BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk
Auteur
BBC Marathi Audio
Categorie
Website van de podcast
Nieuwste aflevering
25 mrt. 2026
Waar luisteren?
Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaarPodcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts
Afleveringen
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पॉक्सो कायदा काय आहे? बृ़जभूषण शरण सिंह यांना अटक का नाही? 30.05.2023 6:16
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्रातले पैलवान गप्प का राहिले? 30.05.2023 5:36
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
महाराष्ट्रातले पैलवान दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी गप्प का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 30.05.2023 5:36
पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनानं भारतीय कुस्तीचं विश्व ढवळून निघालं आहे. त्यातच 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करतानाची दृश्यं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कुस्तीमध्ये हरयाणा विरुद्ध उत्तर प्रदेश असे दोन गट झाल्याचंही चित्र आहे. पण महाराष्ट्रातले बहुतांश प...
पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष BBC News Marathiचा सोपी गोष्ट पॉडकास्ट 30.05.2023 5:01
मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का? स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात. आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो. पण पुरुषांना, मुलांना जर मासिक पाळीविषयी या गोष्टी माहिती असतील तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. पाहा नासिरुद्दीन यांच्या लेख...
राज्यात सरकारी शाळांमध्ये एकसमान गणवेशाची सक्ती कशासाठी? 25.05.2023 5:17
येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील शाळा सुरू होत आहेत. नवीन दप्तर, नवीन वह्या-पाठ्यपुस्तकं आणि नवीन गणवेश खरेदी करत विद्यार्थी आणि पालकांची तयारी सध्या सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मात्र नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल. परंतु हा निर्णय राज्यातील सरसकट सर्व शाळांसाठी आहे क...
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधक बहिष्कार का टाकतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.05.2023 6:41
नवी दिल्लीतलं नवीन संसद भवन बनून तयार आहे. 28 मे 2023 ला त्याचं उद्घाटन होत आहे. पण हे उद्घाटन करणार कोण – पंतप्रधान की राष्ट्रपती, यावरून आता वाद रंगला आहे. या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय. सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे की या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. देशातल्या अनेक विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाव...
2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.05.2023 5:41
तुम्ही जिथे-जिथे 2000ची नोट ठेवली आहे, तिथून ती काढून बँकेत जमा करायची वेळ आली आहे. 2016मध्ये जन्माला आलेली ही नोट अवघ्या साडेसहा वर्षातच का कालबाह्य होतेय? या नोटेमुळे खरंच काळा पैसा रोखता आला का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. अधिकचं वार्तांकन – मानसी देशपांडे लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : केजरीवालांचे अधिकार मोदींना कमी करायचेत? 23.05.2023 6:08
दिल्लीच्या नोकरशाहीविषयीचे, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या सरकारकडेच असतील असं सर्वोच्च न्यायालायाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं. पण आठच दिवसांत केंद्र सरकारनं एक अध्यादेश आणला, जो या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. याकडे काहीजण आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातली चढाओढ म्हणूनही पाहतायत तर काहींना हा भारतीय संघराज्य प्रणालीवरचा हल्ला वाटतो आहे. नेमकं...
कृत्रिम साखर खाऊ नका, WHOने का सांगितलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 20.05.2023 5:31
डायबिटीस, मधुमेह, साखर – आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो. आणि आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत. पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. पाहा WHOचा इशारा...
प्रसूती रजा किती मिळावी – 3, 6 की 9 महिने? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.05.2023 5:23
आई होण्यासाठी मिळणारी रजा अर्थात मॅटर्निटी लीव्ह किती असावी - 3 महिने, 6 महिने की त्याहून जास्त? अनेकांच्या मनात या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं आणि तर्क असू शकतात. भारतात हा कालावधी 26 आठवडे करण्यात आला असला, तरीही तो सर्व कंपन्यांसाठी सक्तीचा नाही. आणि आता अनेकांना वाटतंय की ही रजा जास्त वेळ असावी. पण कंपन्यांना ते चालणार का? पाहू या आज मॅटर्निटी लीव्हची ही सोपी गोष्ट. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर...
तुमचा फोन चोरीला गेला तर सरकार असं शोधून देईल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.05.2023 7:08
तुमचा कधी फोन हरवलाय किंवा कधी चोरीला गेलाय का? मग तो फोन कधीही परत येत नाही. मग आपण आधी रडतो, मग पोलिसात तक्रार करतो, ते सिम कार्ड ब्लॉक करून घेतो आणि पुढे नवीन फोन आणि डुप्लिकेट सिम घेऊन आपल्या कामाला लागतो. पण तुमचे हरवलेले किंवी चोरीला गेलेले फोन परत मिळवता यावेत, यासाठी आता सरकारने एक नवीन पोर्टल आणलं आहे. पण ते कसं काम करेल? त्याने खरंच फायदा होणार का? लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : समुद्रातल्या उष्णतेच्या लाटांमुळे काय होतं? 16.05.2023 5:43
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता व्हिप कुणाचा लागणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 13.05.2023 7:14
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसलाय. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्षाचे व्हिप अर्थात प्रतोद भरत गोगावले यांची निवड सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली. पण हे व्हिप म्हणजे नेमकं काय? आणि त्यावरूनच आता शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकारच्या मदतीने स्विगी, झोमॅटोपेक्षा स्वस्तात अन्न मिळणार? कुठे आणि कसं मिळणार? 11.05.2023 5:46
तुम्ही सहसा जेवण ऑर्डर करायला स्विगी किंवा झोमॅटो वापरता, टॅक्सीसाठी ओला किंवा उबर आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा किंवा आणखी काही... आता कल्पना करा तुम्हाला या सगळ्या ऑनलाईन ॲप्सची तुलना एकाच ॲपवर करता आली तर? आणि जर ते ॲप सरकारी असेल तर?
‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 10.05.2023 6:57
‘द केरला स्टोरी’ या एका सिनेमावरून सध्या देशात वादंग उठलंय. काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केलाय, तर काही राज्यांनी त्यावर बंदी घातलीय. म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकाची पावलं टाकायला लावणारा हा सिनेमा आहे तरी काय? तो किती खरा? किती खोटा आहे? आणि त्यावरून राजकारण का होतंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 09.05.2023 4:59
AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का? AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : हनी ट्रॅप म्हणजे काय? 08.05.2023 5:30
DRDO मधली एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केल्यानंतर हनी ट्रॅप हा शब्द पुन्हा तुमच्या कानावर पडला असेल. या शास्त्रज्ञाकडून माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी व्यक्तीने ‘हनी ट्रॅप’ वापरून हे सगळं केल्याचा ATS ला संशय आहे. पण हनी ट्रॅप म्हणजे काय प्रकार आहे? याआधी अशा कुठल्या घटना घडल्या आहेत?
मणिपूरमध्ये आरक्षणासाठीचं आंदोलन कसं चिघळलं? सोपी गोष्ट 849 05.05.2023 4:21
मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 04.05.2023 5:55
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय. पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय? रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का?...
Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 04.05.2023 5:11
मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3 आणि 4 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत. नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये....
शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi 04.05.2023 7:28
25 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच वॉटर बॉडीज सेन्ससचा अहवाल सादर केला. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आलं. 2018-19 दरम्यान झालेल्या या गणनेनुसार, देशभरात एकूण 24 लाख 24 हजार 540 पाण्याचे साठे आहेत. यापैकी सर्वाधिक तळी हे पश्चिम बंगालमध्ये आहेत, सर्वाधिक जलाशयं आंध्र प्रदेशात तर सर्वाधिक जल संधारण योजनांच्य...
आफ्रिकेहून आलेल्या चित्त्यांचा भारतात मृत्यू का होतोय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 01.05.2023 5:24
17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. अशा एकूण 20 चित्त्यांपैकी आतापर्यंत दोन चित्त्यांचा जीवही गेलाय. असं काय झालं की हे परदेशी पाहुणे भारतात, मध्य प्रदेशातल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात येऊन दगावले? त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती की त्यांना इथलं हवामान मानवलं नाही? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्...
अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 01.05.2023 5:28
अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय. पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे. आपण चंद्रावर लँड केलंय, तिथून माती दगडही पृथ्वीवर परत आणलेत. मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
बृजभूषण शरण सिंह विरोधात FIR दाखल करायला कुस्तीपटूंना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं? सोपी गोष्ट पॉडकास्ट 29.04.2023 7:26
ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा झेंडा फडकवणारे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध. बृजभूषण हे उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदारही आहेत. आणि WFIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लैंगिक शोषण केलंय, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे. या कुस्तीपटूंचे नेमके आरोप काय आहेत? त्यावरून...
आधी नाणार, आता बारसू – कोकणातल्या रिफायनरीचा वाद काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 27.04.2023 5:24
2015मध्ये पहिल्यांदा कोकणात एका मोठ्या रिफायनरीचा प्रस्ताव आला. ही 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी' असेल, अशी घोषणा करण्यात आली. पण या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. या प्रकल्पाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा कोकणात निसर्गाचा ऱ्हास होईल, मच्छीमारांचं नुकसान होईल, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली. नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा प्र...
Vergelijkbare podcasts
Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds