BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Podcast'in sitesini ziyaret etmeyi ve yapımcısını desteklemeyi unutma: www.bbc.co.uk

Yazar

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcast web sitesi

www.bbc.co.uk

Son bölüm

25 Mar 2026

Nereden dinlenir?

Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakında

Podcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol

Google Play'den indir Ücretsiz yükle Android 5 Mn+ indirme · 4,8 puan iOS yakında

Bölümler

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi 08.10.2024

अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं. पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं. ही राज्य कोण...

माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi 08.10.2024

माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते... मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो. माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्या...

आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे? 04.10.2024

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय. सध्या धनगर समाजाचा समावेश भटक्या जमातीत होतो. पण आपल्याला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी या समाजाकडून केली जातेय. मात्र आदिवासी नेत्यांचा याला विरोध आहे. मग आदिवासी म्हणजे नेमकं कोण? कोणत्याही समुदायाला आदिवासी समूहात समाविष्ट करण्याचे निकष कोणते? भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यात फरक काय आह...

सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची? 03.10.2024

जगातलं सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचीही उंची वाढतेय आणि अशी उंची वाढण्यामागचं कारण असू शकतं एक नदी. एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि अरुण नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. अरुण नदी कुठून वाहते? शिखरांची उंची वाढण्यात नदीचा काय संबंध? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग -...

संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi 27.09.2024

'लापता लेडीज' हा सिनेमा या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येतोय. पण यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेत आणखी एक हिंदी सिनेमा आहे. आणि युनाटडेट किंग्डमची ऑफिशियल ऑस्कर एन्ट्री आहे. यावर्षी 'संतोष' हा सिनेमा त्यांची ऑस्करसाठीची ऑफिशियल एन्ट्री असल्याचं जाहीर करण्यात आलंय. क हिंदी सिनेमा युकेकडून ऑस्करचा दावेदार कसा ठरतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशन वनकर एड...

इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं? BBC News Marathi 26.09.2024

हिजबुल्लाह या सशस्त्र गटावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात जवळपास 500 जण मारले गेले तर हजारो जखमी झाले. हा गेल्या काही दशकांमधला सर्वात भीषण हल्ला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रॉकेट्स डागली. इस्रायलने लेबनॉनवर हा हल्ला का केला? यामुळे आता मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झालीय का? रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

एन्काऊंटर म्हणजे काय? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला का? BBC News Marathi 25.09.2024

एन्काउन्टर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काउन्टर स्पेशलिस्ट असं पद असतं का? बदलापुरातल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली. एन्काउन्टर म्हणजे नेमकं काय? कायदा याबद्दल काय सांगतो? आणि यापूर्वीची कोणती एन्काऊन्टर्स चर्चेत आली होती? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे ए...

पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र | BBC News Marathi 24.09.2024

2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल. सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल? रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

प्रेग्नन्सीदरम्यान बदलतो मेंदू, संशोधनातून झालं सिद्ध | BBC News Marathi 20.09.2024

प्रेग्नन्सीच्या काळात विसराळूपणा वाढणं, गोंधळ होणं, अचानक ब्लँक होणं असं झाल्यास त्याला प्रेग्नन्सी ब्रेन किंवा बेबी ब्रेन म्हटलं जातं. पण ही फक्त एक संकल्पना नसून प्रेग्नन्सीच्या काळात मेंदूत खरंच बदल होतात, हे आता अभ्यासातून समोर आलंय. गर्भार राहण्यापूर्वी, गरोदरपणाच्या 9 महिन्यांच्या काळात आणि त्यानंतर मेंदूमध्ये काय बदल होतात याचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे बदल दिसून...

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठीचं 'मिशन मौसम' काय आहे? BBC News Marathi 19.09.2024

11 सप्टेंबरला कॅबिनेटने मिशन मौसम नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल. यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. Ministry of Earth Science - म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. India Meteo...

GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi 19.09.2024

उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील. कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे...

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात कसे? जेवतात, झोपतात कसे? BBC News Marathi 17.09.2024

पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओ रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर

डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे | BBC News Marathi 12.09.2024

5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे. कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - ग...

स्पेसएक्स पोलारिस डॉन मिशन काय आहे? अंतराळ पर्यटन सुरू होणार? BBC News Marathi 11.09.2024

खासगी पैशांतून स्पेसवॉकसाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली. अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे. या मोहीमेचं नावं आहे पोलारिस डॉन. जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे. फाल्कन 9 च्या या पोलारिस डॉन मोहीमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र अस...

स्लीप प्निया म्हणजे काय? या आजारातले धोके काय आहेत? 10.09.2024

Sleep Apnea म्हणजे झोपेमध्ये श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणं. यात मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरू होतो. पण यामुळे शांत झोप लागत नाही. दीर्घकाळ असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्लीप अॅप्नियाची लक्षणं कोणती? याचे धोके कोणते आहेत? आणि यावर उपचार काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटि...

शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi 09.09.2024

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला. पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत? BBC News Marathi 06.09.2024

एका नवीन औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने मान्यता दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स. जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो. पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे ए...

जगातल्या 99% जनतेला होतोय या गोष्टीचा त्रास | BBC News Marathi 05.09.2024

जगामध्ये अशी एक गोष्ट आहे जिचा जगभरातल्या 99% जनतेला त्रास होतोय... आणि दरवर्षी जवळपास 40 लाख लोक याला बळी पडतात. ही गोष्ट आहे - वायू प्रदूषण - Air Pollution 7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळण्याचं 2020 मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? जगभरात यामुळे कोणते आजार भेडसावतायत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. र...

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आणलेलं अपराजिता विधेयक काय आहे? BBC News Marathi 04.09.2024

ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अपराजिता विधेयक आणलं आहे. कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर मोठी निदर्शनं झाली. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचं एक विधेयक मंजूर केलं. पण काय आहे हे विधेयक? समजून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

बोईंग स्टारलायनर असं परतणार अंतराळवीरांशिवाय | BBC News Marathi 03.09.2024

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे. या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने ज...

वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय? | BBC News Marathi 03.09.2024

7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे. मध्यपूर्वेतल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असं वेस्ट बँक काय आहे? त्यावर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निव...

कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय? त्याचा पावसाशी काय संबंध? BBC News Marathi 31.08.2024

पावसाचा अंदाज वर्तवताना त्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा नेहमी उल्लेख होतो. काय असतो हा कमी दाबाचा पट्टा? त्याचा पाऊस पडण्याशी काय संबंध असतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

रिलायन्स, डिस्नी विलीनीकरण : मीडिया क्षेत्रात काय उलथापालथ होणार? BBC News Marathi 30.08.2024

रिलायन्स आणि डिस्नी इंडिया यांच्या विलिनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत. विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल. नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिस्ने मध्ये? Jio Cine...

मंगळ ग्रहावर जीवसृष्टी सापडू शकेल का? BBC News Marathi 29.08.2024

नासाच्या संशोधकांना मंगळावर पृष्ठभागाखाली खोल पाण्याचे साठे सापडले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते. पृथ्वीवर पृष्ठभागाखाली एक प्रचंड मोठं जैविक विश्व असल्याचं गेल्या काही दशकांमध्ये अभ्यासातून समोर आलंय आणि मंगळावरही कदाचित हीच परिस्थिती असू शकते. मंगळावर जीवसृष्टी असलीच तर ती पृष्ठभागाखाली असण्याची शक्यता आहे. रिपो...

रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi 29.08.2024

लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे र...

सोपी गोष्ट podcast'ini Replaio'da dinle

Radyo ve podcast'ler tek uygulamada - ücretsiz, kayıt gerektirmez. Bugün yükle ve lansmanı kaçırma

Google Play'den indir

Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır