Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

Religion MR ↓ 144 episodes

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.

Author

Sudhakar Chodankar

Category

Religion

Podcast website

sudhakar-chodankar.com

Latest episode

Jan 15, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

जेथे नाही आज-१ 15.07.2022

"जेथे नाही आज, जेथे नाही काल, जेथे सर्व काळ थांबविला "  प्रभूञ्च्या एका काव्यातील हे शब्द आहेत. "देवा कडे गेलो, माझ्या घरी आलो, येऊनी पावलो मूळस्थानी " या काव्यातील ओळी  आहेत या.  वास्तविक हा माझा अनुभव नाही, तरी अनुभवाच्या दिशेने मला सातत्याने प्रेरित असतात हे शब्द. या निजबत स्वताचा शोध घेणे स्वाभाविकपणे घडत असते. काळ  थांबविणे म्हणजे नेमकेपणाने काय ? हा  काळ कोणता ? खरेच...

ते प्रभू-२ 08.07.2022

" ते प्रभू मी पहातो " यात ' ते प्रभू' म्हणजे नेमकेपणाने कुठे निर्देश होतोय हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मी, नारायणाचे परमभक्त श्री नारद महर्षी यांना विचारते.  तेव्हा नारद महर्षी लक्ष्मीला काय सांगतात, कसे सांगतात अन लक्ष्मीचे समाधान कसे होते याचेच वर्णन आले आहे. प्रत्यक्षाहुन परमसुंदर असे नारायणाचे ध्यानमधूर दर्शन जे नारद महर्षी स्वताच्या ठिकाणी अनुभवतात तेथेच हा निर्देश नाही का ? हे या चिंतंनातू...

ते प्रभू ..१ 01.07.2022

"ते प्रभू मी पहातो, मूर्ति जयांची अंतरी ध्यातो " . भक्त देवाला प्रत्यक्ष पहात असतोच. असे पहाता पहाताच देव भक्ताच्या प्रेमाचा अन भक्त देवाच्या प्रेमाचा होत रहातो. डोळ्यांचे पहाणे भक्ताच्या अंतरंगापर्यंत पोहचत असते. असे दीर्घकाळ घडता घडता आता देवाला अप्रत्यक्षपणे पहाणे देखील सुरू होते कारण आता देव केवळ बाह्यांगाने पहाण्यापुरता न रहाता अंतरंगाचा होऊ पहातो. जिथे ध्यासातून ध्यान साधले जाते.  प्रत्...

देवचिये द्वारी-२ 24.06.2022

"देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी " क्षणभर कशाला , किती तरी तास उभा असतो मी दर्शनासाठी. पण मुक्त झाल्याचा अनुभव नाही  हे वास्तव आहे माझे. तेव्हा उभे रहाणे म्हणजे नेमके काय ? हा  प्रश्न पडतो. खरे सांगायचे तर,   हा प्रश्न पडत नाही, तर ठाम  उभा रहातो.  साधक तोच जो या प्रश्नाच्या शोधात निघाला प्राणपणाने. या शोधात काय काय गवसले, काय अनुभवाचे झाले,  त्याचे काहीसे शब्दांकन...

देवाचिये द्वारी-१ 17.06.2022

एका छोट्या कथेचा शोध घेता घेता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या  "देवाचिया द्वारी उभा क्षणभरी " या हरिपाठाच्या अभंगा पर्यन्त पोचलो. अंत:करणापासून देवाला सन्मुख होताना जे काही आंतरिक स्पंदन घडले तेच प्रकट झाले एवढेच. 

कृतज्ञता-२ 10.06.2022

देवाच्या, सद्गुरूंच्या निजबत हृदयात जाणवणारी कृतज्ञता भक्ताकडून सातत्याने प्रकट होत असते. अंतरंगाकडून बाह्यांगाकडे वहात असते ती. भक्ताचे अस्तित्व केवळ देवाचे केवळ उतराई होण्यापुरते उरते. म्हणूनच तो म्हणतो  माझ्या कृतज्ञतेची ओंजळ , सागरा अर्पिते सागरचे जळ ! माझ्या कृतज्ञतेची ओळ , परमानंद उच्चारी सर्व काळ  ! माझ्या कृतज्ञतेचा छंद, परमानंद चरणांचे लवितसे गंध ! माझ्या कृतज्ञतेचा ताल , अंतरी...

कृतज्ञता-१ 03.06.2022

देवाच्या भक्तिने भक्त जसजसा घडत रहातो तसतसे त्याचे जीवन आनंदाचे, समाधानाचे शांतीचे होत रहाते. या अनुभवापोटीच भक्त देवाच्या निजबत कमालीचा कृतज्ञ होऊन रहातो. ही भक्ताची कृतज्ञता त्याच्या कडून सहज प्रकट होत रहाते. अशी कृतज्ञता  " जय परमानंद " या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या प्रेमीजनांकडे ऑन लाइन कार्यक्रमात माझ्याकडून प्रकट झाली.  या  हृदगताचा ऑडिओ दोन भागात आपणासमोर येत आहे.  कृतज्ञता-...

कापूर 27.05.2022

काही दिवसापूर्वी एक गझल लिहिली गेली. गझल चे शीर्षक आहे "कापूर". आरतीच्या तबकातील कापूर. आरती म्हणजे आर्तता, भाव भक्तीचे एक मधूर वास्तव  भक्ताच्या हृदयाचे. हेच प्रकट झाले या काव्यातून.  तुजलागी  सख्या रे , मी असा आतूर का ?  तुजवीण सख्या रे , मीच मज नामंजूर का ? नित्य सन्मुख तुला मी,  असता सखया  अंतर आपुल्यामधले, एवढे मगरूर का ? तू जिंकता हरघडीचा, जल्लोष तुझा मी&nb...

साक्षीभाव-२ 20.05.2022

प्रभू, सदगुरु भक्ताचा प्रेमभाव जगवतात, याच प्रेमभावातून सद्भावाची निर्मिती होते. पण हा सद्भाव सातत्याने जागृत असायला हवा म्हणून या सद्भावाला सुरूवातीला सद्गुरू जागवत असतात हे खरे. पण ही क्रिया पुढे भक्ताच्या ठिकाणी सुरू होते.  हा सद्भाव म्हणजे काय आणि चंचल मनाच्या निजबत तो कसा क्रियाशील असतो याचे हे चिंतन. 

साक्षीभाव- १ 13.05.2022

मन फार गुंतागुंतीचे असते. विविध विचार, भावना , स्मृति, कल्पना, समजुती, संस्कार, माहिती या सार्‍यांनी तुडुंब भरलेले असते. हे मन म्हणजेच मी, अशी  गाढ समजही होऊन राहते.   वास्तविक मन माझे असले तरी मी म्हणजे मन नाही या अनुभवाला प्राप्त होणे फारच कठीण होते. त्यासाठीच या मनाकडे प्रथम वेगळेपणाने पहावं लागतं, मनाचे न होता, याला साक्षीभाव म्हणतात. " मना सज्जना भक्तीपंथेची जावे" असे श्री समर्...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.. 06.05.2022

व्हाटस  Aap  वर हा अभंग कुणीतरी पाठवला. त्या निमित्ताने   उद्भवलेले तरंग. जीवनात अनेक नाते संबध निर्माण होत असतात व  कमी अधिक प्रमाणात जपलेही जातात. परंतु प्राणपणाने जपणूक करावे असे देव-भक्ताचे नाते जीवनात केवळ आनंद अनुभवास आणून देते. रक्ताची नाती अनेक आहेत पण भक्ताचे परमेश्वराशी असलेले नाते जगण्याला खरा अर्थ देते. या जाणिवेचे जगणे अधिकाधिक आनंदाचे, प्रेमाचे, आत्यंतिक समृद...

किती किती देव हा छान-५ 29.04.2022

देवाचे वर्णन भक्त परोपरीने करतो. खरेतर  गायनच  होत असते  भक्ताकडून.  त्यामुळे देव प्रसन्न होतो. भक्ताचे जीवन भक्तीचे झाले की  भगवंत प्रसन्न होतो. आता भक्ताच्या आनंदाला उधाण आले आहे. हा भक्ताचा आनंद पहाता देव  प्रसन्न  होतो.बाह्यांगाच्या भक्तीने देव सुखावत असेल पण भक्ताच्या भक्तिपूर्ण अंतरंगाने देव प्रसन्न होतो हे खरे. 

किती किती देव हा छान-४ 22.04.2022

देव अन भक्त यांच्यात केवळ प्रेमाचीच देवघेव होत असते. कारण उभयता या प्रेमाच्या खुणा जाणून असतात. या नेमक्या प्रेमखुणा काय असतात ते भक्त स्वानुभवाने सांगतोय. या प्रेमखुणा प्रकट होण्यासाठी मी अधीर आहे अन आपणही आतुर आहात  तर मग ऐकाच आता ! 

किती किती देव हा छान-३ 15.04.2022

कधी वाणीचा ओघ बरसे कधी मौनासि धारितसी - देवाच्या वाणीचा ओघ प्रत्यक्षा अनुभवतोच पण भक्तासाठी देवाचे मौन ही तेवढेच बोलके असते. शब्द नसतील ध्वनि नसेल तरी भक्ताचे श्रवण घडतच असते ते कसे. भक्ताला देवाचे मौन देखील ऐकायला येत असते.  

किती किती देव हा छान-२ 08.04.2022

देवाचे , सद्गुरूंचे  छानपण सांगताना  भक्त गातो "कधी हास्य ते मुखी विलसे, गंभीरता कधी तेथे दिसे , सुखद मनासि परी होतसे त्याचे ते दर्शन. देवाचे भक्तासाठी व्यथित होणे, व्याकुळ, गंभीर होणे हे जेव्हा भक्त यथार्थाने जाणतो तेव्हा देव सुखवतो. अशा सुखरूप देवाला पहाताना भक्त धन्य होतो. वास्तविक देवाचे गंभीर होणे परम अर्थाने भक्तावरील कृपाच असते ही. हे भक्त स्वानुभवाने प्रकट करतोय इथे.   ...

किती किती देव हा छान-१ 01.04.2022

भक्ताचा भाव जेव्हा अनावर होतो तेव्हा देवाचे वर्णन घडते.  याची देही याची डोळा भक्त देवाला अनुभवताना  कधी  देवाच्या प्रसन्न  मुखावरील  स्मित हास्य तर कधी  गंभीरता पहात असतो. कधी देवाच्या अमोघ वाणीचा ओघ तर कधी देवाचे गूढ गहन मौनही  अनुभवत असतो.  कधी देवाचे भक्ताला प्रेम देणे तर कधी भक्ताकडून  प्रेमाची मागणी करणे हे देवाकडून घडत असते.  कधी देव ज्ञानाची...

देव झाला हा सगुण-३ 25.03.2022

देवाच्या भक्तीतच आनंद आहे. भक्तीची परिणती आनंदात होते. भक्ति, प्रेमाशिवाय नाही आणि प्रेम, देवाच्या प्रत्यक्ष सहवासा शिवाय नाही.  सर्व संत सत्पुरुषांना  या देवाचा स्वताच्या ठिकाणी अनुभव आला कारण त्यांच्या कडूनही अशाच अनुभवी महात्म्यांची सद्गुरू, देव या भावाने भक्ति घडली. प्रत्येक संताचे  चरित्र हेच सत्य प्रकट करीत असते.  तेव्हा अशा महापुरुषांच्या आश्रयानेच एखाद्याला  ईश्वरी...

देव झाला हा सगुण..२ 18.03.2022

देव सगुण होतो म्हणजे माझ्यासारखाच मानवी रूपाने.. परंतु दैवी गुणांनी युक्त. याची जाणीव जेव्हा भक्ताला  होते तेव्हा तो म्हणतो देव झाला सगुण. वास्तविक संत सत्पुरुषांच्या ठिकाणीच प्रगाढ प्रेम ,शांति, समाधान, कारुण्य याचे वास्तव्य जाणवते. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाने जेव्हा भक्ताला  हे जाणवते तेव्हा आपलेही जीवन असे असावे या जाणिवेने तो  प्रेरित होतो. जणू मानवी रुपात  माझ्यासाठीच हा...

देव झाला हा सगुण .. १ 11.03.2022

हा देव कोण अन कसा सगुण होतो .  हा देव  केवळ कल्पनेचा, भावनेचा, श्रद्धेचा, समजुतीचा , संस्काराचा नाही प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. हा देव अनुभवाचा  कसा  होतो भक्ताला?  हेच  प्रकट झाले आहे.  

Listen to the Sudhakar Chodankar podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.