Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: lifeofstories.buzzsprout.com
Autor
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Kategorie
Web podcastu
Nejnovější epizoda
7. čvc 2026
Kde poslouchat?
Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzyPodcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty
Epizody
# 2021 : डोपामिन, BDNF, आणि विजेच्या लहरी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.04.2026 9:17
Send us Fan Mail व्यायामानंतर मेंदूत नेमकं काय घडतं? कधी विचार केलाय का, की फक्त काही मिनिटांची शारीरिक हालचाल तुमच्या मेंदूमध्ये चक्क विजेच्या लहरी निर्माण करू शकते? हो, हे खरं आहे. याच लहरी तुमच्या विसरभोळ्या मेंदूला अतिशय वेगवान बनवू शकतात.
# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (ॲड. स्वाती लेले) 22.04.2026 2:23
Send us Fan Mail एका गरीब घरात तिचा जन्म झाला.ती तीन वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. अनेक अडचणींवर मात करून तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. इतकं हलाखीचं आयुष्य असूनही ती पायलट होण्याचं मोठं स्वप्न ती पहात होती. संधी मिळताच ती " पॅराशूट क्लब " मध्ये सराव करू लागली. नियमित सराव, अविरत मेहनत, अभ्यास आणि अंतराळात जाण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यातून वेलेनतिना तेरेशकोवा हिने जगातील...
# 2019 : "मर्यादांच्या सीमेवर" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.04.2026 10:21
Send us Fan Mail राजाच्या आमंत्रण वरून तो तरुण राजमहालात राहू लागला. गाद्यागिरद्यांवर झोपू लागला. पंचपक्वान्नं खाऊ लागला. सुंदर दासी त्याची सेवा करू लागल्या. तो सगळ्यांचा उपभोग घेत होता ,अगदी सहजपणे. राजाची झोप उडाली. रात्री रात्री तो तळमळत पडे. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न ठाण मांडून असे, "या तरुणात आणि माझ्यात फरक काय? मी राजसुख उपभोगतोय, आणि तो ही त्याचा उपभोग घेतोय. मग, मी राजा, तू साधक...
# 2018 : अनावश्यक ॲंटिबायोटिक्स नको. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.04.2026 4:02
Send us Fan Mail "डॉक्टर, तो साध्या 'पॅरासिटॅमॉल'ने बरा होणार नाही हो... तुम्ही त्याला ते 'स्ट्राँग एंटीबायोटिकच द्या. उद्या मुलाची ट्रीप आहे, आम्हाला रिस्क नकोय!" त्या सुशिक्षित बापाचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांना 'रिस्क' नको होती. कळस म्हणजे, त्या ५ वर्षांच्या मुलाला फक्त व्हायरल सर्दी होती, आणि त्याचे वडील स्वतःच्या हाताने त्याच्या शरीरात...
# 2017 : नच्चियार कोईलचे रहस्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.04.2026 8:33
Send us Fan Mail हे ठिकाण पूर्वी 'गंधादन' वन म्हणून ओळखले जात असे. येथे मेधावी नावाचे एक महान ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना अपत्य नव्हते, म्हणून त्यांनी महालक्ष्मीची आराधना केली. एके दिवशी त्यांना वंजुल वृक्षाखाली एक लहान मुलगी सापडली. ऋषींनी तिचा सांभाळ आपल्या मुलीप्रमाणे केला आणि तिचे नाव 'वंजुलवल्ली' ठेवले. जेव्हा वंजुलवल्ली लग्नाच्या वयात आली, तेव्हा स्वतः भगवान विष्णू गर...
# 2016 : एम व्ही पॅसिफिक ब्रीझ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.04.2026 11:58
Send us Fan Mail हा नैसर्गिक वायू पृथ्वीच्या पोटातून काढला जातो तेंव्हा तो वायू रुपात असतो आणि तो वायू रूपातच ठेवला आणि वहन करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मोठी जागा लागणार म्हणून याला द्रव रुपात परीवर्तित करावा लागतो आणि त्यासाठी त्याचे तापमान शून्याच्या खाली म्हणजेच वजा 163 डिग्री सेल्सिअस इतकं उतरावे लागते म्हणजे तो गॅस द्रावरूपात परीवर्तित करून आम्हाला आमच्या जहाजात नेता येतो, हे गॅस थंड करण्या...
# 2015 : नमस्कार करतो: नको..नको, की कल्याणमस्तु...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 16.04.2026 7:04
Send us Fan Mail काही दिवसांपूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम — “माझ्याजागी देवाच्या पाया पडा.” त्यांचं म्हणणंही योग्यच. पण माझं थोडंसं वेगळं म्हणणे आहे. देवाला नमस्कार — तो रोजचा, मनापासून. पण माणसातल्या देवाला नमस्कार — तोही तितकाच आवश्यक. कारण देवाचे आशीर्वाद आपल्यामागे असणे गरजेचेच. पण ते ऐकू येत नाहीत, मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद — “सुखी रहा”, “आनंदी रहा”, “यशस्वी ह...
# 2014 : "The pearl" लेखक जॉन स्टाईनबेक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.04.2026 14:59
Send us Fan Mail जॉन स्टाइनबेक ह्या अमेरिकन नोबेल साहित्य पुरस्कार विजेत्या लेखकाची ही कथा आहे. मेक्सिकोच्या किनाऱ्यावर एक लहानसा कोळीवाडा आहे. किनो कोळ्याचं चं आयुष्य अगदी साधसुध आहे. बायकोच शांत, समजूतदार, आणि नवऱ्यावर जीव टाकणारी. त्यांच कधी पोट भरतं, कधी भरत नाही. पण ते समाधानी आहेत. त्यांना एक लहानसा मुलगा आहे — कोयोटिटो. जेमतेम काही महिन्यांचा. त्याच्या कडे एक विशेष कला आहे — समुद्रात...
# 2013 : जगातल्या पहिल्या मोबाईल फोनची गोष्ट" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 14.04.2026 9:52
Send us Fan Mail ३ एप्रिल १९७३. ठिकाण :न्यूयॉर्क शहर. सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. सिक्स्थ ॲव्हेन्यूवर त्या एका माणसाकडे लोकं वळून वळून बघतायत. कारण त्याच्या हातात जी वस्तू आहे, ती दिसायला अगदी एखाद्या विटेसारखी आहे. लांबलचक, जाडजूड, वर एक मोठा अँटेना... आणि त्या विटेसारख्या वस्तूतून हा माणूस, चक्क बोलतोय! रस्त्याच्या मधोमध उभं राहून, फोनवर बोलतोय! ज्यादिवशी मार्टिन कूपरने तो फोन हातात घेतला, त्...
# 2012 : "लेमोनेड फोर स्माईल" लेखिका ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.04.2026 6:55
Send us Fan Mail शीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल 12 वर्षांच्या अनाथ मायाने उभं केलं होते. आजीची रेसिपी, “लेमोनेड फॅार स्माईल्स” हे सुंदर नाव, “आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” अशी उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच लेमोनेड वर एक गुच्छ फुकट! कुठं शिकली हे सगळी एवढीशी पोरं ? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते!
# 2011 : "सेकंड ओपिनियन" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 12.04.2026 9:28
Send us Fan Mail व्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली .. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली. माडगूळकरांच्या बहिणीचा कान ठणकत होता. डॉक्टर म्हणाले, "ऑपरेशन तर करावंच लागेल." माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. औषध कानात टाकलं आणि म्हणाले, .. "तीन दिवसांत क...
# 2010 : भाकरीच्या चोरीला जबाबदार कोण? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.04.2026 3:43
Send us Fan Mail न्यायाधीशांनी केस ऐकली आणि मुलाला विचारले, “तू खरंच ब्रेड आणि चीजचं पॅकेट चोरलं होतंस का?” मुलाने खाली मान घालून उत्तर दिलं, “हो.” न्यायाधीश :- “का?” मुलगा :- “गरज होती.” न्यायाधीश :- “खरेदी का नाही केली?” मुलगा :- “माझ्याकडे पैसे नव्हते.” न्यायाधीश :- “घरच्यांकडून घेतले असते.” मुलगा :- “घरी फक्त आई आहे… ती आजारी आहे आणि बेरोजगार आहे. ब्रेड आणि चीज तिच्यासाठीच चोरलं.”
# 2009 :"रफू" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 10.04.2026 5:25
Send us Fan Mail “दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात. पण नातं फाटलं की लोक थांबतात. अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…” ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले, “दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.” ============
# 2008 : झोपेची काळजी घ्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.04.2026 8:36
Send us Fan Mail रॅपिड आय मूव्हमेंट (REM) स्लीप ही झोपेची एक अद्वितीय, सक्रिय अवस्था आहे, जी तीव्र मेंदू क्रियाकलाप, स्पष्ट स्वप्ने, डोळ्यांची जलद हालचाल आणि तात्पुरत्या स्नायू पक्षाघाता मुळे (अटोनिया) वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणपणे दर ९० मिनिटांनी चक्रात येणारी, REM अवस्था स्मृती दृढीकरण, भावनिक प्रक्रिया आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
# 2007 : "पोशाखाने माणसाची परीक्षा होते का?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.04.2026 5:28
Send us Fan Mail नसरुद्दीनने मित्राला राजेशाही पोषाख घालायला दिला. जिथे जातील तिथे परिचित त्या मित्राशीच बोलू लागले. त्याच्या पाहुणचार करू लागले. त्याने नसरुद्दीनच्या मनात असूया जागी झाली. यजमानांना मित्राचा परिचय करून देताना त्याने सांगितलं की "हा माझा फार जवळचा मित्र आहे, आजच आला, मग माझेच कपडे मी त्याला घालायला दिले. छान आहेत ना?" पुढे काय झालं ?.....
# 2006 : "निरागस" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.04.2026 0:54
Send us Fan Mail जेवण संपल्यावर बटू म्हणाला , " काकू सगळं छान झालं होत." मैत्रिणीने आनंदाने विचारलं " आवडलं ना सगळं ? " यावर निरागसपणे आठ वर्षांचा आशिष म्हणाला, " हो, आईने सांगितलंय ...कसेही झाले असले तरी छान म्हणावे. समोरच्याला बरे वाटते " ===========
# 2005 :परिपूर्ण मुलाखत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.04.2026 4:55
Send us Fan Mail तुम्ही खूपच उत्तम कामगिरी करत आहात. तुम्ही लोकांचा आदर करता, मग त्यांची पदे किंवा दर्जा काहीही असो. आता आम्हाला सांगा—आमच्यापैकी 'बॉस' (मुख्य अधिकारी) कोण आहे?" "हो, सर. तुमच्यापैकी दोन जण केवळ निरीक्षण करत आहेत. त्यातील एक जण वित्त विभागातील (Finance) आहे—ते केवळ पगाराविषयी चर्चा होईल तेव्हाच बोलतील. दुसरे गृहस्थ या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शक आहेत—ते 'एचआर...
# 2004 :Belief and Trust. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.04.2026 4:31
Send us Fan Mail एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पू...
# 2003 :संपत्तीचा वाटा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.04.2026 7:44
Send us Fan Mail अख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.
# 20001:बिस्कीटात "पार्ले" राहिले नावापुरते. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.04.2026 8:40
Send us Fan Mail पूर्वी पश्चिम उपनगरांतून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन अंधेरी सोडून पुढे गेली की पार्ले ग्लुकोज बिस्कीटांचा वास येई. बिस्कीटं भाजली जात असल्याचा तो दरवळ गाडीभर पसरे. अनेकांची भूक खवळून उठे. गाढ झोपेतला प्रवासीही या घमघमाटाने जागा व्हायचा. ट्रेन पार्ल्याच्या जवळ आलीय, हे कळायचं. किती वर्षं तरी मुंबईकरांनी रेल्वेने येता जाता त्या वासामुळे मनात ती बिस्कीटं खाल्ली असतील....
# 2002 :बायकोचा मित्र. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.04.2026 11:23
Send us Fan Mail “ओह! इट इज टू लेट’’, म्हणत तो जायला निघाला. त्याला हसून सगळ्यांनी निरोप दिला. तो गेल्यावरही मंजिरीचं ‘राजा पुराण’ चाललंच होतं. माधवला भुरक्यावरून खडसावूनही झालं. रात्री मंजिरी शांत झोपली, पण माधवची मात्र झोप उडून गेली. कारण…‘बायकोचा मित्र!’ माधव-मंजिरीचा नित्यक्रम सुरू झाला, राजा गेला खरा, पण माधवच्या मनातून राजा काही जात नव्हता. मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी त्या राजाने घर करून ठे...
# 1999 : साळींदराचे कोडे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.04.2026 5:43
Send us Fan Mail कल्पना करा की कडाक्याची थंडी पडली आहे. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीने कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवी आहे. साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचायला लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन...
# 2000 : पिझ्झाचा जन्म पोट भरण्याच्या गरजेतून झाला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.04.2026 4:45
Send us Fan Mail ‘हिस्ट्री टुडे'नुसार, पिझ्झाच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल १८८९ मध्ये झाला. खरे तर, राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा (मार्गेरिटा ऑफ सॅवॉय) नेपल्सला भेट देणार होते. त्यांना फ्रेंच जेवणाचा कंटाळा आला होता आणि त्यांना काही स्थानिक पदार्थ चाखून बघायचे होते. प्रसिद्ध पिझ्झा निर्माता राफेल एस्पोसिटो यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी राणीसाठी तीन प्रकारचे पिझ्झे तयार केले, त्...
# 1998 : "अमेझॉन मधले ते सात मंतरलेले दिवस" लेखक संकेत बराले. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.04.2026 11:28
Send us Fan Mail मी ॲमेझॉनमधून मनात एक हुरहूर घेऊन परत आलो…आणि एक जाणीव घेऊन , की त्या सात दिवसांत… माझं शरीर त्याच्या नैसर्गिक घरात होतं ! आणि आता ज्या पिंजऱ्यात मी परत आलो…तो मीच बांधला होता…हळूहळू… एकेक सोयीच्या नावाखाली. अजूनही…कधी कधी…डोळे बंद केले की…ते जंगल आठवतं… विचार येतो , "जर मी पुन्हा तिथे गेलो…तर ते मला ओळखेल का?" आतून एक उत्तर येतं "जंगल आपल्यापेक्षा खूप जुनं आहे…आण...
# 1997 : देवा, त्यांना क्षमा कर.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 31.03.2026 6:49
Send us Fan Mail जेरुसलेमच्या गोलगाथा टेकडीवर, प्रभू येशूचं क्रुसीफिक्सेशन उरकून, दोन मजूर खाली सैनिक छावणीत, क्रुसीफिक्सेशनचा 'मेहनताना' घेण्यासाठी आले. मुकादमाने त्यांना किती खिळे ठोकले विचारलं व प्रभू येशूच्या अंगावर ठोकलेल्या खिळ्यांइतक्या सुवर्णमुद्रा अदा करुन, त्यांना म्हणाला, 'जा ऐश करा!'
Podobné podcasty
Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály