BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

सत्यपाल मलिकना CBI नं का बोलावलं? 25.04.2023

जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्या राज्यातल्या कथित रिलायंस इन्श्यूरन्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे सत्यपाल चर्चेत आले होते. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक दोन फाईल्स पास करण्यासाठी लाच देऊ इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे?...

ट्विटरच्या ब्लू टिकचा गोंधळ का वाढलाय? कुठलं अकाउंट खरं, कुठलं फेक? सोपी गोष्ट पॉडकास्ट 22.04.2023

फुटबॉलपटू रोनाल्‍डो, अभिनेत्री आलिया भट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यात काय एक गोष्ट समान आहे, सांगा? कालपर्यंत या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होते, त्यांच्या नावापुढे ब्लू टिक दिसत होतं, पण आता नाहीय. फक्त यांचंच नव्हे तर अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं व्हेरिफिकेशन बॅज 20-21 एप्रिलच्या रात्रीतून ट्विटवरून उडालं आहे. पण मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकाउंटवर तर ब्लू टिक दिसतंय...

रमजान ईद आज आहे की उद्या? यावरून एवढा संभ्रम का? 21.04.2023

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा ले...

रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 21.04.2023

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा ले...

सुदानमध्ये संघर्ष का होतो आहे? 5 प्रश्न, 5 उत्तरं 20.04.2023

सुदानमध्ये सध्या देशाचं लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकलेत. सुदान ईशान्य आफ्रिकेतला एक मोठा देश. इथल्या साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येत मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण सुदान जगातल्या सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे. राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय. या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासारखा उष्माघात कसा टाळावा? 18.04.2023

पुन्हा उन्हाळा आलाय, पुन्हा पारा चढलाय आणि पुन्हा उष्णतेमुळे लोक हैराण झालेत. अशा उन्हात आपली लाही लाही होऊ नये, यासाठी काय करायला हवं?

अर्शद अतीक अहमद याच्या एन्काउंटरसारखी प्रकरणं उत्तर प्रदेशात का घडतात? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.04.2023

माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदला भीती होती की उत्तर प्रदेशात नेल्यावर त्याचा एन्काउंटर केला जाईल, पण 13 एप्रिलला त्याचा नव्हे तर त्याच्या मुलाचा झांशीजवळ एन्काउंटर झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर पोलिसांची पाठ थोपटली आहे, तर विरोधकांनी याला खोटा एन्काउंटर म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? एखादा एन्काउंटर खरा की खोटा, हे कसं ठरतं? आणि मुळात पोलिसांना कुणाला ठार...

भारतात समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल? सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.04.2023

भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे. लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या सुनावणीतून काय अपेक्षित आहे? जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो, जाणून घेऊयात. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोव्हिड पुन्हा फोफावतोय का? 13.04.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अमूल विरुद्ध नंदिनी वाद काय आहे? 12.04.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

GI टॅग काय असतं? आंबा, सोलापुरी चादरीचं ठिकाण निश्चित कसं होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 11.04.2023

नुकताच बनारसी पान आणि उत्तर प्रदेशात पिकणाऱ्या लंगडा आंब्यासह आणखी काही वस्तूंना GI टॅग मिळाला. पण हा टॅग आहे काय? तो देतं कोण? आणि त्यामुळे कुणाला कसा फायदा होतो? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

वाघांना वाचवण्यासाठी भारतात प्रोजेक्ट टायगर कसं सुरू झालं? 10.04.2023

एकेकाळी भारतात नेमके किती वाघ होते, याची ठोस आकडवारी सांगता येणार नाही. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात त्यांची संख्या वेगानं रोडावू लागली. यामागचं मुख्य कारण होतं शिकार आणि त्यासाठी बंदुका आणि धातुच्या सापळ्यांचा वापर. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर

तुमची गाडी खरंच किती सुरक्षित? हे कोण आणि कसं ठरवतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 07.04.2023

नुकतंच फोक्सवागन आणि श्कोडा कंपन्यांच्या या गाड्यांना नुकतंच सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळालं. तर मारुती सुझुकीच्या या गाड्यांना एक आणि दोन स्टार रेटिंग. पण मुळात कोणती गाडी किती सुरक्षित हे ठरतं कसं? पण हे रेटिंग देतं कोण? भारतीय गाड्या किती सुरक्षित आहेत? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अल अक्सा मशिद महत्त्वाची का आहे? 06.04.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

कच्चं तेल महागल्याने भारतातही पेट्रोल डिझेल महागेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 06.04.2023

ओपेक प्लस राष्ट्रगटानं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा अचानक वाढल्या आहेत. हा ओपेक प्लस गट काय आहे? त्यांनी अचानक तेलाचं उत्पादन कमी का केलं आहे? आणि या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का? 04.04.2023

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे. पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे? 03.04.2023

वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरव...

नवीन आर्थिक वर्षांत खर्च आणि गुंतवणुकीचं गणित असं बसवा 31.03.2023

पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे. पाहुया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात तुमच्याकडच्या पैशांचं अधिक चांगलं नियोजन करता येईल. संशोधन – आयव्हीबी कार...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदी आणि नेतन्याहूंची तुलना का होते आहे? 29.03.2023

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे. कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे. संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे

सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोरनॅडो म्हणजे काय? 27.03.2023

25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात? 27.03.2023

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत. पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : जगातला सर्वात आनंदी देश कसा शोधतात? 22.03.2023

दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोव्हिड, फ्लू, अ‍ॅडिनोव्हायरसमध्ये काय फरक आहे? 21.03.2023

गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय. याशिवाय देशात काही ठिकाणी विशेषतः लहान मुलांमध्ये अ‍ॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. पण हा अ‍ॅडि...

अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 20.03.2023

अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे? संशोधन – अरविंद छाबरा, झोया मतीन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.03.2023

महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – दिपाली जगताप निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds