Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: granthpremi.com

Auteur

Dwitiya Sonawane

Categorie

Arts

Website van de podcast

granthpremi.com

Nieuwste aflevering

2 okt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते 06.03.2026

परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे. अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्रा...

The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी 20.02.2026

मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं प्रो...

The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी 06.02.2026

सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना संवेदनशी...

मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी 23.01.2026

शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्‍याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन' (Primordi...

म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh 10.01.2026

"लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्‍या लिहिणारा हा तरुण लेखक नेमका आहे कसा? त्याची creative process काय आहे? "निळावंती" कादंबरीची सुरुवात कशी झाली? निळावंतीला मिळालेले वाचकांचे प्रेम आणि गमतीदार किस्से.. पूर्ण वेळ लिखाण करून पैसा मिळू शकतो? हे...

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी 26.12.2025

माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, य...

म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi 05.12.2025

सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्‍या भागातही आपण चालू ठेवतोय. डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्...

ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्‍या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी 21.11.2025

संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून...

Across the Himalaya | Inside First Women’s Himalayan Traverse | Vineeta Muni Podcast | Granthpremi 07.11.2025

१९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल प्रदेश ते लडाख इतका लांबचा पल्ला, जो ३ देशातून आणि ४० हून अधिक मोठ्या खिंडी चढून, फक्त महिलांच्या चमूने पार केला. विनीता मुनी एक उत्तम mountaineer तर आहेच. पण या मोहिमेत विनीता official फॉटोग्राफर म्हणू...

Science Behind Yoga and Meditation | Anil Fadanvis | आनंद योग | Granthpremi मराठी #AnandYog #Dhyaan 10.10.2025

सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय? बरेच वर्षे योग करणार्‍या लोकांनाही अष्टांग यो...

Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी 26.09.2025

कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ह...

साहित्य, होमिओपॅथी, कला ते माहितीपट - विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारी अवलिया | Dr. Madhavi Vaidya on Granthpremi Podcast 12.09.2025

१८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल त्यांनी मिळवले, पुढे होमिओपॅथीचा अभ्यास करून त्या प्रॅक्टिस करू लागल्या, जी अजूनही चालू आहे. पुढे फर्ग्यूसन कॉलेज मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनन्वय नावाच...

The Untold Story of Pranav Sakhdeo: From Journalism to Sahitya Academy Award Author | Granthpremi मराठी podcast 29.08.2025

कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात? * रुईया कॉलेजने काय दिले ? * पत्रकाराची नोकरी का सोडली? लेखन प्रवास...

What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी 15.08.2025

आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8 व्या अध्यायाचे गोष्टीरूप निरूपण करीत आहेत. काय पहाल या भागात ? संत ज्ञानेश्वर महाराज मृत्यू आणि पुनर्जन्माबद्दल काय सांगतात? मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते ? आजच्या काळातील सर्वसामान्यांना हे का साधले जा...

Why Discussing S*xuality Matters NOW ? | Dehbhaan | Niranjan Medhekar | Granthpremi मराठी 01.08.2025

S*xuality किंवा लैंगिकता हा विषय भारतीय समाजात अजूनही टॅबू मानला जातो, या विषयावर संवाद आणि शिक्षणाची नितांत गरज आहे. या एपिसोड मध्ये आपण चर्चा करतोय "देहभान" पुस्तकाचे लेखक निरंजन मेढेकर यांच्याशी. सचिन पंडित यांनी हा संवाद साधला आहे. काय पहाल या भागात? * लैंगिकता शिक्षण / S*x Education - गरज काय आणि ही जबाबदारी कोणाची? * डेटिंग, विवाहपूर्व संबंध, सहजीवन आणि लैंगिक समस्या.. * संवादाचा अभाव अनेक स...

Can Women Really Travel Solo and Be Safe? | माझा ब्रँड आजादी | Dr. Ujjwala Barve | Granthpremi मराठी 18.07.2025

अनुराधा बेनीवाल या हरयाणवी तरुणीने फक्त १ लाखात अख्खं युरोप पालथं घातलं, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारतोय "माझा ब्रॅंड आजादी" या पुस्तकाच्या लेखिका (मराठी अनुवाद) डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्याशी. काय आहे या पॉडकास्टमध्ये ? बजेट ट्रॅव्हलची मजा, काउच सर्फिंग काय असते? एकटीने फिरणं सेफ आहे.. ? भारतीय आणि युरोपियन कल्चरमधले गमतीशीर फरक बायकांचं स्वातंत्र्य आणि प्रवासातून आलेला आत्मविश्वास आणि...

How Hindu temples teach us Spirituality ? | Gabhara | Sarvesh Fadnvis | Granthpremi Marathi Podcast 04.07.2025

मंडळी, आपल्या भारताची शान म्हणजे इथली मंदिरं! नुसत्या दगडातून साकारलेली ही वास्तूशिल्पं नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा तो एक जिवंत ठेवा आहे. 'गाभारा - मंदिरांचा समृद्ध वारसा' या पुस्तकाचे लेखक, श्री. सर्वेश फडणवीस यांच्यासोबतच्या या गप्पांमध्ये आपण याच मंदिरांच्या अद्भुत विश्वात डोकावणार आहोत. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भाती...

Spirituality Made EASY with Haripath! | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi Marathi Podcast 20.06.2025

आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे पैसा, साधने आणि सुविधा असतानाही, खरे सुख आणि समाधान आहे का? शांती फक्त वृद्धांसाठी गरजेची आहे, की तरुणांना आणि आजच्या पिढीला तिची जास्त गरज आहे? ती मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता ? माऊलींच्या हरिपाठाचे प्रयोजन काय? संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आजही सर्व पिढ्यांना कसा उपयोगी आहे ? या भागात ऋचा थत्ते यांनी संवाद साधला आहे गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक श्री अनि...

73 Years Young: Still Climbing & Writing! | Dilip Nimbalkar | Granthpremi Podcast Ep - 53 06.06.2025

वयाच्या ७३ व्या वर्षीही ज्यांच्या पायात ट्रेकिंगची उमेद आणि हातात लेखणीची ताकद आहे, असे दिलीप नाईक निंबाळकर आज आपल्यासोबत आहेत. एक अनुभवी गिर्यारोहक, पुरस्कार विजेते लेखक आणि गिरीप्रेमीचे सह-संस्थापक... त्यांची ओळख एवढीच नाही. या गप्पांमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांचा डोंगरांपासून सुरू झालेला आणि शब्दांपर्यंत पोहोचलेला विलक्षण प्रवास, गिर्यारोहणाचे अनुभव, त्यातून मिळालेले जीवनविषयक धडे आणि हे अनुभव त्...

बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 5 | दिल्ली स्वारी | Bajirao Peshwa I | Kaka Vidhate | Maratha History | Granthpremi 23.05.2025

बाजीरावांनी सिध्याचा नायनाट कसा केला? थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या राजपुताना भेटीचे महत्व काय? या diplomatic भेटीतून त्यांनी नेमके काय साधले? राधाबाईंची काशीयात्रा कशी सफल झाली? यात्रेसाठी उभ्या हिंदुस्तानातून शत्रूने देखील राधाबाईना संरक्षण का दिले? बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली आणि बादशाहाचा पराभव कसा केला? बादशहाला हरवले पण दिल्ली घेतली नाही, का ? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत...

बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 4 | Battles of Amjera Bundelkhand and Dabhai | Granthpremi | Kaka Vidhate #MarathaHistory 09.05.2025

पालखेडच्या युद्धानंतर बाजीरावांच्या महत्वाच्या लढाया म्हणजे अमजेरा (माळवा), बुंदेलखंड आणि डभईची लढाई. प्रत्येक लढाईची कारणे, त्या वेळची परिस्थिती काय होती, अंतर्गत आणि बाह्य राजकारण काय होते आणि प्रत्येक लढाईत काय युद्धनीती वापरली गेली, परिणाम काय झाले, स्वराज्य विस्ताराच्या दृष्टीने या लढायांचे महत्व काय होते? , यातली 1 लढाई ही छत्रपती शाहू महाराजांच्या अस्तित्वाच्या लढाई का होती? हे सर्व जाणून घ...

Bajirao Peshwa I Pt 3| Battle of Palkhed| Masterpiece of Strategic Mobility| Maratha vs Nizam|Ep 51 #History 25.04.2025

पालखेडचे युद्ध जिंकल्यानंतर थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व इथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्‍या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा तिसरा भाग. या भागात आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" (बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील कादंबरी) कादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी आणि व...

Bajirao Peshwa I: The Maratha Sword That Shaped an Empire Pt 2 | Kaka Vidhate| Ep 49 #History 11.04.2025

संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा आणि दहशत निर्माण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्‍या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा दूसरा भाग. या episode मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. काय पहाल या दुसर्‍या भागात ? :- मराठ्यांना मुलुखगिरी ( चौथाई / सरदेशमु...

अशी झाली पेशवाईची सुरुवात| Bajirao Peshva - I |Ep-48| Granthpremi Podcast #MarathaHistory #KakaVidhate 28.03.2025

थोरले बाजीराव म्हणजे शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयांचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा ! मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा ! साध्या बाजीगर शिलेदारांतून जयवंत सरदार घडवणारा ! हिंदुस्थानात मराठी फौजा तुफानासारख्या नाचवणारा ! दिल्लीवर धडक मारून बादशाही तख्त त्याने हादरवलं. दख्खनेत दंडेली करणाऱ्या निजामाची नांगी ठेचली. कोकणात लष्कर घालून सिद्दी आणि फिरंग्यांची कंबरडी मोडली. इंग्रजांना धडकी...

हे पुस्तक तुमचा mindset बदलू शकते.. | नचिकेत क्षिरे | Ep 47 | Granthpremi Marathi Podcast #जोजेवांछील 14.03.2025

नचिकेत हे एक उत्तम पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शेकडो लोकांना पॉडकास्ट हा विषय शिकवला आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांना जे सापडले ते सोने होते. त्यामध्ये लोकांना बदलण्याची त्यांच्या mindset वर काम करण्याची ताकत आहे. आणि हे सर्व ग्यान (learnings) त्यांनी "जो जे वांछील" या कादंबरी मध्ये गुंफले आहे. कसा होता...

Luister naar de podcast ग्रंथप्रेमी - Granthpremi in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds