Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 avsnitt

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: www.storytel.com

Skapare

Santosh Deshpande

Kategori

Arts

Poddens webbplats

www.storytel.com

Senaste avsnittet

17 sep 2026

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

97: जु(लै) भारी! 27.06.2020

बघता बघता जुलै आला.... लॉकडाऊनमध्ये अडकलेलं बाहेरचं आणि आतलं जग पावसासंगे जरासं बाहेर जाऊ पाहतंय. खमंग भजी साद घालताहेत आणि त्याच बरोबर मूड टिपणारं खास काही ऐकावसं वाटणार आहे. अशा सर्व रसिकांसाठी हा जुलै अविस्मरणीय ठरणार आहे. कसा? सुकीर्त आणि उर्मिलाच्या या गप्पा ऐका आणि जाणून घ्या... स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा 

96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! 20.06.2020

सेल्फ मेडिटेशन - आयुष्यात मनःशांती इतकं मोलाचं काहीच नाही. मनःशांती लाभण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा, म्हणजेच मेडिटेशन. पुण्यातील प्रयोगशील मानसोपचारतज्ज्ञ गौरी जानवेकर हीने स्टोरीटेल वर सेल्फ मेडिटेशनचा अनोखा मार्ग सादर केला आहे. त्यास सर्वांचा भरभरुन प्रतिसाद लाभतो आहे. श्रोत्यांना स्वतःहून करता येण्याजोग्या या तंत्राबाबत, त्यामागील अभ्यासाबाबत आणि आपल्या एकूणच प्रवासाबाबत गौरीकडूनच जाणून...

95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! 13.06.2020

‘हिडन कॅमेरा’ या स्टोरीटेलवर गाजत असलेल्या ओरिजनलचा लेखक नीरज शिरवईकर म्हणजे एक कलंदर, मनस्वी व्यक्तिमत्व. आपल्या शब्दांच्या सामर्थ्यानं प्रभावी कथानक डोळ्यांपुढं उभं करण्याची कला कशी विकसित केली, या तरुण लेखकाचा आपल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे सारं त्याच्याशी रंगलेल्या या गप्पांमधून उलगडत जातं. तेव्हा ऐकायला विसरु नये, असा हा पॉडकास्ट श्रोतेहो, खास तुमच्यासाठी....  स्टोरीटेल वर हिडन...

94: श्रवणीय श्रोत्री! 06.06.2020

विविधरंगी भूमिका आणि कलाविष्कारामुळे रसिकांची मने जिंकणारा अष्टपैलू अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्याशी दिलखुलास संवाद.

93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... 30.05.2020

पावसासोबतच जून महिना स्टोरीटेलवर अनेक गोष्टीही घेऊन येत आहे. त्या काय आहेत, त्या ऐकण्यात काय गंमत असणार आहे, यावर सुकीर्त आणि उर्मिला यांच्यात रंगलेल्या गप्पा... स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा- https://bit.ly/2TTuyGG

92: श्रोतेहो ऐका ...ऐकत राहा! विक्रम गोखले, तुम्ही बोलत राहा!! 23.05.2020

असा कलाकार क्वचितच असतो...भेटतो, जेव्हा त्याच्या सहज गप्पांमधून त्या क्षेत्रातील, त्याच्या विचारांतील विश्वरुप दर्शन घडतं..... द ग्रेट विक्रम गोखले यांच्याशी रंगलेली ही गप्पांची मैफील म्हणूनच अविस्मरणीय.

91: `लॉकडाउन`मध्ये फास्टर फेणे...! 16.05.2020

भूमिका कोणतीही असो, ती समरसून साकारणं ही खऱ्या कलाकाराची ओळख. रंगमंच असो वा टीव्ही, चित्रपट असो वा वेबसिरीज अमेय वाघ या नावानं स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केलाय. असा हा अभिनेता लॉकडाउनच्या निमित्ताने मनमोकळ्या गप्पा मारतो, ती ऐकणं म्हणजे एक धमाल अनुभव.

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट` 09.05.2020

करोनाच्या आक्रमणानंतर बदललेलं आयुष्य आणि त्यामुळे आपणास स्वतःत करावे लागणारे बदल का व कसे करावे, यावर सहज सोप्या शब्दांत डॉ. अमोल अन्नदाते यांनी केलंलं भाष्य.... स्टोरीटेल कट्टा पॉडकास्ट संवादातून!

89: ऑडिओबाइटस् येता घरा..... 02.05.2020

स्टोरीटेलच्या वतीने नुकतेच प्ले स्टोअरवर आलेलं ऑडिओबाइटस् या झकास अॅपच्या निर्मितीबद्दल, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगत आहेत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ.

88: लॉकडाउनचा काळ पण स्टोरीटेलवर धमाल (मे स्पेशल) 25.04.2020

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. आपल्याकडे त्यात वाढही झालेली आहे. आता प्रश्न येतो...सतत घरी बसून करायचं तरी काय? सतत टीव्ही आणि मोबाईलवर चित्रपटही पाहून झालेत. मग आता काय करावं? तेव्हा पर्याय समोर येतो, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या ऑडिओबुक्सच्या खजिन्याचा. स्टोरीटेल टीमने खास लॉकडाऊन काळात आपल्याकरिता आणलेल्या खास गोष्टींची थोडक्यात ओळख करुन घेऊया उर्मिला आणि सुकीर्त या...

87: ‘युगंधर’ श्रीकृष्णाला आवाजातून मूर्तिमंत उभा करणारा जादूगार 17.04.2020

लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात? चिंतीत आहात? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. आजच्या पॉडकास्टमध्ये आले आहेत ‘अनिरुद्ध दडके’- ज्यांनी आपल्या आवाजातून ‘स्टोरीटेल’वर ‘मृत्युंजय’ आणि ‘युगंधर’मधील श्रीकृष्णाला अक्षरश: जिवंत केले आहे. ज्यांचा आवाज ऐकताना सगळ्या शंका-कुशंका लोप पावतात आणि आतमध्ये एक धीरगंभीर, शांत ॐकार घुमत आहे असे वाटते, असे अनिरुद्ध दडके सांगत आहेत, त्यांच्या व्हॉईस ओव्हर करियरची सुरूवात...

86: लहान मुलांना असलेला धोका: गेम्स आणि मोबाईलचा विळखा 11.04.2020

आजच्या पॉडकास्टमधे एक गंभीर विषयावर चर्चा आहे. ८ ते ११ वयोगटांतील मुले आणि त्यांच्या असलेला पॉर्नोग्राफी आणि मोबाईल गेमिंगचा धोका! यासाठी आज कट्ट्यावर आल्या आहेत मुक्ता चैतन्य. त्यांचा या विषयावर अभ्यास आहे आणि त्यांनी तो वेळोवेळी इतर माध्यमांतून सादर केला आहे. तर जाणून घ्या त्या काय सांगत आहेत, आणि उर्मिला त्यांना कुठल्या-कुठल्या विषयांवर बोलते करत आहे, या पॉडकास्टमधून! हा पॉडकास्ट  जरूर ऐका आणि...

85: जरी असला चावट, तरी ‘सेक्स’चाच आहे वट! 04.04.2020

सेक्सवर बोल बिनधास्त या पॉडकास्टच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर डॉ. प्रसन्न गद्रे आणि निरंजन मेढेकर यांनी आणला आहे, सेक्सवर बोल बिनधास्तचा दुसरा सिझन! काय आहे या सिझनमध्ये? तुम्हीच जाणून घ्या, ऐका उर्मिलासोबत डॉ. प्रसन्न गद्रे आणि निरंजन मेढेकर यांच्या मनमोकळा संवाद! हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. सेक्सवर बोल बिनधास्त-२ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकां...

83: स्टोरीटेल: क्वारंटाईन केअर (एप्रिल स्पेशल) 28.03.2020

सध्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. सर्व देशांमध्ये त्याची दहशत पसरली आहे. त्यापासून सुरक्षेसाठी भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी चालू केला आहे. तर या काळजीच्या दिवसात केवळ घरात बसून कंटाळा येऊ नये, नियमांचे पालन करताना कुठेही दगदग होऊ नये म्हणून प्रत्येकजण कसली ना कसली कामं करण्यात गुंतले आहेत. काही जण २१ दिवसांसाठी पुस्तकांच्या याद्या, चित्रपटांच्या याद्या आणि अशा बर्‍याच...

82: पावनखिंड ३०३ आणि संजय सोनवणी 21.03.2020

स्टोरीटेलवर पहिला ध्वनीपट आला आहे. ‘पावनखिंड ३०३’ ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असलेल्या या काल्पनिक पटाचे लेखक आहेत संजय सोनवणी. त्यानिमित्ताने उर्मिलाने त्यांच्याशी साधलेला संवाद, जाणून घेतलेल्या खूप गंमती-जंमती या पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकता येतील.   तर हा पॉडकास्ट जरूर ऐका, आणि आम्हांलाही कळवा हा पॉडकास्ट कसा वाटला ते! ‘पावनखिंड ३०३’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३०...

81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? 17.03.2020

कोरोना व्हायरस नक्की कसा आला?  कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? नक्की खरं काय आणि खोटं काय? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबत *आपण काय करायला हवं?* कोरोनाबद्दल सर्व काही माहिती देणारे राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचे विश्लेषण.. पहा... शेअर करा... भीती नको पण काळजी घ्या... स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लि...

80: ‘सोंग’ ते ‘पुढचं सोंग’- एक प्रवास 14.03.2020

सोंग आणि पुढचं सोंग या स्टोरीटेल ओरिजिनल ऑडिओबुक्सचे लेखक नितिन थोरात आणि पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांच्या बरोबर ‘सोंग’ या ऑडिओबुकच्या पुस्तक प्रकाशन या सोहळ्याच्या निमित्ताने उर्मिलाने साधलेला संवाद. नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीतून आपले मत मांडणार्‍या नितीनची खुमासदार बोली आणि सुकीर्तची त्याबरोबर जमलेली जोडी.त्यातून जमून आलेली ही गप्पांची फर्मास मैफल जरूर ऐका. ‘सोंग’ ऐकण्यासाठी: येथे क...

79: इसलिए राह संघर्ष की हम चुनें (महिला दिन विशेष) 07.03.2020

इसलिए राह संघर्ष की हम चुनें जिंदगी आंसुओं से नहाई ना हो। शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई ना हो। इसलिए... इसलिए... इसलिए... या महिला दिन विशेष पॉडकास्ट मध्ये आज आपल्या सोबत आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - दीपा देशमुख! लेखिका, समन्वयक, अनुवादक, संपादक,  शिक्षण विभाग प्रमुख या आणि अशा अनेक स्तरांवर आपली मोलाची कामगिरी बजावत त्यांनी समाजकार्यात देखील आपले योगदान दिले आहे. महिला दिना...

78: स्टोरीटेल: मार्च स्पेशल 29.02.2020

हळूहळू उन्हाळा सुरू होत आहे, गुलाबी थंडी मनावर ताबा घेत असतानाच नाहीशी होत आहे. मग या उन्हाळातली ही तगमग कशी शांत करायची? त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या सई तांबे आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! या मार्च मध्ये  नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. तर ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की...

77: फारच Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झालं नाही असं काहीतरी 21.02.2020

फारच Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झालं नाही असं काहीतरी आलंय!    काय आहे? ‘फोर स्क्वेअर’ या स्टोरीटेल ओरिजिनलच्या नव्याकोर्‍या ऑडिओबुकचा लेखक ‘आदित्य भगत’ आणि नरेटर ‘आलोक राजवाडे’ यांच्याकडून ... तुम्हीच जाणून घ्या. मदतीला उर्मिला आहेच, तर, तुम्हाला या 'Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झाल्या नाही' अशा गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा. ‘फोर स्क्वेअर’ ऐकण्यासाठी: य...

76: भयाच्या अस्पर्शी वाटा धुंडाळताना 14.02.2020

भय केवळ भूतांमध्ये नसते. वेळोवेळी दिसणार्‍या, घडणार्‍या, जाणवणार्‍या- न जाणवणार्‍या घटनांमध्ये, माणसांच्या मनामध्ये देखील असते. त्याला केवळ व्यक्त व्हायला मार्ग मोकळा करून द्यावा लागतो. अश्या भयाच्या अनेक पदरी अस्पर्शी वाटा धुंडाळणारे आणि ‘स्टोरीटेल’वरील ‘मृत्योपनिषद’ या ऑडिओबुकचे लेखक ‘हृषिकेश गुप्ते’ यांना बोलते करत आहे उर्मिला! तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा. स्टोरीटेल वर मराठी...

75: शायर... की सिरियल किलर? 07.02.2020

‘सुखन’ फेम, हजारों दिलों की धडकन... शायर नचिकेत देवस्थळी ‘सिरियल किलर’ होतो तेव्हा... नाही नाही, घाबरू नका! नचिकेतने आवाज दिला आहे स्टोरीटेल ओरिजिनलच्या ‘सिरियल किलर’ या ऑडिओबुकला! होय तेच ऑडिओबुक, जे अंजनाबाई गावित यांच्या खूनसत्रांवर आधारित आहे. होय तेच ऑडिओबुक, जे निरंजन मेढेकर यांनी लिहिले आहे. तर जाणून घ्या या स्टोरीटेल ओरिजिनलचा प्रवास, ते लिहिण्याची प्रेरणा, त्यामागची मेहनत आणि सोबत इतरही र...

74: स्टोरीटेल: फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन) स्पेशल 31.01.2020

फेब्रुवारी महिना नुसता थंडीचा नसतो तर गुलाबी गुलाबी थंडी सोबत साजरी करायचा असतो. तर या प्रेमाच्या महिन्यात स्टोरीटेलने आपल्या रसिक चाहत्यांसाठी काय व्हॅलेंटाईन स्पेशल गिफ्टस आणल्या आहेत, हे जाणून घेत आहे उर्मिला स्टोरीटेलच्या सुकीर्त आणि प्रसाद या पब्लिशर्सकडून! व्हॅलेंटाईन डेच्या गुलाबांच्या फुलांपासून ते अगदी मुलांपर्यंत... क्राईम, प्रेम, विनोद यांसोबत अगदी संगीत नाटकांपर्यंत, या फेब्रुवारीत काय...

73: वेगवेगळ्या भूमिका जगताना... 24.01.2020

लेझिम खेळणारी पोरं ते स्टोरीटेलवर ‘क्राईम रिपोर्टर’ व्हाया ‘माझ्या नवर्‍याची बायको’ हा  भिन्न भिन्न माध्यमांमधून प्रयोग केलेले अभिजीत झुंझारराव सांगत आहेत आपला अभिनेता- दिग्दर्शक ते अभिवाचक हा प्रवास. सोबत त्यांच्या अनुभवांची शिदोरी उलगडून देत आहेत रसिक श्रोत्यांना. केलेले स्ट्रगल, नाटकांची रेलचेल आणि त्यातच नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या मुलांसमोर सादर केलेला प्रयोग ते स्टोरीटेलसाठी केल...

72: फर्जंद, पु.ल. आणि दिग्पाल लांजेकर 18.01.2020

निनाद बेडेकर, आनंद मोडक, गोनिदा, संत तुकाराम... या आणि अशाच पूर्वासुरींचा मिळालेला संचिताचा ठेवा! अभ्यासोनी प्रकटावे। नाही तरी झाकोनी असावे। प्रकटोनी नसावे| हे बरे नोहे|| या समर्थ उक्तींना प्रमाण मांडून दिग्पाल लांजेकर या खेळियाने एक भव्य इतिहासकालीन पट सादर केला स्टोरीटेलवर! सोबत पुलंच्या ‘एक शून्य मी’ आणि ‘आपुलकी’मधील काही लेखांचे अभिवाचन देखील! कसे काय जमवले हे सगळे त्यानी? काय काय मेहनत घ्यावी...

Lyssna på podden स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden