BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categoria

Science

Site do podcast

www.bbc.co.uk

Último episódio

8 de mai de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्प भारताच्या कामी येऊ शकतो? 17.06.2023

दिवस मान्सूनचे आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यातले काही जिल्हे अगदी भर पावसातही अनेकदा कोरडे राहतात. बेसुमार वृक्षतोड, अतिचराई, शेती, औद्योगिकरण अशा अनेक कारणांमुळे राज्याच्या 44.93 टक्के भागाचं तर भारताच्या 23 ते 29 टक्के भागाचं वाळवंटीकरण होत आहे. 2017 साली इस्रो आणि स्पेस अप्लिकेशन सेंटर यांच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली होती. परिस्थिती सुधारण्यासाठी व...

महिला आणि पुरुष म्हणून जगण्यात नेमका काय फरक पडतो? गोष्ट दुनियेची BBC News Marathi 10.06.2023

गोष्ट दुनियेची मध्ये आज याच विषयावर आपण बोलणार आहोत की स्त्री आणि पुरुष दोन्ही रूपांत जगण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींकडून आपण काय शिकू शकतो? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi 03.06.2023

28 मे २०२३, दिल्लीचा शाहबाद डेअरी परिसर. एका तरुणानं एका अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडियो व्हायरल झाला. त्यात तो तरूण त्या मुलीवर सपासप वार करताना दिसतोय आणि आसपास येजा करणाऱ्यांपैकी कोणी त्याला थांबवत नाही की पोलिसांना कळवत नाही. ही हत्या कोणी का रोखू शकलं नाही? असा प्रश्न लोक आता विचारतायत. खरंतर गुन्हा घडत असताना किंवा तो घडण्याआधीच गुन्हेगाराला रोखण्याच्या घटना क्वचि...

तुर्कीच्या निवडणुका या देशासाठी आणि आर्दोआन यांच्यासाठी का निर्णायक ठरू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 27.05.2023

6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कस्तान अर्थात तुर्कीला एकामागोमाग एक दोन विनाशकारी भूकंपांचा धक्का बसला. गावंच्या गावं उद्ध्वस्थ झाली, सगळं होत्याचं नव्हं झालं. त्या भुकंपात पन्नास हजार जणांचा मृत्यू झाला होता आणि तीस लाखांहून अधिकजण बेघर झाले होते. अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं. इमारतींचा दर्जा आणि बांधकाम करणाऱ्यांना सरकारनं दिलेल्या कंत्राटांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आर्दोआन यांनी मान्य क...

आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 20.05.2023

जगात कुठेही गेलं की काही गोष्टी कायम असतात - युद्ध, चेंगराचेंगरी, भुताच्या गोष्टी आणि अपयशाची भीती. ही भीती प्रत्येकाला वाटत असते, कशा ना कशाची भीती. माणसाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते आणि भीतीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे का? आपण कुठवर घाबरणं योग्य आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 13.05.2023

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा अमेरिकेच्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वापर केला जाईल, अशी चिंता व्यक्त केली जाते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेल्या गोष्टी मतदारांच्या लहान लहान गटांना त्यांच्या प्रोफाइलनुसार पाठवल्या जाऊ शकतात. यासाठी आता मोठ्या तंत्रज्ञांचीही गरज राहिलेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जनरेटिव...

राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ कसं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 06.05.2023

सप्टेंबर 2022. राणी एलिझाबेथ द्वितिय यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 24 तासांच्या आत किंग चार्ल्स तृतrय यांचं राजा म्हणून पहिलं भाषण टीव्हीवर प्रसारित झालं. यासोबत राणींचे पुत्र हे ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल या 56 देशांच्या संघटनेचे प्रतीकात्मक प्रमुखही बनले. त्यातल्या 15 देशांचं राष्ट्रप्रमुखपदही चार्ल्स तृतीय यांच्याकडेच आलं आहे. पण यातल्या काही देशांना ब्रिटिश राजघराण्य...

क्लाऊड स्टोअरेजची कमतरता कधी भासेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 29.04.2023

हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत दूरच्या एका डेटा सेंटरमधून स्ट्रीम होतो आहे. अगदी तसंच जसं तुम्ही ओटीटीवर एखादी फिल्म बघताना होतं. इंटरनेटवरचे तुमचे फोटो आणि व्हीडियो पाहता ना, तेसुद्धा अशा एखाद्या डेटा सेंटरच्या सर्व्हरवर स्टोर केलेले असतात. या डेटा सर्व्हर्स आणि सेंटर्सना क्लाऊड स्टोरेज म्हटलं जातं आणि इथे साठवलेला डेटा म्हणजे माहिती इंटरनेटद्वारा मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवर पाहता येते. तुम्ही तुमच...

सौदी अरेबियाच्या कंपन्या IPL किंवा महाराष्ट्रात इतक्या का दिसतायत? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 22.04.2023

IPLचे सामने पाहताना तुम्हाला 'व्हिजिट सौदी' आणि 'सौदी अरामको'च्या जाहिराती दिसल्या असतील. अचानक सौदी अरेबियाला भारतीय क्रिकेटमध्ये रस कुठून आला, असा प्रश्नही पडला असेल. याचं उत्तर आजच्या गोष्ट दुनियेची मधून तुम्हाला मिळू शकेल... 10 मार्च 2023 रोजी सौदी अरेबिया आणि इराण या दोन देशांनी एकमेकांमधले संबंध, व्यवहार पुन्हा सुरु करण्याचा करार केला. भारताचं या दोन्ही देशांशी आर्थिक, ऐतिहासिक आणि राजनैतिक...

व्हिटॅमिनच्या गोळ्या जगभरातल्या लाखो लोकांच्या आयुष्यात कधी आणि कशा आल्या? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 15.04.2023

आज जगभरात दररोज लाखो लोक व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. गेल्या शंभर वर्षांत जग खूप बदललंय, आणि या व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी हे जग बदलाना पाहिलंय. 100 वर्षांत ही व्हिटॅमिन गोळ्यांची बाजारपेठ अब्जावधी डॉलर्सची बनली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन्सचं योगदान मोठं मानलं गेलं आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणं आवश्यक आहे का? तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्न...

डिझाईनर बेबीज जन्माला घालणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 08.04.2023

2018च्या नोव्हेंबरमध्ये हे जियान क्वे नावाच्या एका चिनी शास्त्रज्ञाने हाँगकाँगमध्ये घोषणा केली की त्यांनी दोन न जन्मलेल्या मुलींच्या DNAमध्ये बदल केले आहेत. त्या मुली आज चार वर्षांच्या असाव्यात. पण क्वे यांच्या या दाव्याने तेव्हा जगभरात खळबळ उडाली. अनेक शास्त्रज्ञांना धक्का बसला, राजकारण्यांनी या प्रयोगाचा निषेध केला. त्यानंतर क्वे यांना चीनने तीन वर्षांचा तुरुंगवास आणि सुमारे साडेतीन कोटी रुपयांच...

कैलासासारखा स्वतःचा वेगळा देश स्थापन करायला काय लागतं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 25.03.2023

धर्मोपदेशक नित्यानंदच्या युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास (युएसके) या स्वघोषित देशाची प्रतिनिधी असल्याचं सांगत एका महिलेनं संयुक्त राष्ट्रांच्या एका चर्चासत्रात सहभाग घेतला. तेव्हापासून हा नित्यानंद आणि त्यांनं स्थापन केलेला देश चर्चेत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? असं कुणीही संयुक्त राष्ट्रात जाऊ शकतं का आणि स्वतःचा देश स्थापन करू शकतं का? ऐका संपूर्ण गोष्ट दुनियेची इथे - मूळ निर्मिती - द इन्क्वायरी बी...

व्लादिमीर पुतीन युक्रेनवर नव्याने कसा हल्ला करू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 18.03.2023

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वर्षभरापूर्वी युक्रेनवर हल्ला केला होता. त्यांनी याला ‘विशेष लष्करी मोहीम’ म्हटलं होतं. गेल्या बारा महिन्यांत या युद्धात रशियाचे सुमारे दोन लाख सैनिक मारले गेले आहेत. गेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीला रशियन सैन्याने ज्या शहरांवर हल्ला केला होता, त्यापैकी अनेक शहरं युक्रेनियन सैन्याने पुन्हा ताब्यात घेतली. गेल्या फेब्रुवारीमध्ये राजधानी कीव्ह काबीज करण्यात रशियाला...

फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 11.03.2023

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अनब्लॉक करण्याच्या फेसबुकच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. फेसबुकवर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या दररोज फेसबुक वापरते आणि हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सातत्याने वादात राहिलाय. पण फेसबुकसमोर अनेक आव्हानं आहेत. आणि अमेरिकेत होणारी पुढची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फेसबुकसाठी खरी कसोटी ठरू शकते. तर यंदा गोष्ट दुनियेची...

चीन विरुद्ध भारत ही 21व्या शतकातली सर्वांत मोठी स्पर्धा असेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 04.03.2023

भारत आणि चीन जगातले दोन सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत – आणि या शतकात बहुदा या जगातल्या दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असतील. तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना पण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की चीन विरुद्ध भारत ही 21व्या शतकातली सर्वांत मोठी स्पर्धा असेल का? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर. संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर...

तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 25.02.2023

वर्ष 2023, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी आठ वाजता राजधानी काबूलचं लष्करी विमानतळ एका मोठ्या बॉम्बस्फोटाने हादरलं. हा परिसर काँक्रीटच्या भिंती आणि काटेरी तारांनी संरक्षित होता, तरीही हा घटना घडली. या बॉम्बस्फोटाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, पण अनेक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे. हा अफगाणिस्तानातला ताजा दहशतवादी हल्ला आहे, पण 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अशा...

युक्रेन अमेरिका, युरोपच्या मदतीने कधीपर्यंत रशियाविरुद्ध लढू शकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 18.02.2023

रशियाने युक्रेनवर हल्ला करून आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होतंय. अनेक शहरं उद्ध्वस्त झाली, हजारो लोकांचा जीव गेला आणि लाखो विस्थापित झालेत. पण युद्ध अजूनही सुरूच आहे. आणि या युद्धात रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांना शस्त्रास्त्र पुरवावी, असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की करत आहेत. कारण त्यांची लष्करी वाहनं आणि शस्त्रास्त्र संपत चालली आहेत. आता रशियाचा सामना करायला युक्रेनला पाश्चिमा...

कुणी सुसाईड बाँबर का बनतं? धर्मासाठी की पैशांसाठी? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 11.02.2023

30 जानेवारी 2023 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये पोलीस लाइन्स भागात एका मशिदीत नमाजच्या वेळी एक जोरदार स्फोट झाला. यात अनेकांचा मृत्यू झाला. पेशावर पोलिसांचा प्राथमिक अंदाज बरोबर होता – तो स्फोट तिथे मोटरसायकलवर आलेल्या एका व्यक्तीने घडवून आणला होता. या स्फोटात तोही मारला गेला होता. म्हणजे तो एक सुसाईड बाँबर होता. पाकिस्तानात एका सुसाईड बाँबरने घडवून आणलेला हा पहिला स्फोट नव्हता. यापूर्वीही पाकिस्त...

मायक्रोचिप्सच्या निर्मितीत भारत चीनला पर्याय बनू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 04.02.2023

ऑक्टोबर 2022 मध्ये जगातील काही मोठ्या कार उत्पादकांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली. स्वीडनच्या व्होल्वो कंपनीने घोषणा केली की ते त्यांचा एक कारखाना आठवड्याभरासाठी बंद करतायत. जपानच्या टोयोटानेही त्यांचं उत्पादनाचं लक्ष्य कमी केलं. याचं कारण त्यांच्या गाड्यांची मागणी कमी झाली होती, असं नाही. उलट या गाड्या बनवायला लागणाऱ्या एका महत्त्वाच्या पार्टचा मोठा तुटवडा भासत होता. हा भाग म्हणजेच मायक्रोचिप. को...

या देशांमध्ये जाऊन नागरिकत्व मिळवणं सोपं आहे कारण... BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 28.01.2023

कॅनडामध्ये लोकांची कमतरता आहे, काम करणाऱ्या लोकांचीही. या समस्येचा सामना करायला, कॅनडाने 2025 पर्यंत रोजगारासाठी स्थलांतरण करू पाहणाऱ्या कुशल लोकांची संख्या प्रतिवर्ष 500,000 ने वाढविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आणि फक्त कॅनडाच नाही तर इतर देशांमध्येही कुशल कामगारांची कमतरता भासतेय. त्यामुळेच तुमचेही काही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक कॅनडामध्ये अनेक वर्षांपासून असतील. तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची...

भूकंपांमुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 21.01.2023

2016ची ही गोष्ट. तैवानच्या तायनान शहराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती. पण तरीही इमारती अक्षरशः डोलताना दिसल्या होत्या, आणि एकूण 116 लोकांचा मृत्यू झाला. 2022च्या जूनमध्ये अफगाणिस्तानात 6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान एक हजार लोकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2021 मध्ये हैतीमध्ये 7.2 तीव्रतेच्या भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक लोक मरण पावले. गेल्या दोन दशकांत भूकंपामुळे लाखो लोकां...

समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 14.01.2023

जानेवारी 2014. फिजीमधल्या वुनिडोगोलोआ गावासाठी तो एक दुःखाचा दिवस होता. समुद्राच्या वाढत्या पातळीखाली अनेक वर्षं हळूहळू बुडत गेल्यानंतर, अखेर पॅसिफिक महासागरातील हे पहिलं बेट ठरलं, जिथल्या 1,415 रहिवाशांचं दोन किलोमीटर दूर एका उंच भूभागावर पुनर्वसन करण्यात आलं. समुद्राच्या पुरापासून वाचण्यासाठी इथे उंच ठिकाणी घरं बांधण्यात आली होती. पण आठ वर्षांनंतर फिजीमधील परिस्थिती बिकट झाली. फिजी सरकारने आता अ...

कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 07.01.2023

2022 हे वर्षं कोव्हिडवर मात करणारं वर्ष म्हणून साजरं केलं जात होतं. गेल्या वर्षभरात आपण मास्कविना पुन्हा जगायला, गर्दीत निर्धास्त जायला सुरुवात केली. पण ते वर्षं सरता-सरता पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला जाऊ लागला – की कोरोना परत येणार का? चीनमधली परिस्थिती, त्यानंतर भारत सरकारने टाकलेली पावलं पाहता, कोव्हिड कधी पूर्णपणे गेला नव्हता, हे आपल्याला माहिती होतंच. मग अशात या आरोग्य साथी संपतात तरी कशा?...

2022 मधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा धांडोळा घेणारा विशेष भाग BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 31.12.2022

2022 – या वर्षांत आपण कोव्हिडच्या आरोग्य संकटातून बाहेर पडलो, आणि हळूहळू पुन्हा जगात मिळूमिसळू लागलो. याच दरम्यान अनेक घडामोडींनी जगाचं आणि आपलंही लक्ष वेधलं - रशियाने युक्रेनवर हल्ला केला, आर्थिक विश्वातही डिजिटल क्रांती घडली आणि अंतराळात आपण आणखी दूरवर पोहोचू शकलो. तर आजची गोष्ट दुनियेची खरोखरंच या दुनियेची गोष्ट असणार आहे, ज्यात आपण गेल्या वर्षभरात रमलोय. एकदा थोडक्यात सफर करू या त्या सर्व भागा...

पुतळे अर्थात Statuesना आपण इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 24.12.2022

2020 मध्ये अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये जॉर्ज फ्लाईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मानेवर एका पोलिसाने गुडगा ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूचा राग जगभरात पाहायला मिळाला होता, पण काही ठिकाणी त्याचा राग जुन्या पुतळ्यांवर काढण्यात आला. पुतळ्यांवर का? या निर्जीव, मुक्या पुतळ्यांमध्ये असं काय असतं की लोक ते उभारण्याची मागणी करतात किंवा रोष आणि संताप व्यक्त करताना ते पाडूनही टाकत...

Ouça o podcast गोष्ट दुनियेची no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos