Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Ginger Market: आल्याचे भाव कमी का झाले होते? | Agrowon 06.09.2023

आल्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात काहीशी नरमाई आली होती. पण दरात पुन्हा एकदा सुधारणा झाली. राज्याच्या सर्वच बाजारांमध्ये आल्याच्या दरात सुधारणा झाली. मग आल्याचे भाव सध्या कितीवर पोचले? पुढील काळात आल्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: सोयातेलाचे भाव सतत दबावातच का राहीले ? | Agrowon 05.09.2023

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर देशात आयात वाढली. मागील पाच महिन्यांपासून आयातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याचा दबाव देशातील तेलबिया बाजारावर आला आहे. मग सोयातेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे का? सोयातेलाकडून सोयाबीनला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: देशातील कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता | Agrowon 04.09.2023

यंदा जागितक पातळीवर आणि देशातील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे. मग वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? बाजार समित्यांमधील दराची स्थिती काय होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

शेतकरी पावसाची तक्रार का करतात?| Why do farmers complain about the rains ? | Agri Unplugged 03.09.2023

शेतकऱ्यांना हे ही कळतं की, पाऊस काही त्याच्या मर्जीनं पडत वा थांबत नाही. निसर्गापुढे सगळेच हतबल आहेत. कोणी अतिवृष्टीमुळे परेशान आहे तर कोणी पुरेसा पाऊस झाला नाही म्हणून. वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्यांचं जगणं अधिक कठीण होत चाललंय. हतबलतेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. Farmers know that rain does not fall or stop at their will. Everyone is helpless before nature. Some p...

Onion Market: कांद्याचा पुरवठा पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon 02.09.2023

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता. नाफेडच्या खरेदीचाही बाजाराला आधार मिळाला नाही. कारण कांद्याचे भाव दबावातच आहेत. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांद्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: तुरीचा भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती | Agrowon 01.09.2023

देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. तूर, उडीद आणि मुगाचे भाव वाढल्यामुळे हरभराही वाढला. यामुळे तुरीच्या भावाला आणखी आधार मिळाला. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभरा उत्पादनाचे अंदाज यंदा चुकले का? | Agrowon 31.08.2023

सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढले आहेत. हरभरा भाव मागील दोन महिन्यांमध्येच क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. मग हरभरा भाव कितीवर पोचले? पुढे सणांच्या काळात हरभऱ्याचे भाव कमी होतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: देशातील कापूस व्यवहार का थंडावले? | Agrowon 31.08.2023

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील वाढ टिकून आहे. देशातील वायदे आणि बाजार समित्यांमधील भावात मात्र चढ उतार दिसतात. पण देशातील कापूस भावही दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या वाढीवर स्थिर आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत असताना देशातील भाव स्थिर का आहेत? पुढील काळात कापसाला काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळदीचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon 29.08.2023

देशातील बाजारात हळदीचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. चालू हंगामात हळदीची लागवड कमीच आहे. पण मागील काही दिवसांपासून बाजार स्थिरावलेला दिसतो. मग हळदीचा बाजार कशामुळे स्थिरावला? हळदीचे भाव पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापसाची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowon 28.08.2023

वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली आहे. पण बाजार समित्यांमधील कापूस भाव दबावातच आहेत. दुसरीकडे बाजारातील कापूस उलाढाल काहीशी मंदावलेली दिसते. मग बाजारातील कापूस खरेदी विक्री खरचं थांबली का? वायद्यांमध्ये कापूस तेजीत असताना बाजार समित्यांमध्ये दबावात का आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

विकतच्या खतांची गरज संपवणारे संशोधन| Why fertilisers are no more required? | Agri Unplugged 27.08.2023

कोणत्याही मातीत आपण नुसती साखर किंवा स्टार्च जरी घातले तरी मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत फक्त जैवविघटनशील असा सेंद्रिय पदार्थ घालून आपल्या जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढविल्यास त्यांना अन्य कोणतेही खत किंवा सूक्ष्मद्रव्य जमिनीत घालण्याची गरज पडणार नाही.  Even if we add only sugar or starch to any soil, the number of microbes in the soil increases. If farmer...

Onion Market: कांद्याचे बाजारभाव कमी वाढू शकतात? | Agrowon 26.08.2023

सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावून आता एक आठवडा पूर्ण झाला. नाफेडची खरेदीही सुरु झाली. पण कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी कायम आहे. मग कमी झालेले कांद्याचे भाव वाढले का? आज कांद्याला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभरा भाव नेमकं काय वाढत आहेत? | Agrowon 25.08.2023

तूर आणि उडीद भावातील तेजीचा हरभऱ्यालाही आधार मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून हरभरा भावात सुधारणा होत आली. त्यातच नाफेडने खुल्या बाजारात हरभरा विक्री वाढवण्याचा निर्णय घेतला. मग नाफेडच्या विक्रीनंतरही भाव का वाढत आहेत? हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: बाजारातील कापूस आवक वाढली का घटली? | Agrowon 24.08.2023

कापूस बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाच्या भावात वाढ दिसली. देशात बाजार स्थिरावलेला दिसतो. मग सध्या कापसाला काय भाव मिळाला? कापूस बाजाराची स्थिती पुढील काळात काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांद्याची आवक पुढील काळात कशी राहील? | Agrowon 23.08.2023

नाफेडने नगर आणि नाशिक जिल्ह्यात कांदा खेरदी सुरु केली. नाफेड कांद्याला २ हजार ४१० रुपये भाव देत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी उद्यापासून कांद्याची खरेदी सुरु करणार आहेत. मग या सर्व परिस्थितीचा बाजारावर काय परिणाम होत आहे? पुढील काळात कांद्याचा भाव कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापूस बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon 22.08.2023

कापूस बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिर दिसतो. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मात्र काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग सध्या कापसाला बाजार समित्या आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळतोय? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटो बाजारावर आवकेचा दबाव वाढेल? | Agrowon 21.08.2023

टोमॅटोचा बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्यापेक्षा कमी झाले. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोची बाजारातील आवक कशी राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

नेपाळमधील शेतकऱ्यांचे जगणे कष्टाचे पण आनंददायी| Life of farmers in Nepal | Agri Unplugged 20.08.2023

नेपाळमधील ८० टक्के जनता ग्रामीण भागात, डोंगर माथ्यावर राहते. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि जगण्याचा आधार. त्यांच्या घरांची रचना, जागा, राहणीमान, जगणं हे शेतीपूरक, निसर्गपूरक आहे. या शेतीत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं जगणं कष्टाचं आहे. 

Soybean Market: सोयाबीन बाजार दबावातच का दिसतो? | Agrowon 19.08.2023

देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. भावात चढ उतारही दिसत आहेत. पण सोयाबीनच्या भावाला मागील तीन मिहिन्यांमध्ये मोठा आधार मिळालेला नाही किंवा भावात मोठी तेजी आली नाही. मग यापुढील काळात सोयाबीन बाजारात काय स्थिती राहू शकते? सोयाबीन भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Maize Market: मक्याच्या भावात वाढ का होतेय? | Agrowon 18.08.2023

देशातील बाजारात मक्याच्या भावात  मागील काही दिवसांपासून वाढ झाली. दुसरीकडे मागील हंगामात मक्याचे उत्पादन वाढले होते. पण बाजारातील मक्याची आवक सध्या कमी दिसते. मग मक्याच्या भावात किती वाढ झाली? मका दरातील वाढ पुढील काळातही टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापूस भाव आता का वाढत आहेत? | Agrowon 17.08.2023

देशात कापूस लागवड १२१ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पाऊस रुसून बसला. दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत आहे. मग आज कापसाचे भाव कितीवर पोचले? कापूस दरातील सुधारणा टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याचे भाव आणखी किती वाढू शकतात? | Agrowon 16.08.2023

देशात चालू हंगामात जिऱ्याचे भाव दुप्पट झाले. सध्या बाजारात जिऱ्याला ५७ हजार ते ५८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. दुसरीकडे जिऱ्याची लागवड दुप्पट होण्याची शक्यता आहे. मग जिऱ्याच्या भावावर याचा काय परिणाम होईल? दिवाळीत जिरा आणखी किती वाढू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभरा दरातील वाढ टिकेल का? | Agrowon 14.08.2023

हरभरा भावात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली. अगदी महिनाभरापुर्वी दबावात असलेल्या हरभरा भावात देशभरात सुधारणा दिसून आली. मग हरभरा भाव का वाढले? याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का? हरभरा भाव किती वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

शेतकरी आणि कुत्र्याचं नातं अत्यंत जीवाभावाचं| Why dogs are true friends of farmers? | Agri Unplugged 13.08.2023

शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुत्री जीवाभावाची आणि लाखमोलाची असतात. शेतात कुत्र्यांसारखी दुसरी सोबत नाही. इतका सजगपणा, निष्ठा माणसांकडून अपेक्षित नाही. कुत्र्यांना खायला दिलं आणि थोडसं प्रेम दिलं की, ती एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे आपल्या अवतीभोवती फिरत राहतात. Dogs are vital and valuable to farmers. There is no other companion like dogs in the field. Such alertness and loyalty is not expected from humans....

Wheat Market: गव्हाचे भाव आणखी वाढतील का? | Agrowon 12.08.2023

देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली. चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच १ जानेवारी ते १० ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवपास ४८ टक्क्यांनी वाढले आहेत. मग देशात विक्रमी उत्पादन होऊनही गव्हाच्या भावात एवढी वाढ का झाली? गहू वाढीसाठी साठेबाजी हे एकच कारण आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.