Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com
Autor
Sakal Media
Categoria
Site do podcast
Último episódio
15 de nov de 2024
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
Tur Market: तुरीचे भाव टिकून राहतील का? | Agrowon 17.07.2023 5:03
देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ९ हजार ते साडे १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिलमध्ये तूर उत्पादन घेण्याचे नियोजन व्यापारी संघटनेने केले आहे. मग याचा तुरीच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास| Journey of a bottle of insecticides| Agri Unplugged 16.07.2023 8:58
प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीत कीटकनाशकाची बाटली तयार झाल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंतचा प्रवास खूप लांबलचक आहे. या बाबतीत जगात सगळ्यात जास्त लालफितीचा कारभार भारतात आहे. या लांबलचक प्रवासात चार आण्याची कोंबडी बारा रुपयांपर्यंत महागते. सरकारी फाईलींवर ठेवलेल्या वजनांसह, कंपन्यांनी विक्रेत्याला थाईलंडमधे दिलेल्या मसाजचे बिल देखील शेतकऱ्याच्या खात्यातूनच वजा होते. After a bottle of insect...
Turmeric Market: हळदीचे वाढलेले भाव टिकतील का? | Agrowon 15.07.2023 5:24
देशातील बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. हळदीचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर वायद्यांमध्ये हळद तेजीत आहे. हळदीच्या दरातील ही तेजी टिकेल का? हळद आवकेची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Soybean Market: सोयाबीन दराला कशामुळे आधार मिळू शकतो? | Agrowon 14.07.2023 5:32
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरु आहे. देशात मात्र सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा भाव मागील दोन महिन्यांपासून स्थिर दिसतो. मात्र सध्या देशातील सोयाबीन पेरणी पिछाडीवर आहे. पाऊसमानही कमी आहे. मग या सर्व स्थितीचा सोयाबीन बाजारावर परिणाम दिसेल का? सोयाबीनची भावपातळी बदलेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Cotton Market: कापसाला आज काय भाव मिळाला? | Agrowon 13.07.2023 5:18
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. तर देशात कापूस बाजार स्थिरच दिसतो. देशात मागील तीन महिन्यांपासून कापूस भाव दबावात होते. मग आज कापसाला काय भाव मिळाला? कापूस बाजारावर कोणत्या घटकांचा परिमाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Tur Market: तूर आयात वाढल्याने बाजारावर दबाव येईल का? | Agrowon 12.07.2023 5:12
देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आयात झाली. तरीही तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. मग आयात वाढूनही भाव तेजीतच का राहीले? तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Soybean Market: सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon 11.07.2023 5:28
सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. देशातही सोयाबीनचा भाव हंगामातील निचांकी पातळीदरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारही दिसून येत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय? देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Cotton Market: कापूस आवकेची काय स्थिती आहे? | Agrowon 10.07.2023 5:13
आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापूस दरात चढ उतार कायम आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या दरात दरातील तफावत जास्त दिसते. तर बाजारातील कापूस आवकही सध्या जास्तच आहे. मग आज कापसाला बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळाला? कापसाची आवक किती झाली होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
शेतीसारखी जीवावरची जोखीम किती व्यवसायांत आहे? | Life threatening risks in Agriculture | Agri Unplugged 09.07.2023 13:21
शेतकरी शेती स्वत:साठी करीत असले तरी, ते अन्न काही केवळ आपल्यापुरतं पिकवत नाहीत. ते अन्न सगळेच खातात. शेतीत पावलोपावली जीवावरची जोखीम असते. ती पत्करून पिकवलेल्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारसह सगळेच टपून बसलेले असतात. एवढ्या जीवावरच्या जोखमीचे आणखी कोणते व्यवसाय आहेत? No doubt, Farming is a profession, but they do not grow food just for themselves. Everyone eats that food. Agriculture is alway...
Chana Market : हरभरा बाजारावर सरकारच्या विक्रीचा दबाव | Agrowon 08.07.2023 5:29
देशात सध्या सरकारच हरभऱ्याचा सर्वात मोठा स्टाॅकीस्ट आहे. सध्या सरकारकडे ३८ लाख टनांच्या दरम्यान हरभरा स्टाॅक आहे. सध्या बाजारातील हरभरा आवक खूपच कमी झाली. त्यातच गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली. मग हरभरा भाव किती वाढले? हरभरा बाजारावर कशाचा दबाव आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Maize Market: मक्याचा बाजार कशामुळे सुधारला? | Agrowon 07.07.2023 5:33
देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून मक्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळत आहे. जूनच्या मध्यापर्यंत मक्याचे भाव अगदी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. पण सध्या मक्याच्या भावात वाढ झाली आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मका बाजाराला कशाचा आधार मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Jeera Market :जिऱ्याचे भाव कमी होतील की नाही? | Agrowon 06.07.2023 4:59
यंदा जिरा चांगलाच भाव खात आहे. सध्या देशात जिऱ्याचा स्टाॅक खूपच कमी आहे. तर देशांतर्गत आणि निर्यातीसाठी जिऱ्याला चांगली मागणी आहे. पण काही व्यापारी आणि स्टाॅकीस्ट नफावसुली करत असल्याने दरात दोन ते तीन हजारांचे चढ उतार दिसतात. मग यंदा जिऱ्याचे उत्पादन किती झाले? जिऱ्याचे भाव पुढील काळात वाढतील की कमी होतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Cotton Market: बाजारातील कापूस आवक कमी झाली का? | Agrowon 05.07.2023 5:49
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. देशातील बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली. मग आज बाजारातील कापूस आवक कशी होती? कापसाला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
टोमॅटो दरात आली तेजी 04.07.2023 6:59
महिन्याभरापूर्वी भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सध्या मात्र दर तेजीत आहेत. त्यामागची नेमकी कारणं काय, राज्यात आणि देशात टोमॅटोची स्थिती कशी आहे, सध्या दरपातळी काय आहे, हा दर किती दिवस टिकून राहील, पाहूयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
हळद बाजारात काय घडतंय ? 03.07.2023 6:33
हळदीचा वायदेबाजार तेजीत आहे. हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटला हळदीचा पुढचा कल काय राहील, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. राज्यातील आणि देशातील प्रमुख हळद उत्पादक राज्यांत पावसाची स्थिती काय आहे, त्याचा दरावर काय परिणाम होईल, पाहुयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी.Turmeric futures market is booming. Farmers are curious about what will be the future trend of turmeric in Hajar market i.e. spot mark...
Chana Market: आवक घटल्याने हरभऱ्याला आधार मिळेल का? | Agrowon 01.07.2023 5:44
देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली. गुणवत्तापूर्ण हरभरा बाजारात नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. आता हरभऱ्यासाठी विचारणा वाढली आहे. पण गरजेप्रमाणे हरभरा मिळत नसल्याची चर्चा आहे. पण मग असं का घडतं? यामुळे हरभऱ्याचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
आनंददायी शेती शक्य आहे का?| Does joyful farming make any sense?| Agri Unplugged 01.07.2023 4:53
शेतीचे भोग संपण्याची सध्या कुठलीच चिन्हं दिसत नाहीत. उलट यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील, असाच सध्याचा रागरंग आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी माझी 'आनंददायी शेती' ची कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे. ही शेती आपलं जगणं आनंददायी, आरोग्यदायी करू शकते, हा माझा अनुभव आहे.
Soybean Market: ब्राझील यंदा किती सोयाबीन निर्यात करेल| Agrowon 30.06.2023 5:55
ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाले. येथील उद्योगांच्या मते ब्राझीलचं उत्पादन १ हजार ५६० लाख टनांवर पोचलं. यामुळे स्वस्त सोयाबीन बाजारात आले. ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त असल्याने यंदा निर्यातही विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. मग ब्राझीलच्या सोयाबीन निर्यातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या सोयाबीनचा बाजार कसा आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Soybean Market: बाजारात सोयाबीन आवकेची स्थिती काय आहे? | Agrowon 29.06.2023 5:33
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. यंदा शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आवकेचा दबाव वाढू दिला नाही. त्यामुळे भावपातळी टिकून दिसते. पण शिल्लक सोयाबीनचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी सध्या आवकेचा हंगाम नसतानाही सरासरीपेक्षा जास्त आहे. मग सध्या सोयाबीनला काय भाव मिळत आहे? बाजारातील सोयाबीन आवक कशी होत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Chana Market: नाफेड विकणार स्टाॅकमधील जूना हरभरा | Agrowon 28.06.2023 5:39
नाफेडची हरभरा खरेदी बहुतांशी ठिकाणी बंद झाली. २७ जूनपर्यंत नाफेडने देशात २३ लाख ४५ हजार टन हरभरा खरेदी केली. यंदा मध्य प्रदेशात सर्वाधिक हरभरा खरेदी झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यातच नाफेडने हरभरा विक्रीचा निर्णय घेतला. मग नाफेडची हरभरा विक्री कधीपासून सुरु होईल? कोणत्या राज्यांमध्ये नाफेड हरभरा विकणार आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Onion Market: कांद्याच्या दरात सुधारणा; किती झाला भाव? | Agrowon 27.06.2023 5:39
देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून कांद्याच्या दरात काहीशी सुधाराणा झाली. पण अद्यापही भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील आठवडाभरापासून देशभरातील कांदा आवक काहीशी कमी झाली. मग कांदा दरात झालेली सुधारणा टिकेल का? कांद्याच्या भावात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Tur Market: तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील का? | Agrowon 26.06.2023 5:37
तुरीच्या दरात २०० रुपयांपर्यंत चढ उतार. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीच्या भावातही क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची निरमाई दिसून येत आहे. मग तुरीच्या भावात नरमाई का दिसत आहे? बाजारात तुरीची आवक वाढली का? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
जंगलात रमलेले शेतकरी कुटुंब| Why does this farmer's family live in the forest?| Agri Unplugged 25.06.2023 10:13
कोकणातील नरवणमध्ये गेलो असताना जंगलात शेतीत राहणाऱ्या सोमण कुटुंबाविषयी कळलं. सोमण पुण्यातली नोकरी सोडून वडिलोपार्जित शेती कसायला म्हणून १९७५ साली ते आले. गावात त्यांना वाळीत टाकण्यात आल्याने, आपल्या जंगलालगतच्या शेतीत एक छोटी झोपडी बांधून ते राहू लागले. हा भाग वस्तीपासून बराच दूर आहे. आजुबाजुला एकही घर नाही. त्यांच्या घरापर्यंत यायचा रस्ता त्या काळात त्यांनी स्वत:च केलाय. When I went to Naravane...
Maize Market: आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे वायदे का पडले? | Agrowon 24.06.2023 5:39
देशातील बाजारात मक्याचे भाव सध्या दबावातच दिसत आहेत. मक्याला बहुतांशी बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच दिवसात मका वायद्यांमध्ये मोठी घसरण झाली. मग देशातील मका बाजार दबावातच का आहे? मका बाजाराला आधार मिळू शकतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
देशात तुरीचा पुरवठा कमीच राहण्याची शक्यता | Agrowon 23.06.2023 5:52
देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या देशात तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नानंतरही भाव कमी होण्याचं नाव घेईना. सरकारने शेतकऱ्यांनी तूर लागवड वाढवावी यासाठी हमीभावाने खेरदीच्या नियमात बदल केले. हमीभावातही वाढ केली. पण आतापर्यंत तुरीची लागवड पिछावडीवर आहे. मग याचा बाजारावर काही परिणाम होईल का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅड...
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos