Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Cotton Market: कापूस वायद्यांमध्ये किती सुधारणा झाली? | Agrowon 11.08.2023

देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली. मग बाजारात कापसाला काय भाव मिळाला? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांद्याच्या भावात आणखी वाढ होईल का? | Agrowon 10.08.2023

जुलै महिन्यापर्यंत बाजारातील आवक जास्त राहून कांद्याचे भाव दबावात आले होते. त्यातच मालाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा विकावाच लागत होता. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. पण मागील आठवडाभरात कांदा आवक वाढलेली असतानाही भाव वाढत होते. मग आतापर्यंत कादा भावात किती वाढ झाली? कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजाराचं चित्र काय राहू शकतं? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमध...

Soybean Market: वाढलेल्या पेरणीचा सोयाबीन बाजारावर दबाव येईल? | Agrowon 09.08.2023

सोयाबीन बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भाव टिकताना दिसत नाहीत. मग सोयाबीनच्या भावात चढ उतार का सुरु आहेत? अमेरिकेत काल भाव पडल्यानंतर आज का वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापूस भावात किती वाढ झाली? | Agrowon 08.08.2023

देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात काहीशी वाढ दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापूस दर वाढले आहेत. मग कापूस दरात नेमकी किती वाढ झाली? वायद्यांमध्ये आज काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market : भारतातील तूर लागवडीची स्थिती काय?  | Agrowon 07.08.2023

आफ्रिकेतील तूर काढणी सुरु झाली. पुढील महिन्यापासून ही तूर आपल्या बाजारात दिसेल. सरकारही तूर आयातीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मग याचा देशातील तूर बाजारावर काही परिणाम जाणवतो का? गेल्या आठवड्यात तुरीचा बाजार कसा राहीला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

टोमॅटो आणि पक्षपाती मिडिया| Tomato and bias media | Agri Unplugged 06.08.2023

सहा महिने टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते, ५० पैसे किलोने विकले जात होते, हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा सरकारने हे टोमॅटो किफायतशीर भावात विकत घ्यावेत, किमान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं तुम्हाला वाटलं का? कितीतरी टोमॅटो उत्पादक टोमॅटोच्या या जुगारात बरबाद झालेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर कशाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने...

Wheat Market: कापूस वायद्यांमध्ये किती वाढ झाली | Agrowon 05.08.2023

देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्तच दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव वाढला. यामुळे दरात चढ उतार दिसत आहेत. मग कापूस दराची स्थिती काय होती? वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Wheat Market: केंद्र सरकारवर गहू आयातीवर वेळ आली का? | Agrowon 04.08.2023

देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून गव्हाचे भाव चांगलेच वाढले. सरकारने स्टाॅक लिमिट लावूनही बाजारातील पुरवठा वाढला नाही. तसेच सरकारकडे गव्हाच्या स्टाॅकची माहिती कमी आली. मग किती टन गहू सरकारच्या रडारबाहेर आहे? सरकारकडे किती टनांची नोंद झाली? गव्हाचे भाव सरकारला कमी करता येतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: भारताला तूर आयात वाढवता येईल का? | Agrowon 03.08.2023

देशात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. त्यातच देशातील तूर लागवड गेल्यावर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. याचा तूर बाजाराला मजबूत आधार मिळाला. यामुळे सरकारने मोझांबिकमधून तूर आयात वाढविण्यासाठी कंबर कसली. मग सरकार मोझांबिकमधून तूर आयात वाढीसाठी कोणते प्रयत्न करत आहे? आयात वाढल्यास देशातील बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon 02.08.2023

जिऱ्यातील तेजीला चांगला आधार आहे. मागील महिनाभरातच जिऱ्याच्या भावात १३ टक्क्यांची सुधारणा झाली. बाजारातील आवक कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. मग सध्या जिऱ्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांदा बाजाराला दराचा आधार मिळेल का? | Agrowon 01.08.2023

देशातील बाजारात मागील तीन आठवड्यांपासून कांद्याचा बाजार स्थिर दिसतो. जून महिन्यापासून कांदा दरात काहीशी सुधारणा दिसली होती. पण जुलै महिन्यात कांदा भाव स्थिर दिसले. मग जुलै महिन्यात कांदा दरातील सुधारणा का थांबली? पुढील काळात कांद्याचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Wheat Market: गव्हाचे भाव नेमकं कशामुळे वाढले? | Agrowon 31.07.2023

देशातील बाजारात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे. सरकारने निर्यातबंदी आणि स्टाॅक लिमिट लावल्यानंतर देशात गव्हाचे भाव स्थिर दिसत होते. त्यातच सरकारने स्टाॅकमधील गहू विकण्यासही सुरुवात केली. यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव स्थिर दिसू शकतात, अशी आशा होती. पण बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाली. मग असं का घडतंय? गव्हाचे भाव कितीपर्यंत वाढले? पुढील काळात दरातील वाढ टिकेल का? याची माहिती तुम्हाला आ...

अन्नात विष येते कुठून?|How is food contaminated with the toxic elements?| Agri Unplugged 30.07.2023

आपण कीटकनाशकांच्या विषारी जाळ्यात अडकलो आहोत. त्याला फक्त शेतात फवारलेली कीटकनाशके आणि खते जबाबदार नाहीत. काढणीपश्चात प्रक्रिया, साठवणुक, खाद्यपदार्थ प्रक्रिया, घरातली पेस्ट कंट्रोल अशा अनेक मार्गांनी ही रसायने आपल्या अन्नात येतात. Increasing amount of toxic chemicals in food is a serious concern. Only pesticides and fertilisers are not responsible for it. These chemicals enter our food in many wa...

Tur Market: देशातील तूर लागवड किती हेक्टरवर पोचली? | Agrowon 29.07.2023

देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. आजही बाजारातील आवक कमीच होती. बाजारातील आवक वाढीसाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. पुढील महिन्यात आफ्रिकेतील बाजारात नवा माल येईल. मग देशात आयात वाढेल का? या आयातीचा तूर बाजारावर काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी. याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: भारत जुलैमध्ये विक्रमी खाद्यतेल आयात करणार? | Agrowon 28.07.2023

भारत जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर भारतात आयात वाढली. जुलै महिन्यातही देशात मोठी आयात होण्याची शक्यता आहे. पण सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता भारताच्या आयातीचा काय परिणाम होऊ शकतो? सोयाबीनला याचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Cotton Market: कापूस दरातील सुधारणा टिकेल का? | Agrowon 27.07.2023

देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले आहेत. दरात आज काहीसे चढ उतार दिसले. पण भावपातळी घटली नव्हती. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग आज कापूस दराचं चित्र काय राहीलं? देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव काय होते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Rice Market: तांदळाचे भाव आणखी कमी होतील का? | Agrowon 26.07.2023

भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली. पण देशातील बाजारात तांदळाचे भाव कमी झाले आहेत. मग देशात तांदळाचे भाव किती कमी झाले? आंतरराष्ट्रीय बाजारात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापूस भाव कशामुळे वाढले? | Agrowon 25.07.2023

देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून कापसाचे भाव दबावात होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने कापूस विकला. आता बाजारातील कापूस आवकही घटली आहे. त्यातच मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसून आली. मग कापसाच्या भावात कशामुळे सुधारणा झाली? कापसाला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदाही घटणार? | Agrowon 24.07.2023

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा टिकून होती. देशातील बाजारात मात्र सोयाबीन दबावातच आहे. मात्र अमेरिकेतील सोयाबीन पिकाला फटका बसल्याने यंदाही उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. मग अमेरिकेत यंदा सोयाबीनचा पुरवठा कसा राहू शकतो? सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात ग्रामीण महाराष्ट्र| Trap of microfinance| Agri Unplugged 23.07.2023

ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स संस्थांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत.  या संस्था गरीब कुटुंबांना, गरजूंना १४ ते २६ टक्के दराने कर्जवाटप करतात. शिवाय कर्जाचे हप्ते थकल्यास चक्रवाढ व्याज लावण्याचे हक्क त्यांनी स्वत:कडे राखीव ठेवलेले असतात. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात बऱ्याच वेळा ह्या फायनान्स संस्था २४ ते २६ टक्क्याने कर्ज देतात...

Turmeric Market: हळदीची लागवड कमी राहण्याचा अंदाज | Agrowon 22.07.2023

देशात मागील दीड महिन्यापासून हळदीच्या दरात चांगली वाढ झाली. राज्यासह महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये जून महिन्यात पावासाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हळद लागवडीवर परिणाम झाला. यामुळे हळदीच्या दरातील तेजी वाढली. मग हळदीचे भाव किती वाढले? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

Onion Market: कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील का? | Agrowon 21.07.2023

देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त दिसली. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसून आली. मग आज बाजारातील कांदा आवक कशी होती? कांद्याला कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक दर मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: सोयाबीनचे भाव टिकतील की कमी होतील? | Agrowon 21.07.2023

सोयाबीनच्या दरात सकाळपासूनच चढ उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात झालेली सुधारणा आज दुपारपर्यंत कमी झाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत जवळपास एक टक्क्याने कमी झाले होते. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे कितीवर होते? देशात सोयाबीनला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: तुरीचे भाव आणखी किती काळ टिकून राहतील? | Agrowon 19.07.2023

देशात तुरीचे भाव वाढलेले आहेत. आता सणांचा काळ सुरु होणार आहे. तूर डाळीचे भावही महागल्याने सरकार बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सणांच्या काळात तूर डाळीचे भाव वाढल्यास सरकार स्टाॅकमधील तूर मिलर्सना विकू शकते. सरकारने काही राज्यांमध्ये स्टाॅकमधील तूर विकण्यास सुरुवातही केली आहे. मग सरकारने आतापर्यंत किती तूर आयात केली? तुरीला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Tomato Market: देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय? | Agrowon 18.07.2023

टोमॅटोच्या दरातील तेजी बाजारात नवनवीन उच्चांक गाठत आहे. टोमॅटोच्या भावात झालेली वाढ केवळ टिकूनच नाही तर दरात सतत वाढ दिसून येत आहे. बाजारातील आवक कमी असल्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? बाजारात टोमॅटोची आवक कशी होतेय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos