Sakal Media
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
आज Special Podcast | दादांच्या क्लीन चीटला विरोध | Aaj Special SAAM-TV Podcast 07.09.2024 3:46
शिखर बँक घोटाळयाप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात. कारण शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्युहात अडकले आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल? | Aaj Special SAAM-TV Podcast 06.09.2024 6:00
मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण असतानाच माजी खासदार निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, असं विधान निलेश राणेंनी केलंय. कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल? पाहूया स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | नॅनो रोबोटमुळे कॅन्सर पेशींचा नाश होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 05.09.2024 3:32
आता बातमी आहे कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी...नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो...होय, एका शास्त्रज्ञानेच असा दावा केलाय...या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे...नक्की हा रोबोट कसं काम करतो...? कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतो... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | फ्रीजमधील जेवण खाल्लं तर आजारी पडणार? व्हायरल मेसेजचं सत्य काय? | Aaj Special SAAM-TV Podcast 04.09.2024 4:42
तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो... हे आम्ही म्हणत नाहीये तर असा एक दावा करण्यात आलाय... फ्रीजमध्ये जास्तवेळ अन्नपदार्थ ठेवल्याने एक व्हायरस तयार होतो आणि हा व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो. यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने विरोधकांचं टेंन्शन वाढलं? | Aaj Special SAAM-TV Podcast 03.09.2024 3:07
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसंच पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | अवेळी झोपल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका येऊ शकतो? | Aaj Special SAAM-TV Podcast 28.08.2024 5:34
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. मेसेजची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं. पाहुया...
आज Special Podcast | पॅक फूडमुळे हार्ट अटॅक? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? | Aaj Special SAAM-TV Podcast 27.08.2024 4:55
पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र, हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरजमा केली. आमच्या रिसर्चमधून काय सत्य समोर आलंय. पाह...
आज Special Podcast | कॅनडाच्या खाणीत सापडला जगातील दुसरा मोठा हिरा | Aaj Special SAAM-TV Podcast 26.08.2024 2:52
कॅनडाच्या खाणीत सापडला २५०० कॅरेटचा हिरा... १०० वर्षांत आढळलेला सर्वात मोठा हिरा... तो हिरा नेमका कसा आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast|तुमच्या पाणीपुरीत अळ्या तर नाहीत ना? लातूरमधील धक्कादायक घटनेनंतर मोठा खुलासा | Aaj Special SAAM-TV Podcast 25.08.2024 4:03
तुम्ही पाणीपुरी खाताय की अळीपूरी, कारण पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा किळसवाणा प्रकार नेमका कुठे घडलाय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
आज Special Podcast|एक गोळी खाल, तरुण राहाल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? | Aaj Special SAAM-TV Podcast 24.08.2024 5:08
आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरुपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ते पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast| लाडक्या बहिणींमुळे बँकांवर ताण? पैसे काढण्यासाठी बहिणी रांगेत | Aaj Special SAAM-TV Podcast 23.08.2024 5:00
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
आज Special Podcast| विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 21.08.2024 5:06
महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपने केले होते. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast| लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा निवडणुका लांबणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 20.08.2024 4:42
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast| महायुतीत निधीवरून 'फाईल वॉर'? दादांनी विचारला शिंदेंना जाब?| | Aaj Special SAAM-TV Podcast 19.08.2024 5:19
विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट..
आज Special Podcast|देशात समान नागरी कायदा? लाल किल्ल्यावरील भाषणात Narendra Modi यांचा निर्धार| | Aaj Special SAAM-TV Podcast 18.08.2024 3:52
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट...
आज Special Podcast| भारताने बनवली डेंग्यूची लस? स्वदेशी लस येणार, डेंग्यू हद्दपार होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 17.08.2024 2:50
डेंग्यूनं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना डेंग्यूविरोधी स्वदेशी लस विकसित केली जातेय. मात्र ही लस कुठे बनवली जातेय. या लसीची वैशिष्ट्यं काय आहेत. यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट...
आज Special Podcast | म्हाडाची घरं कोटींमध्ये? सर्वसामान्यांना परवडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 16.08.2024 3:16
म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | मुलींच्या लग्नाचं वय कमी होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 15.08.2024 4:02
एकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | उद्धव ठाकरे सीएमपदाचा चेहरा नाहीत? | Aaj Special SAAM-TV Podcast 14.08.2024 3:54
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | वजन घटवलं आयुष्य उद्धवस्त झालं! | Aaj Special SAAM-TV Podcast 13.08.2024 5:52
वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | चंदामामा पृथ्वीपासून जातोय दूर? | Aaj Special SAAM-TV Podcast 12.08.2024 5:06
चंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. भारतासह अनेक देशांनी वेगवेगळ्या चांद्रमोहिमा राबवून चंद्रावरची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast | शिर्डी विमानतळ जप्त करणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 11.08.2024 3:39
शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुली होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast| योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा | Aaj Special SAAM-TV Podcast 10.08.2024 3:49
सरकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठं वक्तव्य केलंय. दुसरीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याचा जयंत पाटलांनी समाचार घेतलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
आज Special Podcast| AI मुळे तुमचीही नोकरी धोक्यात? | Aaj Special SAAM-TV Podcast 09.08.2024 3:22
माणसांची कामं हलकी करण्यासाठी AI तंत्रज्ञान आलं. मात्र हेच तंत्रज्ञान लाखो कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याच AI तंत्रज्ञानाचा पहिला फटका कंम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीच्या 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना बसलाय आणि त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळलीय.पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos