Santosh Deshpande
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: www.storytel.com
Δημιουργός
Santosh Deshpande
Κατηγορία
Ιστοσελίδα του podcast
Τελευταίο επεισόδιο
17 Σεπ 2026
Πού να ακούσεις;
Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομαΤα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast
Επεισόδια
थरारक हसासोर... 03.07.2021 34:16
गोष्टींमधला थरार वाचायला जितका भारी त्याहून भारी असतो, तो गोष्टी ऐकताना अनुभवास येतो तो थरार. म्हणूनच, स्टोरीटेलनं मराठीमध्ये अनेक उत्तमोत्तम थरारकथा आणल्या आहेत. लेखिका सायली केदार हिच्या शब्दांमधून साकारलेली आणि आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहचणारी `हसासोर` ही स्टोरीटेलची ओरिजनल सिरीज श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर आज, `हसासोर`ची एक झलक सादर आहे....
171: ‘पुल’कित विनोद! 01.07.2021 43:03
मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांची नावं जरी उच्चारली तरी ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या महान साहित्यिकांचे स्मरण करतानाच उलगडत जातात विनोदी साहित्यातील एकाहून एक भन्नाट किस्से आणि आठवणी. हे सारे खरोखर आपल्याला पुलकित करणारे क्षण. प्रा. मिलिंद जोशी यांसमवेत रंगलेली ही किश्शांची, आठवणींची सुहास्य मैफल याच क्षणांना आपणापुढं नव्यानं घेऊन येते. 'Sunday With देशपा...
170: काव्यसरी... श्राव्यसरी! 26.06.2021 43:03
आपल्या सगळ्यांचा लाडका कवी संदीप खरे याच्या अनेक सुंदर कलाकृती स्टोरीटेलवर रिलीज झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'संदीप खरे रेअरली हर्ड'! या कार्यक्रमात संदीपने यापूर्वी कुठेही सादर न केलेल्या किंवा क्वचितच ऐकवलेल्या कविता सादर केल्या आहेत, या कवितांमागचे किस्से सांगितले आहेत. याशिवाय संदीपचा आवाज स्टोरीटेलवरील अनेक कथांना लाभला आहे. त्यामुळे तो कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेच, मात्र आता त्याच्या आवा...
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! 19.06.2021 56:53
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मराठी साहित्यात एका विलक्षण कलाकृती साकारली गेली, ती म्हणजे 'सव्यसाची'! या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या भारतातील बंगालमध्ये त्यावेळी काय उलथापालथ होत होती, सव्यसाचीची भूमिका काय, या कादंबरतील इतर पात्रं कशी साकारली, नवी स्वप्नं पाहणाऱ्या समाजाचं काय झालं या सगळ्या...
168: मध्यमवर्गा... जागा हो! 17.06.2021 36:49
मध्यम वर्ग म्हणलं, की खाऊन-पिऊन सुखी, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाला आनंदात ठेवणारा समाजातील एक मोठा आणि महत्त्वाचा घटक आपल्या डोळ्यासमोर येतो. आयुष्यात कितीही अडथळे आले आणि कितीही अवघड परिस्थितीचा सामना करायची वेळ आली तर विनातक्रारपणे तोंड देणारा हा मध्यमवर्ग नक्की कसा आहे, मध्यमवर्गाची मनःस्थिती नक्की काय असते, मध्यमवर्गात नक्की कोण मोडतं, मध्यमवर्गीयांच्या समस्या काय आणि मध्यमवर्गाला आपली मतं...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... 12.06.2021 34:31
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन... पण आपल्यातले अनेक चाहते आजचा दिवस मानत नाहीत, कारण पुलं आपल्यातून गेलेच नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं, ते तितकंच खरंही आहे. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनी त्या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट क्षणांना एकत्रित करत 'आहे मनोहर तरी' ही सुंदर कलाकृती साकारली. याच कलाकृतीचा सुमधूर अंश आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. ज्...
165: कोरोना काळात मदत कशी करावी? 06.06.2021 10:33
संकटकाळात केलेल्या कोणत्याही प्रकारच्या मदतीचं मोल खूप असतं. कोरोना काळात अशा मदतीचे कोणते मार्ग असू शकतात, कोणाकोणाला मदतीची गरज असू शकते, त्यासाठी नेमकं काय करावं अशा तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं आम्ही संकलित केली आहेत. ती आपणापर्यंत पोहोचवत आहोत, तेव्हा नक्की ऐका! 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronash...
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! 05.06.2021 49:14
बालसाहित्य हे वाचायला जितकं रंजक तितकंच लेखकांना लिहिण्यासाठी ते आव्हानात्मक... मात्र हे आव्हान मराठीतील अनेक दिग्गज लेखकांनी पेललं आणि आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती साकारल्या. अनेक पिढ्या या लेखकांची पुस्तकं वाचून मोठ्या झाल्या. याच बालसाहित्याचा खजिना स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. बालसाहित्य कसं लिहावं, त्यासाठी काय आव्हानं आहेत या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखिका आर्या नाईक आ...
164: चला, कोरोनावर मात करूया! 04.06.2021 22:50
कोरोना आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण अगदी बिनधास्त वावरत असतो. पण याच कोरोनाने जर तुमच्या घरात शिरकाव केला तरा? तर घाबरून जाण्याची गरज नाही… आम्ही खास तुमच्यासाठी ‘कोरोना गाईड’ घेऊन आलो आहोत, नक्की ऐका! 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.c...
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? 03.06.2021 12:42
या कोरोना काळात माणूस शारिरीकरित्या तर खचतोच, पण मानसिकरित्याही खचतो. मग या मानसिक ताणातून बाहेर कसं पडायचं, मानसिक आव्हानांना कसं तोंड द्यायला हवं, शारिरीक व मानसिकरित्या कसं निरोगी राहावं या व अशा आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन, नक्की ऐका! 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्...
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 02.06.2021 13:24
कोरोना होऊन गेल्यानंतर नक्की काय करायला हवं, कशी काळजी घ्यायला हवी, न खचता पुन्हा भरारी घेण्यासाठी कसं सज्ज व्हावं, बिनधास्तपणे वावरणं किती धोक्याचं आहे याबाबतचे मार्गदर्शन नक्की ऐका! 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#priceP...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... 29.05.2021 38:30
कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरो...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... 22.05.2021 1:05:38
आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केले...
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! 15.05.2021 51:59
दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवण...
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! 08.05.2021 36:09
आशिष गायतोंडेचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडतो. आशिषने आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली असा प्रश्न पोलिसांना पडतो आणि घटनेचा शोध घेण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानवर येते. अनुभवी, हुशार, प्रामाणिक आणि बहादूर ऑफिसर अशी ओळख असलेला अभिमन्यू या प्रकरणाचा छडा कसा लावतो, त्यासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि एका पोलिसाचं कर्तव्य कसं पणाला लावतो याची थरारक गोष्ट ऐका मर्डर केस या मालिकेत!...
157: कोरोना 2.0....तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! 01.05.2021 1:00:08
कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेला आपण सर्वांनी कसं सामोरं जायला हवं, कोरोनाची नवीन लक्षणं कोणती, व्हॅक्सिनबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, ऑक्सिजनची समस्या नेमकी कशी हाताळता येऊ शकते, लस घेतल्याने संसर्गापासून कितपत बचाव होतो, रेमडिसिवीर कोणी घ्यावं, सिटी स्कॅन तपासणीतून नेमकं काय निदान होतं या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत पुण्यातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्न...
156: अशी साकारली 'हसासोर'! 24.04.2021 41:09
सब इन्स्पेक्टर अमर पाटील आणि आरोपी निखिल जगताप यांच्यात नक्की काय संबंध आहे, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खून केलेला निखिल अमरला बघून का चवताळतो, त्या दोघांच्याही आयुष्यात कोणत्या विचित्र घटना घडू लागतात या सगळ्याचा वेध घेणारी 'हसासोर' ही थरारक मालिका स्टोरीटेलवर २६ एप्रिलला रिलीज होईल. स्टोरीटेलवर यापूर्वी गाजलेली 'हिडन कॅमेरा' ही सिरीज लिहिलेल्या नीरज शिरवईकरने पुन्हा एकदा एक वेगळाच जॉनर निवडत हसासो...
154: अवलिया पुस्तकीया... 20.04.2021 41:47
आपण अनेक वाचनप्रेमी बघतो, पण आपलं जीवनच पुस्तकमय झालंय असा अवलिया तुम्ही बघितलाय का? संडे विथ देशपांडेमध्ये आम्ही अशाच एका अवलियाला बोलतं केलंय ज्याचं जगणं म्हणजेच वाचन आहे, पुस्तकं ही घरातल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत आणि पुस्तक भेट देण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते प्रसिद्धही आहेत... तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा, या अवलियाने तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल माहिती आणि त्या संदर्भात...
155: दैनंदिन 'गीतायोग'! 17.04.2021 41:50
ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक राजेंद्र खेर यांच्या शब्दांत दररोज सकाळी भगवद्गीता ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय आनंद! स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी 'दैनंदिन भगवद्गीता'च्या माध्यमातून दररोज म्हणजे ३६५ दिवस गीतेतील विविध आध्याय, त्याचे अर्थ व महत्त्व अशा स्वरूपात गीता उपलब्ध केली आहे. गेली अनेक वर्षे गीतेचा अभ्यास असलेले खेर अगदी सोप्या भाषेत ही गीता समजावून सांगतात... हा उपक्रम नक्की काय आहे, गीतेचं महत्...
153: कॅलिग्राफीचा किमयागार! 14.04.2021 1:12:42
‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी...
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! 10.04.2021 48:39
जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहे...
151: चाणक्य समजून घेताना...देताना! 03.04.2021 1:07:50
एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोर...
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? 31.03.2021 56:06
मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जनरेशन वाय’ या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह य...
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! 27.03.2021 44:09
नाथमाधव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्यावर जाणून घेतला आहे... तेव्हा चुकवू नये असा पॉडकास...
148: मराठीकारण 23.03.2021 1:36:01
मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता ‘मराठीकारण’ म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मरा...
Παρόμοια podcast
Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS