Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 avsnitt

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: www.storytel.com

Skapare

Santosh Deshpande

Kategori

Arts

Poddens webbplats

www.storytel.com

Senaste avsnittet

17 sep 2026

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! 26.07.2019

स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात.  ‘करसाळ’ ऐकण्यासाठी य...

45: झंझावात- झलक 19.07.2019

खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध...

44: ‘मरडेल मिस्ट्री’ उलगडताना.... 12.07.2019

स्टोरीटेल कट्टा With उर्मिला! जाणून घ्या मरडेल मागची कहाणी! उर्मिला बोलते करत आहे लेखक नितीन थोरात आणि अभिनेते-व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट यशपाल सारनाथ यांना! मरडेलचा जन्म... लेखनामागची प्रेरणा... कथेला आवाज देताना लागणारी माध्यमाची जाणीव... इतर भन्नाट किस्से ... प्रत्यक्षात ऐका आणि एन्जॉय करा हा आगळा-वेगळा धमाल पॉडकास्ट, फक्त स्टोरीटेल कट्ट्यावर!  मरडेल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस...

43: झलक: काळं मांजर 06.07.2019

त्या काळ्या मांजराने माझ्या आयुष्याची वाट लावली होती. त्याला चांगलाच धडा मिळवण्याची मी संधीच पहात होते. त्या दिवशी ती मला मिळाली... काय झाले पुढे? ऐका एक विलक्षण थरारकथेची झलक... आर्या नाईक लिखित, परी तेलंग यांच्या आवाजात: काळं मांजर काळं मांजर- आर्या नाईक सह: परी तेलंग स्टोरीटेलवर ‘काळं मांजर’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

42: घडल्या अशा सुरेख, 'पिल्लू कथा' अनेक! 29.06.2019

राजीव तांबे यांच्या पिल्लू कथांच्या जन्मामागची सुरस कहाणी सांगत आहेत स्वत: राजीव तांबे, पब्लिशर सई तांबे आणि त्यांना बोलते करत आहे मेघना एरंडे! मगरु, डुकरू, उंदरी, सुंदरी, डासुली, कुकूच, कुकी आणि इतरही पिल्लू कथांचे धमाल किस्से ऐका ह्या ‘स्टोरीटेल कट्ट्या’च्या स्पेशल पॉडकास्टमध्ये! ‘पिल्लू कथा’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक कर...

41: इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही... माणूस केलंत तुम्ही मला… 22.06.2019

वरिष्ठ पत्रकार, ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून टी.व्ही. आणि रेडिओ, या माध्यमांतून आपल्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे घरोघरी पोहोचलेले आणि लोकप्रिय असलेले व्यासंगी रसिक श्री. राजेंद्र हुंजे यांच्याशी स्टोरीटेल कट्टयावर रंगलेला संवाद.  ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या शहरात स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवणारे श्री. राजेंद्र हुंजे सांगत आहेत त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल! आयुष्य समृद्ध करणाऱ्या कितीतर...

40: झलक- रत्नाकर मतकरींच्या ‘दुष्ट गोष्ट’ची ! 15.06.2019

दुष्ट गोष्ट: रत्नाकर मतकरी Do you belive in `Witchcraft'? शाळेत जाणार्‍या सुनाम राजवाडे ह्या हुशार आणि वर्गात अव्वल येणार्‍या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू होतो. पूर्ण वर्ग अबोल आणि एका अनामिक भितीने ग्रासलेला असतो. सुनाम मेला कसा? त्याच्यावर चेटूक झाले होते, की? .... की अजून काही? संशय त्याच्याच वर्गातील रिया नावाच्या मुलीवर येतो. नक्की कारण काय? चेटूक की अजून काही? रत्नाकर मतकरी यांच्या ओघवत्य...

39: `सोंग` ते `मरडेल`, व्हाया `मोरपीस`! 08.06.2019

नितीन थोरात. आपल्या निरनिराळ्या कथानकांमधून संवेदनशीलता जपत मार्मिक भाष्य करणारा हा नव्या दमाचा शैलीदार लेखक. `स्टोरीटेल`वर गाजत असलेल्या `सोंग`, `पेटलेलं मोरपीस`, `मरडेल`, `आय लब यु`  तसेच नुकत्याच दाखल झालेल्या मुलांसाठीच्या बेडटाइम स्टोरीज् यांतून नितीन थोरात यांनी आपलं निराळं स्थान निर्माण केलं आहे. `स्टोरीटेल कट्ट्या`वर त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी, त्यांच्या विविध कथांच्या निर्मितीविषयी आ...

38: `स्टोरीटेल`वरील उन्हाळी गोष्टींची बेगमी 25.05.2019

उन्हाळा संपायच्या आत स्टोरीटेलवर काय ऐकाल? स्टोरीटेलवर खास सुट्टीच्या निमित्ताने एकाहून एक धमाल गोष्टी, कथा, कादंबऱ्या आलेल्या आहेत. विनोदी, क्लासिक्स, ऐतिहासिक, रहस्य कथांपासून बच्चेकंपनीला हरखून टाकणारं `स्टोरीटेल`वरचं गजबजगलेलं जग काय आहे....याचा घेतलेला वेध. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

37: झलक- ओसाडवाडीचे देव 18.05.2019

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी....

36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज् 13.05.2019

खास सुट्टीच्या दिवसांमध्ये बच्चेकंपनीसाठी स्टोरीटेलनं आपला खजिना खुला केला आहे, तो म्हणजे बेडटाइम स्टोरीज्. अगदी गाव, जंगल ते थेट भविष्यातलं रोबोटिक शहर इथपर्यंत कल्पनारम्य धमाल गोष्टी आणि त्यातली एकाहून एक झकास पात्र मुलांना भेटायला येत आहेत. अशा या आगळ्या बेडटाईम स्टोरीज् ज्यांच्या लेखणीतून साकारल्या त्या योगेश शेजवलकर, डॉ. सुनेत्रा तावडे आणि ऐश्वर्या कुमठेकर यांचा सई तांबे यांच्याशी रंगलेल्या ग...

35: झलक- मरडेल 03.05.2019

मरडेल- ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ सवत हा प्रकारच भयंकर, आणि त्यात सख्खी बहीणंच सवत असल्यावर काय सांगणार. इतकी धुसमूस होते मनात की थेट ‘मरडेल’ करायचा विचार येतो मनात.   पण कोणाचा? बहीणच सवत आहे, मग? नव-याचा करायचा ‘मरडेल’... की लग्न ठरवणा-याचा... बहीणीचा का थेट…? पण ते तसं सोप्पं काम नसतं. मरडेल करनं जसं सोप्पं नसतं तसं तो शोधनं बी लै अवघड असतं. शेवटी किती झालं तरी ते नातंच असं असतं, हडळीसारखं हसणारं…. का...

34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून 26.04.2019

रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. स्टोरीटेल वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित  तो, ती आणि तिचा तो ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.  तो, ती आणि तिचा तो ऐकण्यासाठी  इथं  क्लिक क...

33: झलक- अजातशत्रू 19.04.2019

स्टोरीटेल ओरिजिनल म्हणून अलीकडेच दाखल झालेली अजातशत्रू रसिकांची मने जिंकते आहे.  अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात एक खूप विचित्र घटना घडली. मगध राज्याला ‘साम्राज्य’ बनवणाऱ्या सम्राट बिम्बिसाराचा त्याच्या स्वतःच्या पुत्राने खून केला. त्या पुत्राचे नाव ‘अजातशत्रू’! त्यानंतर अजातशत्रूच्या मुलाने सिंहासन बळकावण्यासाठी त्याचा जीव घेतला. नंतर अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपुत्र स्वतःच्या प...

32: माझ्या वाचनाची गोष्ट : महेश म्हात्रे 12.04.2019

मराठीतील ज्येष्ठ पत्रकार, संपादक महेश म्हात्रे हे स्वतः उत्तम संवादक देखील आहेत. लेखणी आणि वाणी अशा दोन्ही माध्यमांतून त्यांचा व्यासंग प्रतिबिंबित होत असतो. त्यांच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये अर्थातच पुस्तकं, वाचन आणि चिंतन यांचा मोठा वाटा आहे. त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.  मराठी रसिकांसाठी खास ऑफर-  स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद घ्या. ३० दिवस मोफत.    इथं क्लिक करा, साईन अप करा आणि...

31: ... म्हणून `माया महा ठगनी..` ची रसिकांना भुरळ! 23.03.2019

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मराठीतील पहिले ऑडिओबुक माया महा ठगनी.. स्टोरीटेलवर धुमाकूळ घालते आहे. मराठी रसिकांना हा विषय, त्यातली पात्रं, त्यात दडलेलं रहस्य का आकर्षित करीत आहे, हे जाणून घेण्यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर एक झकास मैफल रंगली. त्यात सहभागी झाले माया महा ठगनीचे लेखक संवेद गळेगावकर, ज्यांच्या आवाजातून ही कथा रसिकांपुढे आली त्या अभिनेत्री लीना भागवत आणि तरुण वाचक-श्रोत्यांचा प्रतिनिधी...

30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे! 08.03.2019

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री व प्रतिभावंत दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणाल कुलकर्णींची ओळख एक उत्तम वाचक व भाषा अभ्यासक म्हणूनही आहे. आपल्यातील कलागुणांना साहित्याने कसा आकार दिला इथपासून ते पुढच्या पिढीवर वाचनाचे संस्कार कसे घडविले हे त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणीच. स्टोरीटेलवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे ही अजरामर साहित्यकृती मृणाल कुलकर्णींनी आ...

29: शोध फराओचा... मराठीतील पहिल्या ऑडिओबुक सिक्वेलची उलगड 22.02.2019

स्टोरीटेलवर गाजलेल्या संजय सोनवणी लिखित फराओचा संदेश या ओरिजनल मालिकेचा सिक्वेल म्हणून शोध फराओचा ही मालिका आता वाचक-श्रोत्यांसाठी स्टोरीटेलवर दाखल झाली आहे. प्राचीन सिंध व ईजिप्त संस्कृतींचा मिलाफ, तत्कालीन राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्वांचा वेध आणि सत्तेसाठीचा लढा यांचा अत्यंत उत्कटपणे घेतलेला वेध हे सारं काही श्रोत्यांच्या नजरेपुढं उभं करणारं हे कथानक. लेखक संजय सोनवणी यांच्याशी अजिंक...

28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` 21.02.2019

अमेरिकेत स्थायिक प्रसिद्ध उद्योजक आणि लेखक श्रीनिवास ऊर्फ श्री ठाणेदार यांची प्रेरक यशोगाथा ऐका त्यांच्यात शब्दांत. स्टोरीटेल बिझनेस मध्ये सक्सेस कोड मालिकेमध्ये रंगलेल्या गप्पांमधून श्री ठाणेदार, त्यांचा प्रवास, त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तरुणांसाठीचा संदेश असं खूप काही उलगडतं. चुकवू नये अशा या मुलाखतीचा हा संक्षिप्त भाग.  संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- https://bit.l...

27: वाचन आणि आपण.... डॉ. अनिल अवचटांशी मुक्त संवाद 21.01.2019

डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसावर नितांत प्रेम करणारे बहुपैलू व्यक्तिमत्व. वाचनाचे आपले स्वतःवर झालेले संस्कार उलगडून दाखवतानाच वाचनसंस्कृतीबाबत निरीक्षणंही ते स्टोरीटेल कट्ट्यावर सागर गोखलेंसमवेत झालेल्या या गप्पांमधून उलगडतात. ऐकायलाच हवा असा संवाद प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करुन जातो.

26: सचिन ईटकर ....मराठी पाऊल पडती पुढे! 08.01.2019

जगभरातील मराठी साहित्य संस्कृती जतनासाठी कार्यरत असणारे तरुण व्यक्तिमत्व म्हणजे जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर.  एक कल्पक, कुशल संघटक म्हणून सचिन ईटकर यांचा लौकीक निर्माण झाला आहे. मराठी तरुणाईला नवी दिशा देण्यासाठी स्टोरीटेलच्या सहकार्यातून त्यांनी एक संकल्प सोडला आहे. त्याविषयी....

25: ईत्र..... आशयातून दरवळणारं प्रेमाचं अत्तर 23.12.2018

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला स्टोरीटेलवर येणारी ईत्र ही गोष्ट म्हणावी तर तुमच्या-आमच्यातलीच. पण त्यात दडलेले भावनिक कंगोरे, सामाजिक आशय आणि नव्या पिढीतील नात्यांमधले बदलते संदर्भ या कथानकाला खोली देतात. गंध पेरण्याची अव्यक्त आस असणाऱ्या अत्तराची कुपिच जणू.  अशा या ईत्रच्या लेखिका हीनाकौसर खान आणि ज्याच्या आवाजातून ही कथा फुलली आहे, तो अभिनेता क्षितिश दाते यांच्याशी स्टोरीटेल पब्लिशर सुकीर्त गुमास्ते...

24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! 20.12.2018

ऐकावंच असं काही… आपली गुणवत्ता, आत्मविश्वास, प्रयत्न आणि धाडस यांच्या बळावर भरत गीते या तरुणाने अल्युमिनियम कास्टिंग हे क्षेत्र निवडून त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. युरोपातील आघाडीच्या समूहाला सोबत घेऊन त्यांच्या टॉरल इंडियाने भारतात भव्य प्रकल्प उभारला. मेक इन इंडिया अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पाने या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. स्टोरीटेल बिझनेस- सक्सेस कोड या सिरिजमध्ये श्री. भरत गीते यांची...

23: पुस्तकी किडा आणि स्टोरीटेल 17.12.2018

नवी पिढी वाचत नाही असं म्हणतात. पण असे अनेक जण आहेत जे पुस्तकं आवडीनं वाचतात आणि ऐकतात देखील. अशातलाच एक म्हणजे अमोघ वैद्य. पुस्तकी किडा म्हणून मित्रांमध्ये आणि सोशल मिडियात लोकप्रिय असणाऱ्या अमोघचं वाचनाशी असणारं नातं त्याच्यातील वाचक, लेखकही समृद्ध करुन जातं. स्टोरीटेल आयुष्यात आल्यापासून त्याचं पुस्तकांशी असणारं नातं आणखी बहरतं आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर साक्षीसोबत अमोघच्या या गप्पांमधून नव्या पि...

22: `शिकस्त` साकारताना.... 03.12.2018

मराठीतील प्रतिभावंत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेला हा संवाद. ना.सं. इनामदार यांची अत्यंत गाजलेली शिकस्त ही कादंबरी प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात लवकरच श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचा संतोष देशपांडे यांच्याशी झालेला हा संवाद.

Lyssna på podden स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden