Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ Epizody: 2151

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: lifeofstories.buzzsprout.com

Autor

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Kategorie

Kids

Nejnovější epizoda

10. říj 2026

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

# 2126 : श्रावणातील वरदलक्ष्मी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.09.2026

Send us Fan Mail श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहेच. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे म्हणजेच जरा-जिवंतिका पूजन केले जाते.  श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजनासह वरदलक्ष्मीचेही व्रत केले जाते. तर आज हे वरदलक्ष्मी व्रत जाणून घेऊया.

# 2125 : मानो, या ना मानो... ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.09.2026

Send us Fan Mail पंडितजी भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव  त्यांना जिवंत वाटत असे. एकदा त्यांनी का त्यांच्या मुलाने नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती.  पण त्या गडबडीत  तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला.  पंडितजी अस्वस्थ झाले.   "मेरा कान्हा मुझसे रूठ गया"... असेच सारखे सारखे म्हणत होते.

# 2124 : माणुसकी अजूनही जीवंत आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.09.2026

Send us Fan Mail मी चालत असताना माझ्या वाटेत एका विजेच्या खांबावर एक छोटासा कागदाचा तुकडा झुलत होता. त्यावर काय लिहिलंय याची उत्सुकता मला झाली आणि मी जाऊन वाचलं. त्यावर लिहिलं होतं: "माझं ५० रुपये हरवलं आहे. कुणाला मिळालं असेल तर कृपया या पत्त्यावर परत द्यावं. मला नीट दिसत नाही." – आणि एक पत्ता दिला होता.

# 2123 : ‘बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.09.2026

Send us Fan Mail न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या मुलाला आईने विचारलं, “घरचं लोणचं पाठवू का?” त्याने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं—“नको गं, इथे सगळं मिळतं!” तीन वर्षांनी त्याने मानसशास्त्रातला एक विचार वाचला… आणि आईच्या त्या साध्याशा प्रश्नाचा अर्थच बदलून गेला. त्याला उमगलं—त्या २०० ग्रॅम लोणच्यात फक्त लोणचं नव्हतं; आणखी बरंच काही सात समुद्र पार करून त्याच्यापर्यंत पोहोचणार होतं. मदत नाकारताना आपण नकळ...

# 2122 : " कृष्णजन्म " (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.09.2026

Send us Fan Mail कृष्णाच्या जन्माच्या रात्री मथुरेत मुसळधार पाऊस कोसळत होता.  तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन यमुनेकडे निघाले.  दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णाच्या चरणांशी येऊन शांत झाली आणि शेषनागाने फण्यांचं छत्र धरून त्याचं रक्षण केलं.  वसुदेवांनी कृष्णाला गोकुळात पोहोचवलं आणि परत तुरुंगात आले.  कंसाला मात्र कृष्ण मथुरेतच असल्याचं वाटत होतं. पण ज्याला तो शोधत होता,...

# 2121 : "ज्याने स्टॅलिनलाही चकीत केले ." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.09.2026

Send us Fan Mail एक कोरा चेक … आणि त्याच्या बदल्यात चक्क एक लाख रुबल्स! समोर होता बँकेचा कॅशियर… आणि पैसे काढून दाखवण्याचं आव्हान होतं खुद्द स्टॅलिनचं! वुल्फ मेसिंगने हा विलक्षण प्रयोग खरंच यशस्वी केला होता का? तो  जागतिक कीर्तीचा हिप्नॉटिस्ट होता. भल्याभल्यांच्या मनावर ताबा मिळवण्याची कला त्याला अवगत होती.  त्याच्या आयुष्याभोवती अनेक एक गूढ आख्यायिका विणलेल्या आहेत. स्टॅलिनलाही चकित करणाऱ्या वुल्...

# 2120 : "देवा मला वर नको" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.09.2026

Send us Fan Mail त्या संताला लोक प्रतिपरमेश्वरच मानू लागले होते. त्यामुळे चिंतेत पडून परमेश्वराने ठरवलं की आता याला काहीतरी दैवी शक्ती दिलीच पाहिजे.  “लोकांना माणुसकीची ताकद कळली, तर माझ्या दैवी शक्तीचं काय?” फकिराने कधी तशी कामनाही केलेली नसताना परमेश्वर त्याला प्रसन्न झाला, त्याच्यापुढे प्रकट होऊन वर माग म्हणू लागला. फकीर म्हणाला, परमेश्वरा, मागण्यासारखा तर तूच होतास. मी तुलाही मागितलं नाही, तर...

# 2119 : सहवासाची भूक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 31.08.2026

Send us Fan Mail "आई... तुम्ही जेवलात ना?" वैशालीने सहजच विचारलं. समोर बसलेल्या सुमित्रा काकूंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो गं सूनबाई... पोटभर जेवले." पण वैशाली स्वयंपाकघरात गेली, तर सिंकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं. ताटात अर्धी कोरडी पोळी, थोडंसं पाणी... आणि भाजीला तर हातही लावलेला नव्हता. पहिल्या दिवशी तिला वाटलं, कदाचित तब्येत बरी नसेल... पण दुसऱ्या दिवशी...

# 2118 : सासुबाईंची अट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 30.08.2026

Send us Fan Mail "सूनबाई... या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन, जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील." नववधू स्वराने आश्चर्याने आपल्या सासूबाई सुमनताई यांच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचार आला, "कदाचित सासूबाई घराचे नियम सांगतील... पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर पदर घ्यायचा किंवा कुणाशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही." स्वरा हळूच म्हणाली, "हो सासूबाई. तुमची प्रत्येक गोष्ट मी मान्य कर...

# 2117 : एका गाण्याची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.08.2026

Send us Fan Mail जयश्रीबाईंनी सुरेश भटांना विचारले..., त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले..., गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..! "हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे..., काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही...

# 2116 : तुमचा आशीर्वाद हिच भेट! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.08.2026

Send us Fan Mail हळूहळू खात्री पटायला लागते की लोकांनी पत्रिकेतील सूचना गंभीरपणे घेतली आहे. आपणही पाकीट खिशातून काढत नाही. उलट मनात यजमानांचं कौतुक सुरू होतं. किती छान विचार आहे. शेवटी लग्न म्हणजे माणसांनी एकत्र येणं. पैशाचा व्यवहार कशाला? माझ्यातला समाजसुधारक नुकताच जन्म घेत असतो आणि तेवढ्यात हॉलच्या प्रवेशद्वारातून ती येते. प्रत्येक लग्नात ती असते. कधी आत्या. कधी मावशी. कधी आईच्या मामाच्या मुलाच...

# 2115 : आपण चुकीच्या वाटेवर चालू नये म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.08.2026

Send us Fan Mail सारंग आधीच प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचा पुण्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर होता. आज सोलापूरमध्ये दुपारी दोन वाजता त्याची एका सरकारी अधिकाऱ्यासोबत अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तो तब्बल पन्नास लाखांची लाच देणार होता. हे काम बेकायदेशीर होते, पण स्वतःची कंपनी वाचवण्यासाठी त्याने हा चुकीचा मार्ग निवडला होता. त्याच्या पत्नीने, &ap...

# 2114 : पण त्यांचे अनुभव अमूल्य असतात. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.08.2026

Send us Fan Mail आधी जेवणाच्या टेबलावर महेंद्रजी एखादा मजेशीर किस्सा सांगत असत. आता, सर्वजण शांतपणे जेवण आटपून आपापल्या खोलीत निघून जात. सर्वात मोठा बदल आरुषमध्ये झाला होता. त्याने आजोबांच्या खोलीत जाणे जवळपास बंद केले होते. त्याला वाटायचे की आजोबा आता त्याच्यावरही रागवले आहेत. एके दिवशी शाळेत त्याला "माझा सर्वोत्तम मित्र" या विषयावर निबंध लिहायचा होता. त्याने लिहिले— "आधी माझे सर्व...

# 2113 : निवृत्ती म्हणजे शेवट नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.08.2026

Send us Fan Mail रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं, आता आपली कोणालाच गरज नाही.. पण सुनेने असा एक निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.  निवृत्ती म्हणजे शेवट नाही… स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ असते ही...

# 2112 : अडीच मिनीटात संपवला अपहरणाचा थरार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.08.2026

Send us Fan Mail कॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता. उड्डाणापूर्वी शिफोल विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्याने बार-लेव्ह यांना 'चार प्रवासी संशयास्पद दिसत आहेत' असं सांगितलं. त्यापैकी दोघांकडे सेनेगलचे पासपोर्ट ह...

# 2111 : त्सुतोमु यामागुची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.08.2026

Send us Fan Mail त्या दिवशी  जेव्हा ते तिथून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा हिरोशिमावरील आकाशाचे स्वरूप अचानक बदलले. यामागुची यांनी वर पाहिले असता, त्यांना अमेरिकेचे B-29 हे बॉम्बर विमान आकाशातून उडताना दिसले. त्यातून पॅराशूटला जोडलेली एक छोटी वस्तू खाली सोडलेली  होती. काही क्षणांतच, आकाशात एक प्रखर लख्ख प्रकाश पसरला. नंतर त्यांनी याचे वर्णन एखाद्या प्रचंड मॅग्नेशियम फ्लेअरच्या तीव्र झगमगाटा सारख...

# 2110 : '438 दिवस समुद्रात.' (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.08.2026

Send us Fan Mail जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळजवळ एक तृतीयांश भाग या महासागराने व्यापला आहे.  पण याच प्रशांत महासागरात मेक्सिकोत मासेमारी करणारा जोसे साल्वाडोर अल्वारेंगा. त्याच्याकडे होती एक फक्त ७ मीटर लांबीची नाव,.त्यात ८००० किमीचा अपघाताने घडलेला थरारक प्रवास, जीव वाचवण्याची धडपड. तब्बल ४३८ दिवस भरकटत राहिला एकट्याने एवढ्या मोठ्या समुद्रात जिंवत...

# 2109 : 'हुकूमशाही, जिथे सर्वच ‘होयबा‘ असतात!' (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.08.2026

Send us Fan Mail रशियाचा हुकूमशहा आपल्या खोलीत बेशुद्ध पडला होता… पण बाहेर उभ्या असलेल्या कुणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती.  ज्याच्या एका शब्दाने माणसं तुरुंगात जायची, त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलवायचं की नाही, हे ठरवायलाही सगळे घाबरत होते.  भीती इतकी होती की लोकांनी स्वतःचा विचार करणंच सोडून दिलं होतं. ही गोष्ट आहे स्टालिनची… आणि त्याने उभी केलेल्या “होयबा” व्यवस्थेची.  कारण सगळेच हो म्हणायला...

# 2108 : "जीवन का जगावं?" पु.ल. देशपांडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.08.2026

Send us Fan Mail प्रिय चंदू. जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस.  वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या.  My dear boy, whose deaths are justifiable? परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली.  आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं justifiable होईल त्या दिवशी आपण मरणाचं justifica...

# 2107 : प्रेमाला प्रतिसाद हवा असतो . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.08.2026

Send us Fan Mail "परतफेडीची संधीच न ठेवता केलेली मदत हे उपकार होतात. ते कोणालाही आवडत नाहीत".  "तुम्ही त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून परतफेडीची संधी दिलीत. बरोबरीला आणलंत."  "प्रेम फक्त बरोबरीच्या नात्यातच जन्मू शकतं! माणसाला असं वाटायला हवं की ‘मीसुद्धा या नात्यात काहीतरी देतोय."

# 2106 : "अत् दीप भव." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 18.08.2026

Send us Fan Mail ही कथा फक्त कंदिलाची नाही. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या ज्ञानावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर, दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जगत असतो. पण तो उजेड कायमचा नसतो. एखाद्या क्षणी तो विझतो... आणि मग आपल्यालाच अंधारात चाचपडावं लागतं. म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेला एक सुंदर संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे— "अत्त दीपो भव."

# 2105 : हिटलरचा मृत्यू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 18.08.2026

Send us Fan Mail आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या ५० फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता.  फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडलेले असायचे.  २५ एप्रिल १९४५ नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, स्वतःच्या मरणाची तयारी करणं.

# 2104 : कथा नागपंचमीची. : श्रद्धेत दडलंय विज्ञान (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.08.2026

Send us Fan Mail आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस उजाडला. वारुळात जी नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला........ जशी नागीण शेतकरी कुटुंबावर  प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हांवरही प्रसन्न होवो. ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!”

# 2103 : घन घन माला नभी दाटल्या" लेखक : सुमित्र माडगूळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.08.2026

Send us Fan Mail "ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे…” असं आपल्या कवितेतून सांगणारे कवी, गीतकार आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर  यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी जन्माला आली.  त्यापैकीच एक गीत  म्हणजे— “घन घन माला नभी दाटल्या,कोसळती धारा…” पावसाळ्याचं नितांत सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं करणारं हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं.  चला, ऐकूया ‘घन घन माला नभी...

# 2102 : "Monkeys PAW" . रूपांतर : आोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 14.08.2026

Send us Fan Mail ताईत असो की जादूची कांडी, इच्छा मागताना जरा जपूनच! कारण आपल्याला काय हवंय हे कळतं; पण ते मिळाल्यावर काय होईल, याचा अंदाज नेहमीच येतो असं नाही.  प्रत्येक इच्छा पूर्ण होणं  आपल्यासाठी चांगलीच ठरेल असं नाही. कधी कधी हवी असलेली  गोष्ट मिळते खरी, पण तिची किंमत मात्र, कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त  निघते.  म्हणून जे आहे त्यात समाधान मानणं आणि काही मागण्याआधी जरा विचार करणं—हेच खरं शहाणपण!...

Poslouchej podcast Life of Stories v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály