Vechleli Phule

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Arts MR ↓ Επεισόδια: 138

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...

Δημιουργός

Vechleli Phule

Κατηγορία

Arts

Ιστοσελίδα του podcast

shows.acast.com

Τελευταίο επεισόδιο

16 Αυγ 2024

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

साथ नभाची | Saath Nabhachi 16.08.2024

साथ नभाची कापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत. 1. ढग येतात  कवी - शांता शेळके  कवितासंग्रह - गोंदण 2 . साथ नभाची असे कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

पंधरा ऑगस्ट | 15 August 09.08.2024

पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासात कोरलेला सुवर्ण दिवस. यासाठी लाखो लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हा सोनियाचा दिनु आपल्या भाळी आला. पण आपण सर्व त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नात आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग साजरा करूयात स्वातंत्र्यदिन. 1. तिरंगा  कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - अस...

अक्षरमौन | Aksharmaun 02.08.2024

अक्षरमौन एक चकारही न काढता ही अक्षरं बोलतात ना. या शब्दांना, अक्षरं , क्रियापदे यांना एक वेगळं वजन असतं. ते आपण कुठं, कधी आणि कसं वापरतो यावर आपण काही बनवू शकतो किंवा सगळं काही बिघडवू शकतो. चला तर मग त्यांची ताकद आजमवूया कवितांतून. 1 . अक्षरमौन कवी - सौमित्र कवितासंग्रह - आणि तरिही मी... 2. क्रियापद कवी - वसंत आबाजी डहाके कवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more info...

वास्तव | Vaastav 26.07.2024

वास्तव आपण सर्वजण वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक निधड्या छातीने त्याचा सामना करतात आणि एक वेगळं जग निर्माण करतात जे त्यांच्या इच्छेनुसार चालतं. चला तर करुया वास्तवाशी चार हात. 1. वास्तव कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - शब्द 2. वास्तव कवी - वसंत आबाजी डहाके कवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

भोवरा | Bhovara 19.07.2024

भोवरा  कधी आपण याला फिरवतो तर तो कधी आपल्याला. भोवरे हे असतातच. खेळण्यातला भोवरा तर भाव खाऊन जातोच पण आयुष्यातले भोवरे ही काही कमी नसतात. चला तर एक गिरकी घेऊच कवितांच्या भोवऱ्यासोबत. 1. भोवरा कवी - के ना डांगे  कवितासंग्रह - बालभारती 2. भोवरा कवी - इंदिरा संत  कवितासंग्रह - निराकार Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

औदुंबर | Audumbar 12.07.2024

औदुंबर औदुंबर ही जागा डोळ्यांना सुखावणारी तर आहेच पण मनालाही एक वेगळीच शांती तिथे मिळते. तो घाट, हिरवळ, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी, ती सुंदर मूर्ती यांनी आपण भारवून नाही गेलो तर नवलच. चला तर दंग होऊन जाऊया आपणही औदुंबर क्षेत्री. 1. श्री क्षेत्र औदुंबर  कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - कैवल्याचे झाड 2. औदुंबर कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना Hosted on Acast. See acast.com/privacy for more in...

सिग्नल्स | Signals 05.07.2024

सिग्नल्स  लाल, हिरवा, पिवळा, धोका, सावधान , पुढे जा अशी असंख्य सिग्नल्स रस्त्यावरती आणि आयुष्यात आपल्याला मिळत राहतात. काही आपला जीव वाचवतात, काही आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही आयुष्य पलटून टाकतात. चला तर बघुया कोणते सिग्नल्स मिळतायत ते. 1. सिग्नल्स कवी - सौमित्र कवितासंग्रह- बाउल 2. ग्रीन सिग्नल कवी - निरंजन उजागरे कवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे Hosted on Acast. See acast.com/pri...

विठ्ठलाची ओटी | Vithalachi Oti 28.06.2024

विठ्ठलाची ओटी  लाखो भाविक ' जय हरी विठ्ठल ' च्या गजरात जरवर्षी हरवून जाऊन पंढरीला पोहचतात. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने त्यांना वेगळाच आनंद मिळतो. ती चंद्रभागा , तो सावळा विठ्ठल आणि ती पंढरी नेहमीच भक्तांना खुणावत असते. चला हरवून जाऊयात हरिनामाच्या गजरात. 1. विठ्ठलाची ओटी कवी - वैभव जोशी कवितासंग्रह- म्हणजे कसं की.. 2. सांगता कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह- कैवल्याचे झाड Hosted on Acast. See acas...

दहावीच्या बाईस | Dahavichya Bai 21.06.2024

दहावीच्या बाईस  आपल्या सर्वांच्या शैक्षणिक काळामध्ये असे काही हाडाचे शिक्षक आपल्याला भेटतात की त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. कधी रागावतात, दटावतात, तर कधी प्रेमाने जवळ घेऊन कौतुकाची थापही पाठीवर देतात. अश्या आपल्या लाडक्या बाई, सरांसाठी काही कविता. 1. प्रिय बाईस कवी - प्रवीण दवणे कवितासंग्रह - गंधखुणा  2. दहावीच्या बाई कवी - निरंजन उजगरे कवितासंग्रह - नवी घरे Hosted on...

