Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: lifeofstories.buzzsprout.com

Autor

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Categorie

Kids

Site-ul podcastului

lifeofstories.buzzsprout.com

Cel mai nou episod

7 iul. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

# 2046 : श्रीरामांचा वनवासातील प्रवास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.05.2026

Send us Fan Mail रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. माता कैकयीच्या हट्टापाई श्री राम, लक्ष्मणजी आणि सीता मातेला वनवासाला जावं लागलं. विष्णूंचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला तरी त्यांनी वनवासात श्रीलंकेपर्यंत केलेल्या भ्रमंतीमूळे अवघी भारतभूमीच त्यांच्या सहवासाने पावन झाली आहे. श्रीरामांनी बरोबर चौदा वर्षे वनवास भोगला. चौदा वर्...

# 2045 : "Mr.Know all" Author / W. Somerset Maugh. by . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.05.2026

Send us Fan Mail “मि. केलाडा, तुम्ही मोत्यांचे मोठे तज्ज्ञ आहात ना?” रॅमसे मिश्किलपणे म्हणाला. “मग सांगा बरं, माझ्या बायकोच्या गळ्यातली ही माळ किती किमतीची असेल?” हा प्रश्न ऐकताच केलाडा यांच्या डोळ्यांत चमक आली. त्यांनी माळ हातात घेतली. मोती निरखले. ओठांवर आत्मविश्वासपूर्ण हसू उमटलं. “ही माळ खरी आहे...” हे शब्द त्यांच्या ओठांपर्यंत आले. पण त्याच क्षणी त्यांची नजर वर गेली... आणि ती मिसेस रॅमसे यांच...

# 2044 : "मधमाशांच्या पोळ्यात उंदीर शिरला तर..." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.05.2026

Send us Fan Mail कधी कधी मधमाशांच्या या पोळ्यात एखादा अनाहूत पाहुणा शिरतो — उंदीर!                                        थंडीत उब मिळावी म्हणून किंवा मधाच्या गोड वासाने आकर्षित होऊन ! हजारो मधमाशा त्याच्यावर तुटून पडतात. त्यांच्या डंखांमुळे शेवटी उंदराचा मृत्यू होतो.  आणि मग एक अद्भुत घडतं — तो उंदीर कुजत नाही. त्याचं शरीर जणू “ममी”सारखं जतन केलं जातं!.....

# 2043 : "खुन्या मुरलीधर मंदिर" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.05.2026

Send us Fan Mail अठराव्या शतकाचा शेवटचा काळ. दादा गद्रे हे पेशवाईचे मोठे सावकार आणि सरदार होते. दृष्टांतानुसार त्यांनी मुरलीधराचं भव्य मंदिर उभारायचंच ठरवलं . मूर्तीच्या सौंदर्याच्या चर्चा थेट दुसरे बाजीराव पेशव्यांपर्यंत जाऊन पोहोचल्या. पेशव्यांनी ती शनिवारवाड्यात आणण्याची इच्छा व्यक्त केली. पण गद्रे सावकारांनी नम्रपणे नकार दिला. रातोरात मूर्ती गुपचूप त्यांच्या सदाशिव पेठेतील बागेत हलवण्यात आली....

# 2042 : "वेडात मराठे वीर दौडले सात" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.05.2026

Send us Fan Mail सरसेनापती प्रतापराव गुजरांचं  मन द्रवलं. त्यांनी बहलोलखानाला जिवंत सोडलं. बातमी रायगडावर पोहोचली. शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते. राजे  भयंकर संतापले. महाराजांनी प्रतापरावांना खलिता पाठवून जाब विचारला,  त्या पत्रातले शब्द..तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होते. “तह काय निमित्त केलात? बहलोलखाना सारख्या  शरण आलेल्या शत्रूला असं सहज सोडलंत? खानाचा पुरता बीमोड केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका...

# 2041 : "डोळ्याला डोळा मिळाल्याशी मतलब" लेखक मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.05.2026

Send us Fan Mail एक चोर विणकराकडे चोरी करायला गेला. त्याचा  डोळा विणकराच्या धनुकलीमुळे फुटला. चोर म्हणत होता की त्याच्या  गलथानपणामुळे माझा डोळा फुटला. राजा म्हणाला, विणकराची चूक आहेच. त्याचाही एक डोळा फोडा.  बाहुल्यांचे हातपाय तोडणं हा याचा छंदच बनला असलेल्या जोडप्याला त्याने दुसरी गोष्ट सांगितली... नवरा एका शेठजीकडे नोकरी करायचा. तो नवऱ्याला भयंकर वाईट वागवायचा, शिविगाळ करायचा. घरी आला की बायकोव...

# 2040 : एक होता ओपनहायमर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.05.2026

Send us Fan Mail अखेरीस २८ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या प्रमाणावर आण्विक शस्त्रांचे देशपातळीवर उत्पादन करण्यास संमती दिली. हाच 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' म्हणून ओळखला जातो..!! संपूर्ण अमेरिकेत ३० प्रोजेक्ट साईट्स, तब्बल १ लाख कामगार आणि २.२ बिलियन डॉलर्सचा अवाढव्य खर्च..!! आणि एवढी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करत असून देखील, कोणालाही आपण अखेरीस कशाचं उत्पादन करणार आहोत ह्या...

# 2039 : "ऑफ तासाची किंमत" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.05.2026

Send us Fan Mail  अस्मादिकांनी एकदा शाळेत, _“सर, प्लीज… आज ऑफ तास  द्या ना! खेळायला सोडा ना…”_ असा हट्ट केला. तेव्हा इंग्रजी शिकवत असलेल्या सरांनी एक जबरदस्त 'गुगली' टाकली… ते म्हणाले, सगळ्यांनी ‘One Two Three…’ अशी आकड्यांची स्पेलिंग्ज लिहायची. जेव्हा कोणत्याही आकड्याच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदा ‘A’ हे अक्षर येईल ना… लग्गेच  खेळायला जा!” थोड्याच वेळात _‘सौदा घाटे का है…’_ हे माझ्या लक्...

# 2038 : शेवटचं पेन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 15.05.2026

Send us Fan Mail वीस वर्षे लोटली. पेरियासामी आता ऐंशी वर्षांचे झाले होते. त्यांची दृष्टी क्षीण झाली होती आणि ऐकण्याची शक्तीही मंदावली होती. तरीही, दररोज ते त्याच मंदिराच्या प्रवेशद्वाराशी बसत असत. तेच कपडे, तीच लेखणी. पण आता मात्र, त्यांचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला होता. मुले आता जेल पेन्स आणि स्केच पेन्स वापरू लागली होती; शिवाय, सर्व काही आता ऑनलाइन उपलब्ध होते.

# 2037 : अपरा एकादशी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.05.2026

Send us Fan Mail एकादशी उपवासाला हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकमास किंवा मलमास येतो तेव्हा त्यांची संख्या २७ पर्यंत वाढते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला "अपरा एकादशी" असे म्हणतात.

# 2036 : "पैज : पूर्ण एकांतवासाची" Anthony Chekhov. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 08.05.2026

Send us Fan Mail ही कथा आहे वीस लाख रुबल पैजेची …नियमानुसार त्या वकिलाला एका छोट्या घरात राहायचं होतं. कोणाशी बोलायचं नव्हतं. वर्तमानपत्र नव्हतं. माणसांचा आवाज येणार नव्हता.  फक्त पुस्तकं, संगीत आणि जेवण.... सुरवातीला तो रात्रभर पियानो वाजवत बसे, कधी ओरडे,...पहिल्या वर्षी त्याने प्रेमकथा, रहस्यकथा, साहसकथा वाचल्या. दुसऱ्या वर्षी तो गंभीर साहित्य वाचू लागला. ....पंधरा वर्षांत त्याने पुस्तकांतून जग...

# 2035 : लेदर शुजची शिलाई-२० रुपये. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.05.2026

Send us Fan Mail रस्त्याच्या कडेला चप्पल शिवणाऱ्या एका म्हाताऱ्या आजोबांकडे माझं लक्ष गेलं. माझ्या महागड्या लेदर शूजची शिलाई थोडी उखडली होती. मी गाडी थांबवली आणि त्यांच्यासमोर शूज ठेवले. "आजोबा, हे लवकर शिवून द्या, मला उशीर होतोय." आजोबांनी शांतपणे चष्मा नीट केला, शूज हातात घेतले आणि अतिशय बारकाईने काम करू लागले. पाच मिनिटांत त्यांनी शूज अगदी नव्यासारखे करून दिले. "किती झाले आजोबा?&...

# 2034 : महामृत्युंजय मंत्र. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.05.2026

Send us Fan Mail ही गोष्ट २०११ पासून सुरू होते. तेव्हा मी नवीनच ड्रायव्हर होतो. गुप्तकाशी ते सोनप्रयाग अशी माझी शिफ्ट होती. पावसाळ्याची एक सकाळ, बसमध्ये ३२ प्रवासी होते आणि पुढच्या बाजूला शाळेची मुलं बसली होती. धुकं इतकं होतं की बोनेटच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. 'काळी वळण'वर अचानक वरून दगड पडला. मी ब्रेक मारला, बस घसरली. डावं टायर अगदी कडेवर आलं होतं. खाली ३०० फूट खोल दरी. बसमध्ये एकच क...

# 2033 : कोंबडी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.05.2026

Send us Fan Mail हळूहळू पाठलाग गतिमान होत गेला,  एका छतावरून दुस-या छतावर  जात जात दोघांनी बरंच अंतर कापलं अशा जीवघेण्या पाठलागाला तोंड देण्याची  त्या कोंबडीत क्षमता नव्हती , आता कुठं जायचं तिला ठरवणं भाग होतं घरातले इतर ह्या कामासाठी उपयोगी नव्हते आणि सावजही तसं किरकोळ होतं  तरी एकजुटीन काम करणं गरजेचं होतं सगळे जोरजोरात ओरडत कोंबडीला हुसकावून लावत होते या जगात कोंबडी मात्र एकटीच होती तिला ना आई...

# 2032 : "Red" W. Somerset Maugham. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.05.2026

Send us Fan Mail दक्षिण समुद्रातील एका छोट्या बेटावर घडणारी ही गोष्ट आहे — प्रेम, विरह आणि काळाच्या शांत क्रूरतेची. रेड आणि सॅलीचं प्रेम इतकं खोल असतं, की गावातल्या लोकांना वाटतं हे दोघं कधीच वेगळे होणार नाहीत. पण समुद्रावरचं एक जहाज येतं… आणि एका क्षणात सगळं बदलून जातं. अनेक वर्षांनी जेव्हा हे दोघं पुन्हा समोरासमोर उभे राहतात, तेव्हा घडणारा प्रसंग मन सुन्न करून टाकतो. ही कथा सांगते — प्रेम संपत न...

# 2031 : "संपूर्ण शरणागती / साखरे महाराजांची गोष्ट." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.05.2026

Send us Fan Mail "महाराज, तुम्हाला हे ज्ञान कुठून मिळाले?" कीर्तनकार म्हणाले, "ज्ञानेश्वरीतून." नारायणाने लगेच विचारले, "मला शिकवाल का?" कीर्तनकरांना त्याच्या डोळ्यांत सच्चेपणा दिसत होता. ज्ञानेश्वरी ही नुसती वाचून समजणारी गोष्ट नव्हे, हेही त्यांना ठाऊक होते. ते म्हणाले — "शिकवीन. पण त्यात तीन मोठ्या अडचणी आहेत." "पहिली अडचण — संपत्ती. "जोपर्यंत मा...

# 2030 : "दोन राजवटी" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.05.2026

Send us Fan Mail राजाच्या पाहुण्यांना निरोपाची वेळ आली तेव्हा काही प्रजाजनही हजर होते. त्यात सरदार, दरकदारांपासून माळी, मजूर, दासी असे सगळ्या वर्गांमधले लोक होते.  कृष्णकेतूने  मोठ्या रुबाबात सगळ्यांना आज्ञा दिली, "तात्काळ निर्वस्त्र व्हा."  सगळे कपडे उतरवून उभे राहिले. शुभ्रकेतू हसला....... ......लोकशाही असो वा राजेशाही — राजा किती बलवान आहे यापेक्षा, सामान्य माणूस किती निर्भय आहे,  याव...

# 2029 : "नव्व्याणवाचा फास" ओशो (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.04.2026

Send us Fan Mail अस्वस्थ  राजा प्रधानाला म्हणाला, “एक य:कश्चित न्हावी माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे, हे मला सहन होत नाही. काहीतरी करा.” प्रधानाने  त्याच्या आयुष्यात नव्याण्णव रुपये टाकले.  मग त्याच्या आयुष्याची परवड सुरू झाली.   “आधी न्हावी 'आहे त्यात आनंदी होता.'  पण आता त्याला शंभर पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर दोनशे, मग पाचशे, मग हजार. आता त्याच्या मनाच्या भुकेला  शेवट उरला  नाही.” “आता त्...

# 2028 : शस्त्रपुजेची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.04.2026

Send us Fan Mail पांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत १२ वर्षे वनवास पूर्ण केल्यानंतर त्यांना अज्ञातवासात जायचे होते. अज्ञातवास म्हणजे ते कुठे आहेत हे कोणालाही माहित न होणे. द्युताच्या नियम अटीनुसार त्यांना अज्ञातवासात कोणी ओळखले तर त्यांना परत वनवासात जावे लागणार होते.  यासाठी पांडवांनी अज्ञातवासासाठी विराट राजाचे मत्स्य राज्य निवडले. त्यांनी आपला वेष बदलला आणि विराट राजा...

# 2027 : "तरंगणारा गडवा." लेखिका अॅड. रंजना पगार गवांदे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.04.2026

Send us Fan Mail ज्या समाजात मुलीचा जन्मच अस्वागतर्ह आहे, तिथे तिचं लग्न होणं, तिला मुल व त्यातही मुलगाच  होणं  अत्यावश्यक असतं. अन्यथा अशा स्त्रीला, वांझ, निपुत्रिक म्हणून समाज छळतो. अशा स्त्रियांना अपत्यप्राप्ती साठी चुकीच्या मार्गला नेलं जातं, जिथे तिचं शोषणच होतं. बुवा-बाबांच्या शोषणाला समाजातील सर्वच स्तरांतील लोक बळी पडतात.  नीताला मूल होण्यासाठी सदाबाबाने तरंगणाऱ्या गडव्याचा चमत्कार करून दा...

# 2026 : मन साफ करणारी मशीन लेखिका गौरी देशपांडे. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 27.04.2026

Send us Fan Mail गुलाबचे बाबा गटारे  साफ करायचे. म्हणून शाळेतली मुलं तिला "वासाडी" म्हणून चिडवायची.  एक दिवस खूप दुखावून ती बाबांवर ओरडली, "हे घाणेरडं काम का करता तुम्ही? पिढ्यानपिढ्या हे काम चालत आलं असलं तरी आता बदलायला हवं. कोणतं तरी मशीन वापरायला हवं यासाठी."  आणि तिने खरोखरच एक मशीन बनवलं. गटार साफ करणारं, जेणेकरून बाबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आत उतरावंच लागणार नाही. ...

# 2025 : Pavilion of women. स्त्रियांचं दालन. लेखिका :पर्ल बक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 26.04.2026

Send us Fan Mail पर्ल बक या साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखिका. ही कथा स्त्रीच्या आंतरिक स्वातंत्र्याचा शांतपणे शोध घेणारी आहे. चाळिसाव्या वाढदिवशी मादाम वू एक अशी घोषणा करतात की संपूर्ण वाडा हादरून जातो. त्या आपल्या पतीला शांतपणे सांगतात की “आजपासून पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्यं पूर्ण झाली असं त्या मानतात. आता त्या त्यांच्याबरोबर शयनकक्षात राहणार नाहीत. पण तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी...

# 2024 : आशा निमाली ... कथन -( ॲड. स्वाती लेले ) 25.04.2026

Send us Fan Mail काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा स्वर्गीय सूर यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. कोणीही अमर नाही हे माहीत असूनही आशाताईंच्या नावामागे स्वर्गीय लिहायला मन तयार होत नाही.  अशी एकही भाषा नसेल आणि स्री व्यक्तिरेखेचं असं एकही रुप नसेल ज्याला आशाताईंच्या स्वरांचं कोंदण मिळालं नाही. नवरसातले सर्वच्या सर्व भाव आजपर्यंत त्यांच्या गळ्यातून निघाले आहेत. अनेक संगीतकारांनी त्...

# 2023 : "The old man and Sea." Ernest Hemingway. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.04.2026

Send us Fan Mail The Old Man and the Sea या जगप्रसिद्ध कादंबरीची ही गोष्ट आहे .  या कादंबरीमुळे अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील नोबेल प्रतस्काराने सन्मानित करण्यात आलं.  हेमिंग्वेचं  यांचं हे अजरामर वाक्य —  “A man can be destroyed but not defeated.” माणूस नष्ट होऊ शकतो… पण पराभूत होऊ शकत नाही. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलं आहे.  शरीर थकू शकतं, काळ संकटं देऊ शकतो, नशिबाने...

# 2022 : "मूर्खपणाचा फुगे बहार" लेखिका : अमृता खंडेराव. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 23.04.2026

Send us Fan Mail वाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करताना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची जोरदार पद्धत आली आहे. फुगे स्वस्त आहेत म्हणून सजावटीसाठी वापरले जातात परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे याचा विचार केला जात नाही! प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे त्यात आता ही फुगेबहार आली आहे!

Ascultă podcastul Life of Stories în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice