Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ Επεισόδια: 395

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: www.storytel.com

Δημιουργός

Santosh Deshpande

Κατηγορία

Arts

Ιστοσελίδα του podcast

www.storytel.com

Τελευταίο επεισόδιο

17 Σεπ 2026

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

21: स्टोरीटेल तारांगण : के.के. मेनन व लोकेश गुप्ते यांना `एक सांगायचंय..` 17.11.2018

स्टोरीटेल पॉडकास्ट पार्टनर म्हणून संलग्न असणारा एक सांगायचंय... हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता के.के. मेननचे प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले. प्रसिद्ध कलाकार व लेखक लोकेश गुप्ते यांचाही दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे मुले आणि त्यांच्या पालकांमधील हरवत चाललेल्या सुसंवादावर संवेदनशील भाष्य करणारा हा...

20: मनमंदिरात...लिहिणाऱ्या मंदारच्या मनातलं! 05.11.2018

आजच्या पिढीतील सर्जनशील प्रतिभावंत कवी-गीतकार म्हणून लोकप्रिय असलेला मंदार चोळकर स्टोरीटेल कट्ट्यावर आला आणि त्याचं शब्दमय आयुष्य सहजसंवादातून अलगद फुलून आलं... मंदार जोशी यांच्याशी त्याचा झालेला हा संवाद रसिकांसाठी नक्कीच पर्वणी ठरावी.

19: झलक- विनासायस वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध 29.10.2018

विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या संकल्पनेचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या या विषयावरील स्टोरीटेल हेल्थ वर रंगलेल्या संवादाचा हा अंश. सविस्तर ऐकण्यासाठी....  https://www.storytel.in/books/633929-Vinasayas-Weight-Loss-Ani-Madhumeh-Pratibandh---Bhag--1

18: `मृत्योपनिषद`बद्दल बोलायचं तर... 15.10.2018

स्टोरीटेलवर गाजत असलेल्या मृत्योपनिषद या ओरिजिनल कादंबरीचे लेखक हृषीकेश गुप्ते आणि त्यास आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध अभिनेता, कलाकार किशोर कदम यांच्याशी रंगलेली ही गप्पांची मैफल. एका रहस्यमय कादंबरीच्या निर्मितीचा वेध घेणारा संवाद तितकाच उत्कंठावर्धक होय.

17: 'स्टोरीटेल'शी जडता नातं... 30.09.2018

स्टोरीटेलवरील पुस्तकं जशी विलक्षण तशीच ती ऐकण्याचा मनमुराद आनंद लुटणारे चोखंदळ वाचकही खासच. अशा खास स्टोरीटेल वाचकांचं प्रतिनिधी म्हणून उद्योजक श्रीहरी नाईक यांच्याशी रंगलेल्या या गप्पा. अगदी आरंभीपासून स्टोरीटेलचे सभासद असलेले श्री नाईक सांगताहेत त्यांचा येथील आजवरचा अनुभव, जो वाचकांना नक्कीच काही देऊन जातो. 

16: 'मेकिंग अॉफ क्लासिक्स' उलगडताना.... 16.09.2018

https://www.storytel.in/search-making+of+classic अभिजात चित्रपटांच्या निर्मितीमागच्या रंजक आठवणींची उलगड करणारी स्टोरीटेलची ताजी टवटवीत ओरिजनल सिरीज म्हणजे ' मेकिंग अॉफ क्लासिक्स'! प्रसाद नामजोशी यांच्या लेखणीतून व आर.जे. राहुल यांच्या आवाजातून साकारलेली ही सिरीज रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवते. प्रसाद व राहुल यांच्याशी सई तांबे यांनी साधलेल्या या दिलखुलास गप्पांतून 'मेकिंग अॉफ क्लासिक्स' विषयी ऐकणं...

15: स्पेस ब्राव्हो.... थरारक असं नवं, ताजं सायन्स फिक्शन 03.09.2018

प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आशितोष गायकवाड यांच्या आवाजातून फुललेली स्पेस ब्राहो म्हणजे ऑडिओ बुक माध्यमासाठी निर्मित पहिले सायन्स फिक्शन ठरावे. भारताच्या स्पेस मिशनचा सुपर हिरो - ब्राव्हो याला मारण्याचा कट दोन ठिकाणी आखला जातोय , ब्राव्हो त्यातून वाचू शकेल ? सन २०५० मध्ये भारत ही महासत्ता आहे आणि अमेरिका, चीन, रशिया यांसारख्या महासत्तांना अंतराळयुद्धात पुरून उरतो...

14: वाचनसंस्कृती बदलतेय : अरुण शेवते 19.08.2018

प्रसिद्ध कवी, लेखक व ऋतुरंग चे संपादक अरुण शेेवते यांनी बदलती वाचनसंस्कृती व त्या अनुषंगाने लेखक, संपादक यांसमोरील आव्हाने यांबाबत स्टोरीटेल कट्ट्यावरील गप्पांमधून केलेले सहजसुंदर विश्लेषण.

13: साहित्यरसिकांची नवी पिढी तयार होतेय? ऐकुया, डॉ. माधवी वैद्य यांचे विश्लेषण 06.08.2018

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची स्टोरीटेल कट्ट्यावरील या गप्पा म्हणजे एक सुरेल मैफलच. साहित्य-संवादाचे बदलते स्वरुप, माध्यमांतर, त्याचा साहित्यावर झालेला परिणाम आणि यातून पुढे येत असलेली रसिकांची नवी पिढी यावर डॉ. माधवी यांनी साधलेला संवाद नक्कीच विचारांना दिशा देऊन जातो.

12: `इप्सिता` अशी अवतरली! 23.07.2018

स्टोरीटेल ओरिजिनल सिरीज इप्सिता ने वाचक-श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नव्या दमाचा लेखक तुषार गुंजाळ यांच्या सहज शैलीतून साकारलेली आणि यशपालने आपल्या आवाजातून ताकदीने श्रोत्यांच्या नजरेपुढे उभी केलेली ही आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी रोमहर्षक गोष्ट. अशा या इप्सिताच्या निर्मितीमागची गोष्टही तितकीच रंजक आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर सुकीर्तसोबत तुषार आणि यशपालच्या रंगलेल्या गप्पांमधून पाहा ती कशी...

11: मेघना ..नव्हे ही तर आवाजाची किमयागार! 15.07.2018

स्टोरीटेल कट्ट्यावर मेघना एरंडे नामक आवाजाची किमयागार दिलखुलास बोलते आणि बोलक्या पुस्तकांशी, श्राव्य माध्यमाशी असणारं आपलं नातं तिच्या शैलीतून सई सोबतच्या गप्पांमधून व्यक्त करते! ऐकायलाच हवा असा हा पाॅडकास्ट स्टोरीटेल च्या तमाम चाहत्यांसाठी सस्नेह सादर!

9: वारी - एक अमृतानुभव 12.07.2018

पंढरीच्या वारीची ओढ प्रत्येक मराठी मनाला असतेच. युगानुयुगे विटेवर उभ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी पंढरीला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्यात, वारकरी होण्यात एक आगळा दडलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ असणाऱ्या नरेंद्र गणपुले या तरुण कार्पोरेट व्यक्तीला या वारीची ओढ लागली आणि त्यात तो सहभागी झाला. तेथे प्रत्यक्ष आलेले अनुभव त्याच्या लेखी अमृतानुभव ठरले, त्याला आणखी समृद्ध करुन गेले....

8: झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर 04.07.2018

मराठी विनोदी साहित्यातील अजरामर ठरलेली पात्रं म्हणजे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. चिं.वि. जोशी यांच्या मिश्कील शैलीतून उगडत जाणारे चिमणराव आणि त्यांचे किस्से आजही पोट धरुन हसायला लावतात. चिमणरावांचे पात्र पडद्यावर ज्यांनी लोकप्रिय केलं त्या  दिलीप प्रभावळकरांसारख्या दिग्गज कलाकाराच्या आवाजात चिमणरावांच्या गोष्टी ऐकणं हा एक अनुभव आहे. स्टोरीटेलवर उपलब्ध असलेल्या निवडक चिमणराव संग्रहातून घेतलेला हा निवडक...

7: लाडका मराठी कवी संदीप खरे समवेत दिलखुलास गप्पा @ स्टोरीटेल कट्टा 01.07.2018

आजचा आघाडीचा हरहुन्नरी प्रतिभावंत मराठी कवी संदीप खरे स्टोरीटेल कट्ट्यावर श्री. संतोष देशपांडे यांच्याशी दिलखुलास बोलता झाला. वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार सांगतानाच श्राव्य माध्यमातून उदयास येणारी नवी वाचनसंस्कृती, तो करीत असलेले प्रयोग आदींविषयी त्याचे सहजसुंदर भाष्य ऐकणं हा देखील एक अनुभवच.

6: झलक - इप्सिता... 28.06.2018

स्टोरीटेल ओरिजिनल सिरिज विभागात नुकतीच दाखल झालेली इप्सिता म्हणजे एक भन्नाट गोष्ट. लेखक तुषार गुंजाळच्या शब्दांतून आणि यशपालच्या आवाजातून साकारलेली ही एक उत्कंठावर्धक गोष्ट. आमच्या रसिक श्रोत्यांना त्याची एक छोटीशी झलक ऐकायला मिळावी, यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर सादर आहे. इप्सिता बद्दल - स्वतःची व्हर्जिनिटी घालवण्यासाठी आणि त्यायोगे आयुष्यातल्या हरलेपणावर मात करण्यासाठी ४० वर्षांचा प्रदीप भैसाटतो आण...

5: सु.शि. आठवताना..... Remembering Suhas Shirvalkar and his work 11.06.2018

Suhas Shirvalkar, one of the most popular writers in Marathi still rules on the hearts and minds of his readers since years. This podcast Unfolds his memories in a chit chat his hardcore fan Ajinkya and Son Samrat.

4: Soang (सोंग), a Storytel Orignial`s author Nitin Thorat shares his insights about the theme of the book 27.05.2018

Soang, is a Storytel Original Marathi audio series, written by young author Nitin Thorat. It is a very different theme and form that marathi audience ever come across. Noted actor Milind Shinde narrated the series that is widely appreciated.  Sukeert talks with Nitin regarding what makes Soang a special one!

3: Petlela Morpis - An epic love story that took the entire village by storm! 07.05.2018

Storytel Originals Presents 'Petlela Morpis', a revolutionary lesbian love story in Marathi. They say love is game and every game has it's own rules. But of course, rules are meant to be broken and taboos are meant to be shattered. The author and the narrator talk about this special audiostory that challenges the status quo.

2: This is how she fell in love with books again! 16.04.2018

This is a talk with Purva, a new generation Indian woman.  In a time pressed routine of the modern day life, she had no time to catch up with books. Well, she did find a way out!

1: #1: सह संजय सोनवणी 10.04.2018

पॉडकास्टच्या या भागामध्ये आपण , लेखक संजय सोनवणी यांच्यासोबत विविध विषयांवर मोकळेपणाने गपा मारणार आहोत. त्यांचे साहित्य , ऑडिओबुकसाठी लिहिण्याचा त्यांचा अनुभव याविषयी जाणून घेणार घेणार आहोत. लेखक म्हणून त्यांचा प्रवास त्यांच्याकडून ऐकणार आहोत.

Άκου το podcast स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS