Veena World
Around The World
प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास. हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी. ही सिरीज म्हणजे कुत...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Episode 8 ft. Girish Kuber (गिरीश कुबेर) | Around The World | Veena World 12.12.2025 2:00:15
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात, वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्याशी. त्यांचा प्रवास हा फक्त ठिकाणांना भेट देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तिथल्या समाजाचा आणि संस्कृतीचा अभ्यास आहे. पाश्चिमात्य देशांतील शिस्त आणि शहरांचे नियोजन त्यांना का भावते? 'रस्त्यांवरील ट्रॅफिक' आणि 'माणसांचे वागणे' यांचा एकमेकांशी काय स...
Episode 7 ft. Girija Oak Godbole (गिरीजा ओक गोडबोले) | Around The World | Veena World 05.12.2025 1:03:49
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात, होस्ट सुनीला पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत आपल्या सर्वांची लाडकी गिरीजा ओक गोडबोले. आपण त्यांना 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखतो, पण या पॉडकास्टमध्ये तुम्हाला भेटेल एक 'लहरी' आणि जबाबदार 'सोलो ट्रॅव्हलर' गिरीजा. या गप्पांमध्ये त्यांनी महिला पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल (Women's Safety) खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, जे प्र...
Episode 6 ft. Vishal Kamat (विशाल कामत) | Around The World | Veena World 28.11.2025 1:10:31
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आजच्या भागात, होस्ट नील पाटील गप्पा मारत आहेत 'द ऑर्किड हॉटेल्स' चे CEO—विशाल कामत यांच्याशी. विशाल कामत हे नाव फक्त एका हॉटेलिअरचं नाही, तर जबाबदार पर्यटन रुजवणाऱ्या एका विचाराचं आहे. या गप्पांमध्ये त्यांनी उलगडला आहे 'ऑर्किड' चा प्रवास — जो फक्त बिझनेस नाही, तर निसर्गाला परत देण्याचा एक वसा आहे. मग ते टर्टल कॉन्झर्व्हेशन असो क...
Episode 5 ft. Dr. Sandesh Mayekar (डॉ. संदेश मयेकर) | Around The World | Veena World 21.11.2025 1:36:05
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत डॉ. संदेश मयेकर – ज्यांना 'Father of Aesthetic Dentistry in India' म्हणून ओळखले जाते. एका सामान्य प्रवासापासून ते जागतिक स्तरावरील या क्षेत्राचे नेतृत्व करण्यापर्यंतची त्यांची कहाणी, या मनमोकळ्या संवादात उलगडते. जगभरात ज्ञान आणि व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रवास, प्रवासातून त...
Episode 4 ft. Rohan Mapuskar (रोहन मापुस्कर) | Around The World | Veena World 14.11.2025 1:03:49
Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! On the occasion of Children's Day, our guest is Rohan Mapuskar. He's a renowned Casting Director and Director of 'April May 99' (a film celebrating children and Konkan)... but beyond that, he's an incredible storyteller with a deep love for his roots. This casual chat explores his personal memories from his village in Konkan, his passion...
Episode 3 ft. Indraneel Chitale | Around The World | Veena World | Chitale Bandhu 24.10.2025 1:13:41
‘Around The World’ पॉडकास्टच्या नवीन भागात आपले स्वागत आहे! या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत इंद्रनील चितळे मनमोकळ्या गप्पा मारतायत. ‘चितळे बंधू’ या प्रतिष्ठित मराठी ब्रँडचे तरुण CEO म्हणून त्यांची ओळख आहे; पण त्यांच्या प्रवासाची आवड आणि जाण तितकीच प्रेरणादायी आहे. या सखोल संवादात ते कामामुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी कशी मिळाली हे सांगतायत. बिझनेस ट्रॅव्हलर, कुटुंबवत्सल प्रवासी आणि सोलो ट...
Episode 2 ft. Kavita Medhekar | Around The World | Veena World 10.10.2025 52:56
वीणा वर्ल्डच्या Around The World पॉडकास्टच्या या भागात आपल्यासोबत आहेत मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता मेढेकर! या खास भागात कविता मेढेकर ह्यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातून मिळालेल्या जग फिरण्याच्या भन्नाट अनुभवांबद्दल अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. मराठी नाटकांच्या प्रयोगांमुळे जगभर फिरायची मिळालेली संधी, परदेशात त्यांना करायला आवडणारी शॉपिंग, आणि जेटलॅगवरचे...
Episode 1 ft. Shri. Raj Thackeray | Around The World | Veena World | World Tourism Day 2025 27.09.2025 1:23:53
Veena World च्या 'Around The World' पॉडकास्टच्या पहिल्या-वहिल्या भागात रंगणार आहेत खास गप्पा. सोबतीला आहेत, माननीय श्री. राज ठाकरे! एक पर्यटनप्रेमी व्यक्तिमत्व असलेले श्री. राज ठाकरे या भागात त्यांचे स्वतःचे जगभरातील अनुभव मोकळेपणाने सांगतायत, जिथे त्यांनी केवळ विविध देशांच्या संस्कृती जाणून घेतल्या नाहीत, तर त्या समाजांची दूरदृष्टी आणि विचारसरणीही जवळून अनुभवली. त्यांचा प्रवास म्हणजे फक्त भटकंती...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.