झाला बेभान पाऊस | Jhala Bebhan Paus 14.06.2024

झाला बेभान पाऊस पावसाळा कोणाला नाही आवडत ? त्याची भुरळ लहान- थोर सर्वांवरच पडते. तो या सृष्टीची अन् मनाचीही तहान भागवतो. निसर्गाचं एक अनोखं रूप आपल्याला अनुभवायला मिळतं ते फक्त आणि फक्त या वृष्टीच्या कृपेने. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांमध्ये. 1. पाऊस चौफेर कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - आत्मरंग 2. झाला बेभान पाऊस कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy...

गुलमोहर | Gulmohar 07.06.2024

गुलमोहर लालबुंद घोसानी डवरलेला गुलमोहर कोणाला भुरळ घालणार हे अशक्यच. त्याचं ते मोहक रूप, सुंदर रंग, त्याचा लालभडक सडा पाहणं हे उन्हाळ्यातील अतिशय विलोभनीय दृश्य. चला तर आनंद घेऊया या बहरलेल्या गुलमोहराचा. 1. गुलमोहर  कवी - इंदिरा संत  कवितासंग्रह - गर्भरेशीम 2. गुलमोहर  कवी - मंगेश पाडगावकर  कवितासंग्रह - नवा दिवस Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

आंबे आणि आंबेच | Aambe Aani Ambech 31.05.2024

आंबे आणि आंबेच फळांचा राजा, उन्हाळ्यात आपल्या जीवाला थंडावा देणारा, मनामनात आणि पोटापोटात घर करणारा असा हा आंबा. त्याचा सुगंध, रंग, चव काय बहार आणतात ना या रणरणत्या उन्हात. चला तर मग ताव मारुयात आंब्यांच्या कवितांवर. 1. आंबे कवी - यमकविता (FB) 2. आंबे - पहिली ते दहावी कवी - शंकर वैद्य कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

झाडांच्या मनात | Jhadanchya Manat 24.05.2024

झाडांच्या मनात निसर्गाची सुंदर देणगी म्हणजे झाडं..ही झाडं , पाखरं, आकाश, झरे खूप काही निर्व्याज प्रेमाने देत राहतात. त्यांच्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने करत राहतात. चला तर मग हरवून जाऊया या हिरवळीमध्ये कवितांच्या झुल्यावर स्वार होऊन. 1. लपक झपक झाडातून कवी - ना धों महानोर कवितासंग्रह - पावसाळी कविता 2. झाडांच्या मनात जाऊ कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/p...

आशाळभूत | Ashalbhut 17.05.2024

आशाळभूत आपण सगळेच एक वेडी आशा मनात ठेऊन जगत असतो. आज हे नाही झालं तर उद्या होईल, असा एक दिलासा आपण सारखा एकमेकांना देत असतो. चला तर मग होऊया आशावादी कवितांसोबत. 1. आशाळभूत   कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - म्हणजे कसं की... 2. आशावादी  कवी - आरती प्रभू  कवितासंग्रह - दिवेलागण Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

कोकिळेचा स्वर | Kokilecha swar 10.05.2024

कोकिळेचा स्वर रणरणत्या उन्हात जीवाची लाही लाही होत असताना अशी एक गोष्ट आपल्या मनाला चंदनासारखा थंडावा देऊन जाते ती म्हणजे कोकिळेचा तो मधुर स्वर. सकाळ, संध्याकाळ बहरून जाते तिच्या गोड गाण्याने. अगदी नि: स्वार्थपणे ती हे सप्त सुर आपल्या आयुष्यात भरते. त्यामुळे मन कसं प्रसन्न होऊन जातं. चला तर मग बघुया ही कोकिळा कशी आहे कावितांसोबत. 1. कोकीळ   कवी - मो ग लोंढे  कवितासंग्रह - बालभारती&n...

संवाद | Samwad 03.05.2024

संवाद रोजच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग. स्वतःशी, इतरांशी जोडणारा हा दुवा. कधी उभारी देणारा, कधी जाणून घेणारा, कधी चिडवतो तर कधी आवडतो असा हा संवाद. 1. संवाद कवितासंग्रह - मुक्तायन कवी - कुसुमाग्रज 2. संवाद कवितासंग्रह - शब्द कवी - मंगेश पाडगांवकर Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

महाराष्ट्र माझा | Maharashtra Majha 26.04.2024

महाराष्ट्र माझा १ मे १९६० रोजी आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. संत, साहित्य, कला, निसर्ग , संस्कृती यांनी संपन्न असलेलं हे राज्य. आपल्याला खूप काही शिकवतं. मला खात्री आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाटतोच वाटतो. चला तर मग साजरा करूया हा महाराष्ट्र दिन कवितांसोबत. 1. नव महाराष्ट्रगीत  कवी - सुरेश भट  कवितासंग्रह - रंग माझा वेगळा ...

साधना | Sadhana 19.04.2024

साधना काहीतरी मोठ्या ध्येपूर्तीसाठी साधना तर करावीच लागते. तेव्हा कुठे तो गोष्ट आपल्याला अवगत होते. आपल्या इतिहासात, पौराणिक गोष्टींमध्ये अशी असंख्य उदाहरणं दिसतात. त्यामुळेच त्यांनी अशक्य कामं शक्य करून दाखवली. जर तर मग करूया साधना कवितेची आणि पाहुयात साधना असते तरी काय! 1. साधना कवी - पु शि रेगे कवितासंग्रह - साधना 2. साधना कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज #marathipodcast #मराठीकाव...

जीवन - मृत्यु | Jeevan Mrityu 12.04.2024

जीवन - मृत्यु प्रत्येक जीवाची सुरुवात जन्मापासून होते. हा प्रवास सुरू असतो मरणापर्यंत. कोणी प्रत्येक क्षण जगतो तर कोणी प्रत्येक क्षण मरतो. जगताना जगायचं राहूनच जातं बऱ्याच लोकांचं. उगाच मरणाच्या बाता करत आनंद हिरावून घेतो चालू आयुष्यातला. चला थोडं जगूया कवितेच्या सुंदर जगामध्ये. 1. जन्म मृत्यू कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह - पूरिया 2. जीवन मृत्यू कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - म्हणजे कसं की.. Hos...

अवयव आपले | Avayav Aple 05.04.2024

अवयव आपले आपण खूप साऱ्या अवयवांचा एक अख्खा पुतळा असतो. एक ना एक अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. पण त्यांचा वापर मात्र माणसागणीक बदलत जातो. मग तीच जीभ वापरून गोड बोलणं असेल नाही तर कटू बोलणं असेल. चला तर जाऊया या अवयवांच्या बाजारात 1. अवयव कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे 2. अवयव आपले कवी - सौमित्र कवितासंग्रह - बाऊल Hosted on Acast. See acast.com/privacy for more informat...

ग्रीष्मातल्या सकाळी | Grishmatalya sakali 29.03.2024

ग्रीष्मातल्या सकाळी हे रणरणतं ऊन सगळ्यांच्याच नाकी नऊ आणून सोडतं. नुसती धगधग. पण हेच इतर खूप गमतीजमती सोबत घेऊन येतं. मोगरा, जाई जुईचा दरवळ , आंबे, कोकिळेची गाणी, करवंद, जांभळं..यादी न संपणारी आहे. चला तर मग मजा घेऊया या ग्रीष्म ऋतूची. 1. ऊन पानात झेलीत कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान 2. ग्रीष्मातल्या सकाळी कवी - पद्मा कवितासंग्रह - श्रावणमेघ Hosted on Acast. See acast.com/priva...

काळी वर्तुळं | Kaali Vartule 22.03.2024

काळी वर्तुळं पृथ्वीचा आकार, पोळी, गोळी, शून्य अश्या असंख्य गोष्टी वर्तुळाकार असतात. किती व्यापले आहे यांनी आपलं आयुष्य. एक वर्तुळच पूर्ण करत खरं तर आपण. चला तर मग फिरुया गोलगोल या काव्यारुपी वर्तुळात. 1. वर्तुळ कवी - मंगेश पाडगांवकर कवितासंग्रह - गिरकी 2. काळी वर्तुळं कवी - वलय मुळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

तुम्ही व्हॉट्सॲप वर आहात ना? | Tumhi Whatsapp var ahat na? 15.03.2024

तुम्ही व्हॉट्सॲप वर आहात ना? ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत त्या सगळ्यांकडे व्हॉट्सॲप आहेच. दिवसरात्र एकमेकांशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे दाखवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. समोर दिसलं तर बोलणार नाहीत पण व्हॉट्सॲप मात्र एकमेकांसाठी जीव देण्याच्या बाता केल्या जातात. खरा संवादच हरवून बसला आहे. चला बघुया या जंजाळाची कथा. 1. Whatsapp  कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही 2. व...

बाईपण : महिला दिन विशेष | Baipan: Mahila Din Vishesh 04.03.2024

बाईपण : महिला दिन विशेष एक बाई आयुष्यात असंख्य भूमिका पार पडते. तेही तितक्याच ताकदीने. अनेक संकटांचा सामना करत ती कधी बनते दुर्गा तर कधी लहान मूल. आज २१व्या शतकातही बाईच्या समस्या कमी झालेल्याच नाहीत दुर्दैवाने. पण तिची झुंज मात्र चालू आहे. चला करूया मुजरा या स्त्रीशक्तीस कवितांच्या सोबत. 1. आता तरी थांब कवी - अज्ञात 2. बाई असते... कवी - अशोक बागवे कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे Hosted on Acast...

शोध | Shodh 01.03.2024

शोध मला हे सापडत नाहीये, ते मिळत नाहीये, हे कळत नाहीये म्हणून आपण सगळेच काही ना काही शोधतच असतो. कधी गोष्टी सापडतात तर कधी कायमच्या हरवतात. चला तर मग शोधूया काय हरवलंय ते कवितेसोबत. 1. शोध कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - त्रिवेणी 2. शोध कवी - अशोक बागवे कवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Άκου το podcast Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS