिसमध्ये पिरान्हा मासे पाळण्यापासून ते आफ्रिकेच्या जंगलात गोरिलांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक...

Unexpected Travel Stories & Life Lessons ft. Sonali Kulkarni | Veena World 17.04.2026

प्रवास म्हणजे फक्त प्रेक्षणीय स्थळं बघणं की स्वतःला नव्याने शोधणं? ‘अराउंड द वर्ल्ड’च्या या भागात आपली पाहुणी आहे सोनाली कुलकर्णी. तिने फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही जग अनेक भाषांमधून आणि अनेक नजरेतून अनुभवलं आहे. या गप्पांमध्ये तुम्हाला भेटेल एक वेगळीच सोनाली. तिच्यासाठी प्रवासाची व्याख्या म्युझियम्स बघण्यापेक्षा तिथे राहून लोकांसाठी स्वयंपाक करण्यात दडलेली आहे. रोमला १५ दिवस का द्यावे...

Episode 25 ft. RJ Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी) | Around The World | Veena World 10.04.2026

आवाजाच्या दुनियेतून प्रवासाच्या जगात, एक वेगळाच प्रवास!या भागात आपण भेटतो एका रेडिओ जॉकी ज्ञानेश्वरी ला, जिचा आवाज तुम्ही तासन्तास ऐकू शकता. पण तिच्या प्रवासाच्या कथा तुम्हाला अजून जास्त गुंतवून ठेवतात. एका १ तासाच्या शोमध्ये RJ नेमकं किती आणि कसं बोलतं? इथून सुरू झालेल्या या गप्पा आपल्याला घेऊन जातात गिरगावच्या गल्ल्यांमध्ये. तिथे बालपण, खाद्यसंस्कृती आणि ‘वाड्यां’वरून ओळखल्या जाणाऱ्या जागांची एक...

Episode 24 ft. Achyut Godbole (अच्युत गोडबोले) | Around The World | Veena World 06.04.2026

ज्ञान, जिज्ञासा आणि सतत शिकत राहण्याची भूक या सगळ्यांचा संगम असलेला हा खास भाग आहे. या भागात आपल्यासोबत आहेत प्रख्यात लेखक आणि विचारवंत Achyut Godbole. IT, गणित, विज्ञान, कला, संगीत, संस्कृती आणि मानसशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी मांडलेले विचार या गप्पांमधून उलगडतात. लहानपणी १३ घरांमध्ये राहणं, IBM च्या इंटरव्ह्यूला पायजमा-बुशशर्टमध्ये जाणं, आणि सतत नवीन शिकत राहण्याची त्यांची वृत्ती या सगळ्य...

Episode 23 ft. Leena Bhagwat (लीना भागवत) | Around The World | Veena World 27.03.2026

आपण एखादं नाटक पाहतो तेव्हा त्यामागची मेहनत दिसते, पण त्या पात्रांना जिवंत करण्यासाठी एक कलाकार जग कसं पाहतो? ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या खास मुहूर्तावर, अभिनेत्री लीना भागवत यांनी उलगडलाय त्यांचा हा प्रवास! सुनीला पाटील यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की त्यांना समुद्रकाठापेक्षा डोंगरांची शांतता का आवडते. अमेरिकेत टेस्लामध्ये बसण्याचा अनुभव असो किंवा नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना भारत-...

Episode 22 ft. Shakti Salgaonkar (शक्ती साळगांवकर) | Around The World | Veena World 20.03.2026

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाचे संकल्प सोडताना, प्रवासाची एक नवी दृष्टी देणारा हा खास भाग!आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेलं 'कालनिर्णय' आजच्या डिजिटल युगात कसं बदलतंय, इथून या गप्पांची सुरुवात होते. शक्ती साळगांवकर सांगतात की, कालनिर्णय म्हणजे केवळ माहिती नाही, तर तो लोकांशी जोडलेला एक भावनिक धागा आहे. पण या वारशासोबतच शक्ती यांची एक 'ट्रॅव्हलर' म्हणून असलेली ओळख तितकीच र...

Episode 21 ft. Jitendra Joshi (जितेंद्र जोशी) | Around The World | Veena World 13.03.2026

जेव्हा वाटा संपतात आणि गोष्टी सुरू होतात!जितेंद्र जोशी — एक असा चेहरा ज्याने आपल्या अभिनयाने आपल्याला रडवलं आणि हसवलं सुद्धा. पण पडद्यामागचा हा ‘माणूस’ जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा तो फक्त प्रेक्षणीय स्थळं पाहत नाही, तर तो माणसं आणि त्यांच्या कथा शोधतो. या भागात जितेंद्र आपल्याला घेऊन जाणार आहेत त्यांच्या भारतभ्रमंतीच्या आणि जागतिक सफरीच्या अशा वळणांवर, जिथे कोणतंही नियोजन नव्हतं — होतं ते फक्त...

Episode 20 ft. Sharmishtha Raut (शर्मिष्ठा राऊत) | Around The World | Veena World 06.03.2026

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत. मनोरंजन विश्वातील ग्लॅमर आणि जबाबदाऱ्या सांभाळताना, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी त्या नेहमीच प्रवासाचा आधार घेतात. आपल्या अटींवर जगणाऱ्या आणि तितक्याच आवडीने जग फिरणाऱ्या शर्मिष्ठाचा हा सफरीनामा नक्कीच प्रेरणादायी आहे. कधी आलिशान हॉटेलमधील सुखसोयी तर कध...

Episode 19 ft. Mahesh Limaye (महेश लिमये) | Around The World | Veena World 27.02.2026

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत नॅशनल अवॉर्ड विजेते सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये. महेशजी हे केवळ एक उत्तम निरीक्षक नाहीत, तर ते एक अफाट स्टोरीटेलर आहेत. राजस्थान, काश्मीर, लडाख ते न्यूझीलंड, जपान आणि माचू पिचूपर्यंतचा त्यांचा प्रवास जेव्हा ते उलगडतात, तेव्हा त्यांच्या शब्दांमुळे ते संपूर्ण ठिकाण आपल्या डोळ्...

Episode 18 ft. Amey Kadam (अमेय कदम) | Around The World | Veena World 20.02.2026

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत अमेय कदम. अमेय हा केवळ एक कंटेंट क्रिएटर नसून, तो एक संवेदनशील फोटोग्राफर आणि Roadies 7 चा माजी स्पर्धक देखील आहे. पण या सगळ्यांत त्याची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे तो एक अफाट खाद्यप्रेमी आहे. हा एपिसोड अतिशय खास आहे, कारण या पॉडकास्टच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टुडिओमध्ये खाद्यपद...

Episode 17 ft. Dilip Prabhavalkar (दिलीप प्रभावळकर) | Around The World | Veena World 13.02.2026

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत खास पाहुणे — दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर. अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखतेच; पण या मनमोकळ्या गप्पांमध्ये यजमान वीणा पाटील यांनी त्यांच्यातील ‘निरीक्षक’ प्रवाशाला बोलते केले आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर तो माणसे आणि संस्कृती जवळून अनुभवण्याचा एक मार...

Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World 06.02.2026

 'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! ७ फेब्रुवारीपासून ‘Men’s T20 Cricket World Cup’ सुरू होत आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज असतानाच, या वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला आमच्या स्टुडिओमध्ये एक ‘चॅम्पियन’ व्यक्तिमत्त्व उपस्थित आहे — ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले. व्यावसायिक क्रिकेट पत्रकारितेमुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी मिळाली, पण या प्रवासात फक्त क्र...

Episode 15 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World 30.01.2026

'Around The World' पॉडकास्टच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे! वैधानिक इशारा: हा एपिसोड पाहण्याआधी पोटभर जेवून घ्या—नाहीतर व्हिडिओ पाहताना प्रचंड भूक लागेल! आजच्या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत आहेत ‘द कुणाल विजयकर’. एक उत्कृष्ट नट म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याहीपलीकडे ते अन्नाचे चालते-बोलते ‘इन्सायक्लोपीडिया’ आहेत. त्यांच्या पदार्थांच्या वर्णनानेच माणसाला भूक लागावी, अशी त्यांची हातोटी आ...

Episode 14 ft. Hon. Shri Nitin Gadkari (नितीन गडकरी) | Around The World | Veena World 23.01.2026

'Around The World' पॉडकास्टच्याया विशेष एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्षाच्यापार्श्वभूमीवर, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमाननीय श्री. नितीनजी गडकरी आणि वीणा पाटीलयांच्यातील हा विशेष संवादसादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. या एपिसोडचे वेगळेपण म्हणजे, पहिल्यांदाच आम्ही आमच्या पॉडकास्ट स्टुडिओच्या बाहेर जाऊन, थेट भारताच्या एकाकेंद्रीय मंत्र्यांच्या अध...

Episode 13 ft. Bharat Gothoskar (भरत गोठोसकर) | Around The World | Veena World 16.01.2026

 'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!  मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. आज आपल्यासोबत आहेत भारत गोठोसकर, ज्यांनी 'खाकी टूर्स'च्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाला आणि वारशाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. होस्ट नील पाटील यांच्यासोबतच्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये, भारत आपल्याला मुंबईच्या त्या भागात घेऊन जातात जिथे सहसा पर्यटकांची पावलं वळत नाहीत. परळ, ल...

Episode 12 ft. Ravi Jadhav & Meghana Jadhav | Around The World | Veena World 09.01.2026

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! सिनेमा बनवणारे जेव्हा स्वतः ‘प्रवासी’ बनतात, तेव्हा काय घडतं? या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्मात्या मेघना जाधव. 'नटरंग' आणि 'टाइमपास' सारख्या सुपरहिट कलाकृती देणाऱ्या या जोडीने या पॉडकास्टमध्ये आपल्या भटकंतीचे अनेक पैलू उलगडले आहेत. जपानमधील संस्कृती, तिथलं मनोरंजन आणि शि...

Episode 11 ft. Sarang Sathaye & Paula McGlynn | Around The World | Veena World 02.01.2026

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! २०२६ च्या पहिल्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागाची सुरुवात थोडी रोमँटिक आणि तितकीच अ‍ॅडव्हेंचरस आहे. होस्ट सुनीला पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत भाडीपा फेम आणि नवविवाहित जोडी—सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन. पुणे ते कॅनडा हे अंतर प्रवासाने कसं मिटवलं आणि त्यांच्या नात्याचा पाया ‘प्रवास’ कसा ठरला, याची ही गोष्ट आहे. या गप्पांमध्ये सारंगने...

Episode 10 ft. Sukirt Gumaste (सुकीर्त गुमास्ते) | Around The World | Veena World 26.12.2025

'Around The World' पॉडकास्टच्या या वर्षातील (२०२५) शेवटच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आपल्या प्रत्येकासाठी ‘जेवण’ हे गरजेचं असतं, पण काही जणांसाठी ती एक ‘भावना’ (Emotion) असते. या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत असेच एक अस्सल खवय्ये आणि प्रसिद्ध यूट्यूबर, सुकीर्त गुमास्ते. सुकीर्तसाठी प्रवासाचं प्लॅनिंग ‘डेस्टिनेशन’वरून नाही, तर तिथे काय ‘खायला’ मिळणार आहे, यावरून ठरतं! या गप्...

Episode 9 ft. Dr. Anand Nadkarni (डॉ. आनंद नाडकर्णी) | Around The World | Veena World 19.12.2025

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत त्यांच्यातील संवेदनशील ‘प्रवाशाला’. कोणार्कच्या सूर्यास्तासमोर किंवा जैसलमेरच्या वाळवंटात त्यांना स्वतःशी संवाद कसा साधता येतो? तुर्कस्तान, स्पेन ते भूतान आणि आफ्रिका… ‘निवांत’ प्र...

Listen to the Around The World podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.